गुगामल राष्ट्रीय उद्यान Gugamal National Park Information in Marathi

gugamal national park information in marathi गुगामल राष्ट्रीय उद्यान, भारतामधील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यामध्ये असणारे गुगामल नॅशनल पार्क हे वाघांच्यासाठी आरक्षित आणि हे सुंदर राष्ट्रीय उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. हे उद्यान सातपुडा डोंगर रांगांच्यामध्ये वसले आहे आणि या उद्यानाचे क्षेत्रफळ ३६१.२८ किमी आहे आणि या उद्यानाला १९७५ या वर्षी राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी अभ्यांगतांना वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती पाहायला मिळतात त्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात.

या उद्यानामध्ये वाघ, जंगली कुत्रा, बाइसन, सांबर, पँथर, गिलहरी, नीलगाय, माकडे, हरण, फुलपाखरे, मासे, मगरी, काळवीट या सारखे अनेक प्राणी पहायला मिळतात. चला तर खाली आपण गुगामल उद्यानाविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

gugamal national park information in marathi
gugamal national park information in marathi

गुगामल राष्ट्रीय उद्यान – Gugamal National Park Information in Marathi

गुगामल राष्ट्रीय उद्यानाचा इतिहास – history

गुगामल राष्ट्रीय उद्यान हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग ज्याची घोषणा १९७३ – १९७४ या काळामध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून करण्यात आली आणि पुढे १९७५ मध्ये या प्रकल्पाला राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता मिळाली.

उद्यानातील वनस्पती आणि प्राणी – trees and animals

या राष्ट्रीय उद्यानामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती आढळतात आणि वनस्पतीचे आणि प्राण्यांचे वेगळे वर्गीकरण खाली आपण पाहणार आहोत.

प्राणी

या उद्यानामध्ये असणाऱ्या प्राण्यांचे तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केले आहे आणि ते म्हणजे सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्षी यामध्ये वाघ, जंगली कुत्रा, बर्किंग डीयर, चौसिंगा, रीसस, माकड, गोर, हायना, लंगुर आणि नीलगाय या सारखे सस्तन प्राणी या ठिकाणी आहेत,

तसेच कॉमन इंडियन मॉनिटर, इंडियन पायथेन, इंडियन कोब्रा, धामीन या सारखे इतर सरपटणारे प्राणी देखील यामध्ये समाविष्ट आहेत. त्याचबरोबर जे लोक पक्षीप्रेमी आहेत त्यांच्यासाठी देखील हे उद्यान एक उत्तम उद्यान आहे,

असे मला वाटते कारण या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी देखील पहायला मिळतात ज्यामध्ये कॉमन किंगफिशर, काळा पतंग पक्षी, पांढरा घसा असणारा किंगफिशर, रॉक पिजन या सारखे इतर अनेक पक्षी पाहायला मिळतात.

वनस्पती

बांबू आणि सागवान ह्या दोन वनस्पती या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचबरोबर या उद्यानामध्ये एन, साग, कुसुम, भामन, भारतीय मोर, सर्प गरुड, माहुआ, तिवस, मोयन, भारतीय रोलर, घुबड या सारख्या इतर अनेक वनस्पती देखील आहेत.

गुगामल उद्यानामध्ये पाहता येणारी इतर ठिकाणी – other places

गाविलगड किल्ला

गवळी अधिवासी किल्ला म्हणून ओळखला जाणारा गाविलगड किल्ला हा या उद्यानाच्या अंतर्गत येतो आणि हा किल्ला १६७३ चौरस किलो मीटर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे आणि तुम्ही जरी अभयारण्याला भेट दिल्यानंतर हा किल्ला देखील पाहू शकता.

शक्कर तलाव

शक्कर तलाव देखील या अभयारण्याच्या परिसरामध्ये येते आणि हे देवीच्या मंदिराजवळ आहे आणि गाविलगड किल्ल्याला जाण्याच्या वाटेवर आहे.

देवी मंदिर

या उद्यानामध्ये एक देवी मंदिर देखील आहे ज्याला गुहा मंदिर असे देखील म्हणतात कारण हे दगडामध्ये आहे आणि शक्कर तलावातील पाणी हे गुहेच्या छतावर सतत पडत असते.

भीमकुंड

भीमकुंड हा महाभारताशी संबधित असणारा एक कुंड आहे आणि या विषयी असे म्हटले जाते कि भीमाने कीचकाचा वध केल्यानंतर या तलावात हात धुतला होता.

गुगामल उद्यानाविषयी मनोरंजक तथ्ये – facts

  • या उद्यानामध्ये महत्वाच्या झाडांच्या प्रजातीमध्ये एन तिवस, लेंडिया, धवडा, टेकटोना ग्रँडीस, सागवान, बांबू आणि कुसुम हे समावेश आहेत आणि सागवान आणि बांबूची झाडे हि या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.
  • गुगामल राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यामध्ये स्थित आहे.
  • गुगामल राष्ट्रीय उद्यानामधून अनेक नद्या वाहतात त्या म्हणजे वान नदी, गाडगा नदी, तापी नदी, सिपना नदी, खापरा नदी आणि डोलार नदी इत्यादी.
  • गुगामल राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र प्रकल्पासाठी खूप प्रसिध्द आहे.
  • गुगामल उद्यान हे पक्षी निरीक्षकांच्यासाठी, पिकनिकसाठी, छायाचित्रनासाठी आणि वन्यजीव सफारीसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

गुगामल उद्यानाला भेट देण्यासाठी आवश्यक असणारी महत्वाची माहिती – information about gugamal national park in marathi

  • या उद्यानाला भेट देण्याचा उत्तम वेळ हा ऑक्टोंबर ते जून महिन्यामध्ये आहे आणि या उद्यानाजवळचे सर्वात जवळचे गाव हे चिखलदरा हे आहे.
  • गुगामल हे उद्यान पाहण्यासाठी ऑक्टोंबर ते जून महिन्यामध्ये उत्तम वेळ आहे आणि हे संपूर्ण उद्यान पाहण्यासाठी २ ते ३ तास गरजेचे आहेत.
  • हे उद्यान पाहण्यासाठी प्रेवेश शुल्क आकाराला जातो आणि वयोगटानुसार आकाराला जातो जसे कि ६ ते १२ या वयोगटातील मुलांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्यासाठी हे उद्यान पाहण्यासाठी १५ रुपये शुल्क आकाराला जातो त्याचबरोबर प्रौढ लोकांच्यासाठी ३० रुपये प्रवेश शुल्क आकारला जातो आणि परदेशी प्रौढ लोकांच्यासाठी हा प्रवेश शुल्क ६० रुपये आहे आणि ६ ते १२ वयोगटातील परदेशी मुलांच्यासाठी हा ३० रुपये इतक आहे.
  • या उद्यानामध्ये व्हिडीओ करण्यासाठी परवानगी आहे परंतु ते करण्यासाठी देखील या ठिकाणी शुल्क आकाराला जातो आणि सिनेमॅटिक कॅमेऱ्यांच्यासाठी ५००० रुपये इतका शुल्क आकाराला जातो तर परेदेशी पर्यटकांच्याकडून १०००० रुपये शुल्क आकारला जातो आणि स्थिर कॅमेऱ्यांच्यासाठी भारतीय लोकांच्या कडून ५०० रुपये आणि परदेशी लोकांच्या कडून १००० रुपये शुल्क आकारला जातो.

आम्ही दिलेल्या gugamal national park information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुगामल राष्ट्रीय उद्यान माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Gugamal national park information in marathi wikipedia या Gugamal national park information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about gugamal national park in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!