Halasana Information in Marathi हलासन माहिती मराठी हलासन म्हणजे काय ? प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य सदृढ आणि मजबूत राखण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम तसेच, योगा नित्यपणे करत असतो. अशाच एका आसनाच्या शेवटच्या पवित्रामध्ये आपले शरीर हे भारतीय शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या नांगरासारखे केले जाते. ज्याला आपण हलासन असे म्हणतो. मित्रहो, जर हे योगासन योग्य अशा पद्धतीने आणि योगासनामध्ये परिपक्व असलेल्या तज्ज्ञ अशा एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केले गेले, तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हलासन हे आसन खूप फायदेशीर योगासन ठरू शकते.
शरीराचा लठ्ठपणा आणि पोटाची घेरी कमी करण्यासाठी या आसनाचा आपल्याला पुरेपूर फायदा होऊ शकतो. याशिवाय, हे आसन मधुमेह, थायरॉईड यांसारखे रोग जडलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीसाठी खूप फायदेशीर देखील आहे. खरंतर मित्रांनो, हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार नांगरासारखा दिसत असल्याने, हलासन या आसनाला ‘हलवा पोझ योग’ असेही म्हटले जाते.
हलासन माहिती मराठी – Halasana Information in Marathi
हलासन आसन करताना प्रत्येकाने एका गोष्टीचे कायम भान ठेवले पाहिजेत की हलासन करणे इतके सोपे नाही. त्यामुळे, ज्या व्यक्ती हे आसन करण्यासाठी असमर्थ आहेत, त्यांनी केवळ अर्धहलसन करावे. याचबरोबर, पहाटे लवकर उठल्यावर रिक्त पोटात हलासनाचा सराव करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगले असते.
मित्रहो, जर काही कारणास्तव आपण हे आसन सकाळी करू शकत नसाल, तर संध्याकाळच्या शुध्द हवेत हलासनाचा सराव देखील केला जाऊ शकतो.
परंतू, प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजेत की आसनाचा सराव करण्यापूर्वी आपण सर्वांनी आपले पोट साफ करणे म्हणजे शौच करणे आवश्यक आहे. शिवाय, आपण जर हलासन आसन सरावाच्या साधारणतः चार ते सहा तास आधी हलक्या स्वरूपाचे अन्न खाल्ले, तर ते आपल्यासाठीच अधिक फायदेशीर आणि चांगले होईल.
- नक्की वाचा: धनुरासन माहिती
हलासनाचे फायदे
हलासन हा आसन प्रकार योगाच्या इतर आसनांमध्ये सर्वांत उत्कृष्ट योग आहे. हलासन आसन केल्याने आपल्या पचन व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी आणि पोटाशी संबंधित इतर विविध विकारांपासून मुक्त होण्यासाठी या आसनचा उपयोग केला जाऊ शकतो.
एनसीबीआय म्हणजे नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन यांच्या एका संकेतस्थळावर प्रचलित झालेल्या संशोधनात देखील हलासना हे आसन केल्यावर आपल्या आरोग्यावर किती सकारात्मक परिणाम होतो याबद्दलची पुष्टी करण्यात आलेली आहे.
शिवाय, या संशोधनात लहान मुलांना सुद्धा काही आसन करण्यासाठी देण्यात आले होते, ज्यामध्ये हलासन या आसनाचादेखील समावेश होता. संशोधनानंतर असे दिसून आले की हलासन केल्यावर मुलांच्या पचन व्यवस्थेमध्ये आधीच्या पचन तंत्रापेक्षा अधिक सुधारणा झाली आहे.
या वरील माहितीवरून मित्रहो आपण असे म्हणू शकतो की हलासन हे आसन पचन तंत्रासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर आहे. योग्य आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा सराव केला तर, वजन कमी करण्याच्या सरावात हलासन आसन आपल्याला सकारात्मक परिणाम दाखवू शकते.
मित्रहो वास्तविक पाहता, एनसीबीआयच्या वेबसाइटवर एक संशोधन आहे, ज्यामध्ये चीन या देशामधील नागरिकांना योगाभ्यास करण्यासाठी तयार केले गेले होते. या संशोधनात असे निदर्शनास आले आहे की हलासन हे आसन आपल्या सदृढ प्रकृतीसाठी विशेष आवश्यक आहे.
- नक्की वाचा: चक्रासन योग माहिती
शिवाय, या संशोधनामध्ये समाविष्ट केलेले आसन चयापचय वाढविण्यात, आपली अतिरिक्त तसेच, अनुपयोगी चरबी कमी करण्यास आणि आपल्या कंबरेचा व पोटाचा घेर कमी करण्यात यशस्वी असल्याचे आढळले. यावरून, आपल्याला असे म्हणता येईल की हलासन या आसनामुळे आपल्या शरीरावर होणारा चांगला परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार बदलू शकतो.
मित्रहो, निद्रानाश अर्थात आपली झोप नाहीशी होणे किंवा झोप व्यवस्थित न लागणे हा एक असा रोग आहे, ज्यामध्ये आपल्याला निवांतपणे झोप घेता येत नाही. त्यामुळे, अशा पद्धतीच्या झोपेच्या कमतरतेमुळे एखादी व्यक्ती बर्याच आजारांनी आणि रोगांनी आपल्याला वेढलेली दिसते. शिवाय, अशी व्यक्ती तिच्या दैनंदिन जीवनामध्ये स्वतःचे संपूर्ण शंभर टक्के देण्यास पूर्णपणे असक्षम असते.
मित्रांनो, एका संशोधनानुसार तर असे सत्य आपल्यासमोर उभे राहिले आहे की, तंद्री हे झोपेच्या कमतरतेमागील एक प्रमुख कारण असू शकते. परंतू, हलासन या आसनाच्या मदतीने आपणा सर्वांना अशा प्रकारच्या अनेक समस्यांवर अथवा तणावांवर मात करता येते. त्याचबरोबर, निद्रानाश, झोप न लागणे अशा परिस्थितींमध्ये हलासना केल्याने आपल्याला या आसनाचा बऱ्यापैकी काही फायदा होऊ शकतो.
आपण वरील काही वाक्यांमध्ये असे नमूद केले आहे की हलासन योगा ताण-तणाव, काळजी किंवा चिंता कमी करण्यासाठी सहाय्य करू शकतो. म्हणूनच, या ठिकाणी आपल्याला असे देखील म्हणतात येईल की हलासनाचे फायदे निद्रानाशसारखे आजार कमी करण्यात सकारात्मक परिणाम दाखवू शकतात.
आजकाल सर्वांच्याच व्यस्त दिनक्रमामुळे आणि दररोजच्या कामाच्या अतीवाढीव दबावामुळे प्रत्येकाला ताण येणे सामान्य आहे. परंतू, अशा परिस्थितीत देखील प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे मानसिक संतुलन व चांगले आरोग्य राखण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि यासाठी योगाचा तसेच, व्यायामाचा अवलंब केला जाऊ शकतो.
जन्मापासूनच मतिमंद असलेल्या मुलांवर एका संस्थेने केलेल्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, हलासना आसन अशा मुलांचा तणाव काही प्रमाणात दूर करू शकते.
खरंतर, सध्या या विषयावर अजुन संशोधन करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील हलासन हे आसन आपल्याला अधिक उपयुक्त ठरू शकते. एनसीबीआय या संस्थेने प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, हलासन या आसनासह इतर काही आसन आणि योगा देखील प्रकार २ या मधुमेहाच्या उपचारात सहाय्यक भूमिका अगदी व्यवस्थितरीत्या निभावू शकतात.
- नक्की वाचा: शवासन योग माहिती
हलासन आसन मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिनची प्रक्रिया सुधारते आणि त्या व्यक्तीच्या शरीरात ग्लूकोजची पातळी नियमित तसेच, नियंत्रित ठेवण्यास सहाय्य करू शकते. याव्यतिरिक्त, प्रकार २ च्या मधुमेहामुळे उत्पन्न होणाऱ्या अनेक इतर समस्या टाळण्यासाठी देखील हलासान या आसनाची आपल्याला मदत होते.
एकंदरीत, असे म्हटले जाऊ शकते की मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखर सामान्य, संतुलित आणि नियंत्रित ठेवण्यासाठी हलासन आसन करणे कधीही फायद्याचे ठरू शकते.
हलासन आसन करण्याच्या पद्धती
मित्रहो, जर तुम्ही प्रथमच हलासन हे आसन करत असाल तर काही गोष्टींची विशेष लक्ष देऊन काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहाटेला किंवा संध्याकाळच्या वेळेला हे आसन आपल्याला करता येऊ शकते. परंतू, पहिल्या वेळी हे आसन एखाद्या योग तज्ज्ञाच्या किंवा योग शिक्षकाच्या देखरेखीखाली करा.
त्याचबरोबर, आपल्या जेवणाची वेळ आणि हलासनाची वेळ या दोहोंमध्ये जवळजवळ पाच ते सहा तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम मित्रहो, हलासन हे आसन करण्यासाठी सपाट मैदान निवडल्यानंतर योग्य आणि फ्रेश वातावरणात चटई घालून त्यावर आपल्या पाठीवर झोपा.
नंतर, आपले शरीर पूर्णपणे सरळ ठेवा, हात सरळ दिशेने पसरवा, आपल्या दोन्ही हातांना कंबरेजवळ घ्या आणि पायाचे तळवे जमिनीच्या बाजूने उघडे ठेवा. यानंतर, चार वेळा दीर्घ, लांब श्वास घ्या तसेच, घेतलेला श्वास तसाच थोडा वेळ आत ठेवा आणि थोड्या वेळानंतर अगदी आरामात बाहेर सोडा.
ही कृती करण्यासोबतच आता सद्यस्थितीत आपले ध्यान एकत्रित आणण्याबरोबरच, आपले शरीर देखील हलासन या आसनासाठी तयार करा. आता पहिल्यासारखा लांब आणि दीर्घ श्वास घेत, दोन्ही पाय हळुवार आकाशाच्या दिशेने करण्यासाठी कृती करा. आपले दोन्ही पाय इतक्या उंचावर न्या की जेणेकरून, आपल्या शरीरावर बरोबर नव्वद डिग्री त्रिकोण तयार होईल.
आता काही सेकंद आपण याच स्थितीत रहा आणि दोन्ही तळवे असलेल्या कंबरेला व्यवस्थित आधार द्या व दोन्ही पाय मस्तकाच्या बाजूने हलवा. यानंतर, आपले दोन्ही पाय मागे घेत, हळुवारपणे पायाचे दोन्ही अंगठे जमिनीवर ठेवा तसेच, तळवे जमिनीवर परत आणा व आपली कंबर पूर्णपणे जमिनीवर ठेवा आणि कमीतकमी २० ते २५ सेकंद या स्थितीत स्थित रहा.
मित्रहो, तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा वेळ वाढवू किंवा कमी करू शकता. आता हळुवारपणे आपले पाय जमिनीवर आणा, परंतू आपले पाय परत जमिनीवर आणताना अजिबात घाई करू नका. अशा पद्धतीने, एकाच वेळी कमीतकमी तीन ते चार वेळा हलासन या आसनाचा सराव केला जाऊ शकतो.
तेजल तानाजी पाटील
बागिलगे, चंदगड.
आम्ही दिलेल्या ardha halasana information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर शवासन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या halasana yoga information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about halasana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये halasana benefits in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट