सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी Surya Mavala Nahi Tar Nibandh in Marathi

Surya Mavala Nahi Tar Nibandh in Marathi सूर्य मावळला नाही तर…सूर्यासारखे तेज आपल्याला या जगात दुसऱ्या कुणाकडेही दिसणार नाही. आपल्या पृथ्वीवर सूर्य हा एकमेव असा नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत आहे. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. या ऊर्जेचा उपयोग आपण अनेक प्रकारे करून घेऊ शकतो. मानवजातीच्या अस्तित्वासाठी सूर्य मोठी भूमिका बजावत असतो. मग अशा वेळेला हा ”सूर्य मावळला नाही तर…?” जर हा सूर्य मावळला नाही, तर सूर्य उगवणार सुद्धा नाही. रात्र होणार नाही तसेच,  दिवस ही होणार नाही.

सगळीकडे फक्त प्रकाश पसरलेला दिसेल. त्यामुळे आपले नेहमीचे कालचक्र आणि निसर्गचक्र थांबेल. पहाटेचे रम्य वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, थंड हवेच्या झुळुका आपल्याला अनुभवता येणार नाहीत. सूर्य मावळला नाही तर, रात्र होणार नाही त्यामुळे रात्रीच्या अंधारात चंद्र आणि तारे यांची मौज देखील आपणाला अनुभवता येणार नाही.

surya mavala nahi tar nibandh in marathi
surya mavala nahi tar nibandh in marathi

सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी – Surya Mavala Nahi Tar Nibandh in Marathi

सूर्य मावळला नाही तर..

मी मराठी शाळेमध्ये शिकत असताना, आम्हाला मे महिन्यात उन्हाळ्याची सुट्टी मिळायची. आम्ही सर्व विद्यार्थी या सुट्टीची खूप आतुरतेने वाट पहायचो. मला चांगलंच आठवतंय मी सातवीला असताना आम्हाला दरवेळी प्रमाणे मे महिन्यात उन्हाळी सुट्टी मिळाली होती. मी या सुट्टीमध्ये मामाच्या गावी गेले होते.

तिथे उन्हाळ्याचे दिवस नुकतेच चालू झाले होते. त्याठिकाणी पडणाऱ्या कडक उन्हाच्या उकाड्यामुळे जीव नकोसा झाला होता. घराबाहेर किंवा आकाशातील सूर्याकडे नुकते पाहण्याचे सुद्धा धैर्य कुणाला होत नव्हते. सूर्याकडे पाहताना डोळे मिटत होते. रस्त्यावरून फिरताना पायाला भाजल्यासारखा चटका लागायचा, डोक्यावर सूर्याच्या झळा खूप जोरात बसत होत्या, त्यामुळे पूर्ण अंगाची लाहीलाही होत होती.

अशा परिस्थितीत मनात एका प्रश्नाने जन्म घेतला. तो प्रश्न असा होता की एवढे कडाक्याचे ऊन देणारा हा सूर्य इतका तळपतो आहे. हा जर सूर्य दररोज असच तळपत राहिला तर माणसांची बाहेर येजा करन बंद होईल. अशा परिस्थितीत हा ”सूर्य मावळला नाही तर…”

बाप रे ! विचार करूनच अजून घाम सुटतोय.

जेव्हा सूर्य मावळतो, त्या वेळेला सर्व पशु- पक्षी, गुरे- ढोरे आपापल्या घराच्या दिशेने जातात. मग हा सूर्य जर मावळलाच नाही, तर पक्षी आपल्या घरट्यांकडे कसे परतणार ? गुरे – ढोरे आपापल्या घरी कसे जाणार? संध्याकाळच्या वेळी कामावर गेलेली माणसे परत आपापल्या घरी कशी परत येणार?

सूर्य मावळला नाही म्हणजे रात्र होणार नाही, मग रात्र झाली नाही तर आपण कसे झोपणार ? कारण दिवस आणि रात्र यामध्ये काहीच फरक राहणार नाही. आपण दिवसा झोपलो तरी आपल्याला रात्रीच झोप घेतल्यासारखे वाटणारं. पण एक समस्या आपल्याला उद्भवणार ती म्हणजे, रात्री सारखी शांत आणि गाढ झोप नसणार.

त्यामुळे, आपली झोप पूर्ण होणार नाही व आपल्यामध्ये चिडचिडपणा, अस्वस्थता निर्माण होईल. याशिवाय, कधीही सकाळ होणार नाही. त्यामुळे, सकाळचे शुद्ध चैतन्यही आपल्याला  प्राप्त होणार नाही .

आपल्या पृथ्वीवर सुर्य हा एकमेव असा नैसर्गिक ऊर्जा देणारा आणि उष्णतेचा स्त्रोत आहे. सूर्यापासून आपल्याला मिळणारी ऊर्जा ही अमर्यादित आहे. या ऊर्जेचा वापर करून आपण अनेक कार्य करू शकतो. मानवजातीच्या अस्तित्वासाठी सुर्य हा तारा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

सूर्य हा फक्त पृथ्वीवरीलच नव्हे तर, आकाशगंगेतील देखील सर्वांत जास्त ऊर्जा देणारा एकमेव असा स्त्रोत आहे. पण जर एखाद्या वेळी सूर्य मावळलाच नाही तर ! ऐकायला थोडे विचित्र वाटते पण, जर असे खरंच झाले तर ! जर सूर्य मावळला नाही तर सर्व मुलां – मुलींसाठी आनंद देणारी एक चांगली गोष्ट होईल ती म्हणजे त्यांना दिवसभर खेळता येईल.

मला आजही चांगलंच आठवत मी लहानपणी शाळेकडून घरी आले की शाळेचा युनिफॉर्म न काढता, शाळेची बॅग घराच्या दारातच ठेवून , मी माझ्या गावच्या गल्लीतल्या मैत्रिणींसोबत खेळायला जायचे .

संध्याकाळचे सहा वाजले की माझी आई काठी घेऊन मला घरी नेण्यासाठी यायची. जर त्यावेळी सूर्य मावळला नसता तर किती बर झालं असत. मला माझ्या मैत्रिणींसोबत भरपूर खेळता आल असत. माझी आई संध्याकाळ झाली म्हणून घरी बोलवायला आली नसती. त्यामुळे, मी निवांतपणे खेळू शकले असते.

त्यावेळी दररोज न चुकता संध्याकाळ झाली कि माझी आई मला घरात बोलवण्यासाठी मोठमोठ्याने आवाज द्यायची त्यावेळी मला सूर्यावर खूप राग यायचा. याच्यामुळे मला जास्त वेळ खेळता देखील येत नाही अस वाटायचं. म्हणून जर सुर्य मावळला नाही तर आतातरी मला माझ्या मैत्रिणींसोबत मनसोक्त खेळता येईल आणि आई बोलवायला लागली तर तिला मी सांगेन की अजून तर संध्याकाळ झालीच नाही आहे.

अस सांगितल्यानंतर आईला देखील ते पटेल आणि आई मला अजुन थोडा वेळ मैत्रिणींसोबत खेळण्यासाठी परवानगी देईल. खरंतर, संध्याकाळ झाली की पाखरांप्रमाने आपली आईदेखील आपल्या मुलांची शाळेतून घरी येण्याची वाट पाहत असते. तिच्या काळजीपोटी ती मला रात्र होण्याआधी घरी बोलवण्यासाठी आवाज द्यायची.

याशिवाय, जर सूर्य मावळला नाही तर सगळीकडे प्रकाश पसरलेला राहील. ज्यामुळे रात्री लागणाऱ्या विजेचा वापर कमी होऊन विजेची बचत होईल. दिवसभर सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेपासून सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात तयार करता येईल. याशिवाय सगळीकडे सौरऊर्जेचा वापर देखील वाढेल.

कमी किमतीत भरपूर ऊर्जा उपलब्ध होईल. ह्या तर होत्या काही चांगल्या गोष्टी, पण जर सूर्यास्त झाला नाही तर नेहमी उजेड आणि दिवस राहील. ज्यामुळे लोकांना आराम करता येणार नाही. दिवस आहे म्हणून सर्व ठिकाणी बाजार चालूच राहतील आणि लोक देखील नेहमी कामच करत राहतील. ज्यामुळे त्यांचे शरीर थकेल आणि कमजोर व्हायला लागेल.

रात्रीचा चंद्र आणि तारे पाहण्याचा आनंद कुणालाही अनुभवता येणार नाही. सूर्यापासून आपल्याला मोफत ऊर्जा मिळते हे खरे आहे. परंतु जर सूर्य 24 तास आकाशात राहिला तर त्याच्या उष्णतेने पृथ्वीवरील तापमान वाढायला लागेल.

