खो खो खेळाची माहिती Kho Kho Information in Marathi

Kho Kho Information in Marathi खो खो हा खेळ सर्वांच्या परिचयाचा आहे कारण हा खेळ आपण लहानपणी सर्वांनी शाळेमध्ये खेळला आहे. हा एक पूर्वीच्या काळापासून खेळला जाणारा खेळ आहे त्यामुळे या खेळला पारंपारिक खेळ म्हणून ओळखले जाते आणि हा खेळ आजही खूप लोकप्रिय आहे आणि खूप आवडीने खेळला जातो. खो खो हा एक मैदानी खेळ असून या खेळाच्या मैदानाच्या दोन्ही टोकांना दोन खांब रोवलेले असतात या व्यतिरिक्त हा खेळ खेळण्यासाठी कोणतेही समान लागत नाही. खो खो हा एक मनोरंजक खेळ आहे जो २ संघामध्ये खेळला जातो एका संघामध्ये १२ खेळाडू असतात त्यामधील ९ खेळाडू मैदानावर खेळतात आणि राहिलेले ३ राखीव असतात जर खेळताना मैदानावरी कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तर हे राखीव खेळाडू त्यांच्या जागी खेळतात.

खो खो हा खेळ भारतीय असून या खेळाची सुरुवात महाराष्ट्र मध्ये झाली. हा खेळ तसा खेळण्यासाठी खूप सोपा आहे पण हा खेळ गतीने खेळावा लागतो त्यामुळे खेळाडूकडे चपळता आणि चांगली गती असणे आवश्यक असते.

kho kho information in marathi
kho kho information in marathi

खो खो खेळाची माहिती – Kho Kho Information in Marathi

खेळाचे नावखो खो
खेळाचा प्रकारमैदानी खेळ
खेळामधील खेळाडूंची संख्याएकूण खेळाडू १२ त्यामधील ९ मैदानात खेळतात आणि ३ राखीव असतात.
खेळासाठी दिलेला वेळ४० मिनिटे
खेळाच्या मैदानाचा आकार२७ बाय १६ मीटर

खो-खो चा इतिहास – kho kho game history in marathi

खो खो हा खेळ खूप प्राचीन काळापासून खेळला जाणारा खेळ आहे आणि हा खेळ पकडण्याच्या खेळावरून सुरु झाला असे म्हंटले जाते. खो खो हा खेळ भारतीय असून या खेळाची सुरुवात महाराष्ट्र राज्यांमध्ये झाली. १९ व्या शतकामध्ये हा खेळ महाराष्ट्र मध्ये शाळांमध्ये थोड्या प्रमाणात खेळला जावू लागला त्यानंतर पुणे जिमखाना येथे खो खो चे नियम बनवण्यासाठी एक समितीची स्थापना १९१४ मध्ये करण्यात आणि बडोदा जिमखान्याने खो खो चे नियम १९२४ मध्ये प्रकाशित केले. अशा प्रकारे खो खो खेळाची सुरुवात झाली. १९५९-१९६० च्या मध्यामध्ये भारत सरकारने खो खो या खेळाची राष्ट्रीय स्पर्धा आंध्रप्रदेश मधील विजयवाडा येथे पार पडली.

खो खो खेळाविषयी माहिती – kho kho game information in marathi

खो खो खेळामधील खेळाडू ?

खो खो हा खेळ सांघिक खेळ आहे आणि हा २ संखामध्ये खेळला जातो आणि हे २ संघ एकमेका विरुध्द खेळ खेळतात. प्रत्येक संघामध्ये १२ खेळाडू असतात त्यामधील ९ खेळाडू मैदानामध्ये खेळत असतात आणि ३ खेळाडू राखीव असतात आणि विरुध्द संघातील ३ खेळाडू पळत असतात.

खो खो खेळासाठी दिला जाणारा वेळ?

खो हा खेळ ४० मिनिटाचा असतो आणि तो २०-२० मिनिटाच्या २ भागामध्ये विभागलेला असतो त्यान २ भागांच्या मधी ५ मिनिटाचा विश्रांतीचा कालावधी असतो आणि दोन आणि दोन उपभाग असतात ज्यामध्ये २ मिनिटाचा विश्रांतीचा कालावधी असतो.

खो खो मैदान माप – kho kho ground information in marathi

खो खो खेळाचे मैदान हे आयताकृती आकाराचे असते आणि या मैदानाचा आकार २७ बाय १६ मीटर असते त्याचबरोबर या मैदानाच्या बरोबर मध्यभागी मैदानाच्या दोन्ही टोकाला दोन लाकडाचे खांब असतात आणि या दोन्ही खांबांना सरळ एक लेन असते आणि त्या लेनचे परिमाण २४ मीटर बाय ३० सेंटी मीटर असते. मध्यवर्ती लेन ओलांडून ८ क्रॉस असतात ज्याचे परिमाण १६ मीटर बाय ३५ सेंटी मीटर आहे. मध्यभागी लहान ८ चौरस असतात त्यांचा आकार १६ मीटर बाय २.३ मीटरचे असतात.

खो ळो हा खेळ कसा खेळला जातो – how to play the kho kho game 

खो खो या खेळाची संकल्पना पाठलाग आणि बचाव करणे अशी असते. या खेळामध्ये मुख्यता २ भाग असतात आणि त्या २ भागामध्ये आणि २ उपभाग असतात. पहिल्या उपभागामध्ये पहिला संघ पाठलाग करतो आणि दुसरा संघ बचाव करतो तर दुसऱ्या उपभागामध्ये पहिला संघ पळत असतो किवा बचाव करतो आणि दिसरा संघ पाठलाग करतो.

मैदानामध्ये पाठलाग करणाऱ्या संघामध्ये ९ खेळाडू असतात आणि बचाव करणाऱ्या संघामध्ये ३ खेळाडू मैदानामध्ये असतात. ८ चौरसामध्ये एक खेळाडू एका विरुध्द दिशेला तर दुसरा खेळाडू त्याच्या विरुध्द दिशेला आणि तिसरा खेळाडू दुसऱ्या खेळाडूच्या विरुध्द दिशेला असे ८ खेळाडू एका क्रमाने बसतात आणि नववा खेळाडू बचाव खेळाडूंचा पाठलाग करण्यासाठी खांबाजवळ उभा राहतो.

खो खो खेळ सुरु झाल्यावर पाठलाग करणारा खेळाडू बचाव करणाऱ्या खेळाडूंचा पाठलाग करू लागतो आणि पाठलाग करणारा संघ तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणारा खेळाडू बसलेल्या खेळाडूला खो खालून तो त्याच्या जागी बसतो आणि तो दुसरा खेळाडू बचाव संघातील खेळाडूंचा पाठलाग करतो अश्या प्रकारे हा खेळ खेळला जातो.

खो खो खेळाचे नियम – rules of kho kho game 

  • खो खो या खेळामध्ये २ संघ असतात आणि प्रत्येक संघामध्ये १२ खेळाडू असतात त्यामधील फक्त ९ खेळाडूच मैदानामध्ये खेळतात आणि बचाव करणाऱ्या संघामधील ३ खेळाडूच पळू शकतात ३ पेक्षा अधिक खेळाडू पळू शकता नाहीत.
  • या खेळामध्ये संवरक्षक ( बचाव ) आणि आक्रमक ( पाठलाग ) अशे २ गट असतात आणि ते ९ मिनिटाच्या २ भागामध्ये खेळले जातात.
  • बचाव करणारा खेळाडू दोन खांबांमधील रेषा ओलांडू शकतो पण पाठलाग करणारा खेळाडू दोन खांबांमधील रेषा ओलांडू शकत नाही.
  • बचाव गटातील ३ खेळाडू बाद होताच पुढील ३ खेळाडू मैदानावर येणे आवश्यक असते.
  • जर पाठलाग करणाऱ्या खेळाडूने एक दिशा पकडल्यास तो आपली दिशा बदलू शकत नाही.
  • पाठलाग करणारा खेळाडू ज्या दिशेला आहे त्या दिशेमध्ये पाठ करून बसलेल्या खेळाडूला पाठलाग करणारा खेळाडू खो देवू शकतो.
  • या खेळामध्ये दोन पंच, एक गुण लेखक आणि एक सरपंच असतो जो निकाल देतो. या खेळाचा निकाल हा सर्व गुंनांची बेरीज करून दिला जातो.
  • खेळाडूच्या पाठीवर थाप मारून खो म्हणणे आवश्यक असते आणि खेळाडूच्या पाठीवर थाप मारून खो म्हंटल्यानंतर बसलेला खेळाडू उठला पाहिजे.
  • जर पाठलाग करणाऱ्या खेळाडूला दिशा बदलायची असेल तर बसलेल्या खेळाडूला खो देवून दिशा बदलू शकतात.

आम्ही दिलेल्या kho kho information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर खो खो या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kho kho chi mahiti  या article मध्ये update करू, मित्रांनो हि kho kho game information in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kho kho khelachi mahiti Share करायला विसरू kho kho game history in marathi नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

8 thoughts on “खो खो खेळाची माहिती Kho Kho Information in Marathi”

  1. खोखो खेळ मधील खुंटाचे माप आपण दिलेले नाही त्याची उंची व जाडी किती तसेच जमिनी पासून उंची किती

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!