Guava Information in Marathi – Peru Fruit Information in Marathi पेरू या फळाविषयी माहिती पेरू (guava) हे फळ अनेक उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये लागवड केलेले एक सामान्य फळ आहे. या फळाची पहिल्यांदा लागवड म्हणजेच हे फळ मुळचे मध्य अमेरिका, उत्तर दक्षिण अमेरिका, कॅरिबियन आणि मेक्सिको या देशांमधील आहे आणि पेरू, अननस आणि फीजोआ सोलियाना हे एकाच प्रजातींशी संबधित आहेत. पेरू या फळाच्या झाडाची अंडाकृती ते आयताकृती पाने असतात आणि ती सुमारे ७.५ सेंटी मीटर म्हणजेच ३ इंच लांबीची असतात, त्याबरोबर या फळाला पहिल्यांदा चार पाकळ्या असलेली पांढरी फुले येतात.
जी २.५ सेंटी मीटर म्हणजे १ इंच रुंद असतात. पेरू ह्या फळाचा आकार गोलाकार असतो आणि हे फळ ५ ते १२ सेंटी मीटर लांब असते. या फळाची वरचा जो हिरव्या रंगाचा कव्हर असतो तो थोडा कठीण असतो आणि चवीला थोडा कडवट लागतो पण जो आतील गाभा असतो तो पांढऱ्या (काही पेरू फळाचा गाभा लाल देखील असतो आणि हे त्याच्या प्रजातीवर अवलंबून असते) रंगाचा गोड आणि मऊ असतो.
त्याचबरोबर या फळाच्या बिया देखील गाभ्यामध्येच असतात. पेरू या फळाची विशेषता महणजे ह्या फळाचा कोणताही भाग काढून टाकला जात नाही. या फळाची पुनर्लागवड सामान्यता बियाण्यांद्वारे केला जातो, परंतु सुधारित जाती वनस्पतींच्या भागांद्वारे कायम ठेवल्या पाहिजेत म्हणून झाडाची कडक कोरडी लाकूड आणि पातळ साल छाटणी आणि कलम लावण्याच्या पारंपारिक पद्धतींना प्रतिबंध करते.
पेरू फळ माहिती मराठी – Guava Information in Marathi
सामान्य नाव | पेरू |
इंग्रजी नाव | guava in marathi |
वैज्ञानिक नाव | psidium guajava |
रंग | हिरवा |
आकार | गोलाकार |
व्यास | ५ ते १२ सेंटी मीटर |
मूळ | मध्य अमेरिका, उत्तर दक्षिण अमेरिका, कॅरिबियन आणि मेक्सिको |
पोषक घटक | कॅलरी, सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, फायबर आणि शुगर |
पेरू खाण्याचे फायदे – Guava Benefits in Marathi
कर्करोगाचा धोका कमी होतो – reduces risk of cancer
पेरू या फळामध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्याची शक्ती असते म्हणजेच या फळामध्ये लाइकोपीन, क्वेरसेटिन, व्हिटॅमिन सी आणि इतर पॉलीफेनॉल असतात. हे लाइकोपीन, क्वेरसेटिन, व्हिटॅमिन सी आणि इतर पॉलीफेनॉल हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात जे शरीरात निर्माण होणाऱ्या मुक्त रॅडिकल्सला निर्बंध करतात.
त्यामुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत होते. पेरूचे फळ प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले आहे आणि स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंधित करते कारण त्यात लाइकोपीन भरपूर असते.
- नक्की वाचा: पीच फळाची माहिती
दृष्टी सुधारण्यास मदत होते – it helps to improve eyesight
पेरू हे एक असे फळ आहे जे खाल्ल्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. पेरू या फळामध्ये व्हिटॅमिन ए च्या उपस्थितीमुळे, पेरू दृष्टी आरोग्यासाठी बूस्टर म्हणून ओळखले जाते. हे केवळ दृष्टीचा ऱ्हास रोखत नाही तर दृष्टी सुधारण्यास देखील मदत करते. हे मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशनचे स्वरूप कमी करण्यास देखील मदत करू शकते.
पेरू या फळामध्ये असलेला मॅग्नेशियम हे अनेक फायद्यांसाठी उपयुक्त ठरते. मॅग्नेशियम हा असा एक पेरू मधील पोषक घटक आहे जो शरीराचे स्नायू आणि नसा आराम देण्यास मदत करतात. त्यामुळे कसरत केल्यानंतर किंवा ऑफिसमध्ये ताण कमी करण्यासाठी तसेच आपल्या स्नायूंना आराम देण्यासाठी, तणावाचा सामना करण्यासाठी आणि आपल्या शरीरातील चांगली ऊर्जा वाढवण्यासाठी पेरू हे फळ खूप फायद्याचे आहे.
खोकला आणि सर्दी कमी करते – lower cough and cold
पेरू फळांमध्ये सर्वाधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लोह असते आणि हे दोन्ही सर्दी आणि विषाणूजन्य संसर्गापासून प्रतिबंधक करत असल्याचे सिद्ध झाले आहे. कच्च्या आणि अपरिपक्व पेरूंचा रस किंवा पेरू-पानांचा एक काढा खोकला आणि सर्दीपासून मुक्त होण्यासाठी खूप उपयुक्त आहे कारण ते श्लेष्मापासून मुक्त होण्यास मदत करते आणि श्वसनमार्ग, घसा आणि फुफ्फुसांचे निर्जंतुकीकरण करते.
- नक्की वाचा: नोनी फळाची माहिती
हृदय निरोगी राहते – keeps healthy heart
पेरू या फळामध्ये सोडियम आणि पोटॅशियम चे प्रमाण असते आणि या सोडियम आणि पोटॅशियम मुळे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये रक्तदाब नियंत्रित होतो आणि हृदयरोगाच्या विकासास हातभार मिळतो. त्याचबरोबर पेरू ट्रायग्लिसराइड्स आणि खराब कोलेस्टेरॉल (एलडीएल) चे स्तर कमी करण्यास मदत देखील मदत करतात.
रोग प्रतिकारशक्ती वाढवते – immunity booster
पेरू हे व्हिटॅमिन सी चे समृध्द स्त्रोत आहे आणि पेरू या फळामध्ये संत्र्यापेक्षा ३ ते ४ पट व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते आणि व्हिटॅमिन सी हे एकमेव समृध्द स्त्रोत आहे जे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे आपल्याला कोणत्याही आजारापासून लांब ठेवले जाते.
मेंदूसाठी चांगले – good for brain
पेरू या फळामध्ये व्हिटॅमिन बी ३ आणि व्हिटॅमिन बी ६ हे पोषक घटक असतात ज्याला नियासिन आणि पायरीडॉक्सिन या नावांनी देखील ओळखले जाते. जे मेंदूची रक्त परिसंचरण सुधारण्यास, संज्ञानात्मक कार्य उत्तेजित करण्यास मदत करतात.
त्वचेचे सौंदर्य सुधारण्यास मदत करते – improves complexion
पेरू खाल्ल्यामुळे त्वचेची चमक आणि ताजेपणा परत मिळवण्यास मदत होते. पेरू हे व्हिटॅमिन के चा एक उत्तम स्त्रोत आहे, जे त्वचेची विद्रूपता, गडद मंडळे, लालसरपणा आणि मुरुमांच्या जळजळांपासून मुक्त होण्यास मदत करते.
पेरू या फळाचे वेगवेगळे प्रकार – different types of guava
विविध भागामध्ये विविध प्रकारचे पेरू पिकवले जातात. पेरूच्या या जाती एक अद्वितीय पोत आणि चव घेऊन येतात आणि बहुतेकदा या फळाचे त्यांच्या गाभा आणि रंगांनुसार वर्गीकृत केले जातात.
रेड इंडियन पेरू
रेड इंडियन पेरू या फळाची लागवड सर्वप्रथम फ्लोरिडा मध्ये केली गेली होती. हे एक मध्यम ते मोठ्या आकाराचे फळ आहे जे एक मजबूत आणि गोड सुगंध असलेले फळ आहे. या फळामध्ये अनेक लहान बिया असलेली पिवळी आणि गुलाबी रंगाची साल आहे.
गोड पांढरा इंडोनेशियन पेरू
गोड पांढरा इंडोनेशियन पेरू (psidium guajava) हे एक फलदायी पेरूचे झाड आहे जे इंडोनेशियातून आले आहे. झाड गोल आकाराची, पिवळसर हिरव्या फळाची आणि गुलाबी रंगाची गाभा देणारी मोठी फळे देतात. फळांचे अतिरिक्त वजन आणि मजबूत हवेच्या हालचालीला समर्थन देण्यासाठी झाडाची मजबूत मुळे तयार करणे गरजेचे असते आणि झाडाची मंद वाढ होण्यासाठी हलकी छाटणी केली जाते.
अननस पेरू
अननस पेरू ही दक्षिण ब्राझीलची मूळची फुलांची वनस्पती आहे. कोलंबिया, उरुग्वे आणि पूर्व पॅराग्वे या देशांमध्ये फळांच्या निर्मितीसाठी या पेरूच्या जातींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मिष्टान्न, सॅलड, जाम आणि पाई बनवण्यासाठी या प्रकारचे पेरू वापरले जातात त्याचबरोबर हे कच्चे देखील खाल्ले जातात.
- नक्की वाचा: किवी फळाची माहिती
उष्णकटिबंधीय पांढरा पेरू
पेरूच्या या जातीमध्ये पिवळसर हिरव्या फळाची साल आहे ज्यामध्ये क्रीमयुक्त पांढरा गाभा आहे. पेरूची झाडे १५ ते ३० फूटांची परिपक्व उंची गाठू शकतात. पेरू हे फळ भारत, आशिया, दक्षिणपूर्व आशिया, हवाई, आफ्रिका, हाँगकाँग आणि पॅसिफिक उष्णकटिबंधीय भागांमध्ये पिकवले जातात.
पेरू फळामधील पोषक घटक – nutrition value
पोषक घटक | प्रमाण |
कॅलरी | ६८ |
सोडियम | २ मिली ग्रॅम |
पोटॅशियम | ४१७ मिली ग्रॅम |
व्हिटॅमिन सी | ३८० टक्के |
व्हिटॅमिन बी ६ | ५ टक्के |
मॅग्नेशियम | ५ टक्के |
फायबर | ५ ग्रॅम |
शुगर | ९ ग्रॅम |
वरील guava information in marathi language सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि पेरू फळाचे फायदे तोटे आणि त्याची लागवड कशी करावी त्याचबरोबर रोग नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना करावी हे सर्व या लेखातून आपल्याला भेटले आहे. peru fruit information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about guava in marathi हा लेख कसा वाटला व अजून पेरू फळाबद्दल काही राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
amrud in marathi या आम्ही दिलेल्या guava fruit in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
खूपच सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिली आहें 🙏🏻🙏🏻