My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ना कोणता आवडता ऋतू असतो आणि ऋतू हे दरवर्षी बदलत असतात आणि दरवर्षी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा येतो आणि हे तीन ऋतूंचे प्रकार आहेत. आपल्यामधील प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी ऋतू आवडत असती आणि आपण तो ऋतू येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अनेकांना जरी पावसाळा किंवा थंडी हा ऋतू आवडत असला तरी मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो कारण मला असे वाटते कि उन्हाळ्या सारखा कोणताच ऋतू नाही, कारण उन्हाळा म्हंटले कि आनंदायी वातावरण आणि याच ऋतू मध्ये आपल्याला मजा मस्ती देखील करायला मिळते.
माझा आवडता ऋतू मराठी निबंध – My Favourite Season Essay in Marathi
माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध – Essay on Summer Season in Marathi
उन्हाळा हा असा ऋतू आहे ज्यामध्ये वातावरण हे स्वच्छ असते आणि परंतु थोडे उन्हाळ्यामध्ये गरम जास्त होते परंतु त्याचा आपल्याला त्रास होत नाही. उन्हाळा हा ऋतू स्त्तीचा ऋतू म्हणून देखील ओळखला जातो कारण बहुतेक शाळेमध्ये किंवा कॉलेज मध्ये मार्च महिन्यामध्ये वार्षिक परीक्षा होतात आणि मुलांना एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुट्टी पडते त्यामुळे उन्हाळा हा सुट्टीचा ऋतू म्हणून ओळखला जातो.
आणि उन्हाळ्यामध्ये मुले सर्व वार्षिक अभ्यास संपल्यामुळे निवांत असतात आणि तसेच जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यामध्ये निवांत असतात. तसेच उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी असल्यामुळे घरातील महिलांची सुध्दा जास्त धावपळ होता नाही. अश्या प्रकारे सर्व बाजूंनी उन्हाळा हा ऋतू खूप फायदेशीर आहे.
उन्हाळा या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात उष्णता असल्यामुळे ह्या ऋतूमध्ये लोक शक्यतो गार पदार्थ खातात आणि गार पेय पितात जसे कि वेगवेगळ्या फळांचा रस, दही, ताक, नाचण्याची आंबील, लस्सी यासारखे गार पेय पिण्यावर आपण जास्त भर टाकतो कारण उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उष्ण हवामान असते आणि त्यावेळी आपल्याला शरीरामध्ये गार पणा राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गार पदार्थ प्यावे लागतात तसेच आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आईसस्क्रीम, स्मुदी, ब्राऊनी यासारखे अनेक पदार्थ देखील खातो आणि एक कारण आहे.
ज्यामुळे मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये आपण सफरचंद, संत्री, पेरू, मोसंबी, चिक्कू आणि कलिंगड यासारखी फळे खायला खूप छान लागतात आणि कलिंगड तर खायला सुरुवात केले कि खरा उन्हाळा सुरु झाला असे वाटते. तसेच उन्हाळ्यामध्ये आमच्या घरी काकडीची कोशिंबीर, टोमॅटो किंवा दही कांदा बनवतात जेणे करून आपले पोट शांत राहील.
अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ बनवून आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाळा ऋतू मला खाण्याचेवेगवेगळे पदार्थ खायला मिळतात म्हणून फक्त आवडत नाही तर उन्हाळा हा ऋतू मला शाळेला सुट्टी असते म्हणून देखील आवडायचा कारण उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी – मार्च महिन्यामध्ये शक्यतो सर्वांच्या वार्षिक परीक्षा आटपून सर्वांना सुट्टी पडलेली असायची.
आणि आम्हाला देखील सुट्टी असायची त्यामुळे आम्ही काही दिवसासाठी तरी शाळेतील वेगवेगळ्या गोष्टींच्यापासून मोकळे झालेलो असायचो कारण वार्षिक परीक्षा झाल्यामुळे अभ्यासाचे कोणतेच टेन्शन असायचे नाही. त्यामुळे निवांत दिवसभर खेळता यायचे तसेच मित्रांच्या सोबत मज्जा – मस्ती करायला मिळायची.
खेडे गावामध्ये पहिले तर उन्हाळ्यामध्ये मुलांचे नदीला किंवा विहिरीला पोहायला जाणे हे ठरलेले असते आणि खेडे गावातील मुले हि सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा अंघोळ करण्यासाठी जातात तसेच शहरातील मुले देखील स्विमिंग टँक मध्ये जाऊन पोहण्याची मजा घेतात. अश्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण अनादी राहू शकतो.
उन्हाळ्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे फिरायला जाने, असे अनेक लोक आहेत जे उन्हाळा सुट्टी मध्ये फिरायला कोठे ना कोठे तरी फिरायला जातात. फिरायला जाणे हा उन्हाळयामधील आमचा आवडता उपक्रम आहे कारण कोणत्याही ठिकाणी गेले कि तेथील माहिती मिळते आणि आपल्याला वेगळ्या ठिकाणी गेल्याचा फील येतो आणि कोठे तरी प्रेक्षणीय स्थळी फिरायला शक्यतो लोक उन्हाळ्यामध्ये जातात
कारण उन्हाळ्यामध्ये वातावरण खूप स्वच्छ असते आणि तसेच उन्हाळ्यामध्ये लोक निवांत असतात तसेच मुलांना देखील सुट्ट्या असतात त्यामुळे घरातील सगळी मंडळी मिळून फिरायला जाण्यासाठी हा एक उत्तम ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये लोक अश्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात जसे कि समुद्र किनारा, वॉटर पार्क, नैसर्गिक ठिकाणे, धबधबे अश्या गार वाटणाऱ्या ठिकाणी फिरायला जातात.
उन्हाळा हा ऋतू बघायला गेला तर सगळ्या दृष्टीने तसा चांगला आहे. ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये स्त्रियांची खूप धावपळ चालू असते कारण ग्रामीण भागातील नाहुतेक स्त्रिया उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे, पापड, लोणचे बनवून ठेवतात जेणेकरून ते थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये खाता यावे.
उन्हाळ्यामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो तसेच शाळेपासून २ महिने सुट्टी असल्यामुळे आपण आपले वेगेगले छंद जोपासू शकतो. उन्हाळा हा जास्त उष्ण असल्यामुळे गरम होते आणि म्हणून लोक उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती कपडे, पातळ कपडेच परिधान करतात तसेच उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी खूप गर्दी असते. म
ला उन्हाळा आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळा या ऋतूमध्ये आंबे लागायला सुरुवात होते आणि मला हापूस आंबा खूप आवडतो आणि हा हापूस आंबा मार्च नंतर बाजारामध्ये यायला सुरुवात होते आणि हापूस आंबा खूप आवडत असल्यामुळे आम्ही घरातील सर्व व्यक्ती आंब्याच्या सिजनमध्ये हापूस आंबे मनसोक्त खातो.
तसेच उन्हाळ्यामध्ये कच्चे आंबे लागतात आणि त्यापासून बनवलेला आंब्याचा करम, पन्हे आणि इतर पदार्थ देखील खूप आवडतात. त्याचबरोबर उन्हाळा ऋतूमध्ये कोकण भाग हा देखील खूप चांगल्या प्रकारे बहरलेला असतो आणि कोकणामध्ये सगळीकडे हिरवीगार झाडी असते तसेच करवंद, काजू यासारखी फळे देखील उन्हाळ्यामध्ये खायला मिळतात म्हणजेच या प्रकारचा कोकण मेवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायला मिळतो.
तसेच कोकण भाग हा गार झाडांच्या गर्दीने भरलेला असतो आणि कोकणामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्यामुळे कोकण भागामध्ये पर्यटकांची देखील खूप गर्दी पाहायला मिळते. अश्या प्रकारे एकूणचा उन्हाळा हा महिना सगळ्याच गोस्तीन्च्यासाठी फायदेशीर असतो तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो आणि उन्हाळा हा असा ऋतू आहे जो आपल्याला मनोरंजक वाटतो.
आम्ही दिलेल्या my favourite season essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता ऋतू मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite season in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि summer essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट