ललिता बाबर मराठी माहिती Lalita Babar Information in Marathi

Lalita Babar Information in Marathi ललिता बाबर मराठी माहिती “मानदेशी एक्सप्रेस” अशी विशेष आणि प्रसिद्ध ओळख असणारी भारताची धावपटू ललिता बाबर हिने विश्वविक्रम करून आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ठरली आहे. भारताच्या महाराष्ट्र प्रांतांमधील एका छोट्याशा दुष्काळग्रस्त व अपरिचित खेड्यांमध्ये जन्माला आलेली ललिता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेली आहे. ललिता ही प्रामुख्याने तीन हजार मीटर्स स्टिपलचेस शर्यतींमध्ये सहभागी होते. म्हणजेच ललिता लाँग डिस्टन्स रणर आहे. याच प्रकारामध्ये ललिता भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आहे.

आधी शालेय मग तालुका, जिल्हा, राष्ट्रीय स्तरावर आणि शेवटी आंतरराष्ट्रीय स्तरावर ललिता बाबर यांनी आपल्या क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जागतिक पातळीवर ललिता बाबर या एक प्रसिद्ध धावपटू म्हणून ओळखल्या जातात. आजच्या लेखामध्ये आपण ललिता यांचा जीवन परिचय जाणून घेणार आहोत.

lalita babar information in marathi
lalita babar information in marathi

ललिता बाबर मराठी माहिती – Lalita Babar Information in Marathi

पूर्ण नाव ललिता बाबर
जन्म२ जून १९८९
जन्म गावसातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू
राष्ट्रीय पुरस्कारअर्जुन पुरस्कार

जन्म

ललिता चा जन्म २ जून १९८९ साली सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला. सातारा जिल्ह्यामध्ये माण नावाचे एक दुष्काळग्रस्त तालुका आहे. या तालुक्यातील मोही नावाच्या गावांमध्ये ललिता व तिचं संपूर्ण कुटुंबच स्थायिक आहे. ललिता चे वडील शिवाजी बाबर एक ड्रायव्हर म्हणून काम करतात. याशिवाय, एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर शेती‌ उद्योग देखील करतात. 

आई निर्मला बाबर या साध्या गृहिणी आहेत. ललिताला दोन बहिणी देखील आहेत त्यातील एक सध्या पोलिस दलामध्ये सेवा देत आहे. ललिताच बालपण गरीबीत गेलं. मुलगी पुढे जाऊन इतकं नाव मोठ करेल असं तिच्या आई-वडिलांना कधी वाटलं देखील नव्हतं.

शिक्षण व वैयक्तिक आयुष्य

ललिता एका गरीब घरातील साधी मुलगी आहे. तिने तिचं प्राथमिक शिक्षण मोही तालुक्यातील एका शाळेमधून पूर्ण केलं. या शाळे मधूनच तिला तिचे पहिले धावपटू कोच लाभले. त्यांचे नाव ज्ञानेश काळे असं आहे. १६ मे २०१७ रोजी ललिता बाबरने सनदी अधिकारी डॉक्टर संदीप भोसले यांच्याशी विवाह केला.

क्रीडा करियर

ललिता लहानाची मोठी एका दुष्काळग्रस्त खेड्यांमध्ये झाली. जिथे एका वेळेच्या जेवणाचे देखील हाल व्हायचे ललिताच्या घरची परिस्थिती हालाखीची होती परंतु ललिता समोर एकच स्वप्न होतं ते म्हणजे धावपटू बनण्याचं. ललिता एका अशा गावांमधून आली आहे जिथे मुली सतरा अठरा वर्षाच्या झाला की त्यांचं लग्न लावून दिलं जायचं.

परंतु ललिता सुदैवाने खूपच नशीबवान ठरली की तिच्या आई वडिलांनी तिच्या स्वप्नाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ललिताचा प्रवास अतिशय संघर्षमय ठरला कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ललिताला कॉम्प्रमाईज करावा लागत होतं. परंतु ललिता अतिशय जिद्दी आहे तिने एखादी गोष्ट करण्याचं ठरवलं कि ती करूनच दाखवते.

एका छोट्याशा खेड्यांमध्ये आणि आदिवासी पाड्यांमध्ये ललिता सारखं स्वप्न बाळगणाऱ्या अनेक मुली आहेत या सगळ्या मुलींसाठी, स्त्रियांसाठी ललिता एक खरं आणि उत्तम आदर्श ठरली आहे. ललिताचं धावपटू बनण्याचा हा प्रवास तिच्या शाळे पासून सुरू झाला. शाळेमध्ये ललिता खो-खो संघामध्ये सहभागी होती. तिच्या घरांमध्ये आणि शाळेमध्ये जवळपास साडेतीन किलोमीटरच‌ अंतर होत.

त्यामुळे ललिताला खोखोच्या सरावासाठी सकाळी साडेसात वाजता जावं लागायचं. ललिता घरापासून शाळेपर्यंतच अंतर धावतच पार करायची आणि ह्यातूनच तिच्या धावण्याचा सराव व्हायचा असं म्हणणं तिचे शालेय‌ स्तरावरील प्रशिक्षक ज्ञानेश काळे यांच आहे. ललिता शालेय स्तरावर आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांमध्ये नेहमीच जिंकत आली आहे.

आणि इथूनच पुढे ललिताने ऍथलेटिक्‍समध्ये पंधराशे मीटर आणि तीन हजार मीटर धावणे सुरुवात केली. २००४ साली छत्तीसगडमधील कोरबा येथे घडलेल्या राष्ट्रीय ग्रामीण स्पर्धा ललिताची पहिली स्पर्धा होती. ज्ञानेश काळे हे ललिताचे शालेय प्रशिक्षक होते. त्यांच्यामते ललिता अनवाणी स्पर्धा खेळायची कारण घरच्या परिस्थितीमुळे तिच्याकडे शूज किंवा किट नव्हते.

बारा वर्षानंतर महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देणारी ललिता बाबर स्पर्धा अनवाणी पायाने खेळली होती. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ललिताची असलेली जिद्द ही शब्दात व्यक्त करण्यासारखी नाही आहे. पाच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकून सुद्धा तिच्याकडे शूज नव्हते. २०१४ साली मुंबई मॅरेथॉनमध्ये ललिताने सहभाग घेतला होता.

आणि ती हॅट्रिक विनर ठरली. सलग तीन वेळा ललिता बाबर यांनी मुंबई मॅरेथॉन जिंकली आहे. २०१४ रोजी एशिया क्रीडा स्पर्धेमध्ये ललिताने कांस्यपदक जिंकलं. ही स्पर्धा साउथ कोरियातील ईंचाॅन येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तीने ९:३५.३७ अशी वेळ नोंदवून सुधा सिंगने केलेला राष्ट्रीय विक्रम मोडला आणि आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना जिंकला.

२०१५ मधील एशियन चॅम्पियनशिपमध्ये ललिता बाबरने सुवर्णपदक पटकावलं यावेळी ललिताने ९:३४.१३ अशी वेळ नोंदवली होती ही स्पर्धा जिंकून तिने स्वतःचा विक्रम मोडला होता आणि या स्पर्धेमुळे ललिताची २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली. आशियाई स्तरावरील ललिता सर्वोत्कृष्ट धावपटू ठरली.

यानंतर लगेच ललिताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला. २०१५ रोजी बिंजींग येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ९:२७.८६ अशी वेळ नोंदवली. तिला पोडियम फिनिशइन मिळू शकले नाही तरी स्टिपलचेस स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहचणारी ललिता बाबर ही पहिली भारतीय महिला ठरली.

सुरुवातीला ललिता स्वतःच्या टॅलेंट बद्दल इतकी जागरूक नव्हती परंतु एकावर एक स्पर्धा खेळल्यानंतर तिच्या मधील आत्मविश्वास जागा झाला. २०१६ मध्ये दिल्ली येथे आयोजित‌ केलेल्या फेडरेशन कॅप नॅशनल एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ललिताने ९:२७.९ अशी राष्ट्रीय विक्रम केला. रिओ ऑलिम्पिक स्पर्धा तर ललिताच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.

बत्तीस वर्षांमध्ये ट्रेक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ललिता ही पहिली भारतीय महिला आहे. ९:१९.७६ ही वेळ नोंदवून ललिताने आणखी एक राष्ट्रीय विक्रम केला. ललिताच हे यश तिच्या कुटुंबा सहित तिच्या संपूर्ण गावाने एका उत्सवा सारखा साजरं केलं. २०१७ साली ललिता विवाह बंधनांमध्ये अडकली त्यानंतर तिने थोडा वेळ ब्रेक घेतला.

परंतु, “माझी कारकीर्द यापुढेही चालूच राहील” हे ललिताचे शब्द होते. आज ललिता भारताची प्रसिद्ध धावपटू आहे शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तिने नाव कमावले आहे परंतु अजूनही ललिता तितकेच परिश्रम घेत आहे. असं म्हणतात ललिताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पी.टी.उषा आणि कविता राऊत यांचा वारसा पुढे नेला आहे.

ललिताने तिच्या कार्यातून दिलेला एकच संदेश म्हणजे आपली परिस्थिती कितीही हालाखीची असली तरीही आपण न जुमानता नेहमीच पुढे राहत जायला पाहिजे. कारण कधी ना कधी आपल्याला कष्टाचा फळ नक्कीच मिळतं. अथक परिश्रम हाच खरा यशाचा मार्ग असतो. यश मिळवणं इतका सोपं नसलं तरी ते अशक्य आहे असे देखील नसतं.

आज आपण कितीही आधुनिक समाजामध्ये राहात असलो तरी बरीच अशी ग्रामीण भागात राहणारी लोक आहेत ज्यांचा मुलींच्या शिक्षणावर किंवा मुलींच्या स्वप्नांवर विरोध असतो. परंतु नशिबाने ललिता बाबर यांच्या आई-वडिलांनी ललिताच्या स्वप्नांना पाठिंबा दिला ज्यामुळे ललिता आज यशाच्या उंच शिखरावर पोहोचले आहेत.

पुरस्कार

२०१५ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने क्रीडा पुरस्कार प्रदान करताना ललिता बाबर यांना “स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर” असं म्हंटलं आणि त्यांचा सन्मान केला. ललिता बाबर यांना २०१६ मध्ये त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदाना मुळे भारतातील सर्वोच्च मानला जाणारा “अर्जुन पुरस्कार” देखील प्रदान करण्यात आला.

ललिताने तिच्या कामगिरी मधून क्रीडाक्षेत्रातील बऱ्याच स्त्रियांना प्रोत्साहित केलं आहे बऱ्याच स्त्रियांसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे. ललिताच्या कुटुंबियांना ललिताचे या फिल्ड बद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांच्यासाठी फक्त ललिता बाहेरगावी धावण्यासाठी गेली आहे एवढच माहीत होतं. ललिताने तिच्या स्वप्ननां सोबत आपल्या आईवडिलांच देखील नाव मोठं केलं.

ललिता बाबर यांची रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. खेळाडू कोट्यातून सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. ललिता चे वडील वडील एकदा म्हणाले होते, आम्ही दुष्काळग्रस्त भागात राहणारी माणस आहोत. आम्हाला नेहमीच पावसा पाण्याची चिंता असते. परंतु, ललिताच्या या स्वप्नासाठी आम्ही कधीच विरोध केला नाही आणि आज ती भरपूर पुढे गेली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू माणगावला तहसीलदार म्हणून लाभला गेल्यामुळे माणगाव आमची प्रतिष्ठा वाढली आहे.

आम्ही दिलेल्या lalita babar information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ललिता बाबर मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lalita babar information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of lalita babar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lalita babar full information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!