घृष्णेश्वर मंदिराची माहिती Grishneshwar Temple Information in Marathi

Grishneshwar Temple Information in Marathi घृष्णेश्वर मंदिर माहिती महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर प्राचीन काळापासून येथे स्थित आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण या मंदिराची स्थापना कशी झाली आणि त्यामागील एक पौराणिक कथा, मंदिराचे वैशिष्ट्ये, मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील दौलताबाद येथून ११ किलोमीटर अंतरावर घृष्णेश्वर महादेवाचं मंदिर स्थित आहे. हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काही लोक याला घुश्मेश्वर या नावाने देखील ओळखतात. बौद्ध भिक्षूंनी निर्मित केलेल्या एलोरा, अजिंठा लेणीची प्रसिद्ध गुहा देखील या मंदिराजवळच स्थित आहेत.

grishneshwar temple information in marathi
grishneshwar temple information in marathi

घृष्णेश्वर मंदिराची माहिती – Grishneshwar Temple Information in Marathi

घृष्णेश्वर मंदिरमाहिती
मंदिराचे नावघृष्णेश्वर मंदिर
उत्सव, यात्रामहाशिवरात्रि
मंदिर कोठे आहेमहाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात
मंदिर स्थापनामंदिराचं पुनर्निर्माण १८ व्या शतकामध्ये इंदूरची महाराणी राणी अहिल्याबाई यांनी केलं.
मंदिर कोणी बांधलेशिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले ‌यांनी या मंदिराचं पुनर्निर्माण केलं.
दर्शन वेळसकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत
पाहाण्यासारखी ठिकाणेअजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला

मंदिराचा इतिहास:

या ज्योतिर्लिंगा विषय पुराणात काही कथा वर्णित आहेत. त्यातलीच एक कथा म्हणजे सुधर्म नावाचा एक अत्यंत हुशार तपोनिष्ठ ब्राह्मण दक्षिण देशातील देवगिरी पर्वताजवळ त्याच्या पत्नी सोबत राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदेहा होत. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं पण त्यांना मूलबाळ होत नव्हतं. एकदा ज्योतिषशास्त्रीय गणिता मधून असं समजलं की सुदेहाच्या गर्भातून मूल होऊ शकत नाही. सुदेहाला मूल होण्याची खूप उत्सुकता होती तीने सुर्धमला आपल्या धाकट्या बहिणी सोबत पुनर्विवाह करण्याची विनंती केली. सुधर्म याला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु पत्नीच्या हटा्मुळे त्याने विवाह करायचा निर्णय घेतला.

घुष्मा ही सुदेहाची धाकटी बहीण होती. अत्यंत सदाचारी स्त्री होती. भगवान शिव यांची ती दररोज पूजा करायची. आणि म्हणूनच भगवान शिव यांच्या कृपेने थोड्या दिवसांनी तिच्या गर्भात सुंदर आणि स्वस्थ बाळाने जन्म घेतला. त्याच्यानंतर सुदेहा आणि घोषणा या दोघींना तितकाच आनंद झाला. त्यानंतर दिवस असेच चालू राहिले तर पुढे जाऊन सुदेहाच्या मनामध्ये अतिशय वाईट विचार येऊ लागले.‌ तिला असं वाटू लागलं की तिचा पती, तिचं घर हे सगळ आता घुष्माच होऊ लागल आहे. आणि घुष्मामुळे संतान प्राप्ती देखील झाली होती. पुढे जाऊन घुष्माचा मुलगा मोठा झाला आणि त्याचं लग्न देखील झालं.

एकदा सगळेजण झोपले असताना सुदेहाने घुष्माचा लहान मुलगा मारून त्याचं शरीर त्याच तलावांमध्ये फेकलं जिकडे दररोज सकाळी घुष्मा भगवान शिव यांची पूजा केल्यावर त्यांच्या शिवलिंगाचा विसर्जन करायला जायची. सुधर्म आणि त्याचे सून रडू लागले. घुष्मा असं वागत होती जसं काही घडलेच नाही आहे. तीने दररोजप्रमाणे सकाळी देवाची पूजा केली आहे शिवलिंगाचा विसर्जन करण्यासाठी ती पुन्हा त्या तलावाजवळ गेली तिकडे तिला तिच्या मुलगा जिवित असताना दिसला.

तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितलं आणि ते सुदेहावर अत्यंत क्रोधित झाले होते म्हणून त्यांनी त्रिशूळ तिच्या देहावर आरपार करायचं ठरवलं परंतु घुष्मा त्यांना म्हणाली की मला माहित आहे माझ्या बहिणीकडून घोर पाप झाल आहे. परंतु तुम्ही तिला काही करू नका त्याच्या बदल्यात तुम्ही या ठिकाणी लोककल्याणासाठी कायमस्वरूपी निवास करा. सती शिवभक्त घुष्माच्या या आराधनेमुळे हे मंदिर घुश्मेश्वर म्हणून विख्यात प्रसिद्ध झाले.

मंदिर वास्तुकला:

पारंपारिक दक्षिण भारतीय वास्तुकलेचा उत्तम उदाहरण म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. मंदिराच्या परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. मंदिराचं बांधकाम लाल रंगाच्या दगडाने केल गेल आहे. या मंदिराचं बांधकाम ४४०० चौरस फूट क्षेत्रावर पसरलं आहे. हे ज्योतिर्लिंग मंदिर सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे. मंदिराच्या परिसरामध्ये पाच स्तरीय लांब शिखर बनवलं गेलं आहे. त्या सोबतच काही स्तंभ देखील आहेत. जे पौराणिक जटिल या नक्षीच्या रूपामध्ये निर्मित केले गेले आहेत. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या लाल दगडांच्या भिंती जास्त करून भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या दहा अवतारांचे प्रतिबिंब दर्शवतात. गर्भगृहाच्या पूर्वे बाजूस शिवलिंग आहे आणि तिथेच नंदीस्वरची मूर्ती देखील आहे.

मंदिराची वैशिष्ट्ये:

महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील दौलताबाद येथून ११ किलोमीटर अंतरावर घृष्णेश्वर महादेवाचं मंदिर स्थित आहे. हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काही लोक याला घुश्मेश्वर या नावाने देखील ओळखतात. बौद्ध भिक्षूंनी निर्मित केलेल्या एलोरा, अजिंठा लेणीची प्रसिद्ध गुहा देखील या मंदिराजवळच स्थित आहेत. या मंदिराचे निर्माण देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलं होतं. बारा द्वादश ज्योतिर्लिंग मधील हे एक अंतिम ज्योतिर्लिंग आहे. ह्याला घुश्मेश्वर, घुस्रुनेश्वर किंवा घुश्नेश्वर असेही म्हणतात. हे महाराष्ट्र राज्यातील दौलताबादपासून बारा मैल वेरूळ‌ गाव जवळ आहे.

मंदिराचे रहस्य:

ज्योतिर्लिंग घुश्मेश्वरच्या जवळच एक तलाव आहे. जो शिवालय नावाने ओळखला जातो असा म्हणतात कि ज्योतिर्लिंग सोबत भक्त या तलावाला‌ देखील भेट देतात. भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. धर्मग्रंथानुसार ज्या जोडप्यान संतान सुख प्राप्त होत नाहीत. ते इथे येऊन या तलावाचे दर्शन करतात आणि मग त्यांना संतान प्राप्ती होते. असे म्हणतात की हा तोच तलाव आहे जिथे घुष्मा बनवलेले शिवलिंग विसर्जित करायची आणि याच तलावातून तिचा पुत्र तिला जीवित मिळाला होता.

उत्सव, यात्रा:

घृष्णेश्र्वर मंदिर हे औरंगाबाद येथे आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. मंदिरामध्ये भगवान शिव यांच ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या मंदिराला भेट देतात. महाशिवरात्रीला तर इथे मंदिरात पाय ठेवायला देखील जागा नसते. दरवर्षी येणारी महाशिवरात्रि इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

घृष्णेश्वर मंदिर फोटो:

grishneshwar temple
grishneshwar temple

मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:

घुश्मेश्वर हे मंदिर औरंगाबाद येथे स्थित आहे. छत्रपती संभाजी महाराज एअरपोर्ट पासून ३० किलोमीटर अंतरावर हे ‌मंदिर स्थित आहे. औरंगाबाद एअरपोर्टला पोहोचण्यासाठी हैदराबाद, दिल्ली, उदयपूर, मुंबई, जयपुर, पुणे, नागपूर अशा अनेक प्रमुख शहरांपासून फ्लाईट उपलब्ध आहेत. आणि औरंगाबादच्या शिवाय इथे पोहोचण्यासाठी पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट उपलब्ध आहे. ज्या पासून हे मंदिर साधारण २५२ किलोमीटर दूर आहे.

औरंगबाद रेल्वेस्टेशन साठी देशातल्या प्रत्येक मुख्य शहरांपासून रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. जर तुमच्या शहरातून औरंगाबादला जाण्यासाठी थेट ट्रेन नसेल तर तुम्ही मनमाड रेल्वे जंक्शन वर जाऊन तिकडून जवळपास २२ रेल्वे औरंगाबाद साठी जातात. पुढे घुश्मेश्वर या मंदिरा पर्यंत पोहोचण्यासाठी औरंगाबाद रेल्वे स्टेशन वरून टॅक्सी, ऑटो किंवा बस सेवा उपलब्ध आहेत. घुष्मेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ हा सडक मार्ग आपल्या भारताच्या सर्व भागांशी सरळ मार्गे जोडला गेला आहे. औरंगाबादच्या सेंट्रल बस स्टँड पासून घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जाण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट च्या बस देखील उपलब्ध आहेत. औरंगाबाद ते घृष्णेश्वर अंतर एक तासाच आहे.

मंदिर कोणी बनवले आहे:

या ज्योतिर्लिंग मंदिराची स्थापनेची वास्तविक तारीख अद्याप कोणाला माहित नाही आहेत. तर ह्या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की ह्या मंदिराचे निर्माण तेराव्या शतकात करण्यात आले आहे. मोगल साम्राज्याच्या वेळेस हे मंदिर बेलूर क्षेत्रामध्ये स्थित होतं ज्याला आता वर्तनामध्ये एलोरा केव्स असं म्हटलं जातं. मंदिराच्या आसपासच्या भागात १३ व्या १४व्या शतकात दरम्यान झालेल्या विध्वंसक हिंदू-मुस्लीम संघर्ष ज्यात मंदिराचे नुकसान झाले होते त्यावेळेचे‌ काही अवशेष सापडतील. सोळाव्या शतकामध्ये बैलूर चे प्रमुख असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले ‌यांनी या मंदिराचं पुनर्निर्माण केलं.

परंतु सोळाव्या शतकानंतर मुघल साम्राज्याने घृष्णेश्वर ‌मंदिरावरती खूप हल्ले केले. १६८० ते १७०० या दरम्यान पुन्हा एकदा मोगल मराठा युद्ध झालं होतं त्यावेळी या युद्धात देखील हे मंदिर पुन्हा उध्वस्त झालं. आणि मग या मंदिराचं बांधकाम १८ व्या शतकामध्ये इंदूरची महाराणी राणी अहिल्याबाई यांनी केलं.

पाहाण्यासारखी ठिकाणे:

अजिंठा लेणी महाराष्ट्र राज्यामधील औरंगाबाद शहरापासून साधारण १०५ किलोमीटर दूर स्थित आहे. अजिंठा ही प्राचीन गुहा आहे. आणि भारतामधील सर्वात जास्त दर्शनीय पर्यटक स्थळांमधील एक आहे. ही भारतीय गुहा कलेच जिवंत उदाहरण आहे. अजिंठा लेणी वाघुर नदीच्या काठी खडबडीत आकारच्या खडकाळ प्रदेशातून कोरलेली आहे. यात अश्‍वशक्तीच्या आकाराच्या डोंगरावर २६ लेण्यांचा संग्रह आहे. एलोरा लेणी ही एक महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील युनेस्कोचे जागतिक वारसा‌ लाभलेली गुहा आहे.

औरंगाबादच्या उत्तर पश्चिमेस सुमारे १९ किलो मीटर अंतरावर एलोरा लेणी स्थित आहे. जगातील सर्वात मोठी रॉक कट मठ मंदिर गुहा आहे. ज्यात बौद्ध हिंदू आणि जैन धर्माशी संबंधित स्मारकांची वैशिष्ट्ये आणि कलाकृती पहायला मिळतील पर्यटकांना अजिंठा आणि एलोरा लेणी खूपच जास्त आकर्षित वाटतात. त्याच्यानंतर बीबी का मकबरा हे औरंगाबाद येथील सर्वात अतिशय प्रेक्षणीय स्थळ आहे. हा मकबरा मुघल सम्राट औरंगजेब याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ १६६१ मध्ये बनवला आहे.

हा मकबरा ताजमहलशी मिळताजुळता आहे. आणि प्रेक्षकांचं खास आकर्षण देखील आहे. दौलताबाद किल्ला हा घृष्णेश्वर ज्योतिलिंग मंदिराच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आणि हे महाराष्ट्र राज्याच्या ७ अजुबा मध्ये देखील मांडलं जातं. दौलताबाद किल्ला औरंगाबाद मध्ये साधारण १५ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. आणि पर्यटकांना खूप जास्त आकर्षित करतं. बौद्ध गुहा घृष्णेश्वर मंदिराची यात्रा करताना या गुहेच लिस्टमध्ये नक्कीच समावेश करा.

या गुहेमध्ये बौद्ध ‌यांच्या मूर्तींचा शिल्प कलाकृती आढळून येतात. सिद्धार्थ गार्डन या गार्डनच एक अतिशय वेगळच महत्त्व आहे. गार्डन मध्ये विविध प्रकारचे पक्षी, प्राणी आणि झाडे आहेत एक अतिशय‌ सुंदर असे दृष्य बघायला मिळते. त्यानंतर सलीम अली हे तलाव एक अतिशय प्राकृतिक सौंदर्याने भरलेल आहे म्हणूनच हे तलाव प्रेक्षकांना अतिशय आकर्षित करतं. हिवाळा आणि पावसाळा मध्ये हे तलाव‌ अजुन जास्त छान दिसत. त्यानंतर पुढे औरंगाबाद पासून २० किलोमीटर अंतरावर बाणी बेगम गार्डन आहे हे गार्डन देखील अतिशय चांगल आहे. त्याच्यामध्ये काही वास्तुकला आणि प्राकृतिक सुंदरतेचे दर्शन होऊ शकत.

त्याच्यानंतर जैन गुहा औरंगाबाद मधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. गुहेमध्ये जैन धर्मा संबंधित  माहिती चित्रकला आणि शिल्पकला द्वारे दिली गेली आहे. त्याच्या नंतर कैलास मंदिर देखील एक दर्शनीय स्थळ आहे. जे एलोरा या गुहेमध्ये स्थित आहेत हे मंदिर शिव भगवान शिव यांना समर्पित केले गेले आहे. जामा मज्जीद, भद्र मारुती मंदिर, खुलदाबाद, पंचांकी, सोनेरी महाल अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेळ – grishneshwar jyotirlinga temple timings

घुष्मेश्र्वर ज्योतिर्लिंग मंदिर पहाटे साडेपाच वाजता भाविकांसाठी उघडतं ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालूच असतं. खरं तर श्रावण महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यांमध्ये हे मंदिर पहाटे तीन वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत भक्तांसाठी चालूच असतं. ह्या मंदिरात प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारची एन्ट्री फीस लागत नाही.

घृष्णेश्वर मंदिर अधिकृत वेबसाइट – grishneshwar temple official website

https://www.artofliving.org/mahashivratri/ghrishneshwar-jyotirlinga

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा घृष्णेश्वर मंदिर मराठी माहिती grishneshwar temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. grishneshwar temple information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about grishneshwar temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही घृष्णेश्वर मंदिर मराठी माहिती विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या grishneshwar temple history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!