Hibiscus Information in Marathi – Hibiscus Flower in Marathi जास्वंद फुलांची माहिती मराठी आपल्या घराच्या परिसरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि फुलांची झाडे लावतो त्यामधील आपल्या घराच्या परिसरामध्ये हमखास असणारे फुलाचे झाड म्हणजे जास्वंदीच्या फुलाचे झाड. आज या लेखामध्ये आपण जास्वंदीच्या फुला विषयी माहिती घेणार आहोत म्हणजेच हे फुल कोणत्या आकाराचे असते, या फुलाचा रंग कसा असतो, फुलाला किती पाकळ्या असतात आणि हे फुल कश्यासाठी वापरले जाते आणि या फुलापासून काय फायदे आहेत. चला तर मग जाणून घेवूयात जास्वंदी या फुलाबद्दल मनोरंजक माहिती.
जास्वंदीचे फुल हे एक सुगंध रहित फुल आहे जे लाल, केशरी, गुलाबी आणि पांढऱ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हे फुल पाच पाकळ्यासह ४ ते ५ सेंटी मीटर आकाराचे असते आणि हे हिरव्यागार झाडामध्ये मोठ्या प्रमाणात लागते आणि या झाडाची उंची १३ ते १५ फुट इतकी वाढू शकते.
जास्वंदी या फुलाचे जगभरामध्ये २०० हून अधिक प्रजाती आहेत आणि या फुलाच्या प्रत्येक प्रजातीमध्ये वेगवेगळ्या रंगाची आणि वेगवगेळ्या आकाराची फुले आपल्याला पाहायला मिळतात. या फुलाला इंग्रजी मध्ये हिबिस्कस (hibiscus) असे म्हणतात आणि जास्वंदी हे फुल मॅग्नोलीओप्सिडा या फुल वर्गातील असून माल्वेसी कुटुंबातील आहे.
या प्रकारच्या प्रजाती ह्या उष्ण हवामानामध्ये किंवा उष्ण कटीबंधामध्ये चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणात वाढतात तर काही प्रकारच्या या फुलांच्या प्रजाती थंड हवामानामध्ये वाढतात.
जास्वंद फुलांची माहिती मराठी – Hibiscus Information in Marathi
नाव | जास्वंदी – hibiscus meaning in marathi |
प्रकार | फुल |
इंग्रजी नाव | हिबिस्कस (hibiscus) |
वर्ग | मॅग्नोलीओप्सिडा |
कुटुंब | माल्वेसी |
वर्णन | जास्वंदीचे फुल हे सुगंध रहित फुल आहे जे पाच पाकळ्यासह ४ ते ५ सेंटी मीटर आकाराचे असते आणि हे हिरव्यागार झाडामध्ये मोठ्या प्रमाणात लागते आणि या झाडाची उंची १३ ते १५ फुट इतकी वाढू शकते. |
फुलाचा रंग | लाल, केशरी, गुलाबी आणि पांढरा |
महत्व
भारतामध्ये जास्वंदीच्या लाल फुलाला महत्व आहेच पण भारतातील हिंदू संस्कृतीमध्ये या फुलाला खूप महत्व आहे कारण हे फुल गणपतीच्या पूजेला वापरले जाते त्यामुळे गणेश चतुर्थीमध्ये या फुलाला मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि असे म्हणतात कि गणपतीला जास्वंदीचे लाल फुल खूप आवडते.
- नक्की वाचा: मोगरा फुलाची माहिती
जास्वंदी फुलाचे फायदे
- जास्वंदीच्या फुलामध्ये असे अनेक औषधी गुण असतात जे आपल्याला वेगवेगळ्या कारणासाठी उपयोगी ठरतात. जास्वंदीच्या फुलाचे काही फायदे खाली दिलेले आहेत.
- जास्वंदीच्या फुलामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात जे चयापचय प्रक्रिया मजबूत करण्यासाठी मदत करतात तसेच उर्जा उत्पादनासाठी महत्वाची कामगिरी बजावतात.
- जास्वंदीचे फुल शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी मदत करते.
- या फुलामध्ये असणारे पॉलीफेनॉल त्वचेचा होणारा कर्क रोग दूर करू शकतात त्याचबरोबर त्वचेच्या पेशी परत निर्माण करतात.
- या फुलाचा वापर चेहऱ्याचे सौंदर्या वाढवण्यासाठी देखील वापरली जातात.
- जास्वंदीचे फुल मधुमेह, मासिक पाळीच्या समस्या, मुत्राशय समस्या, नैराश्या, उच्च रक्दाब या सारख्या वेगवेगळ्या आजारांच्या वर एक चांगला उपाय आहे.
- या फुलाचे चूर्ण खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी जास्तीची चरबी कमी होण्यास मदत होते.
- जसे वेगवेगळ्या फुलांमध्ये वेगवेगळे पौष्टिक घटक असतात तसेच जास्वंदी या फुलामध्ये देखील फॉस्फरस, नायट्रोजन, जीवनसत्व बी , जीवनसत्व सी असतात.
- या फुलांचा वापर सुरुकुत्या दूर करण्यासाठी आणि त्वचा कोमल ठेवण्यासाठी केला जातो.
- जास्वंदीच्या फुलाचे तेल करून केसांना लावले तर केसांचा निरोगी पणा टिकतो आणि केस चमकतात आणि केसांची वाढ देखी चांगल्या प्रकारे होते.
- नक्की वाचा: कमळ फुलाची माहिती
जास्वंदी फुलापासून केले जाणारे काही उपाय
- जर आपण जास्वंदीच्या संपूर्ण फुला पासून जर तेल बनवून ते केसांना लावले तर आपले केस खूप निरोगी होतात आणि त्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते.
- तसेच जर टक्कल पडली असेल तर जास्वंदीचे तेल डोक्याला लावल्यास, जास्वंदीच्या तेलाचा चांगला फायदा केस उगवून होऊ शकतो.
कृती
- हे तेल करताना आपल्याला २ कप तेलामध्ये जास्वंदीची ६ ते ७ फुले घालून ते तेल उकळून घ्या त्यानंतर ते तेल गार झाल्यानंतर ते एक बाटलीमध्ये भरून १० ते १५ दिवस गच्च टोपण झाकून ठेवा. १० ते १५ दिवसानंतर हे तेल गाळून घेवून ते बाटलीत ओतून ठेवा आणि ते रोज केसांना लावा.
- जर आपल्याला आपल्या चेहऱ्याचे तेज आणि सौंदर्य राखायचे असल्यास जास्वंदीची २ ते ३ पाकळ्या खाल्ल्या तर ते तुमच्या चेहऱ्यासाठी उपयोगी ठरेल.
- जास्वंदीच्या पाकळ्यांचा रस काढून तो पाण्यामध्ये टाकून ते पाणी जर आपण रोज सेवन केले तर शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
- एक ग्लास पाण्यामध्ये जर २ ते ३ जास्वंदीची पाने जर भिजवून ठेवून ते पाणी आपण जर दुपारी सेवन केले तर आपल्याला होणारा उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो कारण या पानांच्यामध्ये उष्णता कमी करण्याचा गुणधर्म असतो.
जास्वंदीच्या फुलाविषयी काही मनोरंजक आणि अनोखी तथ्ये
- जास्वंदीची फुले लाल, पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी आणि केशरी रंगाची असतात आणि हे फुलाचे रंग त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असतात.
- या फुलाचा व्यास ५ सेंटी मीटर असतो आणि या फुलाला ५ पाकळ्या असतात.
- जास्वंदीचे फुल हे जगभरामध्ये कोठेही आढळते.
- जास्वंदीच्या फुलाला इतर फुलांच्यासारखा वास नसतो हे फुल सुंगधी रहित असते पण या फुलामध्ये अनेक औषधी गुण असतात.
- या फुला पासून जाम तयार केले जाते तसेच या फुलापासून जेली देखील तयार केली जाते.
- जास्वंदीचे लाल फुल गणपतीच्या पूजेसाठी वापरले जाते.
- या फुलामध्ये देखील फॉस्फरस, नायट्रोजन, जीवनसत्व बी , जीवनसत्व सी या सारखे पोषक घटक असतात.
- नक्की वाचा: सूर्य फुलाची माहिती
भाषा | नाव |
वैज्ञानिक नाव | हिबिस्कस रोसा सिनेन्सीस |
सामान्य नाव | जास्वंदी |
मराठी | जास्वंदी |
हिंदी | गुडहल |
गुजराती | जासूद |
इंग्रजी | hibiscus |
संस्कृत | जपा |
या फुला मध्ये असणारे पोषक घटक
पोषक घटक | प्रमाण |
कॅलरी | ३७ |
सोडियम | ३ मिली ग्रॅम |
कार्बोहायड्रेट | ६ ते ७ ग्रॅम |
पोटॅशियम | ९ मिली ग्रॅम |
प्रोटीन | ०.४ ग्रॅम |
साखर | ६ ग्रॅम |
आम्ही दिलेल्या hibiscus information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर जास्वंद फुलांची माहिती मराठी hibiscus in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hibiscus flower information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about hibiscus flower in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये jaswand in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट