प्रल्हाद केशव अत्रे यांची माहिती Pralhad Keshav Atre Information in Marathi

Pralhad Keshav Atre Information in Marathi प्रल्हाद केशव अत्रे यांची माहिती अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे हे मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज कवी, लेखक, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, शिक्षणतज्ञ, राजकारणी आणि वक्ते होते. कुठलंही क्षेत्र आचार्य अत्रे यांच्या हातून सुटलं नाही. काव्यलेखना पासून ते अगदी राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून संपूर्ण महाराष्ट्र व्यापलं. असे ख्यातनाम आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ आज आपण या लेखामध्ये त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

pralhad keshav atre information in marathi
pralhad keshav atre information in marathi

प्रल्हाद केशव अत्रे यांची माहिती – Pralhad Keshav Atre Information in Marathi

पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे
जन्म१३ ऑगस्ट १८९८
जन्म गावपुण्यातील पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द या छोट्याशा गावामध्ये
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख कवी, लेखक, नाटककार, संपादक, पत्रकार
मृत्यू१३ जून १९६९
टोपणनावकेशवकुमार

जन्म

आपल्या सर्वांचे लाडके आचार्य अत्रे यांचा जन्म पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द या छोट्याशा गावामध्ये १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला. अत्रे यांचं संपूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे असे आहे. केशवकुमार या टोपण नावाने आचार्य अत्रे यांनी साहित्य लेखन केलं. आचार्य अत्रे यांनी स्थायीक ठिकाणा जवळील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते मुंबई आणि त्यानंतर लंडनला गेले.

आचार्य अत्रे यांनी बी.ए, बी.टी, टी.डी या पदव्या संपादन केल्या आहेत. आचार्य अत्रे यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मध्ये देखील महत्त्वाचा सहभाग होता. प्रमुख नेते म्हणून त्यांनी मुख्य भूमिका बजावली. असं म्हणतात आचार्य अत्रे यांच्यामुळेच केवळ संयुक्त महाराष्ट्र मिळालं. साहित्य क्षेत्राकडे वळण्याआधी आचार्य अत्रे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये देखील सेवा दिली आहे.

पत्रकारिता

प्रल्हाद अत्रे यांची कारकीर्द फार मोठी आहे. साहित्य क्षेत्रामध्ये येण्याआधी आचार्य अत्रे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामगिरी बजावली आहे. आचार्य अत्रे आधी पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये होते. महाराष्ट्राचा आवाज बण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा वापर केला. १९२३ मध्ये प्रल्हाद अत्र्यांनी त्यांच पहिल मासिक सुरू केले ज्याचं नाव होतं “अध्यापन”.

यानंतर १९२६ मध्ये “रत्नाकर” मग पुढील तीन वर्षांमध्ये “मनोरमा” १९३५ मध्ये “नवे अध्यापन” हे मासिक सुरू केले. “नवयुग” नावाच साप्ताहिक देखील सुरू केलं होतं. _जय हिंद” व “मराठा” असे दैनिक देखील सुरू केले. आचार्य अत्रे यांची पत्रकारिता मधील कारकीर्द संपल्यावर ते अध्यापना‌कडे वळाले. बराच वेळ त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केलं.

शिक्षक म्हणून त्यांची वाटचाल मुंबई पासून सुरु झाली व मुंबईमध्ये जवळपास अर्धा वर्ष त्यांनी सायन्स सॅंढस्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित विषयाचे शिक्षण दिले. नंतर रॉबर्ट मनी स्कूल मध्ये सेवा दिली. नंतर पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटी शाळे मध्ये १८ वर्ष मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होते. या शाळेचा बहुतांश विकास आचार्य अत्रे यांच्यामुळेच झाला.

पुढे इंग्लंडला जाऊन टीचर्स डिप्लोमा ची डिग्री संपादन केल्यावर राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल या शाळा पुण्यामध्ये स्थापन केल्या. आचार्य अत्रे हे संस्कृत विषयांमध्ये देखील पारंगत होते फोर्टमधल्या भरडा निवास स्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून त्यांनी सेवा दिली होती.

पुढे आचार्य अत्रे यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं. अत्रे यांचं शिक्षण क्षेत्रांमध्ये वर्चस्व होतं शिक्षण क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रमुख कामगिरी केली आहे. प्राथमिक शाळेसाठी नवयुग वाचनमाला तर दुय्यम शाळेसाठी अरुण वाचनमाला ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. मराठी भाषेचे समीक्षक म्हणून देखील त्यांनी कार्य केलं मराठी भाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये पसरावी म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग राबवले.

साहित्य क्षेत्र – Pralhad Keshav Atre Books in Marathi

अनेक वेगवेगळ्या माध्यमांमधून, क्षेत्रांमधून आचार्य अत्रे यांनी आपले मत समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. कधी पत्रकार, कधी शिक्षक, कधी राजकारणी तर कधी एक साहित्यिक म्हणून. त्यांच्या सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे अत्र्यांना आचार्य अशी पदवी देण्यात आली होती. डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली भारताचे माजी राष्ट्रपती होते.

त्यांनी अत्रे यांचं “राईटर अंड फायटर ऑफ महाराष्ट्र” अशा शब्दांमध्ये वर्णन केलं होतं. आचार्य अत्रे यांनी नाट्यसृष्टीला एक वेगळा रूप दिलं. आपल्या लेखणी कौशल्याने एका पेक्षा एक अजरामर नाटके लिहिली. आचार्य अत्रे यांची सर्वच नाटके सुपरहिट होती परंतु त्यात गाजलेलं सर्वात मोठं नाटक म्हणजे “मोरूची मावशी”.

साष्टांग नमस्कार, सम्राट सिंह, लग्नाची बेडी, वंदे भारतम् वीर वचन, शिवसमर्थ, मी मंत्री झालो, ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा, मी उभा आहे, प्रल्हाद, प्रीतीसंगम, बुवा तेथे बाया, पाणिग्रहण, तो मी नव्हेच, पराचा कावळा, जग काय म्हणेल, घराबाहेर गुरुदक्षिणा, उद्याचा संसार, अशी बायको हवी, यासारखी विनोदी आणि सामाजिक दृष्ट्या संदेश देणारी नाटकं अत्रे यांनी लिहिली.

ही सर्व नाटके विनोदाने भरलेली होती ज्याच्या माध्यमातून आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचले. मराठी भाषेमध्ये लेखन करून अत्रे यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. मराठी साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे. काव्य लेखनामध्ये देखील “झेंडूची फुले”, “गीतगंगा” असे काव्यसंग्रह लिहिले. काव्यलेखन करताना ते केशवकुमार हे टोपण नावाचा वापर करायचे.

झेंडूची फुले” हा १९२५ साली लोकप्रिय झालेला कविता संग्रह होता. अत्र्यांचे सुप्रसिद्ध कथासंग्रह देखील उपलब्ध आहेत. “अशा गोष्टी अशा गंमती”, “कशी आहे गम्मत”, “कावळ्यांची शाळा”, “फुले आणि मुले”, “बत्ताशी आणि इतर कथा”. “कऱ्हाचे पाणी” खंड १ ते ५ हे आचार्य अत्रे यांचे आत्मचरित्र उपलब्ध आहे.

आचार्य अत्रे व कवी गिरीश या दोघांनी मिळून संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके यांचा समावेश हल्लीच्या पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमात केला होता. या नंतर निघालेल्या पुस्तकांची तुलना या पुस्तकांशी करता येणे शक्यच नाही असे शिक्षण वर्तुळातील लोकांचे आणि पालक जणांचे मत आहे. “चांगुणा”, “मोहित्यांचा शाप” या आचार्य अत्रे यांच्या कादंबर्‍या आहेत.

साहित्य क्षेत्रामध्ये आचार्य अत्रे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार हाताळले. आचार्य अत्रे यांच्या साहित्या मधून त्यांच्या विनोद बुद्धीचा, सामाजिक बांधिलकीचा, समाजातील सम-विषम गोष्टींचा प्रत्यय येतो. १९३४ मध्ये अत्रे यांनी चित्रपट सृष्टी मध्ये पाऊल ठेवले. नारद नारदी या चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहले होते.

प्रेमवीर या मराठी चित्रपटाची पटकथा आणि बेगुनाह या हिंदी चित्रपटाची पटकथा अत्रे यांनी लिहिली. अत्रे यांनी ब्रँडीची बाटली ह्या चित्रपटाच लेखन केलं होतं. त्याकाळी हा चित्रपट सिनेमा गृहा मध्ये धुमाकूळ घालत होता. या चित्रपटाला भरपूर लोकप्रियता मिळाली. इतकंच नव्हे तर स्वतःची चित्रपट कंपनी सुधा काढली अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या दोन साथीदारांचा सोबत “नवयुग चित्रपट कंपनीचे” उद्घाटन केलं.

साने गुरुजी यांच्या श्यामची आई या कादंबरीचा अत्र्यांनी “श्यामची आई” हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला १९४५ साली “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार” सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पहिलं “सुवर्णकमळ” मिळालं. १९५५ मध्ये महात्मा फुले हा चित्रपट अत्रे यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाऊ रौप्यपदक प्राप्त झालं होतं.

अत्रे हे प्रसिद्ध वक्ते होते. त्यांच्या भाषणातून त्यांनी समाजाबद्दल असलेले त्यांचे मत मांडून महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपलेसे केले होते. महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचण्यासाठी अत्र्यांनी वक्तृत्वाचा वापर केला.

पुरस्कार

अत्रे यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्र कधीच विसरु शकणार नाही. आज जरी आचार्य अत्रे आपल्यासोबत नसले तरी त्यांची साहित्य माला आपल्यासोबत आहे. आजही त्यांनी केलेले साहित्यलेखन बघितले की त्यांचं स्मरण होतं. महाराष्ट्रातील गाजलेले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले. त्यांनी प्रत्येक क्षेत्रांमधून समाजाला नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला.

आचार्य अत्रे यांना विष्णुदास भावे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. आचार्य अत्रे यांच्या नावाने सुरू होणाऱ्या आज महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था सुरू आहेत हा आचार्य अत्रे यांच्यासाठी एक सन्मानच आहे. आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी दरवर्षी त्यांच्या जन्मठिकाणी म्हणजे सासवड येथे अत्रे यांच साहित्य संमेलन भरतं.

आणि या कार्यक्रमांमध्ये अत्रे यांच्या नावाने सुरू केलेले पुरस्कार प्रदान केले जातात. अत्रे यांना फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी आचार्य अत्रे यांना महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचं भरपूर प्रेम मिळालं हा खरा सन्मान आहे.

आम्ही दिलेल्या pralhad keshav atre information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रल्हाद केशव अत्रे यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pralhad keshav atre या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of pralhad keshav atre in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये acharya atre full name Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!