माहिती तंत्रज्ञान कायदा माहिती IT Act 2008 pdf in Marathi

it act 2008 pdf in marathi माहिती तंत्रज्ञान कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये आयटी कायदा (IT act) म्हणजेच ज्याला आपण तंत्रज्ञान कायदा म्हणून ओळखतो त्याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मध्ये सुरु करण्यात आला होता आणि हा कायदा अंतरराष्ट्रीय व्यापार कायद्यावरील सयुंक्त राष्ट्र आयोगाने स्वीकारलेल्या कॉमर्सवरील कायद्यावर आधारित कायद्यावर आहे. या कायद्याचे मराठीमधील पूर्ण स्वरूप माहिती तंत्रज्ञान कायदा आहे आणि इंग्रजीमध्ये याचे पूर्ण स्वरूप information technology act म्हणून ओळखला जातो.

माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये २००६ मध्ये आणि २००८ मध्ये काही सुधारणा करण्यात आलाय होत्या त्यामुळे या कायद्याला माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ (information technology act 2008) म्हणून देखील ओळखले जाते. या कायद्याला ९ जून २००० मध्ये संमत्ती मिळाली आणि तो संपूर्ण देशामध्ये लागू झाला.

माहिती तंत्रज्ञान कायदा हा भारतामध्ये भारतीय संसदेने डिसेंबर २००८ मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर लगेच एक महिन्याने मंजूर करण्यात आला आणि या कायद्यातील कलम ६९ सारखे काही विभाग जे भारत सरकारला मॉनीटरिंग, डिक्रीप्शन, इंटरसेप्शन, इलेक्ट्रॉनिक डेटा आणि ट्रॅफिक डेटा अवरोधित करण्याचे अधिकार देतात. चला तर खाली आपण या कायद्याविषयी आणखीन माहिती घेवून.

it act 2008 pdf in marathi
it act 2008 pdf in marathi

माहिती तंत्रज्ञान कायदा माहिती – IT Act 2008 pdf in Marathi

कायद्याचे नावआयटी कायदा (IT act)
पूर्ण नावमाहिती तंत्रज्ञान कायदा २००८ (information technology act 2008)
संमती केंव्हा मिळाली९ जून २०००
कायद्यातील सुधारणा२००८
कोणी लागू केलाभारतीय संसदेने

आयटी चे पूर्ण स्वरूप काय आहे – what is full form of IT 

या कायद्याचे मराठीमधील पूर्ण स्वरूप माहिती तंत्रज्ञान कायदा आहे आणि इंग्रजीमध्ये याचे पूर्ण स्वरूप information technology act म्हणून ओळखला जातो.

माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ वैशिष्ठ्ये – features 

  • हा कायदा संपूर्ण भारतामध्ये विस्तारित आहे किंवा संपूर्ण भारतामध्ये हा लागू होतो.
  • या कायद्याद्वारे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला प्रमाणीकरण देण्यात आले होते.
  • मोबाईल फोन, वैयक्तिक डीजीटल साहाय्य किंवा कोणत्याही व्हिडिओ आणि ऑडीओ किंवा प्रतिमा संप्रेषण करण्यासाठी किंवा प्रसारित करण्यासाठी वापरलेल्या कोणत्याही उपकरणांचे संयोजन म्हणजे संप्रेषण उपकरण परिभाषित करण्यासाठी एक नवीन विभाग समाविष्ट केला आहे.
  • सायबर नियामक अपिलीय न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाविरुध्द केवळ उच्च न्यायालयात अपील केले जावू शकते.
  • २००० च्या पूर्वीच्या कायद्यामध्ये कलम ४३ अंतर्गत संगणक प्रणाली नुकसानीसाठी विहित केलेले एक कोटी काढले आहेत आणि कलमातील संबधित भागाच्या जागी तो नुकसान भरपाईच्या मार्गाने नुकसान भरपाई देण्यास जबाबदार असेल.
  • काही विशिष्ट गोष्टींच्यामध्ये तपशीलवार माहिती देते ज्यामध्ये सेवा प्रदात्यांना जबाबदार धरले जावू शकते.
  • मध्यस्थांचे कार्य हे संप्रेषण प्रणालीमाडे प्रवेश प्रधान करण्यापुरते मर्यादित केलेले असते ज्यावर तृतीय पक्षाद्वारे उपलब्ध केलेली माहिती प्रसारित केली जाते. किंवा तात्पुरती संग्रहित केली जाते.
  • कायदा अधिक तंत्रज्ञान तटस्थ बनवण्यासाठी डीजीटल स्वाक्षरी हा शब्द इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी या शब्दाने बदलण्यात आला आहे.
  • हा कायदा विविध सायबर गुन्ह्यांची आणि उल्लंघनांची व्याख्या आणि तपशीलवार वर्णन करतो आणि त्याच्या संबधित शिक्षा देखील ठरवतो.
  • सायबर कॅफे अशी कोणतीही सुविधा म्हणून परिभाषित करण्यासाठी एक नवीन विभाग या कायद्यामध्ये जोडला आहे.
  • हा कायदा राज्य सरकारला अधिकृत राजपत्रात अधिक सुचनेद्वारे या कायद्यातील तरतुदी अमलात आणण्यासाठी नियम बनवण्याची परवानगी हा कायदा देतो.
  • वेगवेगळ्या कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांची नोंद या कायद्याद्वारे ठेवली जाते.

आयटी कायद्यासमोरील उद्देश – it act 2008 in marathi

  • रोजगार देवाणघेवाणीमध्ये शाळा प्रवेश किंवा नोंदणीशीसंबधित कागदपत्रे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
  • बँकर्स आणि इतर कंपन्यांच्या खात्यांची पुस्तके इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ठेवण्यासाठी कायदेशीर मान्यता देणे.
  • या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे जे लोक इंटरनेट वापरकर्ते आहेत अश्या लोकांच्या इंटरनेट वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करणे.
  • तसेच संगणक गुन्हेगारी थांबवणे.
  • इलेक्ट्रॉनिक मार्गाने किंवा इंटरनेटच्या वापरणे केलेल्या कोणत्याही व्यवहाराला कायदेशीर मान्यता देणे हे आयटी कायदा २००० चे उदिष्ट आहे.
  • इलेक्ट्रॉनिक गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी IPO, RBI आणि भारतीय पुरावा कायद्याला अधिक शक्ती देणे.

माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदी

  • या कायद्यामध्ये हॅकिंग म्हणजेच कोणाच्याही व्यक्तीच्या संगणकावरून हॅकिंग मार्फत माहिती चोरून घेणे तसेच किंवा एखाद्या व्यक्तीच्या किंवा सानास्थेच्या संगणकामध्ये बिघाड करणे अश्या सर्व गोष्टी ह्या माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ ( information technology act 2008 ) कायद्यामध्ये समाविष्ट आहेत.
  • जर एखादा व्यक्ती इंटरनेट माध्यमातून उगाचच किंवा मुद्दाम virus पसरवत असेल तर या सारके कृत्य देखील या कायद्यामध्ये समाविष्ट आहे.
  • जर एखादा व्यक्ती आपली बँकिंग विषयी माहिती चोरण्याचा किंवा ओळखीचा पुरावा, डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड आणि आधारकार्ड माहिती ऑनलाईन मार्फत चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा समावेश देखील या कायद्यामध्ये होतो. आणि असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी ३ वर्ष शिक्षा होऊ शकते आणि २ लाख रुपया पर्यंत दंड होऊ शकतो.
  • जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा संगणक हॅक करून जर त्याच्या संगणकातील महत्वाची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर अश्या कृती देखील या या कायद्यामध्ये समाविष्ट आहे आणि जर एखादा व्यक्ती असे कृत्य करताना सापडला तर त्या व्यक्तीला ३ वर्ष शिक्षा आणि २ लाख रुपये दंड होऊ शकते.

आम्ही दिलेल्या it act 2008 pdf in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माहिती तंत्रज्ञान कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या it act 2008 in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!