कटाची आमटी रेसिपी मराठी Katachi Amti Recipe in Marathi

Katachi Amti Recipe in Marathi कटाची आमटी रेसिपी मराठीआज आपण या लेखामध्ये कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत जी पुरण पोळी सोबत साईड डीश म्हणून सर्व्ह केली जाते कारण आपण ज्यावेळी पुरण पोळी बनवण्यासाठी चण्याची डाळ भिजत घालून मग ती पाणी घालून कुकरमध्ये ती शिजवून घेतो आणि मग त्यामध्ये असणारे पाणी इळवनी किंवा कट म्हणून काढतो आणि त्या पाण्यापासून इळवनीची आमटी बनवतो त्याला कटाची आमटी म्हणून ओळखले जाते. कटाची आमटी हि विशेषता आपण सणांमध्येच बनवतो कारण आपण पुरण पोळ्या देखील काही सणवार किंवा काही खास पूजा किंवा कार्यक्रम असल्यानंतर नैवैद्य म्हणून बनवतो.

आणि त्यासोबतच हि कटाची आमटी देखील बनवतो. जर तुम्हला कटाची आमटी ऐन वेळी खावू वाटत असेल तर तुम्ही वाटीभर चणा डाळ जास्त पाणी घालून शिजवून घेवून त्यामधील पाणी काढून आमटी बनवू शकता. कटाची आमटी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये अगदी उत्तम बनते.

 katachi amti recipe in marathi
katachi amti recipe in marathi

कटाची आमटी रेसिपी मराठी – Katachi Amti Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ९ ते १० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन ( भारतीय )
बनवण्याची पध्दतखूप सोपी

कटाची आमटी म्हणजे काय ?

ज्यावेळी आपण पुरण पोळी बनवण्यासाठी चण्याची डाळ भिजत घालून मग ती पाणी घालून कुकरमध्ये ती शिजवून घेतो आणि मग त्यामध्ये असणारे पाणी इळवनी किंवा कट म्हणून काढतो आणि त्या पाण्यापासून इळवनीची किंवा कटाची आमटी बनवतो.

कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

 • इळवनी किंवा कट : कटाची आमटी बनवण्यासाठी आपण जो चणा डाळ शिजवून त्यामधील इळवनी किंवा कट काढतो तो कटाची माती बनवण्यासाठी लागणारा मुख्य घटक असतो.
 • तेल : तेल देखील कटाची आमटी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापैकी एक मुख्य घटक आहे कारण आपण जितके जास्त तेल वापरू तितके जास्त कट आमटीला येतो.

कटाची आमटी कशी करायची – how to make katachi amti recipe in marathi

कटाची आमटी हा क महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो चणा डाळीच्या शिजवलेल्या इळवनी किंवा कटापासून बनवला जातो आणि हा एक असा पदार्थ आहे ज्याचा आस्वाद पोळी बरोबर किंवा पांढऱ्या भातासोबत लोक आवडीने घेतात. आता हि सोपी आणि कमी वेळेमध्ये बनणारी रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात कटाची आमटी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ९ ते १० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन ( भारतीय )
बनवण्याची पध्दतखूप सोपी

कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make katachi amti recipe 

कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घरामध्ये आधीपासून उपलब्ध असू शकते आणि नसेल तर ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. चला तर मग कटाची आमटी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

 • ५ ते ६ वाटी इळवनी किंवा कट.
 • २ ते ३ चमचे शिजवलेली आणि कुसकरलेली चना डाळ किंवा पुरण.
 • अर्धी छोटी वाटी खवलेले ओले खोबरे.
 • ३ चमचे तीळ
 • १/४ चमचा जिरे.
 • थोडी कोथिंबीर ( मसाल्यासाठी ).
 • १ मोठा चमचा तेल.
 • ८ ते ९ लसून पाकळ्या ( ठेचलेल्या )
 • १ चमचा मोहरी.
 • दीड चमचा लाल मिरची पावडर.
 • १/२ चमचा हळद.
 • १/४ चमचा हिंग.
 • ७ ते ८ कडीपत्ता पाने.
 • १/ चमचा गुळ.
 • २ ते ३ तुकडे आमसूल
 • मीठ ( चवीनुसार ).
 • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
 • १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( बारीक चिरलेली ) ( वरून टाकण्यासाठी ).

कटाची आमटी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make katachi amti 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून कटाची आमटी कशी बनवायची ते पाहूयात.

 • सर्वप्रथम चणा डाळ शिजवून त्यामधील कट काढून घ्या आणि तो बाजूला ठेवा.
 • आता कढई गॅसवर मध्यम आचेवर गरम करून त्यामध्ये तीळ आणि जिरे भाजून घेवून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पावडर करून घ्या मग त्यामध्ये खिसलेले ओले खोबरे आणि कोथिंबीर घाला आणि ते मिक्सरवर बारीक वाटून घ्या आणि ते बाजूला ठेवा ( टीप : जर मसाल्यामध्ये वाटताना थोडे पाणी घालावे लागत असल्यास थोडे पाणी घाला त्यामुळे मसाला चांगला बारीक होईल ).
 • आता गॅसवर मध्यम आचेवर एक खोल भांडे ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये ठेचलेला लसून आणि कढीपत्ता घाला आणि ते चमच्याने एक दोन वेळा हलवा आणि लसून थोडा भाजू द्या.
 • आता फोडणीमध्ये हिंग, हळद, लाल मिरची पावडर आणि आमसूल घाला आणि ते मिक्स करा आणि मग त्यामध्ये आपण बनवून घेतलेला मसाला घाला आणि तो मिक्स करून मिनिटे भाजा आणि मग त्यामध्ये चणा डाळ शिजवून त्यामधील काढून घेतलेला कट घाला आणि आणि तो मसाल्यामध्ये चांगल मिक्स करा. ( टीप : हि आमटी फोडणी टाकतेवेळी काळजी पूर्वक टाका कारण फोडणी करपण्याची शक्यता असते )
 • मग यामध्ये चवीनुसार मीठ, गुळ, आणि शिजवलेली आणि कुसकरलेली चना डाळ किंवा पुरण घाला आणि ते चमच्याने मिक्स करा आणि मग हे सर्व घालून आमटी थोडी घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये वाटी गरम पाणी घाला आणि आमटीला चांगली उकळी येऊ द्या. आमटीला उकळी आली कि गॅस बंद करा.
 • आता आमटीवर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि सर्व्ह करा.

कटाची आमटी कश्यासोबत खातात – serving suggestion

 • कटाची आपण पुरण पोळी सोबत खाऊ शकतो किंवा पांढऱ्या भातासोबत या आमटीची आस्वाद घेवू शकतो.

टिप्स ( Tips ) 

 • जर तुम्हला आमटी जास्त घट्ट नको असेल तर त्यामध्ये शिजवलेली आणि कुसकरलेली चना डाळ किंवा पुरण घालू नका.
 • कटाच्या आमटीला फोडणी देताना काळजीपूर्वक द्या आणि मध्यम किंवा मंद आचेवर फोडणी द्या.

आम्ही दिलेल्या katachi amti recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कटाची आमटी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या katachi amti recipe in marathi by madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि katachi amti recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये puran poli and katachi amti recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!