भारतीय जलतरणपटू ची माहिती Indian Swimmers Information in Marathi

indian swimmers information in marathi भारतीय जलतरणपटू ची माहिती, आज आपण या लेखामध्ये भारतीय जलतरणपटू यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. पाण्यामध्ये पोहाल्यानंतर आपल्याला अनेक फायदे होतात त्यामुळे अनेक लोक हे खेड्यामध्ये नदीमध्ये, विहिरीमध्ये किंवा तलावामध्ये रोज जात असतात तसेच शहरामध्ये लोक स्विमिंग टँक मध्ये पोहण्यासाठी जातात. पूर्वी पोहणे हा एक विरंगुळा किंवा आरोग्य फायद्यासाठी केला जाणारा एक उपक्रम होता परंतु नंतर याला खेळाचे स्वरूप आले आहे. सध्या जलतरण हा ५ ऑलीम्पिक खेळामध्ये एक महत्वाच्या खेळामधील आहे.

जो १८९६ पासून खेळाचा भाग बनला आहे आणि या खेळामध्ये इतर देशाच्या खेळाडूंनी तर आपले नाव कमवले आहेच, परंतु आपल्या भारतीय जलतरणपटूनी देखील या ऑलीम्पिक खेळामध्ये आपले नाव मोठे केले त्याचबरोबर आपल्या सोबत आपल्या देशाचे देखील नाव उंचावले.

indian swimmers information in marathi

indian swimmers information in marathi

भारतीय जलतरणपटू ची माहिती – Indian Swimmers Information in Marathi

काही प्रसिध्द भारतीय जलतरण खेळाडू – best swimmer in india

सध्या ऑलीम्पिकमध्ये जलतरण या खेळाला महत्वाचे स्थान मिळाले आहे आणि यासाठी अनेक वेगवेगळ्या देशाचे जलतरण खेळाडू यामध्ये सहभागी होत असतात आणि तसेच भारताचे देखील असे अनेक खेळाडू आहेत जे यामध्ये सहभागी झाले आणि आपले तसेच भारताचे नाव देखील उंचावले. चला तर आता आपण काही प्रसिध्द भारतीय जलतरण खेळाडूंची माहिती पाहूया.

  • आरती साहा

आरती साहा हि एक भारतीय जलतरणपटू म्हणून ओळख आहे आणि हिने वयाच्या चौथ्या वर्षी ब्रिटीश काळामध्ये भारतीय पश्चिम बंगालची राजधानी असणारे कलकत्ता या शहरामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. आरती साहा हि १९५९ मध्ये इंग्रजी चॅनेल ओलांडणारी पहिली आशियाई महिला म्हणून सन्मानित केले होते आणि यासाठी तिला भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती. या जलतरणपटू ला १९६० मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता आणि हि पद्मश्री पुरस्कार मिळवणारी भारतीय पहिली महिला होती.

  • समशेर खान

समशेर खान हा भारतामधील एक प्रसिध्द जलतरणपटू आहे आणि भारतामधील सर्वात बलवान जलतरणपटूपैकी एक आहे. ऑलीम्पिक मध्ये भाग घेणारा हा पहिला भारतीय जलतरणपटू म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याने उन्हाळी ऑलीम्पिक मध्ये प्रथम खेळला होता. तसेच त्याने १९५४ मधील २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेमध्ये त्याने वैयक्तिकरित्या सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याचबरोबर १९५५ मध्ये बंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय संमेलनात तत्कालिक विद्यमान विजयी मालिका खंडित करणारा समशेर हा पहिला खेळाडू होता.

  • साजन प्रकाश

साजन प्रकाश यांना भारताचे मायकल फेल्प्स महणून ओळखले जाते किंवा ते प्रसिध्द आहेत. साजन प्रकाश यांचा जन्म १४ सप्टेंबर १९९३ मध्ये झाला आणि त्यांनी २१६ पासून ऑलीम्पिक खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी २०१६ मध्ये २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता तसेच त्यांनी २०१५ च्या राष्ट्रीय खेळामध्ये ६ सुवर्ण आणि ३ रौप्य पदक मिळवली होती. तसेच यांनी २०१७ मध्ये ताश्कंद या ठिकाणी आशियाई वयोगटामध्ये १ सुवर्णपदक, २ रौप्य पदक आणि ३ कांस्यपदक अशी एकूण ५ पदके मिळवली होती.

  • भक्ती शर्मा

भक्ती शर्मा हि एक भारतीय ओपन वॉटर स्विमिंग लिजेंड आहे आणि अंटाक्टिक ओपन स्विमिंग रेकोर्ड करणारी ती सर्वात तरुण महिला आहे. यांनी १ डिग्री सेल्सियस पाण्यामध्ये ४१ मिनिटे १४ सेकंदामध्ये २.३ किलोमीटर पोहले होते. तसेच तिने लीन कॉक्स आणि लुईस पग यांचा पाचही महासागरामध्ये पोहचण्याचा विक्रम शर्माने मोडला.

वीरधवल खाडे हा सर्वात प्रसिध्द आधुनिक भारतीय जलतरणपटू आहे आणि या जलतरण खेळाडूला २०११ मध्ये महाराष्ट्रातील अर्जुन पुरस्कार मिळाला होता तसेच २००८ मध्ये बीजिंग ऑलीम्पिकसाठी त्याने पुरुषांच्या ५० मीटर, १०० मीटर आणि २०० मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०१० मध्ये ५० मीटर बटरफ्लाय स्पर्धेमध्ये वीरधवलच्या कांस्यपदकाने भारताला २४ वर्षातील पहिले ऑलीम्पिक पदक मिळवून दिले.

  • शिख टंडन

२००४ मध्ये अथेन्स ऑलीम्पिक स्पराधेमध्ये भाग घेणारी बंगळूर ची शिखा टंडन हे खेळाडू भारताची एकमेव जलतरण खेळाडू होती. शिखा टंडन हिने २००५ मध्ये महाराष्ट्राचा अर्जुन पुरस्कार मिळविला आणि ती अनेकांची रोल मॉडल बनली. हिने वयाच्या १३ व्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि १६ व्या वर्षी जागतिक स्पराधेमध्ये भाग घेतला होता आणि हिने २००५ मध्ये आपल्या नावावर ५ विक्रम बनवले होते. तिने तिच्या आज पर्यंतच्या कारकिर्दीमध्ये १४६ राष्ट्रीय पदके आणि ३६ आंतरराष्ट्रीय पदके मिळवली आहेत.  

  • शिवानी कटारिया

शिवानी कटारिया हिने वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजेच शाळेमध्ये असतानाच पोहण्यास सुरुवात केली किंवा प्रशिक्षण घेण्य सुरुवात केली. शिवानीच्या नावावर २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सर्वाधिक राष्ट्रीय विक्रम आहेत. २०१६ मध्ये तिने २०० मीटर फ्रीस्टाईल पूर्ण केले परंतु तिला उपांत्य फेरी मध्ये प्रवेश मिळाला नाही. तसेच तिने त्याच वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास बनवला.

  • नफिसा आली

नफिसा लई हि एक अभिनेत्री आहे आणि ती जलतरण खेळाडू म्हणून देखील प्रसिध्द आहे. १९७४ मध्ये ती नॅशनल चॅम्पियन बनली होती. नफिसा हिने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये १५ वर्ष जुना विक्रम मोडला होता. तिने असे देखील सांगितले कि ती शाळा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जलतरण चॅम्पियन आणि नानात्र तिने अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली.

आम्ही दिलेल्या indian swimmers information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारतीय जलतरणपटू ची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indian swimmers information in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about indian swimmers in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!