सूर्याच्या उष्णतेने सगळीकडचे तापमान वाढून सर्व सजीव सृष्टी उकाड्याने हैराण होईल आणि घामाने भिजून निघेल. नदीतील, समुद्रातील तसेच, महासागरातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊ लागेल. ज्यामुळे पृथ्वीवरील जलस्त्रोत कोरडे पडतील आणि संक्षेपण प्रक्रिया न झाल्याने पाऊस देखील पडणार नाही. 

परिणामी मनुष्य, पक्षी व प्राण्यांना प्यायला पाणी उरणार नाही. वातावरणात आद्रतेचे प्रमाण वाढायला लागेल. आकाशातील वातावरण जास्तीत जास्त दाट होऊ लागेल ज्यामुळे आकाशात पक्ष्याप्रमाणे भरारी घेणाऱ्या विमानाची वाहतूक आपल्याला बंद करावी लागेल. समुद्रातील आणि नदीतील पाणी सूर्याच्या उष्णतेने आटल्याने आपल्याला बोटीतून प्रवास करता येणार नाही.

अशाप्रकारे, विमान वाहतूक आणि बोट वाहतूक बंद पडून आपल्याला जास्त अंतराचा प्रवास करता येणार नाही, शिवाय पायी चालून देखील इतक्या लांब अंतराचा प्रवास करन सोपं नाही.

जगातील अनेक बाहेरचे देश, त्या देशांतील सुंदर ठिकाणे, अभयारण्ये, प्राचीन वास्तू , वाडे – इमारती अशी बरीच स्थळे आपल्याला सहजासहजी पाहता येणार नाहीत. पर्यटनाच्या आनंदापासून आपल्याला वंचित रहावे लागेल. सूर्य न मावळल्याने पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे झाडे, झुडपे नष्ट होऊ लागतील.

शेतीसाठी सूर्यकिरणांची आवश्यकता असते. झाडाझुडुपांच्या वाढीसाठी सूर्यकिरण अतिशय गरजेचे असतात. परंतु सूर्य न मावळल्याने अतिउष्णतेमुळे झाडे झुडपे जळून जातील. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अडचणी निर्माण होतील. शेतकरी शेतीतून पिके घेऊ शकला नाही तर आपल्याला व प्राण्यांना खायला अन्न मिळणे कठीण होऊन जाईल.

शेती करणे कठीण होईल, परिणामी मनुष्य व प्राण्यांना खाण्यासाठी अन्न उरणार नाही. सूर्याच्या उष्णतेमुळे पर्वतावरील बर्फ वितळू लागेल. या बर्फाचे पाणी मनुष्य वस्तीत शिरेल, ज्यामुळे महापूर येण्याचा देखील धोका संभवेल. थोडक्यात सांगायचे झाले तर सूर्य न मावळल्याने सृष्टीचे पुर्ण चक्रच बिघडून जाईल. मनुष्य जीवन आज जसे आहे त्या पद्धतीने अस्तित्वात राहणार नाही.

परंतु आपल्याला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही, कारण आपली दिनचर्या अशा प्रकारे चुकवायला सूर्य आणि निसर्गातील सगळ्या गोष्टी या मुळीच मानवासारख्या नाहीत. सूर्याचे तसेच, इतर ताऱ्यांचे, दिर्घिकांचे, आकाशगंगेचे आणि पृथ्वी सारख्या अन्य ग्रहांचे अस्तित्व हे मनुष्य जन्माच्या हजारो वर्षांआधीपासून आहे.

या सर्व गोष्टींचे अस्तित्व मनुष्य जीवन नष्ट होईपर्यंत कायम राहील. त्यामुळे मित्रांनो, “सूर्य मावळला नाही तर ,” ही कल्पना सत्यात येणं अशक्य आहे. कारण अस झाल तर संपुर्ण सृष्टीचा विनाश होईल. त्यामुळे आपण सर्वांनी या कल्पनेकडे निर्भयपणे पाहिले तरी चालेल. कारण काहीही झालं तरी सूर्य मावळायचा किंवा उगायचा कधीही थांबणार नाही.

– तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या surya mavala nahi tar nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या surya mavala nahi tar essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि surya mavala nahi tar nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण surya mavala nahi tar MARATHI nibandh या लेखाचा वापर essay on surya mavala nahi tar असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!