भीमाशंकर मंदिर मराठी माहिती Bhimashankar Temple Information In Marathi

Bhimashankar Temple Information In Marathi भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर जे मोटेश्वर महादेव म्हणून देखील ओळखलं जातं. या मंदिराची आपल्या ब्लॉगमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सोबतच आपण मंदिराचा इतिहास आणि मंदिराचे वैशिष्ट तसेच काही प्रेक्षणीय स्थळ देखील पाहणार आहोत. भीमाशंकर मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र महाराष्ट्रातील सह्याद्री नावाच्या डोंगरावर स्थित असून हे पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण नाशिक पासून जवळपास १२० मैल वर आहे.‌ हे मंदिर भारतात आढळणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. भीमाशंकर मंदिर प्राचीन आणि नवीन रचनांचे संयोजन आहे. हे‌ नागार वास्तुकलेच्या शैलीने बनवले आहे.

bhimashankar temple information in marathi
bhimashankar temple information in marathi

भीमाशंकर मंदिर मराठी माहिती – Bhimashankar Temple Information In Marathi

भीमाशंकर मंदिरमाहिती
मंदिराचे नावमोटेश्वर महादेव
उत्सव, यात्रामहाशिवरात्री
मंदिर कोठे आहेभीमाशंकर हे मंदिर पुण्यामध्ये स्थित आहे
मंदिर स्थापना१८ व्या शतकात नाना फडणवीस यांनी केली
मंदिर कोणी बांधलेनाना फडणवीस
दर्शन वेळसकाळी पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत
पाहाण्यासारखी ठिकाणेसह्याद्री किंवा पश्चिम घाट, भीमाशंकर अभयारण्य

मंदिर वास्तुकला:

भीमाशंकर मंदिर प्राचीन आणि नवीन रचनांचे संयोजन आहे. हे‌ नागार वास्तुकलेच्या शैलीने बनवले आहे. हे मंदिर प्राचीन विश्वकर्मा आर्किटेक्टसच कौशल्य, श्रेष्ठता दर्शवते. या सुंदर मंदिराचे शिखर १८ व्या शतकात नाना फडणवीस यांनी बनवले होते. ह्या मंदिराचा प्रकार हेमांडपथी आहे. हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूर्वी बांधल गेल आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर सुंदर नक्षीकाम कोरलेले आहेत. त्यामध्ये दशावताराच्या मुर्त्या देखील कोरलेल्या आहेत, ज्या अतिशय सुंदर आणि रेखीव आहेत. मंदिराचा सभामंडपा बाहेर पाच मण वजनाची एक सुंदर लोखंडी घंटा आहे.

ही घंटा चिमाजी अप्पांनी मंदिराला भेट दिली होती असे सांगण्यात येते या घंटेवर १७२९ असं इंग्रजी भाषेत लिहिलं आहे. महान मराठा शासक शिवाजी या मंदिराच्या पूजेसाठी विविध सुविधा पुरवितात. जर तुम्ही इथे गेला तर तुम्हाला हनुमान तलाव, गुप्त भीमाशंकर मंदिर, भीमा नदीचे मूळ स्थान, हाॅथाॅन, बॉम्बे पॉईंट, साक्षी विनायक अशा ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळू शकेल.

मंदिराचा इतिहास – bhimashankar temple history in marathi

भीमाशंकर मंदिर भोरगिरी खेड पासून पन्नास किलोमीटर अंतरावर उत्तर पश्चिम पुण्यापासून ११० किलोमीटरवर अंतरावर आहे. हे पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतावर स्थित आहे. भीमा नदी येथूनच उगम पावते व नैऋत्य दिशेने वाहणारी रायचूर जिल्ह्यातील कृष्णा नदीला जोडते. येथे भगवान शिव यांच प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर महादेव हे काशीपूरातील शिवमंदिरातील प्रसिद्ध मंदिर आणि तीर्थक्षेत्र आहे. याचे वर्णन पुराणांत आढळते. आसाम मध्ये शिवांतील बारा ज्योतिर्लिंगा मध्ये भीमाशंकर महादेवाचे मंदिर आहे. त्याचे स्वरूप काशीपुरा चे मंदिर असल्याचे सांगितले जाते.

मंदिराची वैषिष्ट:

भीमाशंकर मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र महाराष्ट्रातील सह्याद्री नावाच्या डोंगरावर स्थित असून हे पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण नाशिक पासून जवळपास १२० मैल वर आहे.‌ हे मंदिर भारतात आढळणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. या मंदिरातील शिवलिंग ३.२५० फिट च्या ऊंचाई वर स्थित आहे. मंदिरातील शिवलिंग अतिशय मोठा आहे, म्हणूनच त्याला मोटेश्वर महादेव म्हणून हि ओळखलं जातं. हे स्थान भाविक तसेच ट्रॅकर प्रेमींसाठी उपयुक्त आहे. हे मंदिर पुण्यात खूप अतिशय प्रसिद्ध आहे जगभरातील लोक या मंदिराच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी येथे येतात. भीमाशंकर मंदिराजवळील कमळजा मंदिर आहे. हे कमळजा पार्वतीचा अवतार असून या मंदिरातही भाविकांची गर्दी असते.

मंदिराचे रहस्य:

या मंदिराजवळून भीमा नावाची नदी वाहते. जी पुढे जाऊन कृष्णा नदीला जोडली जात. पुराणात असा समज आहे की जो फक्त दररोज सकाळी या मंदिरात सूर्य उदय झाल्यानंतर या मंदिरास श्रद्धेने भेट देतो आणि बारा ज्योतिर्लिंगांची नावे सांगतो त्याचे सात जन्मातील पाप काढून टाकले जातीलआणि स्वर्गात जाण्यासाठी त्याचे मार्ग उघडले जातात.

उत्सव, यात्रा:

शंकर मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित आहे. त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्रीला इथे भाविकांचा कल्लोळ असतो. भाविकांच्या मोठ्यात मोठ्या रांगा लागतात प्रत्येक वर्षी येणारी महाशिवरात्र येथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. महाशिवरात्रि शिवाय इथे इतर धार्मिक उत्सव देखील साजरे केले जातात.

भीमाशंकर मंदिर फोटो:

bhimashankar temple
bhimashankar temple

मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:

भीमाशंकर हे मंदिर पुण्यामध्ये स्थित आहे. एयर मार्गे भीमाशंकर ज्योतिर्लिंग पासून सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे आहे. पुण्याहून भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे अंतर अंदाजे ११० किलोमीटर आहे. रेल्वे मार्गे भीमाशंकरचे कोणतेही रेल्वे स्टेशन नाही आहे. पुणे हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. ते भीमाशंकर पासून १६८ किलोमीटर दूर आहे. रेल्वेस्थानकावर इथून पुढे भीमाशंकरला जाण्यासाठी बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहेत. भीमाशंकर रस्ता विविध शहरांशी जोडला आहे. हे अंतर भीमाशंकर ते पुणे ११० किलोमीटर, नाशिक २०६ किलोमीटर, मुंबई १९६ किलोमीटर आहे.

भीमाशंकर अभयारण्य माहिती मराठी मध्ये:

भीमाशंकर वन्यजीवन अभयारण्य १०० चौरस किलोमीटर आणि भीमाशंकर गावात २१०० फूट ते ३८०० फूट उंचीवर पसरलेलं आहे. हे हिरव्यागार सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल आहे, आणि सर्व बाजूंनी हिरवा गार शालू पसरला आहे. या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी आढळून येतात जसे की सांबर, भेकर, रानमांजरे, रानससा, रान डुक्कर, बिबट्या, उदमांजर तसेच विविध जातीचे पक्षी देखील आढळून येतात. इथली सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू (उडणारी खार) ही खार तांबूस रंगाची असते आणि ही खार फक्त याच जंगलात आढळते. 

राक्षस भारतीय गिलहरी सारख्या नामशेष झालेल्या प्रजाती आढळतात. हायना, भुंकणारा हरण, चित्ता, प्रकुपिन आणि वन्य डुक्कर असे काही प्राणी आढळतात. मलबार व्हिसलिंग थ्रश, ग्रीन पिजन, क्वेकर बक, मलबार ग्रे हॉर्नबिल आणि ग्रे जंगल फॉल हे पक्षी आहेत. जे पक्षी आणि निसर्ग प्रेमींना नक्कीच आनंदित करतील. हे अभयारण्य विशेषतः पावसाळ्यात भेट देण्यासारखे आहे.‌ या अभयारण्यात विविध प्रकारचे वनस्पती आढळतात. अगदी जादुई वनस्पती पासून ते औषधी वनस्पतीं पर्यंत. येथे अनेक प्रकारची वनस्पती आढळतात.

भीमाशंकर कथा मराठीत:

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे वर्णन शिवपुराणात मिळते. शिवपुराणात असे म्हणतात की पूर्वी काळी कुंभकर्णाचा मुलगा भीम एक राक्षस होता. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा जन्म झाला. भगवान राम यांच्या हस्ते त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. ही घटना त्याला माहीत नव्हती ह्या घटनेची माहिती त्याला त्याच्या आईकडून मिळाली आणि तो भगवान राम यांचा बदला घेण्यास उत्सुक झाला. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांने बरीच वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्या कारणास्तव ब्रह्मदेवाने त्याला विजयी होण्याचे वरदान दिले.

वरदान मिळाल्यानंतर राक्षस निरंकुश झाला. मानवा बरोबरच देवी-देवतांचा ही छळ करू लागला. हळूहळू त्याच्या दहशतीची चर्चा सर्वत्र झाली देवतांचा त्याने युद्धात पराभव केला. खूप हाहाकार माजला होता. सर्व देवी देवता भगवान शिव यांना शरण गेले. मग भगवान शिव यांनी या वर काहीतरी उपाय काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी या राक्षसाला हरवण्याचे ठरवलं त्याच्यानंतर भगवान शिव यांनी या राक्षस भिमाशी लढण्याचा ठरवलं.

