गोपाळ गणेश आगरकर माहिती Gopal Ganesh Agarkar Information in Marathi

Gopal Ganesh Agarkar Information in Marathi – Gopal Ganesh Agarkar Biography in Marathi गोपाळ गणेश आगरकर माहिती “इष्ट असेल ते बोलेल साध्य असेल ते करेल”. प्रबोधन कारक महाराष्ट्र घडवण्यासाठी आजपर्यंत अनेक समाजसुधारक उदयास आले. हे समाजसुधारक समाजाचे शुभचिंतक असतात नेहमी समाजाच्या हिताचा विचार करत समाजामध्ये वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणण्याचे काम करतात. असेच थोर समाज सुधारक होते गोपाळ गणेश आगरकर. समाजामध्ये जागृती घडवून आणण्यामध्ये गणेश आगरकर यांचे मोलाचे योगदान आहे. आजच्या लेखामध्ये आपण गणेश आगरकर यांच्या जीवनाविषयी व त्यांनी केलेल्या समाजसुधारणे विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Gopal Ganesh Agarkar Information in Marathi
Gopal Ganesh Agarkar Information in Marathi

गोपाळ गणेश आगरकर माहिती – Gopal Ganesh Agarkar Information in Marathi

 

जन्म

गोपाळ गणेश आगरकर हे साताऱ्याच्या टेंभू या खेड्याचे रहिवासी होते. १४ जुलै १८५६ साली गणेश आगरकर यांचा जन्म झाला. सुरुवातीच जीवन अतिशय मेहनतीने गेलं. गरीब कुटुंब असल्यामुळे शैक्षणिक सुविधा पूर्ण करण्यासाठी अडचणी यायच्या. स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी आगरकर मिळेल ते काम करायचे. इकडची तिकडची कामे करून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं.

अकोला येथून १८७५ मध्ये आगरकरांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालं. त्याच दरम्यान आगरकर बहाड समाचार या वृत्तपत्रात लेखन देखील करायचे. कराड मधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी दाखला नोंदवला. इसवीसन १८७८ मध्ये आगरकरांनी बी.ए ची परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण झाले.

महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे जिंकून किंवा शिष्यवृत्ती मिळवून काढला. १८७९ मध्ये एम.ए करताना गणेश आगरकर यांचा परिचय लोकमान्य टिळकांशी झाली. इसवी सन १८८१ मध्ये इतिहास व तत्वज्ञान या विषयातून आगरकरांनी एम.ए च शिक्षण पूर्ण केलं.

अबूताई फडके यांच्या सोबत १८७७ मध्ये आगरकर यांचा पहिला विवाह झाला. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आगरकर यांनी यशोदाबाई यांच्याशी पुनर्विवाह केला.

समाजसुधारणेची चळवळ

गणेश आगरकर हे थोर समाज सुधारक होते. आगरकरांनी त्यांच्या १५ वर्षाच्या समाजसुधारणेच्या कारकीर्द मध्ये आपले मोलाचे योगदान दिले आहे. समाजाला अधिक प्रबोधन करण्यासाठी समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. आगरकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार, शिक्षकतज्ञ होते.

समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांना आपले शास्त्र बनवलं. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी या वृत्तपत्रांचा आधार घेतला. समाजातील सम-विषमता, स्त्री-पुरुष तुलना, स्त्री शिक्षण या सगळ्या गोष्टींसाठी आगरकरांनी लढा दिला. बाळ गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक यांचा केसरी हे वृत्तपत्र तर सर्वांनाच परिचयाचे आहे.

या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते गणेश आगरकर. आगरकरांना समाजसुधारणेची मशाल हाती घेतली. विष्णुशास्त्री यांनी सुरू केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल ला प्राधान्य देण्यासाठी आगरकर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जाऊन मिळाले. टिळक आणि आगरकर यांनी इंग्रजीतून मराठा आणि मराठी मधून केसरी अशी दोन वृत्तपत्र सुरू केली. आगरकर हे केसरीचे संपादक होते.

पुढे १८८४ मध्ये आगरकरांनी टिळकांच्या साथीदारीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढील वर्षी याच सोसायटी अंतर्गत फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात आली. पुढे या कॉलेजचे प्राचार्य म्हणून आगरकरांनी सेवा दिली. इसवीसन १८८८ मध्ये आगरकरांनी “सुधारक” हे वृत्तपत्र सुरू केलं.

आगरकर हे एक असं व्यक्तिमत्व होतं जे बुद्धीचा वापर करायचे ते आपल्याला पटेल त्याच गोष्टी आपण स्वीकाराव्या फक्त काही ग्रंथांमध्ये लिहिलं गेल आहे म्हणून आपण निर्णय घेणे हे केवळ अयोग्य ठरेल. ते विज्ञान निष्ठ होते रूढी परंपरा ऐवजी त्यांचा विज्ञानावर विश्वास होता. प्रत्येक गोष्टीला एक शास्त्रीय कारण असतं त्यामुळे जुन्या रूढी-परंपरांना मान्यता देणे अयोग्य आहे.

म्हणूनच समाजात आणि लोकांच्या विचाराचे परिवर्तन व्हावे असे त्यांचे मत होते आणि त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न देखील घेतले. वृत्तपत्रातून अनेक लेख लिहून त्यांनी आपलं मत समाजापुढे मांडलं. गणेश आगरकर यांच्या विचारांवर जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बट स्पेन्सर यांच्या विचारांचा पगडा होता. त्यामुळे त्यांचे लेख देखील त्याच्याशी संबंधित पाहायला मिळायचे.

यामुळे मराठा व केसरी च्या चालक मंडळास वाटू लागलं की सामाजिक प्रश्नांपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव तीव्र असली पाहिजे. अगरकर आणि टिळक यांच्यामध्ये काही वैचारिक मतभेद झाले त्यामुळे आगरकर यांना केसरी सोडावं लागलं त्या पुढे जाऊन त्यांनी स्वतःचा सुधारक हे वृत्तपत्र सुरु केले. हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये प्रकाशित व्हायचे.

आगरकरांचे विचार क्रांतिकारक होते आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये परिवर्तन आणण्याच मोलाचं काम आगरकरांनी केलं. जरी ते अल्पायुषी ठरले तरी पंधरा वर्ष आगरकरांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं बहुमुल्य असे योगदान दिलं. समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले परिणामी त्यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला होता.

स्वतःच्या साप्ताहिक वृत्तपत्रांमधून आगरकरांनी आपल्या विचारांच्या पोळ्या शेकल्या. हळूहळू आगरकरांचे विचार जनतेपर्यंत पोहचू लागले आणि समाजामध्ये परिवर्तन दिसून येऊ लागलं. समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी आगरकरांनी बाल विवाह, स्त्री-शिक्षण, केशवपन, भेदभाव, अस्पृश्यता, जुनाट चालीरीती या सारख्या विषयांमध्ये हात घातला.

आगरकरांचे व्यक्तिमत्व म्हणजे उच्च प्रतीची नैतिकता, ध्येय प्राप्त करण्याचा असलेला दृढनिश्चय, अपार साहस, बलिदान या सगळ्यांचा समूह होय. आगरकर यांचे कार्य सर्वांच्या पसंतीस पडत होतं आगरकरांच्या मृत्यूनंतर आचार्य अत्रे यांनी आगरकर यांच्या स्मरणार्थ १९३४ साली “आगरकर हायस्कूल” मुलींना शिक्षण देणारी शाळा सुरू केली.

पुरोगामी विचारांचे आगरकर समाजवादी सुधारणेमधील जहालवादी नेते म्हणून ओळखले जायचे. शेक्सपियर यांच्या हॅम्लेट या नाटकाचा मराठीमध्ये अनुवाद आगरकरांनी विकारविलासीत या नावाने केला. तुरंगामध्ये असताना आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. यासोबतच गुलामांचे राष्ट्र, अलंकार, मीमांसा हे देखील आगरकरांनी लिहिले काही प्रसिद्ध ग्रंथ आहे.

हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी हा महत्त्वपूर्ण लेख आगरकरांनी लिहिला. गुलागिरीचे शस्त्र हा आगरकरांचा महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध ग्रंथ. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे “सुधारक”-कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. महाराष्ट्र संपादक संस्था आदर्श पत्रकारितेसाठी गो ग आगरकर हा पुरस्कार देते.

गोपाळ गणेश आगरकर यांचे साहित्य लेखन

गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेली काही साहित्य खालील प्रमाणे. डोंगराच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस, विकार विलसित हे शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकाच मराठी मध्ये असलेल भाषांतर गोपाळ गणेश आगरकर यांनी केलं आहे. गोपाळ गणेश आगरकर निवडक-लेखसंग्रह. वाक्य विश्लेषण हा वाक्य ग्रंथ गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे. सुधारकातील निवडक निबंध, गुलामगिरीचे शस्त्र हा लेख. गुलामांचे राष्ट्र इत्यादी ग्रंथ व महत्त्वपूर्ण लेख गणेश गोपाळ आगरकर यांनी लिहिले आहेत.

मृत्यू

गोपाळ गणेश आगरकर यांनी समाजाला नवीन आणि पुरोगामी रूप देण्यासाठी अनेक प्रयत्न केले. एक विचारवंत आणि समाज सुधारक म्हणून त्यांची ख्याती आज जगप्रसिद्ध आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी समाजातील विषमतेवर बोट ठेवला. लोकशिक्षण आणि लोक जागृती घडवून आणण्यासाठी त्यांना अनेक परिस्थितीला सामोरे जावं लागलं.

शिवाय लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांसारख्या साथीदारांची साथ मिळाली ज्यामुळे त्यांचा अर्धा प्रवास सुखरूप झाला. आपल्या शिक्षणाचा आणि विचारांचा त्यांनी अगदी योग्य वापर केला. आगरकर यांनी त्यांच्या १५ वर्षाच्या सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर बदल घडवून आणले. ज्या वेळी ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते त्या वेळी ते भारताच्या हक्कासाठी आणि समाजासाठी लढत होते.

आगरकर यांना दम्याचा त्रास होता ज्यामुळे त्यांच्या वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी निधन झालं. पुण्यामध्ये अस्थमा या विकारामुळे त्यांचा निधन झालं. १७ जून १८९५ रोजी आगरकरांचा मृत्यू झाला. एका पर्वाचा अस्त झाला. त्यांचा आजार त्यांच्या कार्याच्या मध्ये आला. आगरकर यांच्या सारखे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलेलं हे आपल्या सगळ्यांचे भाग्य आहे.

त्यांनी घडवून आणलेल्या बदलांचा प्रभाव आज सर्वत्र दिसतो आहे. आज मुलींना शिक्षणाचा हक्क आहे, आज समाजामध्ये पुरुष आणि स्त्री यांच्या मध्ये भेदभाव नाही आहे, बालविवाह, केशवपन यांसारख्या जुनाट रूढी परंपरा आज बंद झाल्या आहेत त्याचे श्रेय आगरकरांना जातं.

आम्ही दिलेल्या gopal ganesh agarkar information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गोपाळ गणेश आगरकर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Gopal Ganesh Agarkar Biography in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of gopal ganesh agarkar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gopal ganesh agarkar information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!