Puran Poli Recipe in Marathi पुरण पोळी रेसिपी मराठी भारतामध्ये अनेक विविध सण साजरे केले जातात जसे की दसरा, दिवाळी, गौरी गणपती, गुढी पाडवा, मकर संक्रांत, बैल पोळा आणि नागपंचमी आणि या सर्व सणांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि पुरण पोळीला तर प्रत्येक सणामध्ये विशेष महत्व आहे. कारण पुरण पोळी हा पदार्थ शक्यतो सर्व सणाला बनवली जाते. पुरण पोळी हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे जी शिजवलेल्या हरभरा डाळीमध्ये गुळ घालून त्याचे पुरण करून ते गव्हाच्या पिठाच्या कणकीच्या गोळ्यामध्ये भरून त्या गोळ्याला तेल लावून त्याची पोळी लाटुन ती तव्यावर भाजली जाते.
पुरण पोळी बनवण्यासाठी जरी वेळ लागत असला तरी पुरण पोळी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे आणि पुरण पोळी बनवताना तुम्ही एक दिवस अगोदर पुरण बनवून ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. आपण पुरणामध्ये बडीशेफ, जायफळ पावडर, वेलची पावडर किंवा सुंठ पावडर या सारखे मसाले देखली वापरले जातात कारण यामुळे पुरणाला खमंग चव येते.
लुसलुशीत पुरणपोळी रेसिपी – Puran Poli Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १ तास |
लाटण्यासाठी आणि भाजण्यासाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
एकूण लागणारा वेळी | १ तास ३० मिनिटे |
वाढणी | ३ ते ४ व्यक्ती |
पाककला | महाराष्ट्रीयन |
पुरण पोळी हि पारंपारिक डिश
पुरण पोळी हि पारंपारिक डिश म्हणायचे कारण महाराष्ट्रामध्ये पुरण पोळी खूप पूर्वीच्या काळापासून होळी, संक्रांत, पाडवा, दिवाळी आणि गौरी गणपती सणाला हमखास बनवल्या जात होत्या. पुरण पोळी या पदार्थाला महाराष्ट्राचा एक पारंपारिक पदार्थ म्हणून ओळख आहे. महाराष्ट्राबरोबरच पुरण पोळी गोवा आणि गुजरात या राज्यामध्ये देखील लोकप्रिय आहे आणि तेथील लोक पुरण पोळी आवडीने खातात.
- हरभरा डाळ : हरभरा डाळ हा पुरण पोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या मुख्य साहित्यापैकी एक आहे. हरभरा डाळ हि पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. डाळ शिजल्यानंतर त्यामधील पाणी काढून त्यामध्ये गुळ घालून ते शिजवून त्याचे पुरण केले जाते.
- गव्हाचे पीठ : गव्हाचे पिठाची कणिक मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून त्यामध्ये पुरणाचे मुटके भरून ते लाटले जाते.
पुरण पोळी हा पदार्थ महाराष्ट्रीयन पदार्थ जरी असला तरी भारतामध्ये अनेक ठिकाणी पुरण पोळी अनेक सण साजरे करण्यासाठी बनवली जाते. पुरण पोळी हा एक गोड पदार्थ असून तो कसा बनवायचा आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १ तास |
लाटण्यासाठी आणि भाजण्यासाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
एकूण लागणारा वेळी | १ तास ३० मिनिटे |
वाढणी | ३ ते ४ व्यक्ती |
पाककला | महाराष्ट्रीयन |
पुरण पोळी बनवण्यासाठी लागणारे बहुतेक साहित्य घरामध्ये उपलब्द असल्यामुळे आपल्याला विशेष असे काही साहित्य बाजारातून आणावे लागत नाही. पुरण पोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी खाली दिलेली आहे.
- पाव किलो हरभरा किंवा चण्याची डाळ.
- १५० ग्रॅम गुळ.
- १ चमचा वेलची आणि सुंठ पूड.
- मीठ ( चवीनुसार ).
- ३०० ग्रॅम गहू आटा.
- १ चमचा गोडे तेल.
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
आता आपण वरती दिलेले साहित्य वापरून महाराष्ट्राची पारंपारिक पुरण पोळी कशी बनवायची याबद्दल माहिती घेणार आहोत.
- सर्वप्रथम पाव किलो हरभरा डाळ घेवून ती चांगली स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर पाव किलो डाळीमध्ये साधारणपणे ३ ग्लास गरम पाणी घालून ती कुकर मध्ये घालावी आणि कुकरचे झाकण घालून कुकरला मध्यम आचेवर ठेवून कुकरला ७ ते ८ शिट्य द्याव्यात.
- कुकर थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आणखीन एक ग्लास पाणी घालून त्यामध्ये कुकर मधील डाळ ओतून मोठ्या आचेवर डाळीच्या दोन उकळ्या काढून घ्या.
- मग त्यानंतर त्यामधील पाणी मोदक पात्राच्या चाळणीने गाळून घेवून डाळ वेगळी करा आणि ती डाळ त्याच भांड्यामध्ये काढून घेवून त्यामध्ये गुळ, वेलची पावडर, सुंठ पावडर आणि मीठ ( चवीनुसार ) घालून ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि ते चांगले घट्ट गोळा होईपर्यंत सतत ढवळत चांगली शिजवून घ्या.
- मग गरम असतानाच पुरण वाटायच्या चाळणी मध्ये, मिक्सरवर किंवा पुरण मशीनमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- सर्व प्रथम एका ताटामध्ये गव्हाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये तेल आणि मीठ मिक्स करा आणि मग त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून कणिक चांगली मळून घ्या.
- मग कणिक अर्धा तास भिजवून ठेवा.
- आता कणिकेचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या आणि त्याचे आकाराचे पुरणाचे देखील गोळे बनवून घ्या.
- मग कणकीचा एक गोळा घ्या आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा भरा आणि त्याचे तोंड बंद करा.
- मग तो गोळा पोळपाटावर तेल घालून चांगला थापून घेवून लाटण्याने हलक्या हाताने लाटावी.
- लाटल्यानंतर ती लाटण्याला हलक्या हाताने गुंडाळून घ्यावी आणि मग ती हळुवार तव्यावर टाकावी आणि मग ती दोन्ही बाजूने चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यावी.
पुरण पोळी कश्या सोबत खावी – serving suggestions
आपण पुरणाची पोळी दुध आणि तूप किंवा फक्त तुपासोबत देखील खाल्ली जावू शकते आणि महाराष्ट्रामध्ये पोळीसोबत खाण्यासाठी गुळवणी बनवली जाते.
टीप
- जर तुम्हाला तेल लावून पोळी लाटता येत नसेल तर पोळी पीठ लावून देखील लाटली तर चालते.
- तेलाची पोळी लाटताना ती हलक्या हाताने लाटा ज्यामुळे ती लाटताना कुठे फाटणार नाही.
- जेंव्हा तुम्ही पोळी लाटता तेंव्हा गोळ्याला जास्त तेल लावा त्यामुळे पोळी पोळपाटाला चिकटणार नाही.
- पुरण पोळी तुपासोबत खूप छान लागते.
आम्ही दिलेल्या puran poli recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर लुसलुशीत पुरणपोळी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या puran poli maharashtrian recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि puran poli kashi banvaychi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये puran poli and amti recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
सामुग्रीबरोबर लाटलेली पेक्षा पुरणपोळी खापर वरची पाहीजे होती.