युद्धात भगवान शिव यांनी या राक्षसाचा पराभव केला आणि त्याला जाळून भस्म केलं. मग भगवान शिव यांना सर्व देवतांनी विनंती केली होती की त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाच्या रूपात रहावे त्यांची प्रार्थना भगवान शिव यांनी स्वीकारली आणि ते अजूनही भीमाशंकर ज्योतिर्लिंग रूपात इथे विराजमान आहेत.

भीमाशंकर घाट – bhimashankar ghat information in marathi

भारताच्या पश्चिम तटावर स्थित पर्वत शृंखला आहे जिला आपण सह्याद्री किंवा पश्चिम घाट असे म्हणतो. या सह्याद्रीच्या कुशीमध्ये भीमाशंकर मंदिर वसलेल आहे‌. भीमाशंकर मंदिराजवळील पश्चिम घाट निसर्गप्रेमींसाठी एक सुखद आणि खास ठिकाण आहे. पश्चिम घाटात पर्वत, घनदाट जंगले, चित्तथरारक खोरे, विपूल फुलांचे दर्शन पर्यटकांचे आकर्षण आहे. भीमाशंकरला भेट देणारा प्रत्येक यात्रेकरु या घाटाची यात्रा नक्कीच करतो.

गुप्त भीमाशंकर कथा:

भीमा नदीचा मूळ उगम ज्योतिर्लिंग जरी असले तरी हि नदि तिथून लुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारण १.५ किमी पर्यंत पूर्वेच्या दिशेने पुन्हा प्रकट होते‌ असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

भीमाशंकर मंदिर वेळ – bhimashankar temple darshan timings

इथे येणारे यात्रेकरू किमान तीन दिवस नक्कीच मुक्काम करतात. भाविकांना येथे राहण्यासाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था केल्या आहेत.शिनोली आणि घोडगाव हे भीमाशंकर पासून थोड्या अंतरावर आहे. जिथे आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील तर. भीमाशंकर मंदिरात जायचे असेल तर ऑगस्ट फेब्रुवारी महिन्यात जा तसेच आपण उन्हाळ्याच्या हंगामा शिवाय कोणत्याही वेळी जाऊ शकतो. तसेच ज्यांना ट्रेकिंग आवडते त्यांनी पावसाळ्यात जाणं ‌टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंदिर उघडण्याची योग्य वेळ पहाटे साडेचार वाजताची आहे.

त्यानंतर पहाटे सकाळी ४.४५ ते ५ पर्यंत च्या दरम्यान पंधरा मिनिटांची आरती होते. निजरूप दर्शन म्हणजेच मूळ शिवलिंगाच्या दर्शनाची वेळ सकाळी ५ ते ५:३० म्हणजेच अर्ध्या तासाची असते. दर्शनी अभिषेक पहाटे ५:३० ते दुपारी २:३० पर्यंत चालू असते. नैवेद्य पूजा दुपारी १२ वाजल्यापासून रात्री १२:३० पर्यंत चालू असतं. या वेळेमध्ये अभिषेक केला जात नाही. आरती दुपारी ३ ते ३:३० पर्यंत असते. शृंगार दर्शन ३:३० ते ९:३९ पर्यंत असत. आरती संध्याकाळी ७:३० ते ८ वाजेपर्यंत होते.

मंदिर कोणी बनवले आहे:

भीमाशंकर‌ हे हिंदू धर्माचे प्रार्थना स्थळ आहे. येथे भगवान शिव यांची पूजा केली जाते. या मंदिराची स्थापना पुण्यामध्ये खेड गावात नाना फडणवीस यांनी अठराव्या शतकात केली होती.

पाहण्यासारखी ठिकाणे:

कोकण कडा भिमाशंकर मंदिरा जवळच पश्चिमेस एक कडा आहे त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. या कड्यावरून अतिशय रमणीय असे दृश्य दिसते. इथल्या स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबी समुद्र देखील दिसू शकतो. हा कडा पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो. तुकाराम बाबा आश्रम पासूनच पुढे एक रस्ता या आश्रमाकडे जातो. अतिशय घनदाट जंगलात हे ठिकाण आढळून येईल या ठिकाणी आपण आपल्या प्रायव्हेट गाडी ने देखील पोहोचू शकतो.

पुढे या आश्रमा पासूनच नागफणी या नावाच्या ठिकाणी जायला एक रस्ता आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असं मानलं जातं. त्याची उंची समुद्र तळापासून १२३० मीटर इतकी आहे. या ठिकाणावरून कोकणाचे अतिशय छान दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्या प्रमाणे दिसते म्हणूनच या ठिकाणाला नागफणी असे नाव पडले आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा भीमाशंकर मंदिर माहिती bhimashankar temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. bhimashankar temple information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about bhimashankar temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही भीमाशंकर मंदिर माहिती विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या bhimashankar temple history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!