Khandala Ghat Information in Marathi खंडाळा घाटाची माहिती मराठी मुंबई पुण्याला जोडणारा महत्त्वाचा घाट म्हणून खंडाळा घाट याची ओळख आहे. खंडाळा घाटाला आपल्या तळ हाताच्या रेषा प्रमाणे ओळखणाऱ्या वीर शुग्रोबानी ब्रिटिशांना हा मार्ग दाखवला आणि खंडाळा घाट अस्तित्वात आला. ब्रिटिशांनीशी शिग्रोबाला या कामाच्या बदल्यात काहीही मोबदला माग असे सांगितले, त्यावेळी वीर शुग्रोबायांनी आपल्या देशाचे स्वातंत्र्य मागितले. त्यामुळे ब्रिटिशांना त्यांचा राग आला व त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. या कामाच्या बदल्यात देशाचे स्वातंत्र्य मागणाऱ्या शिग्रोबाना वीरमरण आले. त्यांची आठवण म्हणुन खंडाळा घाटामध्ये वीर शुभरोबांचे मंदिर बांधले गेले. लोणावळा पासून पाच किलोमीटर अंतरावर खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे.

खंडाळा घाट माहिती – Khandala Ghat Information in Marathi
खंडाळा घाट | माहिती |
श्रेणी | पश्चिम घाट |
लांबी | लोणावळ्यापासून ३ किलोमीटर लांबी आहे |
कोठे आहे | महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात येतो – kandala in pune |
पाहण्यासारखी ठिकाणे | ड्युक्स नोज, राजमाचीचा किल्ला, ढाक बहिरीचा सुळका |
रस्ता | मुंबई पुण्याला जोडणारा महत्त्वाचा घाट |
बोर घाट जिथे संपतो ते ठिकाण म्हणजे खंडाळा. सह्याद्रीच्या पर्वताचा उंच पहाड आणि दऱ्या यांच्यामधे खंडाळा हे गाव आहे. खंडाळा घाट हा डेक्कन पठार आणि कोकणच्या मैदानाच्या दरम्यानच्या रस्त्यावर जोडणारा प्रमुख घाट आहे. खंडाळा मध्ये अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. त्यातील वाघदरी, अमृतांजन पॉईंट, मंकी हिल, नागफणी, भाजा लेणी, खंडाळा सनसेट पॉईंट अशी अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते. मंकी हिल हे पर्यटकांचे खंडाळ्यातील सर्वात आकर्षक ठिकाण आहे. तसेच ड्युक्स नोज, राजमाचीचा किल्ला, ढाक बहिरीचा सुळका अशी अनेक ठिकाणे घाटाच्या आजूबाजूस आहेत.
- नक्की वाचा: ताम्हिणी घाटाची माहिती
राजमाचीचा किल्ला :
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाट उतरून लोणावळ्याच्या दिशेने जाताना अलीकडेच डाव्या बाजूला किल्ले राजमाचीला जाण्यासाठी रस्ता आहे. महामार्गापासून किल्ल्याचे अंतर अंदाजे 16 किलोमीटर आहे. दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रस्ता चांगला आहे. तिथून पुढे 12 ते 13 किलोमीटरचा कच्चा रस्ता थेट किल्ल्या पर्यंत आहे. किल्ल्याच्या पायथ्याला उधेवडी नावाचे गाव आहे. या गडावर अतिशय सुंदर शंकराचे एक मंदीर आहे. तिथून थोडे समोर जातात भैरवनाथाचे मंदिर लागते.
तिथून पुढे दोन रस्ते लागतात. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत त्यातील एका बालेकिल्ल्याची नाव श्रीवर्धन तर दुसऱ्याचे नाव मनरंजन आहे. भैरवनाथ मंदिराच्या डावीकडे जाणारा रस्ता मनोरंजन या बालेकिल्ल्याकडे जातो, तर उजवीकडे जाणारा रस्ता श्रीवर्धन या बालेकिल्ल्याकडे जातो. राजमाचीचा परिसर जणू निसर्गसौंदर्याची खाणच आहे. या किल्ल्याची तटबंदी देखील सुस्थितीत आहे. राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा असे संबोधले जाई. निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन बालेकिल्ले मनरंजन आणि श्रीवर्धन
- नक्की वाचा: आंबोली घाटाची माहिती
ड्युक्स नोज :
ड्युक्स नोज हे एक पॉप्युलर हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन खंडाळापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे, तर लोणावळापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे.ड्युक्स नोज हा कडा 2506 फूट उंच आहे. ड्युक्स नोज याला नागफणी असे म्हणतात.ड्युक्स नोज याठिकाणी जाण्यासाठी दोन पायवाटा आहेत एक म्हणजे खंडाळा रेल्वे स्टेशन पासून थोडे अंतर चालल्यानंतर टाटा पावर प्लांट लागतो. तिथून पुढे डॉक्स नोजला जाण्यासाठी पायवाट आहे.
तर दुसरी म्हणजे कुरवंडी या गावातून जाता येते कुरवंडी हे ड्युक्स नोजच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. कुळवंडी हे गाव लोणावळा रेल्वे स्टेशनपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. खंडाळा घाटातून जाताना ड्युक्स नोजला पोहोचण्यासाठी तीन तास लागतात तर कुरवंडी या गावातून दोन तास लागतात. ड्यूक्स नोज हे दिसायला नागाच्या फनासारखे दिसते म्हणूनच याला नागफनी असे म्हणतात. ड्युक्स नोजच्या माथ्याशी महादेवाचे मंदिर आहे .
खंडाळा घाट फोटो:

अमृतांजन पॉईंट :
अठराशे तीस साली अमृतांजन ब्रीजचे बांधकाम करण्यात आले. हे संपूर्ण बांधकाम दगडामध्ये करण्यात आले आहे. या ब्रिजचे बांधकाम अवघे 296 दिवसांमध्ये इंग्रजांनी बांधून पूर्ण केले.या पुलावरती अमृतांजनची जाहिरात करण्यात आली. त्यामुळे या पुलाला अमृतांजन ब्रिज असे नाव पडले. अनेक पिक्चरची शूटिंग करण्यासाठी सुद्धा या पुलाचा वापर करण्यात आला. वाहतुकीचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे कोरोना लॉकडाऊन च्या काळात हा पूल पाडण्यात आला.
- नक्की वाचा: आंबा घाटाची माहिती
भाजा लेणी :
भाजा लेणी ही खंडाळा पासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. भाजा लेणी ही भाजा या गावापासून चारशे फूट उंचावर आहे. भाजा लेणीला ऐतिहासिक महत्त्व आहे. भाजा लेणी 22 लहान लहान गुहापासून बनलेली एक मोठी गुहा आहे.या गुहेचा संबंध बुध्दा बरोबर जोडलेला आहे.या गुहेचे प्रवेशद्वार हे तेथील सर्वात आकर्षक आहे. तिथे असलेल्या कमानीला 172 छिद्रे काढलेली आहेत. येथील चैत्य सुमारे 17 मीटर लांब, आठ मीटर रुंद आहे. त्यात 27 अष्टकोणी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबावर कमळ,चक्र कोरलेली आहेत स्तूपा पाठीमागील खांबावर बुद्धांची पुसट चित्रे पहायला मिळतात.
या प्रवेशद्वार मधून आत गेल्यानंतर बौद्ध धर्माशी निगडित असलेले स्तूप पाहायला मिळतात व या स्तूपावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे. तसेच या लेणी वर खूप प्रमाणात विश्रामगृह आहेत. प्रत्येक विश्रामगृहाची रचना ही सारखीच केलेली आहे. या गुहेच्या सर्वात शेवटच्या बाजूला मेडीटेशन गृह आहे.या लेणीला 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या लेणीमध्ये भिख्खूंना राहण्यासाठी खोल्या आहेत. तसेच येतील सूर्य लेणी तेथील प्रसिद्ध लेणी आहे.
- नक्की वाचा: भोर घाटाची माहिती
कार्ला लेणी :
कार्ला लेणी या लेणी वर एकवीरा आईचे मंदिर आहे. या लेणीला 2000 हुन अधिक वर्षे उलटून गेली. कार्ला लेणी मधील चैत्यगृह हे खूप आकर्षक आहे. तेथील चैत्य हे 45 मीटर लांब, 14 मीटर उंच आहे.ही लेणी दगडांमध्ये कोरीव काम करून बनवलेली आहे. या चैत्याच्या दोन्ही बाजूला पंधरा-पंधरा खांब आहे.त्याचे छप्पर हे पूर्ण लाकडापासून बनवलेले आहे.
भुशी लेक :
भुशी लेक हे पर्यटकांसाठी खंडाळातील सर्वात आकर्षक ठिकाण आहे. येथे पर्यटकांची खूप गर्दी असते.या ठिकाणी एकदा गेले तर असे वाटते की परत परत या ठिकाणाला भेट द्यावी. उंच पहाड, त्या पहाडावरील हिरवळ, फुले, उंच झाडे आणि ते शांत वाहणारे पाणी पाहून मन प्रसन्न होऊन जातं. या डॅमला लागून असलेल्या पायऱ्या आणि त्यावरून वाहणारे पाणी पाहून मन आनंदित होऊन जातं.
वाघदरी:
भुशी लेक पासून वागदरी हे सहा किलोमीटर अंतरावर आहे हे खूप सुंदर ठिकाण आहे येथे पर्यटकांची खूप गर्दी असते हे ठिकाण पाहिल्यानंतर असे वाटते जसे वाघ दरीत उडी मारतो आहे असा भास होतो.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, खंडाळा घाट khandala ghat information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about khandala ghat in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही खंडाळा घाटा विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या khandala ghat माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट