बेसन रेसिपीज मराठी Besan Recipe in Marathi

Besan Recipe in Marathi बेसन रेसिपीज मराठी बेसन हे हरभरा डाळीचे पीठ आहे आणि यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवतो. बेसन पासून आपल्याला वेगवेगळ्या आणि सोप्या आणि खूप कमी वेळेमध्ये अगदी स्वादिष्ट रेसिपी बनवता येतात. बेसन पासून आपण बेसन लाडू, म्हैसूर पाक, झुणका, पिठले, भजी यासारखे अनेक पदार्थ बनवता येतात. आज आपण या लेखामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेसन पासून बनवले जाणारे पदार्थ पाहणार आहोत. चला आता पण बेसन पासून वेगवेगळ्या रेसिपी कश्या बनवायच्या आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

besan recipe in marathi
besan recipe in marathi

बेसन रेसिपीज मराठी – Besan Recipe in Marathi

कांदा भजी रेसिपी 

कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make kanda bhaji recipe 

 • ३ वाटी उभा चिरलेला कांदा.
 • १ वाटी डाळीचे पीठ.
 • २ ते ३ चमचे रवा.
 • १ ते २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
 • दीड चमचा लाल मिरची पावडर.
 • १/२ चमचा हळद.
 • १ चमचा ओवा.
 • १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
 • १/४ चमचा खायचा सोडा.
 • २ चमचे लिंबू रस.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • तेल ( तळण्यासाठी ).

कांदा भजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make kanda bhaji recipe 

 • सर्वप्रथम चिरून २ वाटी होईल इतके कांदे घ्या आणि बारीक उभे चिरून घ्या आणि ते एका भाड्यात घालून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यामधील पाणी काढून घ्या. ( टीप : भाडे थोडे मोठे असावे कारण त्यामध्ये आपण इतर साहित्य देखील मिक्स करायचे असते आणि मोठे भांडे असले कि सर्व मिश्रण चांगले एकत्र करता येते ).
 • चिरलेला कांदा धुतल्यानंतर सुट्टा होतो त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि आणि ते मिक्स करून कांदा १० मिनिटे बाजूला ठेवा.
 • तोपर्यंत हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
 • आता मीठ लावून ठेवलेले कांद्याचे भांडे घ्या, त्या कांद्याला पाणी सुटले असेल आता डाळीचे पीठ घ्या आणि त्या कांद्यामध्ये मावेल तेवढे पीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या. मावेल तेवढे पीठ घालूनही जर कांदा थोडा सुट्टा वाटत असेल तर त्यामध्ये अनखील थोडे पीठ घाला.
 • आता त्यामध्ये रवा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, रस, लाल तिखट, हळद, ओवा आणि थोडे मीठ घालावे लागत असेल तर ते सर्व घालून ते चांगले एकत्र करून आणि थोडे पाणी लावून मिश्रण एकत्र करून घ्या.
 • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई मध्ये भजी तळण्यासाठी तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा.
 • आता त्या पिठामध्ये सोडा घाला आणि ते चांगले मिक्स करा.
 • तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये जितके भजी मावतील तितके भजी टाकून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि तळल्यानंतर ते तेलातून बाहेर काढा.
 • आणि राहिलेल्या पीठाचे देखील भजी तळून घ्या.
 • कुरकुरीत कांदा भाजी खाण्यासाठी तयार झाले.

मैसूर पाक रेसिपी  

मैसूर पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make mysore pak recipe 

 • २ वाटी डाळीचे पीठ / बेसन.
 • २ वाटी साखर
 • १ वाटीला थोडे कमी पाणी.
 • २ वाटी तूप किंवा डालडा.
 • १ चमचा बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा.

मैसूर पाक बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make mysore pak recipe 

 • सर्व प्रथम बेसनाचे पीठ एका चाळणीने चाळून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
 • आता गॅसवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये २ वाटी साखर आणि १ वाटीला थोडे कमी पाणी घाला आणि त्याचा मध्यम आचेवर पाक बनवून घ्या. मैसूर पाक बनवण्यासाठी आपल्याला एक तारी पाक बनवावा लागतो त्यामुळे पाक थोडा घट्ट झाला कि चमच्याने थोडासा पाक एका वाटीमध्ये काढा आणि दोन बोटांच्या मधी धरून पहा जर त्याची एक तार झाली तर तो पाक झालेला असतो.
 • आता या पाकमध्ये आपण चाळून ठेवलेले पीठ घाला आणि ते चांगले हलवा आणि पीठ घातल्या नंतर गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
 • मग दुसरीकडे गॅसवर तूप ठेवा आणि ते गरम करून घ्या.
 • आता चमच्याने २ ते ३ चमचे तूप साखरेच्या पाकाच्या आणि पिठाच्या मिश्रणामध्ये घाला आणि ते सतत हलवत रहा आणि तूप चांगले पिठामध्ये मिक्स झाले कि त्यामध्ये परत २ चमचे तूप घालून परत ते सतत हलवत रहा जोपर्यंत तूप पिठामध्ये चांगले मिक्स होणार नाही. अशी प्रक्रिया ३ ते ४ वेळा करा आणि मग त्यामध्ये खायचा सोडा घाला आणि पीठ चांगले हलवून ते घट्ट होईपर्यंत शिजवा आणि मग ते एक तूप लावलेल्या ताटामध्ये काढून ते पसरा आणि ते वरून थोडे सपाट करा आणि ते थोडे गार होऊ द्या.
 • ते थोडे गार झाले कि त्याच्या वड्या पाडून ते आणखीन थोडे गार होऊ द्या.
 • ह्या वड्या पूर्णपणे गार झाल्या कि त्या एक डब्यामध्ये काढून त्या आपण ४ ते ५ दिवस ठेवू कधी हव्या तेंव्हा खावू शकतो.

बेसन लाडू रेसिपी – besan ladoo recipe in marathi

बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make besan ladoo 

 • २ वाटी बेसन पीठ.
 • दीड वाटी तूप ( बाजारातील किंवा घरगुती ).
 • १ वाटी पिठी साखर किंवा दळलेली साखर.
 • २ चमचे वेलची पावडर.
 • १ चमचा काजू.
 • १ चमचा बेदाणे.

बेसन लाडू बनवण्याची कृती – instructions to make besan ladoo

 • मऊ आणि तोंडामध्ये टाकताच विरघळतील असे लाडू कसे बनवायचे याची कृती खाली दिलेली आहे.
 • सर्वप्रथम लाडू बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते साहित्य एकत्र करून घ्या.
 • त्यानंतर एक कढई घ्या आणि ती कढई मंद आचेवर गरम करण्यास ठेवा. एकदा कढई गरम झाली कि त्यामध्ये २ वाटी बेसनचे पीठ घाला आणि ते मंद आचेवर भाजण्यासाठी सुरुवात करा.
 • प्रथम बेसनचे पीठ कोरडेच भाजा.
 • बेसनाचे पीठ सारखे चमच्याने वरती खाली करा त्यामुळे सर्व पीठ चांगले भाजले जाईल आणि पीठ खाली लागणार नाही.
 • आपण ज्यावेळी कोरडे पीठ भाजत असतो त्यावेळी आपल्याला पिठामध्ये गुठळ्या झाल्यासारख्या दिसतात पण आपण जस जसे पीठ भाजत जाईन तस तश्या त्या गुठळ्या फुटतात.
 • हे कोरडे पीठ मंद आचेवर ८ ते १० मिनिटे भाजून घ्या आणि मग त्यामध्ये दीड वाटी तूप घाला आणि ते पिठामध्ये चांगले एकत्र करा आणि ते सतत हलवत रहा आणि तुपाचे आणि पीठाचे मिश्रण चांगले शिजवून घ्या.
 • हे मिश्रण १० ते १५ मिनिटे सतत हलवत हलवत भाजून घ्या.
 • आपल्या हे पीठ भाजताना त्याचा रंग बदलेला पाहायला मिळेल तसेच पीठ घट्ट बनेल आणि पिठाचा खमंग वास देखील येईल.
 • पीठ कढईमध्ये पीठ असे एका ठिकाणी गोळा झाल्यासारखे दिसेल म्हणजेच ते कढईच्या कडा सोडतील आणि मध्यभागी गोळा होईल.
 • तसे झाले कि गॅस बंद कारण आणि कढई गॅसवरून खाली उतरून ठेवा आणि ते गार होईपर्यंत वाट पहा.
 • भाजलेले पीठ गरम झाले कि ते दोन्ही हाताने घासून चांगले फोडून घ्या आणि मग त्यामध्ये १ वाटी साखर आणि वेलची पावडर घालून ती साखर चांगली मिक्स करा आणि ते मिश्रण दोन्ही हाताने घासून चांगले एकत्र करून घ्या आणि त्यामधील सगळ्या गुठळ्या फोडून घ्या आणि त्या पीठाचे छोटे छोटे लाडू वळा.
 • लाडू वळते वेळी त्या लाडूंना वरती एक बेदाना किंवा काजू लावा त्यामुळे लाडू छान दिसतील.
 • बेसनचे लाडू खाण्यासाठी तयार झाले.

आम्ही दिलेल्या besan recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बेसन रेसिपीज मराठी माहिती besan paratha recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या besan ladoo marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of besan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये besan barfi recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!