वीरधवल खाडे मराठी माहिती Virdhawal Khade Information in Marathi

Virdhawal Khade Information in Marathi वीरधवल खाडे मराठी माहिती महाराष्ट्राचा मराठी मुलगा वीरधवल खाडे याने जागतिक स्तरावर जलतरणपटू म्हणून आपल्या देशाचं नाव मोठं केलं आहे. वीरधवल खाडे हा भारतातील अव्वल क्रमांकाचा जलतरणपटू मांनला जातो. जलतरणपटू म्हणून वीरधवल खाडे यांची ख्याती संपूर्ण जगभरात पसरली आहे. राष्ट्रकुल, आशियाई, आंतरराष्ट्रीय या सर्व स्पर्धांमध्ये त्याने आपल्या कलागुणांनी दाखवून दिलं की जलतरणात देखील आपण आपला विश्व निर्माण करू शकतो. जलतरणात अव्वल यश मिळवणारा वीरधवल खाडे यांच्या जलतरण क्रीडा क्षेत्रातील सहभागाविषयी आणि जीवनाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Virdhawal Khade Information in Marathi
Virdhawal Khade Information in Marathi

वीरधवल खाडे मराठी माहिती – Virdhawal Khade Information in Marathi

पूर्ण नाव (Name)वीरधवल विक्रम खाडे
जन्म (Birthday)२९ ऑगस्ट १९९१
जन्म गाव (Birth Place)कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत.
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)जलतरणपटू, फ्रीस्टाइल व बटरफ्लाय

जन्म

वीरधवल खाडे यांचा जन्म कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला आहे. २९ ऑगस्ट १९९१ साली वीरधवल खाडे यांचा जन्म झाला. आज पर्यंत आपल्या सगळ्यांचाच असा समज होता की कोल्हापूरच्या मातीत जन्माला आलेला पैलवान होतो. परंतु वीरधवल खाडे हे ह्या गोष्टीला अपवाद आहे. असं म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण वीरधवल खाडे यांच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात उतरली.

अगदी चार वर्षांचे असल्यापासून वीरधवल पोहण्याचा  सराव करत आहेत. सुरुवातीस त्यांनी त्यांच्या वडिलांकडून प्रशिक्षण घेतले त्यांचे वडील लहानपणापासूनच त्यांना पोहण्यास शिकवायचे. कोल्हापुरातच वीरधवल लहानाचे मोठे झाले तिथूनच त्यांनी त्यांच शिक्षण देखील पूर्ण केलं.

प्रारंभिक शिक्षण कोल्हापूर मधून पूर्ण केल्यावर वीरधवल खाडे यांनी महाविद्यालय शिक्षण न्यू मॉडेल कॉलेज येथून पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर वीरधवल यांनी फक्त आणि फक्त जलतरणावर लक्ष केंद्रित केलं वीरधवल खाडे नऊ वर्षाचे असल्यापासून वेगवेगळ्या जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात करु लागले.

वैयक्तिक आयुष्य

अगदी कमी वेळेत वीरधवल खाडे यांनी यशाचं शिखर गाठलं. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खाडे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलं. भरपूर यश आणि प्रसिद्धी प्राप्त झाल्यावर वीरधवल खाडे हे विवाहबंधनात अडकले वीरधवल खाडे यांचा विवाह आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतूजा भट हिच्याशी झाला.

३० जून २०१७ सली कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल मध्ये या दोन उत्कृष्ट खेळाडूंनी एकमेकांच्या गळ्यात हार घालून विवाह सोहळ्याला चारचाँद लावले. यांच्या विवाहात अनेक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. वीरधवल खाडे यांची पत्नी ऋतूजा भट हीसुद्धा एक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील ऋतुजा भट यांची कारकीर्द उत्कृष्ट आहे.

वीरधवल खाडे एक उत्कृष्ट जलतरणपटू

वडिलांच्या साथीने व मार्गदर्शनाने वीरधवल खाडे यांनी अवघ्या चार वर्षाचे असताना पोहण्याच्या सरावाला सुरुवात केली. पुढे जाऊन स्विमिंग करणं हा वीरधवल खाडे यांचा एक छंदच झाला आणि पुढे याच क्षेत्रामध्ये करिअर करावं अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये जागृत झाली. पुढे वीरधवल खाडे यांनी कोल्हापूर मधील जलतरण शिक्षण शिबिरांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली पुढे दहा वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपलं कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली.

वीरधवल खाडे अवघ्या सतरा वर्षाचे असताना ऑलम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली. त्यावेळी वीरधवल खाडे हे सर्वात लहान जलतरणपटू होते. वीरधवल खाडे हे वरिष्ठ राष्ट्रीय विजेता आहेत‌‌. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ग्वांगंझू येथे झालेल्या स्पर्धेमध्ये ब्रॉंझ म्हणजेच कांस्य पदक पटकावलं आणि तिथून पुढे जागतिक स्तरावर वीरधवल खाडे याची प्रसिद्धी पसरली.

या पदकाचा देखील एक इतिहास आहे. खरंतर १९५१ नंतर पन्नास मीटर बटरफ्लाय या प्रकारांमध्ये हे पदक पटकावणारा वीरधवल खाडे हा पहिलाच भारतीय जलतरणपटू ठरला होता. आणि हे पदक भारताला तब्बल चोवीस वर्षांनी लाभलं. वीरधवल खाडे याच्या या यशामुळे भारताचं नाव देखील उंचावलं गेलं. वीरधवल खाडे यांनी ऑलम्पिक वगळता इतर सर्व स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवून दिले आहेत.

आज पर्यंत वीरधवल खाडे यांच्याकडे जलतरणात किती पदक असतील याचा आपण विचारही करू शकत नाही. वीरधवल खाडे हे पुरुषांच्या ५०, १०० आणि २०० मीटर फ्रीस्टाइल या प्रकारांमध्ये देखील सहभागी झाले. चीनच्या बींजीग येथील २००८ साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत २०० मीटर मध्ये सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये वीरधवल खाडे याने १०० मीटर राष्ट्रीय विक्रम करून आपला स्वतःचाच रेकॉर्ड मोडला होता. ५०.०७ अशी वेळ नोंदवून वर वीरधवल खाडे यांनी राष्ट्रीय विक्रम केला. ऑलिंपिक स्पर्धांच्या बाबतीत वीरधवल खाडे यांचे नशीब थोड्या थोड्या गोष्टींसाठी नेहमीच मूकल आहे. २०१२ साली झालेल्या ऑलम्पिक मध्ये शारीरिक दुखापती मुळे वीरधवल खाडे यांना ऑलम्पिक मध्ये सहभागी होता आले नाही.

सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये ५० मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात सहभागी होऊन खाडे यांनी सुवर्णपदक पटकावलं या स्तरावरील या स्पर्धेत २३.०२ सेकंद अशी सर्वात उत्तम वेळ नोंदवत त्याने विक्रम केला आहे.

वीरधवल खाडे याने सिंगापूर मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील फ्रीस्टाईल प्रकारांमध्ये २२.५८ सेकंदात १०० मीटर फ्री स्टाइल मध्ये ४९.४७ सेकंद २०० मीटर फ्री स्टाइल मध्ये एक मिनिट ४९.८६ सेकंद ४०० मीटर मध्ये चार मिनिटे ०१.८७ सेकंद आणि शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारांमध्ये ५२.०७ सेकंद अशा वेगवेगळे वेळ नोंदवत राष्ट्रकुल, आशियाई आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वीरधवल खाडे यशाची शिडी वर चढत राहिले.

इसवी सन २०१० मध्ये वीरधवल खाडे यांचा एक उत्कृष्ट जलतरणपटू आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना अर्जुन पुरस्काराने देऊन सन्मानित करण्यात आले. सन २००६ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये वीरधवल खाडे यांनी तीन सुवर्ण पदक जिंकून नवीन विक्रम तयार केला होता. दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये देखील वीरधवल खाडे यांचा सहभाग होता. सन २०१६ मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये वीरधवल खाडे यांनी ५० मीटर बटरफ्लाय या प्रकारात सुवर्णपदक पटकावलं.

आणि पन्नास मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं. २०१९ मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा मध्ये ५० मीटर फ्री स्टाइल या प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. महाराष्ट्र शासनातर्फे वीरधवल खाडे यांना मालवण येथील तहसीलदार पदाची संधी साधून आली होती. परंतु त्यांच्या सराव करण्याच्या वेळा म्हणजेच दैनंदिन कार्यक्रमावर त्या गोष्टीचा प्रभाव पडत होता म्हणून ती संधी नाकारावी लागली.

सध्या वीरधवल खाडे बेंगळूर येथे नरहर आमीन या कोच च्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये वीरधवल खाडे यांना अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. त्यातीलच एक सांगायचं झालं तर काही काळात त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता स्पर्धेसाठी ते तंदुरुस्थ नव्हते परंतु नंतर आहार तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी आपल्या तब्येतीवर लक्ष केंद्रित केलं आणि तंदुरुस्त बनण्याचा प्रयत्न केला जेणेकरून पाण्यात उतरल्यावर त्यांना चपळता येईल.

वीरधवल खाडे याला गो स्पोर्ट्स फाऊंडेशन चा पाठिंबा आहे. ही फाउंडेशन ना-नफा क्रीडा संस्था आहे. या फाउंडेशन मुख्य उद्दिष्ट आहे भारतातील क्रीडा उत्कृष्टतेला चालना देणे. वीरधवल खाडे याच फाउंडेशन च्या मार्फत देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा मध्ये सहभागी होतो. महाराष्ट्र राज्य सरकारने अंधेरीच्या तहसीलदार पदासाठी वीरधवल खाडे यांची नियुक्ती केली आहे.

आज जगभरात वीरधवल खाडे सर्वात उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून नावाजले जातात. खरंतर या क्षेत्राला आपलं करिअर ऑप्शन म्हणून निवडणं ही खूप कठीण गोष्ट आहे परंतु वीरधवल खाडे यांनी अथक परिश्रमानंतर इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. नियमित सराव करणं हा त्यांच्या यशाचा खरा मार्ग आहे.

सरावाच्या दरम्यान त्यांना बहुतांशवेळा पाण्यात राहावं लागलं असणार त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर नक्कीच झाला. बऱ्याच वेळा त्यांना शारीरिक दुखापती ना सामोरे जावे लागले परंतु इतक्या सगळ्या अडचणींवर मात करत वीरधवल खाडे आज आपल्या सर्वांच्या समोर उभे आहेत. त्यांच या क्षेत्रातील योगदान असामान्य आहे. लहानपणापासून जोपासलेली आवड पुढे जाऊन त्यांना जागतिक स्तरावरील उत्कृष्ट जलतरणपटू अशी ओळख निर्माण करून देईल याचा विचार त्यांनी कधीच केला नसावा.

राष्ट्रकुल, आशियाई व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अजूनही वीरधवल खाडे यांची घोडदौड चालूच आहे. एका छोट्याशा जिल्हा मधून पुढे जाऊन जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना वीरधवल खाडे यांना खूप अभिमानास्पद वाटलं असेल.

आम्ही दिलेल्या virdhawal khade information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वीरधवल खाडे मराठी माहिती virdhawal khade in marathi language बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indian swimmer virdhawal khade information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of virdhawal khade in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये virdhawal khade all information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!