कोणार्क सूर्य मंदिर माहिती Sun Temple Information in Marathi

Konark Sun Temple Information in Marathi कोणार्क सुर्य मंदिराची माहिती कोणार्क सूर्य मंदिर हे भारताच्या ओडिशा राज्यातील जगन्नाथ पुरी येथून कोणार्क या ठिकाणी स्थित आहे. हे मंदिर अतिशय अद्भुत आणि कलिंग शैलीचा उदाहरण आहे. या मंदिराच्या अनेक कथा आणि रहस्य आहेत. आजच्याच्या ब्लॉगमध्ये आपण या मंदिरा विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. कोणार्क शब्द कोण आणि अर्क या दोन शब्दांचा संगम आहे. अर्कचा अर्थ आहे सूर्य आणि कोण याचा अर्थ आहे किनारा. प्रस्तुत कोणार्क सूर्य मंदिर लाल रंगाच्या साॉडस्टोन आणि काळ्या ग्रानाइट दगडांपासून बनविल आहे. हे मंदिर सूर्यदेव यांना समर्पित आहे. ज्यांना स्थानिक लोक बिरन्चि नारायण असे म्हणतात. ह्याच कारणामुळे हे क्षेत्र अर्क क्षेत्र किंवा पद्म शेत्र म्हणून ओळखलं जातं.

konark sun temple information in marathi
konark sun temple information in marathi

कोणार्क सूर्य मंदिर माहिती – Konark Sun Temple Information in Marathi

कोणार्क सूर्य मंदिर माहिती
मंदिराचे नावकोणार्क सूर्य मंदिर
दुसरे नावबिरन्चि नारायण
उत्सव, यात्राआषाढ महिन्या मध्ये
मंदिर कोठे आहेपुरी, भुवनेश्वर, ओडिसा
मंदिर स्थापना कोणी केली?राजा नरसिंहदेव
पाहण्यासारखी ठिकाणेचंद्रभागा समुद्रकिनारा, जगन्नाथ पुरी मंदिर, रामचरणडी समुद्रकिनारा, कोणार्क नाट्य मंडप, कोणार्क पुरी कोणार्क मरीन ड्राईव्ह.

मंदिराचा इतिहास – Konark Sun Temple History in Marathi language

एका आख्यायिकेनुसार गंगा वंशातील राजा नरसिंहदेव प्रथमने आपल्या घराण्याचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शाही घोषणा द्वारे मंदिर बांधण्याचे आदेश दिले. बाराशे आर्किटेक आणि कारागिरांच्या सैन्याने आपल्या सर्जनशीलता आणि सामर्थ्याने बारा वर्षाच्या अथक परिश्रमातून हे मंदिर बांधले. राजाने बारा वर्षे पैसे खर्च केले होते परंतु बांधकामाचे पूर्णत्व कोठेही दिसत नव्हते‌. मग राजाने एका निश्चित तारखेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले बिसु महाराणा यांच्या देखरेखीखाली आर्किटेकच्या पथकाने आपली सर्व कौशल्ये यापूर्वीच दाखवली होती मग बिसु महाराणा चा बारा वर्षांचा मुलगा धर्मापाद पुढे आला.‌

आणि म्हणाला त्याला मंदिर बांधकामाचे व्यावहारिक ज्ञान नसेल तरी त्यांनी मंदिराच्या स्थापत्यशास्त्राच्या शास्त्रांचा अभ्यास केला होता. त्याने कामगारांना मंदिराच्या शेवटचा मध्यवर्ती दगड बांधण्यासाठी सांगितले आणि मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. असे करून त्याने सर्वांना चकीतच केले पण यानंतर लगेचच समुद्रकिनाऱ्यावर या अद्भुत प्रतिभा चा मृतदेह सापडला. असे म्हणतात की धर्मपादने आपल्या जातीच्या हितासाठी आपले प्राण दिले.

मंदिर वास्तुकला:

हे मंदिर सूर्यदेव यांना समर्पित आहे. ज्यांना स्थानिक लोक बिरन्चि नारायण असे म्हणतात. ह्याच कारणामुळे हे क्षेत्र अर्क क्षेत्र किंवा पद्म शेत्र म्हणून ओळखलं जातं. पुराणांनुसार श्रीकृष्ण यांचे पुत्र सांबा यांना कुष्ठरोग झाला होता. त्यामुळे सांबा यांनी चंद्रभागा नदी जवळ सागर संगम वरती कोर्णाक मध्ये १२ वर्ष तपस्या केली. तेव्हा त्यांना सूर्य देव प्रसन्न झाले. सूर्य देव सगळ्याच रोगांचा नाश करतात. त्यांनी या रोगाचा देखील नाश केला. सांबा यांनी मित्रवन मध्ये सूर्य भगवान यांचे मंदिर स्थापन करायचा निश्चय केला.

आजारपणानंतर चंद्रभागा नदीत स्नान करताना त्यांना सूर्यदेवाची मूर्ती सापडली. ही मूर्ती देव शिल्पी श्री विश्वकर्मा यांनी सूर्यदेवाच्या शरीर भागातून बनवली होती. सांबाने मित्रवन येथे बांधलेल्या मंदिरात ही मूर्ती स्थापित केली. तेव्हापासून हे स्थान पवित्र मानले गेले. अनेक इतिहासकारांच्या मते कोणार्क मंदिराचे बांधकाम करणारे राजा लंगुल नृसिंहादेवाच्या अवकाळी निधनामुळे मंदिराचे बांधकाम थांबले गेले. परिणामी अपूर्ण रचना ढासळली परंतु हे दृश्य ऐतिहासिक माहितीनुसार आकड्यांचा समर्थन करत नाही.

१२७८ मध्ये पासून पुरीचा मदल पांजी आणि काही तांबे प्लेटच्या आकडेवारीनुसार राजा लंगुल नृसिंहदेवने १२८२ पर्यंत राज्य केले. अनेक इतिहासकारांचे असेही देखील मत आहे की कोणार्क मंदिर १२५३ ते १२६० दरम्यान बांधले गेले आहे. त्यामुळे मंदिर कोसळण्याचे कारण अपूर्ण बांधकाम करण तर्कसंगत नाही.

मंदिराची वैशिष्ट्ये:

कोणार्क शब्द कोण आणि अर्क या दोन शब्दांचा संगम आहे. अर्कचा अर्थ आहे सूर्य आणि कोण याचा अर्थ आहे किनारा. प्रस्तुत कोणार्क सूर्य मंदिर लाल रंगाच्या साॉडस्टोन आणि काळ्या ग्रानाइट दगडांपासून बनविल आहे. हे मंदिर गंगा राजवटीतील तात्कालिक सरंजामशाहिच्या नृसिंह देवाने इसवी सन पूर्व १२३६ ते १२६४ मध्ये बांधलेले होते.

मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन ठिकाणांपैकी एक आहे. या मंदिराचं बांधकाम कलिंग शैलीत केलं गेलं आहे. सूर्यदेव रथाच्या रूपात विराजमान आहेत आणि या दगडांवर उत्तम कोरीव काम केल गेल आहे. संपूर्ण मंदिराची जागा ७ घोड्यांनी घेरलेल्या बारा चक्रांनच्या जोड्याने बनवली आहे. ज्यामध्ये सूर्यदेव बसले आहेत. पण सध्या त्या सात घोड्यांमधील एकच घोडा बाकी आहे. मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या सुशोभित केलेले बारा चक्र वर्षाचे बारा महिने दर्शवतात. 

प्रत्येक चक्र आठ बाणांनी बनवले आहे. जे दिवसातील आठ घड्याळांचे प्रतिनिधित्व करतात. मुख्य मंदिराला एकूण तीन मंडप आहेत. त्यातील दोन मंडप कोसळले गेले आहे. मूर्ती असलेल्या तिसऱ्या मंडपात इंग्रजांनी स्वातंत्र्य काळापुर्वी वाळु आणि दगड भरून सर्व दरवाजे कायमस्वरूपी बंद केले होते जेणेकरून मंदिराला आणखी नुकसान होणार नाही. या मंदिरात सूर्यदेवाच्या तीन मूर्ती आहेत. बालपणातील उगवणारा सूर्याचीची मूर्ती ८ फूट आहे. तर युवा सूर्य ९.५ फूट उंचीचा तर प्रोढं अवस्थेतील सूर्याचे मूर्ती ३.५ फुटाची आहे.

प्रवेश द्वारा मध्येच दोन सिंह हत्तींवर आक्रमित होताना स्वतःच्या संरक्षण करताना दाखवले गेले आहेत‌. हे दोन हत्ती एका प्रतिमेमध्ये दोन पुतळ्यांवर स्थित आहेत. ह्या दोन्ही प्रतिमा एकाच दगडाने बनवल्या आहेत. या दोन प्रतिमा ३८ टनच्या असून ८.४ फूट लांबी ४.९ फूट रुंदी आणि ९.२ फूट उंचीच्या आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील भागात दोन सुशोभित घोडे आहेत‌. ज्यांना ओरिसा सरकारने आपलं राज्यचिन्हच प्रतीक म्हणून निवडलं आहे‌‌. हे घोडे दहा फूट लांब आणि सात फूट रुंद आहेत.

मंदिरात सूर्य देवाचा भव्य प्रवास दर्शविला गेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या जवळच एक नाट्य मंदिर आहे. हे असे स्थान आहे जिथे मंदिरातील नर्तक सूर्य देवाला अर्पण करण्यासाठी नृत्य करून दाखवायचे. मंदिरांमध्ये जिथे-तिथे फुल बेल आणि ज्यामितीय यांचे नक्षी कोरले आहेत. या बरोबरच मानव देवता,गंधर्व, किन्नर इत्यादींची प्रतिमा देखील संवेदनात्मक मुद्रांमध्ये दर्शविली गेली आहे.

मंदिराच आता अर्धवट अवशेषांमध्ये रूपांतरीत झाले आहे. येथील शिल्प कलाकृती यांचा संग्रह भारतीय पुरातत्त्व  सर्वेक्षण संस्थेच्या सूर्य मंदिर संग्रहालयात सुरक्षित आहेत. थोर कवी आणि नाटककार रवींद्रनाथ टागोर यांनी या मंदिरा बद्दल  एक उत्तम अशी ओळ लिहिली आहे जी म्हणजे कोणार्क जिथे दगडांची भाषा माणसं पेक्षा श्रेष्ठ आहे.

मंदिराचे रहस्य:

असं म्हणतात की या मंदिरांमध्ये आजही नर्तकांचे आत्मे इथे येतात. जर जुन्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर आज देखील संध्याकाळ संध्याकाळी सातच्या नंतर राजाच्या दरबारात नाचण्यासाठी येणाऱ्या नर्तकांच्या घुंगरांचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. असं म्हणतात या मंदिराच्या मुख्य आर्किटेकच्या मुलांनी त्याच्या वडिलांच्या बांधकाम अंतर्गत मंदिराच्या आतमध्ये आत्महत्या केली होती. म्हणूनच या मंदिरामध्ये कोणत्याही कुठली धार्मिक विधी पूजा करण्यासाठी पूर्णपणे बंदी घातली आहे.

या मंदिराचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे इथे असलेले चुंबक. इथे उपस्थित असलेला चुंबका बद्दल अनेक रहस्यं कथा आहेत. कित्येक पुरानीक कथांनुसार सूर्य मंदिरातील शिखरावर एक चुंबक दगड बसवला गेला आहे. या चुंबकीय दगडाच्या परिणामामुळे कोणार्कच्या समुद्रावरून जाणारी जहाजे मंदिराच्या दिशेने ओढली जातात. आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते या कथेनुसार दगडामुळे जहाजांचे चुंबकीय कंपास योग्य दिशा सांगत नाहीत. त्यामुळे मुस्लीम नागरिकांनी आपले जहाज वाचवण्यासाठी हा दगड काढून टाकला होता. मंदिराच्या भिंती मधील सर्व दगड संतुलित ठेवण्याच हे दगड मध्यवर्ती म्हणून काम करतं.

दगड काढून टाकल्यामुळे मंदिराच्या भिंती यांचा समतोल गमावला आणि परिणामाने त्या कोसळल्या परंतु या घटनेचे कोणती ऐतिहासिक नोंद उपलब्ध नाही आहे. किवा चुंबकीय मध्यवर्ती दगडाच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे नाही आहेत. त्यामुळे मंदिर ८०० वर्षात पाडण्यात आले. हे मंदिर वास्तू नियमांत बदल‌ करून बांधल गेल आहे.

उत्सव, यात्रा:

आषाढ महिन्या मध्ये येथे रथ यात्रा भरते. ही रथयात्रा पाहण्यासाठी भाविकच नाहीत तर जगभरातून सर्वधर्मीय इथे येतात. तिन्ही मुर्त्यांचे रथ वेगवेगळे असतात. दरवर्षी येथे नवारथ असतो. तो सुद्धा लाकडी. यात्रा देवळापासून सुरू होते. हि यात्रा दोन दिवसांनची असते. दर बारा वर्षांनी सर्व मूर्ती नव्याने बनवण्यात येतात. जुन्या मूर्ती आवारातील मागील बाजूस पुरवतात.

कोणार्क सूर्य मंदिर फोटो:

konark sun temple information in marathi
konark sun temple information in marathi

मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:

हिंदू धर्मामध्ये सूर्य देवाचे विशेष महत्व आहे. ज्योतिष शास्त्रात सूर्य देव‌ ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य देवाची आराधना केल्याने कुंडली मधील सगळे दोष नाहीसे होतात. ओडिसातील कोणार्क सूर्य मंदिराला भेट देण्याची योग्य वेळ फेब्रुवारी ते ऑक्टोंबर महिन्यातील आहे. या काळामध्ये वातावरण थोडे अल्हाददायक असते. तिथे पोहोचण्यासाठी आपण तिन्ही मार्गांचा वापर करू शकतो, ट्रेन, बस, विमान, इत्यादी. येथे पोहोचण्यासाठी भूवनेश्वर हे इथलं जवळच विमानतळ आहे.

इथून भारत देशातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमधून विमान सेवा उपलब्ध आहेत, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, इत्यादी. एकदा विमानतळावर पोहचल्यावर पुढे बस किंवा टॅक्सी सेवा उपलब्ध आहेत. कोणार्क सूर्य मंदिर याला भेटण्यासाठी पुरी आणि भुवनेश्वर येथून नियमित बससेवा सुरूच असतात. त्या शिवाय खासगी बसेस आणि टॅक्सी देखीलखी मिळेल.

मंदिर कोणी बनवले आहे ? :

कोणार्क सूर्य मंदिर हे १३ व्या शतकातील (सन १२५०) कोणार्क येथील सूर्य मंदिर आहे. पुरीच्या ईशान्य पूर्वेस, ओडिशा, किनार्यावर भारताच्या पूर्वेला स्थित आहे. या मंदिराचे श्रेय राजा नरसिंहदेव प्रथम यांना देण्यात आले आहे. गंगा राजवटीतील एक राजे.

पाहाण्यासारखी ठिकाणे:

कोणार्क सूर्य मंदिर हे एक प्राचीन आणि भारतातील महत्वपुर्ण स्थळ आहे. या मंदिराला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. यामध्ये परदेशी लोकांचा खूप जास्त समावेश असतो. कोणार्क सूर्य मंदिर शिवाय इथे अशी अनेक स्थळ आहेत जे बघण्यासारखी आहेत जसे की, चंद्रभागा समुद्रकिनारा, जगन्नाथ पुरी मंदिर, रामचरणडी समुद्रकिनारा, कोणार्क नाट्य मंडप, कोणार्क पुरी कोणार्क मरीन ड्राईव्ह.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा कोणार्क सूर्य मंदिर sun temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. konark sun temple information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about sun temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही कोणार्क सूर्य मंदिर विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या konark sun temple in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!