10 जंगली प्राण्यांची माहिती Wild Animals Information in Marathi

Wild Animals Information in Marathi जंगली प्राण्यांची माहिती वन्य प्राण्यांना त्यांच्या वर्गीकरण श्रेणींनुसार विविध प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते, ज्यात फिलाम, वर्ग, ऑर्डर आणि कुटुंब समाविष्ट आहे. बोलचालाने, ते अपरिवर्तकीय (पाठीचा कणा नसलेले) आणि कशेरुक (पाठीच्या कड्या असलेले) या प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत. इनव्हर्टेब्रेट्समध्ये कीटक, वर्म्स, क्रस्टेशियन्स, मोलस्क आणि सेफॅलोपॉड्ससारखे प्राणी असतात. कशेरुकामध्ये सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, मासे, पक्षी आणि उभयचर प्राणी असतात. हे प्राणी, पाळीव नसल्यास, सर्व वन्य प्राणी मानले जातात.

wild animals information in marathi
wild animals information in marathi
अनुक्रमणिका hide
1 जंगली प्राण्यांची माहिती – Wild Animals Information in Marathi
1.2 वन्य प्राणी – Wild Animals Name in Marathi

जंगली प्राण्यांची माहिती – Wild Animals Information in Marathi

वन्य प्राणी म्हणजे काय?

वन्य प्राणी हे पाळीव प्राणी नसलेले प्राणी आहेत आणि हे असे प्राणी आहेत जे अन्न, निवारा किंवा पाण्यासाठी मानवांवर अवलंबून नसतात किंवा ते सामाजिक किंवा कृषी क्षमतेमध्ये मानवांशी नियमितपणे संवाद साधत नाहीत. वन्य प्राण्यांमध्ये निवासस्थान असू शकते जे मानवांनी आरक्षित केले आहे, परंतु त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते पाळीव प्राणी म्हणून ठेवले जात नाहीत किंवा अन्नासाठी वाढवले जात नाहीत.

वन्य प्राणी – Wild Animals Name in Marathi

सिंहाला जंगलाचा किवा सर्व प्राण्यांचा ‘राजा’ म्हणून ओळखले जाते. सिंह हा मांजराच्या कुळातील एक मोठा प्राणी असून सिंहाचे अस्तित्व भारतामध्ये आणि आफ्रिका मध्येच आढळून येते. सिंह जंगलामध्ये १० ते १४ वर्षे जगतात आणि ते जर पकडले असतील तर ते २० वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकतात.

जंगलामध्ये नर सिंह सहसा १० ते ११ वर्षापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत कारण इतर नर सिंहाशी भांडून झालेल्या जखमांमुळे त्यांचे आयुष्य कमी होते. सिंह हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो मृग,  म्हशी, पक्षी, झेब्रा, वारथोग, हरीण, मासे यासारख्या प्राण्याचा शिकार करून आपले पोट भरतो. सिंहिणीला दोन वर्षानंतर पिल्ले होतात व सिंहीण एका वेळी २ किवा ३ पिल्लांना जन्म देते.

सिंह १० ते १५ प्राणी असनाऱ्या कळपामध्ये राहतात ज्यामध्ये मादा, लहान नर आणि पिल्ले असतात. सिंहाच्या चेहऱ्याभोवती आणि मानेभोवती जे केस असतात त्यांना आयाळ म्हणतात सिंहिणीला आयाळ नसते .

सिंह कोठे राहतात – habitat

सिंह हा शक्यतो जंगलामध्येच राहतात आणि त्यांना सिंहाला जंगलाचा किवा सर्व प्राण्यांचा ‘राजा’ म्हणून ओळखले जाते. सिंह १० ते १५ प्राणी असनाऱ्या कळपामध्ये राहतात ज्यामध्ये मादा, लहान नर आणि पिल्ले असतात.

सिंहाचा आहार – food 

सिंह हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो मृग,  म्हशी, पक्षी, झेब्रा, वारथोग, हरीण, मासे यासारख्या प्राण्याचा शिकार करून आपले पोट भरतो.

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून त्याचे वाघाचे वैज्ञानिक नाव ‘पँथेरा टीग्रीस’ असे आहे. वाघ हा मांजरीनीच्या कुळातील सर्वात मोठा आणि हिंस्र आणि सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून ओळखला जातो. वाघ हा मांसाहारी पाणि आहे आहे आणि तो अतिशय चपळ आहे त्यामुळे शिकार जवळ येताच जलद गतीने धावत जावून आपल्या टोकदार दातांमध्ये शिकार मजबुतपणे पकडून ठेवतो.

वाघाचे पंजे आणि जबडे अतिशय बलवान असतात त्यामुळे ते आपला शिकार घट्टपणे पकडून ठेवू शकतात. वाघ हे कळपामध्ये राहत नाहीत ते एकटे राहतात आणि ते जेथे राहतात त्या जागेबद्दल ते खूप आक्रमक जर त्यांच्या भागात जर दुसरा वाघ आला तर ते त्यांना सहन होत नाही पण वाघ आपल्या जागेत वाघिणीला राहू देतात.

आता जगामध्ये ३००० ते  ४००० वाढ जंगलामध्ये शिल्लक आहेत आणि १९००० पेक्षा जास्त वाघ कैद करून ठेवले आहेत तर काही वाघांच्या जाती नामशेष पावल्या आहेत.

वाघ कोठे राहतात – tiger habitat

वाघ आश्चर्यकारकपणे विविध वस्तींमध्ये आढळतात जसे कि पावसाळी जंगले, गवतमय प्रदेशात, सवाना आणि अगदी मॅनग्रोव्ह दलदली मध्ये सुद्धा . दुर्दैवाने, ऐतिहासिक वाघाच्या ९३ टक्के  जमिनी प्रामुख्याने मानवी क्रियाकलाप वाढविण्यासाठी नष्ट केल्या आहेत.

वाघाचा आहार – Food

वाघ हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे हा प्राणी हरीण, मृग, पक्षी, झेब्रा आणि इतर प्राण्यांचे शिकार करून आपले भरतो.

जिराफ हा जगातील सर्वात उंच सस्तन प्राणी आहे, जो सुमारे ४ ते ५  मीटर उंचीवर उभा आहे आणि आतापर्यंत नोंदवलेले सर्वात उंच जिराफ ५.९ मीटर पर्यंत आहेत. जिराफ हा प्राणी डबल डेकर बसपेक्षा मोठा असतो. जिराफ हा प्राणी उंच तर असतोच पण या प्राण्याचे वजन देखील १९०० किलो पर्यंत असते.

जिराफच्या पाठीवर एक लहान कुबडा असतो आणि त्याला बिबट्यासारखा ठिपके असल्यामुळे बऱ्याच पूर्वीच्या काळापासून लोक जिराफला “उंटबिबट्या” म्हणत असत कारण त्यांचा असा विश्वास होता की हे उंट आणि बिबट्याचे संयोजन आहे आणि म्हणून जिराफला जिराफचे कॅमलोपार्डलिस असे देखील म्हंटले जात होते.

जिराफ हा एक आफ्रिकन आर्टिओडॅक्टाइल सस्तन प्राणी असून सर्वात उंच जिवंत स्थलीय प्राणी आणि सर्वात मोठा रवंथ करणारा प्राणी आहे.

जिराफ कसे व कुठे राहतात – habitat

जिराफ हा प्राणी गवताळ प्रदेश, सवाना आणि जंगल या ठिकाणी राहतात. जिराफ हे सामाजिक प्राणी आहेत जे १० ते १२ सदस्यांसह कळपांमध्ये राहतात आणि यामध्ये बहुतेक गटांमध्ये आई, तिची संतती आणि अनेक तरुण जिराफ असतात. काही प्रौढ जिराफ एकटे राहणे पसंत करतात.

जिराफ प्राण्याचा आहार – food

जिराफ हा प्राणी शाकाहारी आहे त्यामुळे जिराफ फळे, बियाणे आणि विविध प्रकारच्या वनस्पती, कोवळी पाने या सारखे अन्न खातात. त्याचबरोबर जिराफ या प्राण्याचे आवडते अन्न बाभूळ आहे, धोकादायक काटे असलेले झाड जिराफला त्याच्या जाड लाळ आणि प्रीहेन्सिल जीभाने व्यवस्थापित करण्यासाठी अनुकूल केले जाते.

चित्त्याचे वैज्ञानिक नाव ‘अॅकिनोनिक्स’ असे आहे हा एक मांजरी कुळातील प्राणी आहे आणि हा प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारा प्राणी आहे. वेगवान प्राणी म्हणून ओळखला जाणारा प्राणी म्हणजे ‘चित्ता’ होय चित्ता हा प्राणी ताशी ९० ते ११० किलोमीटर धावू शकतो.

एकेकाळी भारतामध्ये आणि युरेशियामध्ये चित्ता हा प्राणी खूप मोठ्या प्रमाणात आढळयाचे पण आत्ता या देशांमध्ये चीत्त्यांचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट झाले आहे. आता ते फक्त आफ्रिकेमध्ये गवताळ प्रदेशातच आढळतात. भारतामध्ये चित्त्याचा एकेकाळी मोठ्या प्रमाणात वावर होता आणि शेवटचा जंगली चित्ता १९५१ च्या दरम्यान आंध्रप्रदेश दिसला होता. त्यानंतर तो भारताच्या कोणत्याच जंगलामध्ये आढळला नाही त्यामुळे भारतातून चित्ता  नामशेष झाला आहे असे म्हंटले जाते.

चित्ता कुठे राहतो – cheetah habitat

जास्ती जास्त चित्ता हा प्राणी झुडूप, सवाना किवा गवताळ प्रदेशमध्ये राहतात. चित्ता उष्ण वातावरणामध्ये किवा वाळवंटामध्ये राहु शकतात आणि ते कधी कधी झाडावरही राहतात.

चित्त्याचा आहार – cheetah food

चित्ता हा मांसाहारी प्राणी असल्यामुळे तो फक्त मांस खातो. चित्ता शक्यतो लहान प्राण्यांचे शिकार करतो तो ससे, पक्षी , हरीण किवा इतर लहान प्राण्यांचा शिकार करतो .जर शिकार गटामध्ये करायचा असेल तर ते झेब्रा किवा मोठे हरीण यासारख्या प्राण्यांचा शिकार करतात. चित्ता हा असा प्राणी आहे जो तरुण प्राण्यांचा शिकार करतात ते जास्त वय झालेल्या प्राण्यांचा शिकार करत नाहीत.

अस्वल हा प्राणी असिर्डी कुळातील असून त्यांच्या एकूण जाती ८ आहेत. अस्वल हा एक सस्तन प्राणी आहे जो युरोप, आशिया, आणि अमेरिकेमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अस्वल हे तात जंगलात राहणारे मांसभक्षक प्राणी असून अस्वलांना मासे खायला खूप आवडतात. त्यामुळे ते नदी काठी किवा तलावा जवळच राहतात.

भारतीय अस्वल हे काळ्या किवा तपकिरी रंगाचे असतात. भारतीय अस्वलाचे वर्णन करायचे म्हंटले तर पांढऱ्या रंगाचे लांब मुस्कट. खालचा ओठ लांब, नाकपुड्या पुढे आलेल्या तसेच चार पाय असतात पण ते पुढच्या दोन पायाच्या पंजाचा उपयोग हातासारखा करतात आणि ते पाठीमागच्या पायावर उभे राहू शकतात.

अस्वल कुठे राहते – bear habitat

अस्वलांचा एक लहान गात असतो आणि ते शक्यतो जंगलामध्ये, पर्वत आणि गवताळ प्रदेशामध्ये राहतात.  तपकिरी अस्वल हे वायव्य किवा उत्तर अमेरिका, वायव्य आफ्रिका, युरोप आशिया या देशामध्ये आढळतात. धुर्वीय अस्वल हे बर्फाळ प्रदेशामध्ये आढळते. अशियाटिक अस्वल हे अफगाणीस्तान, भूतान, बांगलादेश, भारत, कोलंबिया, चीन, इराण, कोरिया, मलेशिया, रशिया, म्यानमार, पाकीस्तान, आणि तैबान या देशामध्ये आढळतात.

अस्वलांचा आहार – diet

अस्वलांचा आहार हा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून असतो. ते ज्या भागामध्ये राहतात त्या भागामध्ये कश्या प्रकारचा आहार उपलब्ध आहे त्यावर त्यांची आहाराची सवय असते. अस्वल हे शक्यतो मांस, मासे तसेच दुसरे सस्तन प्राणी देखील खातात , काही अस्वल गवत, मुळे, बेरी, किडे, बांबू यासारखे अन्न सेवन करतात.

बिबट्या हा प्राणी वाघ आणि सिंह नंतर अमेरिकेतील सर्वात मोठी मांजर जात आहे. ते १७० सेंटी मीटर पर्यंत वाढू शकतात त्यांमध्ये त्यांच्या प्रभावी शेपटींचा समावेश नाही जे ८० सेंटी मीटर पर्यंत असू शकतात. नरांचे वजन १२० किलो असू शकते, परंतु बिबट्याचा आकार वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये बदलू शकतात आणि मध्य अमेरिकेतील बिबट्या पंतनालमधील बिबट्या अंदाजे अर्ध्या आकाराचे असू शकतात त्याचबरोबर बिबट्याला मोठे गोलाकार डोके आणि लहान पाय असतात.

बिबट्या हा प्राणी मोठ्या प्रमाणात ब्राझीलमध्ये आढळतात म्हणजेच १७०००० बिबट्यांपैकी अर्धी संख्या असू शकते. बिबट्या जगातील तिसरी सर्वात मोठी मांजर प्रकारातील जात आहे. बिबट्या हा प्राणी वाघ आणि सिंह नंतर अमेरिकेतील सर्वात मोठी मांजर जात आहे. बिबट्याला इतर कोणत्याही मोठ्या मांजरीपेक्षा जास्त शक्तिशाली चावा असतो.

त्यांचे दात मगरमच्छांच्या जाड आच्छादन आणि कासवांच्या कडक टरफले चावण्याइतके मजबूत आहेत. बिबट्या हा प्राणी पंथेरा कुळातील असून या प्राण्याचे वैज्ञानिक नाव पँथेरा ओन्के असे आहे. बिबट्याचे वजन ५० ते ९० किलो इतके असते आणि उंची ६५ ते ७५ सेंटी मीटर इतकी असते.

बिबट्या हा प्राणी कोठे व कसा राहतो – Jaguar habitat

बिबट्या हा प्राणी मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय पावसाच्या जंगलांमध्ये आढळतात. जरी बिबट्याची ऐतिहासिक श्रेणी संपूर्ण महाद्वीप आणि अगदी अमेरिकेमधील दक्षिणेकडील राज्यांमध्ये पसरलेली असली तरी आज ते विशेषतः ओलसर अमेझॉन बेसिनमध्ये पावसाळी जंगल भागांमध्ये मर्यादित आहेत. बिबट्या हा प्राणी जाड, दाट, ओलसर जंगला मध्ये राहणे पसंत करतात त्याचबरोबर कायमस्वरुपी दलदल किंवा हंगामी पूरग्रस्त जंगले देखील पसंत करतात.

बिबट्याचा आहार – food

हा प्राणी हरीण, कासव, आर्मडिलो, मासे, इगुआना, पक्षी आणि माकडे हे काही शिकार आहेत जे बिबट्या खातात. त्याचबरोबर ते दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे प्राणी, टॅपीर आणि केमन सारख्या प्रचंड भक्षकांचा सामना करू शकतात. जग्वार दिवसा आणि रात्री दोन्हीहि वेळेला शिकार करू शकतात.

सुतार पक्षी हा picidae या कुळातील असून सुतार पक्ष्याच्या जगभरामध्ये १८० जाती आहेत. ह्या पक्ष्याची विशेषता म्हणजे आपल्या मजबूत आणि बळकट चोचीने झाडाला होल पाडून घर बनवतो आणि या साठी हा पक्षी लोकप्रिय आहे आणि या पक्ष्याला सुतार नाव हे या कारणामुळेच पडले आहे. सुतार पक्षी हा आकाराने साळुंखी पक्ष्यापेक्षा थोडा मोठा आणि कावळ्या पेक्षा लहान असतो.

सुतार पक्ष्याचे मानेपासून खालचे पूर्ण शरीर काळ्या रंगाचे असते आणि मान आणि चेहऱ्यावर काळ्या पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात तसेच या पक्ष्याचा डोक्यावरचा भाग लाल रंगाचा असतो आणि चोच लांब आणि मजबूत तसेच या पक्ष्याची शेपू थोडी छोटी असते आणि ताठ असते. सुतार या पक्ष्यांचा मार्च ते ऑगस्ट हा विणीचा हंगाम असतो आणि मादी सुतार पक्षी एका वेळी २ ते ३ अंडी देते. घरटे बनवणे, अन्न गोळा करणे, अंडी उबवाने हे काम नर आणि मादी दोघेही करतात.

सुतार पक्षी कुठे राहतात – habitat

सुतार पक्षी हा शक्यतो जंगलामध्येच राहतात त्याचबरोबर या पक्ष्यांच्या काही जाती बांबूच्या जंगलामध्ये राहतात तर काही पक्षी वाळवंटा मध्ये सुध्दा राहतात.

सुतार पक्ष्याचा आहार – food

सुतार पक्षी हा सर्वभक्षी पक्षी आहे आणि तो धान्य, बिया, शेंगदाणे, झाडाची वाळवी, मुग्या, कीटक आणि बेरी या प्रकारचा आहार खातात.

कांगारू या प्राण्याला ऑस्ट्रोलियाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखले जाते. या प्राण्याची खासियत म्हणजे हे उडी मारत चालतात कारण त्यांचे पुढचे पाय लहान असतात आणि पाठीमागचे पाय मोठे असतात त्यामुळे कांगारू हा प्राणी पाठीमागच्या पायावरती जास्त भर देवून चालतात आणि ते उडी मारतच चालतात. कांगारू हा प्राणी मॅक्रोपस कुळातील असून या प्राण्याची उंची १.५ ते १.८ मीटर असून वजन ४५ ते ५० किलो इतके असते.

कांगारू कुठे राहतात – kangaroo habitat

कांगारू हे प्राणी मुख्यता कोरडी जंगले, गवताळ प्रदेश आणि वाळवंटाच्या ठिकाणी राहू शकतात ( ते उष्ण कटिबंधात राहणारे प्राणी आहे ) आणि कांगारू हे प्राणी कळपाने राहणे पसंत करतात.

कांगारूचा आहार – food

हे प्राणी गवत, फुले, पाने, झाडांचा पाला आणि बिया खातात.

कोल्हा हा लांडगा कुटुंबातील सर्वात लहान सदस्य आहे, जो मांजरीपेक्षा मोठा आणि कुत्र्यापेक्षा लहान प्राणी आहे. कोल्ह्याच्या जवळ जवळ २० ते २५ प्रजाती आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतात. कोल्ह्याच्या मोठ्या प्रजातीचे नाव रेड फॉक्स आहे, ज्याचे वजन सुमारे दोन किलोग्राम ते १५ किलोग्राम आहे, तर उंची ३० ते ५० सेंटीमीटर आणि लांबी ४० ते ९० सेंटीमीटर आहे त्याचबरोबर कोल्ह्याच्या लहान प्रजातीचे नाव फेन्स फॉक्स असे आहे.

ज्याचे वजन २ ते ३ किलोग्राम पर्यंत असते, तर उंची २० सेंटीमीटर इतकी असून लांबी २५ ते ४० सेंटीमीटर असते. कोल्हा हा प्राणी सर्वभक्षी प्राणी आहे म्हणजे तो शाकाहारी तसेच मांसाहारी आहार देखील खातो आणि तो जंगलांमध्ये राहतो. सामान्यपणे हा प्राणी जंगलांच्या आसपास असलेल्या गावांमध्ये शिकारीसाठी येतो आणि गावकऱ्यांच्या घरगुती मेंढ्या आणि बकऱ्यांची शिकार करतो.

कोल्हा हा प्राणी कोठे राहतो – habitat

कोल्हा हा प्राणी मुख्यता झुडुपे, जंगले आणि शेतात राहणे पसंत करतात त्याचबरोबर बहुतेकदा हे प्राणी एकटे राहणे आणि शिकार करणे पसंत करतात परंतु कधीकधी हे प्राणी कळपांमध्ये देखील आढळतात.

कोल्ह्याचा आहार – food

कोल्हा हा प्राणी शाकाहारी तसेच मांसाहारी अन्न खातो म्हणजेच हा प्राणी सर्वभक्षी प्राणी आहे. हा सर्वभक्षी प्राणी असल्याने त्यांच्या आहारात पक्ष्यांची अंडी, मासे, ससे, कोंबडी उंदीर या प्रकारचे लहान प्राणी असतात.

हत्तीला मोठे सुफासारखे कान म्हणजेच हत्तीचे कान खूप लांब आणि रुंद असतात तसेच हत्तींना लहान शेपटी आणि दोन मोठे दात देखील असतात आणि हे दात तोंडातून बाहेर पडतात या प्रकारे हत्तीची शरीर रचना असते. हत्ती हा प्राणी मुख्यता सहारा आफ्रिका, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये आढळतो. हत्ती हा जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे आणि वैशिठ्य म्हणजे हत्ती ह्या प्राण्याकडे इतर प्राण्यांपेक्षा विकसित मेंदू आहे त्यामुळे हत्तीला बुध्दिमान प्राणी म्हणून ओळखले जाते.

हत्ती कुठे राहतात – habitat

हत्ती हा प्राणी जंगलामध्ये किवा गवताळ प्रदेशमध्ये राहणे पसंत करतात आणि ते ६ ते ७ जणांच्या कळपामध्ये राहतात.

हत्ती या प्राण्याचा आहार – food

हत्ती एक शाकाहारी प्राणी आहे जो लहान फांद्या, पाने आणि झाडांची फळे या प्रकारचा आहार खातो.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास जंगली प्राण्यांची ओळख व संपूर्ण माहिती प्रजाती, जीवन Wild Animals Information in Marathi language या विषयी थोडक्यात माहिती मिळाली असेलच. names of animals in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच wild animals information in marathi wikipedia  हा लेख कसा वाटला व अजून काही जंगली प्राण्यांच्या विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या wild animals name in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!