वासोटा किल्ला माहिती Vasota Fort Information in Marathi

Vasota Fort Information in Marathi वासोटा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या कोयना नदीजवळ एका जंगल भागामध्ये हा किल्ला वसलेला आहे. वासोटा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची ४२६७ फुट इतकी आहे. वासोटा या किल्ल्याला व्याघ्रगड देखील म्हंटले जाते आणि हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो. सह्याद्रीची मुख्य डोंगर रांग आणि दातेगडाची रांग यामधून वाहणारी कोयना नदीचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. असे म्हणतात कि या किल्ल्यावर वसिष्ठ ऋषि यांचा एक शिष्य या गडावर राहत होता व त्याने त्यावेळी या गडाचे नाव वसिष्ठ असे ठेवले होते पण त्याचे नंतर वासोटा असे नाव पडले असावे. 

vasota fort information in marathi
vasota fort information in marathi

वासोटा किल्ला माहिती मराठी – Vasota Fort Information in Marathi

किल्ल्याचे नाववासोटा किल्ला ( व्याघ्रगड )
ठिकाणवासोटा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या कोयना नदीजवळ कारवीच्या जंगल भागामध्ये हा किल्ला वसलेला आहे
प्रकारवनदुर्ग
जिल्हासातारा
संस्थापकशिलाहार वंशातील दुसऱ्या भोजराजा
उंची४२६७ फुट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ह्या किल्ल्याचा वापर गुन्हेगारांना कैद करून ठेवण्यासाठी केला जात होता. वासोटा हा किल्ला शिलाहार वंशाच्या काळात आहे हा किल्ला शिलाहार वंशातील दुसऱ्या भोजराजाने बांधला आहे.

वासोटा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या कोयना नदीजवळ एका जंगल भागामध्ये हा किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ११७१ मीटर आहे आणि किल्ल्याची उंची ४२६७ फुट इतकी आहे. हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्यावर जाताना कारवीचे दाट जंगल लागते.

नक्की वाचा: विशाळगड किल्ल्याची माहिती 

हा गड नंदुगड म्हणून देखील ओळखला जातो. या किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे कुसापूर गावाजवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतल्या नंतर या किल्ल्याच्या संरक्षक वातावरणामुळे या किल्ल्याला व्याघ्रगड असे नाव दिले होते. हा किल्ला पुण्याहून ११० किलो मीटर आहे आणि सातारा शहरापासून हा किल्ला ४० किलो मीटर अंतरावर आहे.

हा किल्ला शिलाहार वंशातील दुसऱ्या भोजराजाने बांधला आहे. वासोटा किल्ल्यावर आपल्याला महादेव मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात तसेच तेथे एक मोठे सदरेचे क्षेत्र पाहायला मिळते. वासोटा हा किल्ला आपल्यला आज जीर्ण अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. या किल्ल्यावरती गेल्यानंतर या किल्ल्याचा वरचा सपाट भाग अंडाकृती असून याचे क्षेत्रफळ सहा एकर आहे. या किल्ल्यावर आपल्यला चंदकाईचे मंदिर देखील पाहायला मिळते.

वासोटा किल्ल्याचा इतिहास – Vasota Fort History In Marathi

असे म्हणतात कि या किल्ल्यावर वसिष्ठ ऋषि यांचा एक शिष्य या गडावर राहत होता आणि म्हणून त्याने त्यावेळी या गडाचे नाव वसिष्ठ असे ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी जावळी भाग जिंकला होता त्यावेळी त्या भागातील अनेक किल्ले त्यांच्या ताब्यात घेतले होते पण वासोटा किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात घेतला नव्हता पण पन्हाळा गडावर असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यांला सांगून वासोटा ६ जून १६६० मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला गुन्हेगारांना कैद करण्यासाठी वापरला. इ. स. १६६१ मध्ये पकडलेले इंग्रज फॅरन, रेव्हींग्टन आणि सॅम्यूअल यांना याच किल्ल्यावर कैद करून ठेवले होते. इ. स. १७०६ मध्ये हा किल्ला ताई तेलीनीच्या हाती गेला आणि इ. स १७३० मध्ये ताई तेलीनीचा पराभव करून बापू गोखले यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

नक्की वाचा: पद्मदुर्ग किल्ल्याची माहिती 

किल्ल्यावर काय पहाल 

  • दीडशे फुट खोल असणारा बाबू कडा किल्ल्याच्या पश्चिम दिशेस पाहायला मिळतो.
  • पडक्या अवस्थेतील एक वाडा देखील पाहायला मिळतो.
  • किल्ल्याला एक उंच भिंतीसारखा कडा आहे त्याला ताई तेलीनीचा कडा म्हणतात.
  • वासोटा किल्ल्यावर आपल्याला महादेव मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात.
  • या किल्ल्यावर नागेश्वर शिवलिंग आहे आणि त्यावर गुहेच्या छतातून पाणी झिरपते आणि चंदकाईचे मंदिर देखील पाहायला मिळते.
  • गडावर प्रवेश केल्यानंतर आपल्यला छापर नसलेले मारुतीचे मंदिर पाहायला मिळते.
  • या गडावरील माची हि लोहगडावरील विंचूकड्याची आठवण करून देते.

वासोटा किल्ला फोटो:

vasota fort information in marathi
vasota fort information in marathi

वासोटा किल्ल्यावर कसे जायचे 

या किल्ल्यापासून सातारा हे गाव ४० किलो मीटर अंतरावर आहे आणि आपण कोणत्याही मुख्य शहरातून साताऱ्याला रेल्वे किवा बसने येवू शकतो. येथून आपल्यला महाबळेश्वर मार्गे, खीरकंडी मार्गे किवा कुसापूर मार्गे बसने जावे लागते. त्याच बरोबर या किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी बामणोली येथून बोट पकडून जावे लागते. बामनोलीतून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी जवळ जवळ दीड तास लागतो. बामणोली पासून किल्ल्यापर्यंतचे बोटीने जायचे अंतर १५ किलो मीटर आहे.

नक्की वाचा: विशाळगड किल्ल्याची माहिती 

वन विभाग परवानगी : या किल्ल्यावर जाण्यासाठी वनमार्ग असल्यामुळे तेथे जंगली प्राणी देखील असू शकतात त्यामुळे किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला वन विभागाची परवानगी घ्यावी लागते.

वेळ : किल्ल्याभोवातीचे जंगल हे संरक्षित राखीव जागा असल्यामुळे या किल्ल्याला भेट देण्यासाठी वनविभागाने काही निश्चित वेळा ठरवल्या आहेत. जर किल्ल्यावरून उशिरा आल्यास वनविभाग तुमच्या कडून दंड आकाराला जातो.

टीप

  • जंगलातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी ३ तास लागतात.
  • किल्ला सकाळी ६ ला उघडतो आणि संध्याकाळी ६ वाजता बंद होतो.
  • या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी ३० रुपये प्रवेश शुल्क आकाराला जातो.
  • जर तुम्हाला मार्गदर्शक हा असेल तर त्याची ३०० रुपये फी द्यावी लागते.
  • या किल्ल्यावर जर फोटो किवा व्हीडीओ करायचा असेल तर ५० रुपये आकारले जातात.

विशेषता : वासोटा हा किल्ला ट्रेकिंगच्या पर्यटकांच्यासाठी एक प्रसिध्द किल्ला आहे.

नक्की वाचा: वसईच्या किल्ल्याची माहिती 

वासोटा ट्रेक तपशील

  • वासोटा किल्ला श्रेणी : मध्यम
  • वासोटा किल्ला उंची : ४२६७ फुट
  • वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गाव : इंदावली
  • प्रदेश : कोयना
  • चढाईसाठी लागणारा वेळ : ३ तास

किल्ला चढताना लागणाऱ्या आवश्यक गोष्टी

  • आपल्याकडे किल्ला चढताना ओळख पुरावा असणे आवश्यक आहे.
  • ट्रेकिंग शूज असले तर चांगलेच आहे.
  • पिण्याचे पाणी आणि खाण्यासाठी काही तरी सोबत घ्यावे.
  • आवश्यक असणारी औषधे देखील आपल्या सोबत घेतली तर चालतील.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, वासोटा किल्ला vasota fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. vasota fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about vasota fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही वासोटा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या vasota killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!