कळसुबाई शिखर विषयी माहिती Kalsubai Shikhar Information in Marathi

kalsubai shikhar information in marathi कळसुबाई शिखर विषयी माहिती, महाराष्ट्रामध्ये अनेक उंच टेकड्या आणि किल्ले आहेत आणि कळसूबाई शिखर (kalsubai peak) देखील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे जे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे आणि या शिखराला भेट देण्यासाठी अनेक ट्रेकर्स येतात आणि हे ट्रेकर्ससाठी खूप अवगड श्रेणीची चढाई आहे आणि आज आपण या लेखामध्ये कळसुबाई शिखर या ठिकाणा विषयी पाहणार आहोत. कळसुबाई शिखर हे वर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि या शिखराची उंची समुद्रसपाटी पासून एकूण १६४६ मीटर इतकी आहे आणि या शिखराच्या पायथ्याचे गाव हे बारी हे आहे.

आणि बरी या गावातून शिखरावर जाण्यासाठी वाटा आहेत आणि या शिखरावर जाण्यासाठी कातळावर शिड्या बसवल्या आहेत, तसेच या शिखरावर जाण्यासाठी कमीत कमी ३ तास तरी लागतात. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असल्यामुळे या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट (everest) म्हणून देखील ओळखले जाते. या शिखराला कळसुबाई असे नाव पडण्याचे कारण म्हणजे एका शिखराच्या जवळपास असणाऱ्या खेड्यामध्ये कळसूबाई नावाची एक मुलगी राहत होती आणि ती त्या शिखरावर जनावरे रोज नेत होती आणि संध्याकाळ झाल्यानंतर परत येत होती.

परंतु एके दिवशी ती शिखरावर गेली परंतु परत आली नाही आणि म्हणून तिच्या स्मरणार्थ या शिखराचे कळसुबाई असे नाव देण्यात आले आहे आणि तिच्या स्मरणार्थ शिखरावर एक छोटेसे कळसुबाईचे मंदिर देखील आहे आणि त्या मंदिराला गावातील लोक दर्शन घेण्यासाठी वर्षभर येत असतात. कळसुबाई शिखरावरून आपल्याला आजूबाजूचा मोहक नजरा पाहायला मिळतो तसेच आपल्याला या ट्रेकचमध्ये अनेक धबधबे तसेच जंगल या नैसर्गिक गोष्टींचा अनाद घेता येतो.

kalsubai shikhar information in marathi
kalsubai shikhar information in marathi

कळसुबाई शिखर विषयी माहिती – Kalsubai Shikhar Information in Marathi

ठिकाणाचे नाव

कळसुबाई शिखर
पत्तामहाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये वसले आहे.
पायथ्याचे गावबारी
पर्वत रांगसह्याद्री
उंची

१६४६ मीटर

कळसुबाई शिखर विषयी महत्वाची माहिती – information about kalsubai shikhar in marathi

कळसुबाई हे शिखर महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आहे आणि या शिखराच्या पायथ्याशी बरी हे गाव आहे जे शिखराच्या ९०० मीटर खाली आहे आणि हे शिखर समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर उंच म्हणजेच ५४०० फुट उंच आहे. हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय शिखर आहे त्यामुळे या ठिकाणी आणि पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

बरी या गावातून या शिखरावर चढण्यासाठी वाट आहे आणि या शिखरावर चढण्यासाठी ३ तास लागतात आणि या शिखरावर एक छोटेसे कळसुबाईचे मंदिर देखील आहे. कळसुबाई शिखरावरून आपल्याला हरीशचंद्र गड, रतन गड, हरिहरगड, कुलंग, अलंग या सारख्या ऐतिहासिक किल्ल्यांची दृश्ये देखील आपल्याला पहायला मिळतात. कळसुबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे आणि म्हणून याला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून संबोधले जाते आणि हा शिखर सह्याद्री पर्वत रांगेवर वसलेला आहे.

कळसुबाई शिखरावर कसे जायचे – where is kalsubai shikhar

या शिखरावर चढण्यासाठी आपल्याला बारी या पायथ्याशी असणाऱ्या गावातून जावे लागते आणि या शिखरावर जाण्यासाठी बरी या गावातून सरळ वाट आहे आणि मग गाव पाठीमागे गेल्यानंतर आपल्याला काही अंतर शेतातून चालावे लागते आणि काही अंतर शेतातून गेल्यानंतर आपल्या झोपड्या लागतात आणि झोपड्यांच्या शेवटच्या टोकावर गेल्यानंतर आपल्याला उजवीकडे वळावे लागते आणि मग त्या रस्त्यावर आपल्याला एक ओढा लागतो आणि त्या ओढ्यामध्ये पाणी वाहत असते आणि पावसाळ्यामध्ये थोडे जास्त पाणी असते त्यामुळे पावसाळ्यामध्ये थोडे लक्षपूर्वकपणे ओढा ओलांडावा लागतो.

ओढा पार केल्यानंतर आपण परत शेतातल्या वाटेमध्ये चालत राहावे लागते. आता पुढे आल्यानंतर आपल्याला २ ग्रामीण घरे आहेत आणि ढाबा आहे या ढाब्याच्या पुढे गेल्यानंतर काही उंच भाग आणि खडकाळ रस्ता चालू होतो. शेताच्या डावीकडे चढावर गेल्यानंतर चढीचा रस्ता सुरु होतो आणि त्या ठिकाणी स्थानिक देवतांचे मंदिर देखील आहे आणि या ठिकाणाहून आपल्याला शिखर दिसू लागते.

आता या पुढील रस्ता हा चिन्हाकित केलेला आहे आणि येथूनच मुख्य चढाई सुरु होते तुम्ही तासभर चढाई पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लोखंडी पायर्या आहेत त्यावरून सावधपणे चढा. या शिखरावर जाताना चार चढण आहे. या पायऱ्यांच्यावरून चढून वर गेले कि पुढे थोडा सपाट प्रदेश आहे. अश्या प्रकारे तीन तासाच्या प्रवासानंतर आपण शिखरावर पोहोचतो.

कळसुबाई शिखरावर काय पहावे

  • शिखरावर एक छोटेसे कळसुबाईचे मंदिर आहे त्यामध्ये फक्त २ किंवा तीन लोक मावतात आणि या ठिकाणी राहण्यासाठी कोणतीच सोय नाही.
  • या शिखरा वरून पश्चिमेकडे पाहिल्यानंतर आपल्याला अलंग, मलंग, रतनगड ची दृश्ये दिसतात त्याचबरोबर उत्तरेस ब्रह्मगिरी, रामशेज, हरिहर गड, घरगड तसेच दक्षिणेस कुंजरगड, भैरवगड, हरीश्चंद्रगड दिसतात तर या शिखरावरून पूर्वेकडे पाहीलेतर आपल्याला विश्रामगड आणि बितनगड याची दृष्ये दिसतात.

कळसुबाई शिखराला भेट देण्याचा उत्तम काळ – best time visit 

कळसुबाई शिखराला भेट देण्याचा उत्तम वेळ हि पावसाला किंवा हिवाळा आहे कारण पावसाळ्यामध्ये सर्वत्र हिरवळ असते आणि हि दृष्य पाहण्यासाठी खूप छान वाटते. पावसाळी हंगाम हा जुलै ते ऑक्टोबर पर्यंत असतो आणि या काळामध्ये हे शिखर पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे परंतु पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करणे खुच अवघड आहे. तसेच हिवाळ्यामध्ये देखील आपण हा शिखर पाहण्यासाठी जावू शकतो आणि हिवाळा म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च महिन्याचा काळ देखील या शिखराला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.

कसे पोहचायचे – how to reach 

  • जर काहींना कळसुबाई शिखराला भेट देण्यासाठी विमानाने यायचे असेल तर या ठिकाणाला जवळचे विमानतळ हे औरंगाबाद हे आहे आणि औरंगाबाद हे शहर या ठिकाणापासून २०० किलो मीटर अंतरावर आहे. आपण येथून भाड्याने टॅक्सी घेऊन पायथ्याच्या गावा पर्यंत जावू शकतो.
  • जर तुम्हाला रेल्वेने यायचे असल्यास तुम्ही अहमदनगर या ठिकाणी कोणत्यही मुख्य शहरातून येवू शकता आणि येथून तुम्हाला कळसुबाईला जाण्यासाठी भाड्याने टॅक्सी घेऊन पायथ्याच्या गावा पर्यंत जावू शकतो.
  • आपण या शिखराला बसने देखील येऊ शकतो परंतु जर आपण या ठिकाणाला भेट देण्यासाठी स्वताची कार घेऊन गेलो तर ते सोयीस्कर होईल आणि आपण आपली कार बारी गावामध्ये पार्क करून ट्रेक सुरु करू शकतो.

आम्ही दिलेल्या kalsubai shikhar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कळसुबाई शिखर विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kalsubai shikhar history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि kalsubai shikhar wikipedia in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!