केस गळतीवर घरगुती उपाय Kes Galti Var Upay in Marathi

kes galti var upay in marathi – kes galane upay – How To Stop Hair Fall In Marathi केस गळतीवर घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये केस गळती वर उपाय या वर माहिती लिहिणार आहोत. केस म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे सौंदर्य असते आणि सर्वजन आपले केस कसे चांगले राहतील या बद्दल चिंतिती असलेले पाहायला मिळतात पण या लेखामध्ये केस गळती विषयी अनेक उपाय पाहणार आहोत. स्त्री असो किंवा पुरुष दोघानाही केस गळतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्याच्या या प्रदूषणाच्या काळामध्ये लोकांना अनेक आरोग्य विषयक तसेच त्वचा आणि सौंदार्याविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामधील केस गळती हि एक दैनंदिन समस्या बनली आहे म्हणजेच केस गळण्याच्या या समस्येला लोकांना रोजच्या जीवनामध्ये तोंड द्यावे लागत आहे.

या मुळे स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या मनामध्ये अनेक भीती आणि संशय निर्माण होतात जसे कि स्त्रियांना वाटते कि आपले केस खूप कमी होतील का तसेच पुरुषांना वाटते कि आपल्याला टक्कल पडेल किंवा आपले केस खूप कमी होतील पण जर आपण केसंच्यासाठी योग्य ते उपाय केले तर आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर होतील आणि आपल्या केसांची गळती देखील थांबेल.

केस गळणे हि समस्या अनेक कारणांच्यामुळे होऊ शकते जसे कि एखादा व्यक्ती सतत टेन्शन मध्ये असेल तर त्या व्यक्तीचे केस गळतात तसेच आपण पाहतो कि स्त्रिया गच्च वेणी घालतात पण गच्च वेणी घातल्यामुळे देखील काही वेळा केस तुटण्याची क्षमता असते अश्या प्रकारे केस गळतीची अनेक कारणे आहे ती आपण उपायांच्या सोबत पाहणारच आहोत. चला तर आता आपण केस गळतीची कारणे आणि उपाय पाहणार आहोत.

kes galti var upay in marathi
kes galti var upay in marathi

केस गळतीवर घरगुती उपाय – Kes Galti Var Upay in Marathi

केस गळण्याची कारणे – causes of hairfall 

स्त्री व पुरुष यांच्या सौन्दार्याचा केस हा सर्वात महत्वाचा भाग आहे परंतु सध्या केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत त्यामुळे स्त्रिया आणि पुरुष देखील खूप चिंतेत आहेत. आता आपण खाली केस गळण्याची कारणे पाहणार आहोत.

  • एखादा व्यक्ती सतत टेन्शन मध्ये असेल तर त्या व्यक्तीला केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते.
  • आपण पाहतो कि स्त्रिया गच्च वेणी घालतात पण गच्च वेणी घातल्यामुळे देखील काही वेळा केस तुटण्याची क्षमता असते म्हणून अशी समस्या उद्भवणाऱ्या स्त्रियांनी केसांची सैल वेणी घातली तर केस तुटणार नाहीत.
  • आपल्या शरीरामध्ये जर लोहाचे ( iron ) चे प्रमाण कमी असेल तर आपले केस गळू शकतात.
  • त्याचबरोबर थायरॉईड असणाऱ्या व्यक्तीचे केस देखील गळतात.
  • गर्भनिरोधक गोळ्या, गर्भधारणा किंवा बाळंतपना या हार्मोन्सच्या बदलामुळे देखील केस गळण्याची समस्या उद्भवते.
  • जास्त औषधे खाल्ल्यामुळे देखील केस गळू शकतात.
  • अन्नातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील केस गळतीची समस्या उद्भवते.

केस का गळतात ?

स्त्री व पुरुष यांच्या सौन्दार्याचा केस हा सर्वात महत्वाचा भाग आहे. केस गळणे हि एक फार मोठी समस्या आहे आणि औषधे किंवा अनुवंशिकता या सारखी अनेक कारणे केस गळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला या समस्येमुळे टक्कल पडू लागले तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. दाट केस असणे हे तारुण्याचे एक लक्षण आहे तर टक्कल पडणे हे प्रौढ पणाचे लक्षण आहे. रोज ५० ते १०० केस गळणे हे सामान्य समजले जाते.

वयाप्रमाणे व्यक्तीचे केस गळणे हे साहजिक आहे. परंतु तसे काही कारण नसताना देखील जर केस गगळत असतील तर आपल्याला त्या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केस गळती हि शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे देखील केस गळू शकतात तसेच मुला मुलींमध्ये केस गळण्याचे प्रमाण खूप जास्त असते कारण म्हणजे वजन कमी करण्याचा दबाव, ताणतणाव, असंतुलित आहार, विविध प्रकारची व्यसने आणि विचित्र प्रकारच्या केसांच्या स्टाईल्स यामुळे केस गळू शकतात.

केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय – hair fall solution in marathi language

kes galane upay

केस गळती या समस्येला अनेक लोक जरी सामोरे जात असले तरी त्यावर काही उपाय करून आपण केस गळती थांबवू शकतो. चाल तर आता आपण केस गळती वर उपाय पाहूयात.

  • आठवड्यातून एक किंवा दोन वेळा केसांना तेल लाऊन मसाज करा कारण असे केल्याने केस गळती कमी होऊ शकते ( टीप : तुम्ही मसाजसाठी जे तेल वापरता ते तुमच्या केसांना जे सूट होते ते तेल लावा त्यामुळे तुमच्या केसांची गळती थांबेल आणि केस वाढण्यास आणि दाट होण्यास मदत होईल).
  • पूर्वीच्या काळापासून शिकेकाई देखील केसांच्या सौंदर्यासाठी वापरली जाते आणि शिकेकाई मध्ये देखील असे आयुर्वेदिक गुणधर्म असतात जे केस गळती थांबवण्यासाठी मदत करतात. ज्या वेळी आपण केस धुणार असतो त्यावेळी जर शिकेकाई पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उकळून ते पाणी गाळून ते थंड करू त्याने आपले केस धुतले तर केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
  • आठवड्यातून एकदा कांद्याच्या रसाने जर आपण केसांच्या मुळाचा मसाज करून ते १० ते १५ मिनिटे तसे ठेऊन प्रांत शाम्पूने धुवून घेतले तरी देखील केस गळती कमी होण्यास मदत होऊ शकते तसेच सध्या बाजारात ओनियन ऑईल देखील उपलब्ध आहे त्याचा वापर देखील केसांच्या मसाजसाठी केला जाऊ शकतो.
  • केस गळतीवर जास्वंदीचे तेल हे देखील एक रामबाण उपाय आहे आणि हे जास्वंदीचे तेल आपण घरच्या घरी अगदी सहजपणे बनवू शकतो. जास्वंदीचे तेल बनवताना ५ ते ६ जास्वंदीची फुले घ्या आता एका खोल भांड्यामध्ये १ मोठी वाटी तेल घाला आणि त्यामध्ये फुले कुस्करून घाला आणि ते मिश्रण चांगले १० मिनिटे उकळून घ्या आणि उकळ्यानंतर गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. तेल थंड झाले कि ते एका बाटलीमध्ये काढा आणि ते तेल आठवड्यातून एकदा केसांना लावा.
  • भृंगराज तेल किंवा ऑलीव्ह तेलाने केसांना मालिश केली तरी केस गळती थांबते त्याबरोबर डोक्याला देखील आराम मिळतो.
  • जर एकाद्या व्यक्तीचे केस गळत असतील तर त्या व्यक्तीने जर कोरफडचा गर केसांना लावून ते १५ ते २० मिनिटे तसे ठेवून ते पाण्याने स्वच्छ धुतले तर केस गळती थांबते आणि केस दाट होतात,
  • केस गळतीवर मोहरीचे तेल देखील उपयुक्त ठरू शकते.
  • केस गळतीसाठी योगासन आणि व्यायाम करणे देखील फायद्याचे ठरते आणि केस गळतीवर उपाय म्हणून शीर्षासन हा व्यायाम खूप उपयोगाचा आहे कारण हा व्यायामामुळे आपल्या केसांना रक्तपुरवठा होतो आणि केस गळणे कमी होतात.
  • आवळा व शिकेकाई हे दोन्ही एका भांड्यामध्ये पाण्यात भिजत घाला आणि हे मिश्रण दोन दिवसांनी त्यामधील बिया काढा आणि हे मिश्रण मिक्सरवर वाटून घ्या आणि मग त्यामध्ये दही आणि मेहंदी मिक्स करा आणि ते मिश्रण केसांना लावा आणि ते चार तास तसेच ठेवा आणि चार तासानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा त्यामुळे केस गळती थांबेल तसेच केसांना मऊ पणा येईल.
  • केसांची चांगली निगा राखली तरी देखील केस गळती समस्या दूर होते.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या kes galti var upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर केस गळतीवर घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hair fall solution in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि kes galati upay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!