गुळपोळी रेसिपी मराठी Gulpoli Recipe in Marathi

Gulpoli Recipe in Marathi गुळपोळी रेसिपी भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सणांना खासकरून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सणांना पुरण पोळीचा नैवैद्य बनवला जातो तसेच सांज्याच्या पोळ्या, शेंगदाण्याच्या पोळ्या यासारखे पोळ्यांचे प्रकार देखील काही वेळा खाण्यासाठी बनवले जातात आणि त्यामधील एक एक पोळीचा प्रकार म्हणजे गुळ पोळी. आज आपण या लेखामध्ये स्वादिष्ट आणि गोड गुळपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. गुळपोळी बनवण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट, भाजलेल्या सुक्या नारळाचा खीस, तील, खसखस, बेसन, गुळ हे सर्व साहित्य एकत्र मळले जाते आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून ते कणकीच्या पिठामध्ये आपण पुरण पोळीचे पुरण जसे कणकीच्या गोळ्यामध्ये भरतो जसे भरतो तसे भरले जाते.

आणि आणि मग त्याची मैदा किंवा गव्हाचे पीठ लावून पोळी लाटली जाते आणि मग ती तव्यावर तेल लावून भाजली जाते. गुळपोळी हि एक पारंपारिक रेसिपी आहे जे खास करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते आणि हि रेसिपी भारताच्या बहुतेक भागामध्ये देखील बनवली जाते. गुळपोळी हि अशी रेसिपी आहे जी लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकेल.

गुळपोळी हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग आता आपण गुळपोळी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

gulpoli recipe in marathi
gulpoli recipe in marathi

गुळपोळी रेसिपी मराठी – Gulpoli Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळी३० ते ३५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन

गुळ पोळी कशी बनवायची – How to make gul poli recipe

गुळपोळी बनवण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट, भाजलेल्या सुक्या नारळाचा खीस, तील, खसखस, बेसन, गुळ हे सर्व साहित्य एकत्र मळले जाते आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून ते कणकीच्या पिठामध्ये आपण पुरण पोळीचे पुरण जसे कणकीच्या गोळ्यामध्ये भरतो जसे भरतो तसे भरले जाते आणि आणि मग त्याची मैदा किंवा गव्हाचे पीठ लावून पोळी लाटली जाते आणि मग ती तव्यावर तेल लावून भाजली जाते

गुळपोळी रेसिपी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • गुळ : गुळपोळी बनवण्यासाठी गुळ हा महत्वाचा घट आहे कारण खिसलेल्या गुळामध्ये सर्व साहित्य घालून ते मळून घेतले जाते आणि मग त्याचे गोळे बनवून ते कानिकीच्या गोळ्यामध्ये भरून त्याच्या पोळ्या लाटल्या जातात.
  • कुट : भाजलेला शेंगदाण्याचा कुट घातल्यामुळे पोळ्यांना एक वेगळीच टेस्ट येते.
  • गव्हाचे पीठ किंवा मैदा : गुळपोळी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ किंवा मैदा हे देखील महत्वाचे साहित्य आहे.

गुळपोळी रेसिपी – gulpoli recipe 

गुळपोळी हि एक पारंपारिक रेसिपी आहे म्हणजेच हि रेसिपी खूप पूर्वीच्या काळापासून बनवली जाते आणि आजही हि रेसिपी भारताच्या काही भागामध्ये खूप आवडीने बनवली जाते आणि खाल्ली देखील जाते. गुळपोळी हि रेसिपी शेंगदाण्याचा कुट, भाजलेल्या सुक्या नारळाचा खीस, तील, खसखस, बेसन, गुळ हे आणि काही इतर साहित्य वापरून बनवलेली असते आणि खूप टेस्टी लागते.

गुळपोळी हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे ३० ते ३५ मिनिटामध्ये बनू शकते आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग गुळपोळी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळी३० ते ३५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन

गुळपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make gulpoli recipe 

गुळपोळी बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते त्यावेळी आपण जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध नाही ते बाजारातून अगदी सहजपणे अनु शकतो. चला तर मग आता आपण गुळपोळी रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.

  • १ वाटी बेसन / हरभरा डाळीचे पीठ.
  • २ मोठे चमचे सुक्या नारळाचा खीस.
  • अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट.
  • दीड चमचा तीळ.
  • अर्धी खसखस.
  • दीड वाटी गव्हाचे पीठ.
  • अर्धा किलो गुळ ( खिसलेला ).
  • १ चमचा वेलची पावडर.
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).

गुळपोळी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make gulpoli recipe 

चला तर मग आता आपण वर दिलेले साहित्य वापरून गुळपोळी कशी बनवायची हे पाहूयात.

  • गुळपोळी बनवताना सर्वप्रथम गॅसवर मध्यम आचेवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तीळ घाला आणि ते चांगले खमंग वास येईपर्यंत भाजा तसेच खसखस देखील घाला नि ती देखील भाजून बाजूला काढून ठेवा.
  • आता या कढईमध्ये खिसलेले खोबरे घाला आणि मग ते देखील कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि बाजूला काढून घ्या आणि ते हाताने थोडे बारीक करून घ्या.
  • आता बेसनचे पीठ देखील भाजून घ्या.
  • आता एक परातीमध्ये खिसलेला गुळ घ्या आणि त्यामध्ये भाजलेले सर्व साहित्य घाला आणि मग त्यामध्ये वेलची पावडर घाला आणि ते मिश्रण चांगले एकजीव करून त्याचा घट्ट गोळा बनवून घ्या आणि ते थोडावेळ बाजूला ठेवा.
  • आत एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ, गरम तेल आणि चवीपुरते मीठ घाला आणि त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून कणिक सैलसर मळून घ्या.
  • आता कणिकेचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या आणि त्याच आकाराचे गुळाच्या मिश्रणाचे देखील गोळे बनवून घ्या.
  • मग कणकीचा एक गोळा घ्या आणि त्यामध्ये गुळाच्या मिश्रणाचा एक गोळा भरा आणि त्याचे तोंड बंद करा.
  • मग तो गोळा पोळपाटावर चांगला थापून घेवून त्याला गव्हाचे पीठ लावा आणि लाटण्याने हलक्या हाताने लाटा.
  • आता गॅसवर गरम करायला ठेवलेल्या तव्यावर थोडेसे तेल लावा आणि त्यावर लाटलेली पोळी टाका आणि पोळी मध्यम आचेवर दोन्ही बाजूला तेल लावून दोन्ही बाजूने भाजा.
  • अश्या प्रकारे सर्व पोळ्या लाटून घ्या भाजून घ्या.

गुळपोळी काश्यासोबत खाल्ली जाते – serving suggestion 

  • गरम गरम गुळपोळी आपण तुपासोबत किंवा गरम दुधासोबत खावू शकतो.

आम्ही दिलेल्या gulpoli recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुळपोळी रेसिपी मराठी माहिती gulpoli बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gulpoli recipe by madhura in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि recipe of gulpoli in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gul poli in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!