IPS Krishna Prakash Biography in Marathi – IPS Krishna Prakash Information in Marathi आईपीएस कृष्ण प्रकाश माहिती आज समाजामध्ये पोलीस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. पोलीस हे समाजाचे शुभचिंतक असतात. टीव्ही वरती किंवा मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे पोलिस ऑफिसर, हवालदार यांच्यापेक्षा खऱ्या आयुष्यातील पोलीस यांच्यामध्ये खूप फरक असतो. खरा आयुष्यामध्ये पोलीस आपले वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून फक्त आणि फक्त समाजाच्या हितासाठी काम करतात समाजामध्ये कायदा व्यवस्था कायम ठेवणें शिवाय गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अतिशय धाडसाने पोलीस काम करतात.
आजच्या लेखामध्ये देखील आपण अशाच एका रुबाबदार, प्रामाणिक, शौर्यवान, धैर्यवान पोलिस ऑफीसरची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांची सोशल मीडियावर आयर्न मॅन म्हणून नवीन ओळख जगासमोर आली आहे. चला तर जाणून घेऊ या आयपीएस ऑफिसर कृष्ण प्रकाश यांची शौर्यगाथा.
आईपीएस कृष्ण प्रकाश माहिती – IPS Krishna Prakash Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) | कृष्णप्रकाश |
जन्म गाव (Birth Place) | झारखंड मधील हजारीबाग |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | पोलिस ऑफीसर |
जन्म
कृष्णप्रकाश हे झारखंड मधील हजारीबाग या एका छोट्याशा गावांमध्ये जन्माला आलेले एक अतिशय हुशार व प्रामाणिक पोलिस ऑफिसर आहेत. कृष्ण प्रकाश यांच संपूर्ण बालपण झारखंडमध्ये गेलं. कृष्णप्रकाश यांची आई शेती करायची आणि त्यांचे वडील एक पोलीस अधिकारी होते. कृष्ण प्रकाश यांना दोन मोठ्या बहिणी देखील आहेत.
कृष्णा प्रकाश लहानपणापासून अभ्यासामध्ये चतूर होते. कृष्ण यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात ते राहत असलेल्या गावातील शाळेतूनच झाली. कृष्ण प्रकाश यांच राहत गाव म्हणजे कोरंबे ज्या गावांमध्ये साधा वीज पुरवठा देखील नियमित व्हायचा नाही. अशा गावातील शाळेमध्ये कृष्णप्रकाश यांच शिक्षण सुरू झालं. परंतु शाळेमधील सोयीसुविधा अपूर्ण असल्याने त्यांना शाळा बदलावी लागली.
इयत्ता तिसरी मध्येच कृष्णप्रकाश यांना शाळा बदलावी लागली आणि हजारीबाग येथील सेंट झेवियर्स अंड सेंड रॉबर्ट हायस्कूल ह्या कॅथलिक शाळेमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. सुरुवातीला त्या शाळेतील वातावरणाशी मिळतंजुळतं करून घेताना कृष्ण प्रकाश यांना हाल सोसावे लागले. ते ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी होते.
कृष्णप्रकाश यांनी स्वतः सांगितलेल्या माहितीप्रमाणे सुरुवातीच्या पहिल्या वर्षांमध्ये त्यांना परीक्षेमध्ये अक्षरशा शुन्य गुण मिळाले होते. आणि त्याच वेळी त्यांनी संकल्प केला की ते याच्या पुढील प्रत्येक परीक्षेमध्ये पहिले येथील आणि तेव्हापासून त्यांनी प्रत्येक परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी गाठली. कृष्णा प्रकाश यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हजारीबाग येथील सेंट कोलंबीयाझ कॉलेजमधून पूर्ण केलं.
कृष्णप्रकाश लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचे होते शिवाय त्यांच्यामध्ये समाजाचं रक्षण करण्याची ताकद इच्छा होती. समाजासाठी काहीतरी करून दाखवायाची नेहमीच त्यांना आस लागलेली होती. कृष्णप्रकाश जेव्हा हायस्कूल मध्ये होते तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला ज्या प्रसंगामुळे ते आयपीएस ऑफिसर बनण्यासाठी प्रेरित झाले.
कृष्णप्रकाश बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत होते साधारण आपण सर्वच बोर्डाच्या परीक्षेचे अंतिम दोन महिने घरातूनच अभ्यास करतो. कृष्णप्रकाश देखील त्यांच्या घरूनच अभ्यास करायचे. एक दिवस असच अभ्यास झाल्यावर ते क्रिकेट खेळायला गेले होते. तेव्हा मैदानामध्ये एक पोलिसांची जीप आली आणि त्या जीपमधून काही पोलीस अधिकारी खाली उतरले आणि त्यांनी कृष्णप्रकाश यांच्यावर चोरीचा आळ लावला.
शिवाय कृष्णप्रकाश यांनी चोरी केली नाही असं म्हटलं तेव्हा त्यांनी कृष्णप्रकाश यांना ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. ते पोलिस अधिकारी प्रकाश यांच्यावर खोटे आरोप लावत होते आणि त्यांना अटक करून पोलिस ठाण्यात घेऊन गेले. कृष्ण प्रकाश यांनी सगळे आरोप फेटाळून लावले तेव्हा कुठे एक दिवसाची शिक्षा भोगून झाल्यावर कृष्णप्रकाश यांना सोडून देण्यात आलं.
या गोष्टीमुळे कृष्ण प्रकाश यांचा फार संताप झाला आणि ते अक्षरशः त्या पोलिसाला मारण्यासाठी निघाले परंतु त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना अतिशय चांगल असे मार्गदर्शन दिले. त्यांचे वडील कृष्णप्रकाश यांना म्हणाले की आपल्या रागाचा आपण सकारात्मक उपयोग केला पाहिजे. वडिलांनी दिलेला हा अतिशय चांगला उपदेश कृष्णप्रकाश यांच्या कामी आला.
कृष्णप्रकाश यांनी तेव्हा अशा खोट्या पोलिस अधिकाऱ्यांना खरा कायदा दाखवण्याची शपथ घेतली आणि तेव्हापासूनच त्यांनी आयपीएस ऑफिसर बनण्याचा निर्णय घेतला. परंतु याच एका प्रसंगामुळे कृष्णप्रकाश यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता. म्हणूनच त्यांनी थोडावेळ शिक्षणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या वडिलांनी कृष्णप्रकाश यांना गावी जाऊन शेती करण्याचा संदेश दिला.
पुढील एक वर्ष कृष्णप्रकाश हे गावांमध्ये शेती करत होते. त्या एक वर्षांमध्ये देखील कृष्णप्रकाश यांनी नेहरू विभाग केंद्रात काम केलं बऱ्याच गावांमध्ये युथ कॉर्डिनेटर च्या माध्यमातून त्यांनी नेहरु विभाग केंद्र सुरु केलं आणि त्यांना त्यांच्या कामामुळे नेहरु विभाग केंद्रामध्ये संपादन पद देखील मिळाल.
ऑफिसर कृष्णप्रकाश
कृष्ण प्रकाश एक जिद्दी, प्रामाणिक, बुद्धिमान व्यक्ती आहेत. आपल महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून शेती करून पुन्हा त्यांची पाऊले शिक्षणाकडे वळली. आणि त्यांनी यूपीएससी एक्झाम देण्याचा निर्णय घेतला. इतपर्यंत कृष्णप्रकाश अतिशय मेहनतीने पुढे आले होते. आता त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण असा क्षण त्यांच्या समोर उभा होता. यूपीएससी च्या इंटरव्यू मध्ये तीन राऊंड असतात सुरुवातीचे दोन राउंड कृष्णप्रकाश यांनी पार केले होते.
परंतु तिसर्या राऊंड साठी ते भरपूर निराश झाले होते हताश झाले होते. परंतु तरीही त्यांच्या मधली ति जिद्द व साहस अजूनही गेली नव्हती. इंटरव्यू पॅनल मध्ये त्यांना विचारला जाणारा प्रश्न असा होता की, जर तुमचे वरिष्ठ किंवा तुमचे सहकारी भ्रष्ट असतील तर तुम्ही काय कराल ? जर तुमच्या सोबत काम करणारी सर्व सहकारी गैरवर्तणूक करत असतील तर तुम्ही काय कराल? जर तुम्हाला प्रमोशन मिळवून देण्यासाठी किंवा तुम्हाला एखादी पोस्ट मिळवून देण्यासाठी चुकीचे काम करावे लागत असेल तर तुम्ही काय कराल?
या प्रश्नाचं उत्तर देताना कृष्णप्रकाश म्हणाले जर तुम्ही खरे आहात जर तुम्ही सत्याच्या मार्गावर आहात तर तुम्ही एकटे पुढे जायला हवं जर तुमचा आवाज खरा आहे तर तुम्ही एकटे जाण्याचा मार्ग निवडला पाहिजे. कृष्णप्रकाश यांच्या या उत्तरावर परीक्षक फारच खूश झाले आणि ते कृष्णप्रकाश यांना म्हणाले तुम्हाला आयएएस परीक्षे मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी जितके गुण हवे आहेत तितके गुण सांगा.. यावर कृष्णप्रकाश म्हणाले मला माझ्या पात्रते पेक्षा जास्त गुण मिळाले नाही पाहिजेत आणि मला माझ्या पात्रते पेक्षा कमी गुण देखील मिळाले नाही पाहिजे.
हे उत्तर ऐकल्यावर कृष्णप्रकाश यांना या परीक्षेमध्ये १९८ गुण मिळाले आणि ते उत्तीर्ण झाले. पुढे आयपीएस एक्झामचा असणारा फाउंडेशन कोर्स कृष्णप्रकाश पूर्ण करू शकले नाहीत कारण त्यावेळी त्यांच्या वडिलांची तब्येत खालावली होती. परंतु आयपीएस ट्रेनिंग मध्ये जाण्याचं कृष्णप्रकाश यांचं स्वप्न होतं जे त्यांनी तेव्हाच ठरवलं होतं जेव्हा त्यांच्यावर खोटे आरोप लादले गेले होते.
ते त्यांचे स्वप्न त्यांना आज जगायला मिळत होतं. कृष्णप्रकाश यांचे विचार खरच येणाऱ्या पिढीसाठी आपल्या समाजासाठी विकासंशिल ठरले आहेत. जसा अन्याय ते लहान असताना त्यांच्यावर झाला तसा अन्याय यापुढे कोणावरही होऊ नयेत म्हणून त्यांनी आयपीएस ची परीक्षा दिली होती.
त्यांनी तेव्हाच शपथ घेतली की समाजातील खोट्या, कपटी, भ्रष्टाचारी वृत्तीच्या लोकांना कायद्याने धडा शिकवायचा. ते भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपला फोन नंबर देतात जेणेकरून कधी कोणी अडचणीत असेल कोणावर अन्याय होत असेल तर ते त्यांच्या मदतीला धावून जाऊ शकतील.
आयर्नमॅन कृष्ण प्रकाश
कृष्णप्रकाश यांनी आतापर्यंत अनेक गुन्हेगारांना धडा शिकवला आहे. ते आपलं काम अतिशय निष्ठेने, जबाबदारीने पार पाडतात. ते आजपर्यंत या एकाच उद्देशावर चालत आले आहेत ते म्हणजे ज्याच्यावर अन्याय होत आहे त्याला न्याय मिळवून देण. सध्या कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये आयपीएस ऑफिसर म्हणून सेवा देत आहेत. २०१७ साली कृष्णप्रकाश यांनी फ्रान्स मध्ये घडलेली आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस ही स्पर्धा जिंकली होती.
ही स्पर्धा जगातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. आणि ही स्पर्धा जिंकणारे कृष्णप्रकाश हे भारतातील पहिले पोलीस अधिकारी होते शिवाय भारतातील इतर सैनिक किंवा निमलष्करी दल, पोलीस सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्याने जिंकली नव्हती म्हणूनच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कृष्णप्रकाश यांच्या कामगिरीची नोंद करण्यात आली आहे.
ही खरंच खूप कौतुकास्पद बाब आहे कृष्ण प्रकाश यांच्यासारखे आयपीएस ऑफिसर येणाऱ्या भावी पिढीसाठी खूप प्रेरणादायी ठरले आहेत. आजच्या भारताला कृष्णप्रकाश यांच्या सारख्या अनेक आयपीएस ऑफिसर्स ची गरज आहे.
आम्ही दिलेल्या ips krishna prakash biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आईपीएस कृष्ण प्रकाश माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ips krishna prakash information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of ips krishna prakash in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये krishna prakash ips wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट