Kanda Lasun Masala Recipe in Marathi कांदा लसून मसाला रेसिपी कांदा लसून मसाला हा एक अस्सल महाराष्ट्रीयन मसाला आहे जो कोणत्याही भाजीची, आमटीची किंवा मसाले भाताची चव वाढवतो. कांदा लसून मसाला हा एक मसाल्याचा प्रकार असून जर आपण हा मसाला कोणत्याही तिखट पदार्थामध्ये घातला तर तो पदार्थ खूप स्वादिष्ट आणि चमचमीत बनतो तसेच हा मसाला मटन आणि चिकन रेसिपीज मध्ये देखील हमखास वापरला जातो. कांदा लसून मसाला हा महाराष्ट्रामध्ये काही जेवणामध्ये वापरला जातो परंतु भारतामधील बहुतेक स्वयंपाक घरांमध्ये देखील कांदा लसून मसाला वापरला जातो.
कांदा लसून मसाला घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कानी वेळेमध्ये म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये बनतो परंतु हा बनवण्यासाठी साहित्य जास्त लागते. चला तर आता आपण या लेखामध्ये कांदा लसून मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.
कांदा लसूण मसाला रेसिपी – Kanda Lasun Masala Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
बनवण्याची पद्धत | खूप सोपी |
कांदा लसून मसाला बनवण्यासाठी कांदा आणि लसून हे महत्वाचे साहित्य वापरले जाते आणि काही इतर मसाले देखील वापरले जातात. सर्व मसाले गॅसवर मध्यम आचेवर कढईमध्ये थोडेसे तेल घालून वेगवेगळे भाजले जातात आणि मग ते मिक्सरवर बारीक केले जातात.
- नक्की वाचा: गरम मसाला रेसिपी
कांदा लसून मसाल्यामध्ये वापरले जाणारे मुख्य साहित्य – key ingredients
- कांदा : कांदा हा कांदा लसून मसाला बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे. या मसाल्यामध्ये कांदा वापरताना तो भाजून किंवा मग कडक उन्हामध्ये वाळवून मग तो मसाल्यामध्ये वापरला जातो.
- लसून : कांदा लसून मसाला मध्ये लसून देखील वापरला जातो लसून तेलामध्ये तळून तो इतर मसाल्यांच्या सोबत मिक्सरवर बारीक केला जातो.
- लाल मिरची पावडर किंवा लाल सुख्या मिरच्या : कांदा लसून मसाला मध्ये लाल मिरची पावडर किंवा लाल सुख्या मिरच्या वापरल्यामुळे मसाल्याला तिखटपणा येतो.
कांदा लसून मसाला रेसिपी – kanda lasun masala recipe
कांदा लसून मसाला हा एक महाराष्ट्रीयन पारंपारिक मसाला आहे जो खूप पूर्वीच्या काळापासून भारतीय स्वयंपाक पध्दतीमध्ये वापरला जातो. कांदा लसून मसाला हा आपण कोणत्याही तिखट भाजी मध्ये वापरू शकतो त्यामुळे भाजी तिखट, खमंग आणि चमचमीत बनते. कांदा लसून मसाला घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कानी वेळेमध्ये म्हणजे २० ते २५ मिनिटामध्ये बनतो. चला तर आता आपण कांदा लसून मसाला कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
बनवण्याची पद्धत | खूप सोपी |
कांदा लसून मसाला बनवण्यासाठी कांदा, लसून, लाल मिरची पावडर आणि वेगवेगळ्या प्रकारचे इतर मसाले देखील आवश्यक असतात आणि ते सर्वच साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते असे नाही तर ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग आता आपण कांदा लसून मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- नक्की वाचा: काळा मसाला रेसिपी
- ३ ते ४ वाटी कांदा ( उभा चिरलेले ).
- अर्धी वाटी लसून पाकळ्या ( सोललेल्या ).
- १ वाटी लाल मिरची पावडर.
- अर्धी वाटी खोबरे.
- २ मोठे चमचे तीळ.
- ४ चमचे जिरे.
- २ बदाम फुल.
- २ ते ३ पाने तमाल पत्री.
- २ ते ३ दालचिन तुकडे.
- ३ वेलदोडे.
- २ मसाला वेलदोडे.
- १ चमचा काळी मिरी.
- १/२ चमचा हिंग.
- १/२ चमचा हळद.
- अर्धी वाटी कोथिंबीर.
- अर्धी वाटी तेल.
- १ ते दीड मोठा चमचा मीठ.
कांदा लसून मसाला बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनतो. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून कांदा लसून मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.
- कांदा लसून बनवण्यासाठी सर्वप्रथम जे साहित्य लागणार आहे ते एकत्र करून ठेवा.
- कांदा जर तुम्ही कडक उन्हामध्ये वाळवून घालणार असाल तर तो आधल्या दिवशी उभा चिरून दिवसभर उन्हामध्ये वाळवून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि आणि मग त्यामध्ये थोडेसे तेल घाला आणि लसून, खोबरे, तीळ, जिरे हे सर्व घटक वेगवेगळे भाजून घ्या आणि ते बाजूला काढून ठेवा.
- मग आता कढईमध्ये वेगवेगळे गरम मसाले जसे कि बदाम फुल, तमाल पत्री, दालचिन तुकडे, वेलदोडे, मसाला वेलदोडे आणि काळी मिरी वेगवेगळ्या तेलामध्ये भाजून घ्या आणि ते बाजूला काढा.
- आता त्या गरम असणाऱ्या मसाल्यांवर हिंग आणि हळद घाला.
- आता खोबरे, तीळ आणि जिरे हे वेगवेगळे मिक्सरवर बारीक करून घ्या आणि मग बदाम फुल, तमाल पत्री, दालचिन तुकडे, वेलदोडे, मसाला वेलदोडे आणि काळी मिरी हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या आणि त्याची मिक्सरवर बारीक पावडर करून घ्या.
- आता कडाड उन्हामध्ये वाळलेले कांदा, लसून आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
- आता हे वाटून घेतलेले सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये मिरची पावडर, मीठ आणि गरम तेल घाला आणि परत मिक्स करून घ्या.
- आणि हे मिश्रण थोडे भांड्यामध्ये घालून चांगले मिक्स करून घ्या.
- घरगुती पध्दतीने बनवलेला कांदा लसून मसाला तयार झाला आता हा एका बरणीमध्ये भरून ठेवून आपल्याला हवा तेंव्हा आपण तो वापरू शकतो.
टिप्स (Tips)
- कांदा लसून मसाल्यामध्ये सुख्या मिरच्या देखील वापरल्या तरी चालतात.
- कांदा लसून मसाला एक वर्ष चांगला टिकू शकतो.
आम्ही दिलेल्या kanda lasun masala recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला रेसिपी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ambari kanda lasun masala recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of yoga in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kolhapuri kanda lasun masala recipe in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट