लिअँडर पेस माहिती मराठी Leander Paes Information in Marathi

leander paes information in marathi लिअँडर पेस माहिती मराठी, भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ हे राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जातात आणि अनेक वेगवेगळ्या खेळामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करून अनेक खेळाडूंनी आपले आणि देशाचे नाव मोठे केले आहे आणि लिएंडर पेस हे देखील एक भारतीय व्यावसायिक टेनिस खेळाडू आहेत आणि त्यांनी या खेळामध्ये चांगले नाव मिळवले आहे आणि आज आपण या लेखामध्ये लिएंडर पेस यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.

लिएंडर पेस यांचा जन्म हा १७ जून १९७३ मध्ये भारतातील कोलकत्ता या ठिकाणी झाला आणि त्यांचे वडील व्हेस पेस हे भारतीय फिल्ड हॉकी संघाचे सदस्य होते आणि त्यांची आई जेनिपर पेस ह्या १९८० मध्ये आशियाई चॅम्पियनशिप बास्केटबॉल संघाच्या कर्णधार होत्या.

लिएंडर पेस यांनी आपले शालेय शिक्षण हे मार्टीनियर स्कूलमध्ये शिक्षन घेतले आणि मग नंतर त्यांनी कोलकत्ता या ठिकाणी असणाऱ्या प्रसिध्द सेंट झेवियर्स या कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे कौटुंबिक पार्श्वभूमी खेळाची असल्यामुळे त्यांना देखील खेळाची आवड होती आणि म्हणून त्यांनी १९८५ मध्ये म्हणजेच वयाच्या १२ व्या वर्षी मद्रास या ठिकाणी असणाऱ्या ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकादमीमध्ये प्रवेश घेतला.

आणि डेव्ह ओ मीरा यांच्या खाली टेनिस या खेळाचे प्रशिक्षण घेतले. १९९१ मध्ये ते व्यावसायिक टेनिस खेळाडून म्हणून मैदानामध्ये उतरले आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी खेळामध्ये आश्चर्यकारक भूमिका बजावली आणि त्यांनी आपण एक आश्वासक खेळाडू असल्याचे देखील सिध्द केले.

leander paes information in marathi
leander paes information in marathi

लिअँडर पेस माहिती मराठी – Leander Paes Information in Marathi

नावलिएंडर पेस
जन्म१७ जून १९७३
जन्मठिकाणलिएंडर पेस यांचा जन्म भारतातील कोलकत्ता या ठिकाणी झाला
ओळखव्यावसायिक टेनिस खेळाडू
पालकव्हेस पेस आणि जेनिपर पेस
प्रशिक्षकडेव्ह ओ मीरा
खेळामधील पदार्पणत्यांनी १९९१ मध्ये व्यावसायिक टेनिस खेळामध्ये पदार्पण केले.

लिएंडर पेस यांनी टेनिस प्रशिक्षण केंव्हा आणि कोणाकडून घेतले ?

लिएंडर पेस यांच्या घरातील किंवा कौटुंबिक वातावरण हे खेळाचे होते म्हणजेच त्यांचे वडील हे भारतीय फिल्ड हॉकी संघाचे सदस्य होते आणि त्यांची आई जेनिपर पेस ह्या १९८० मध्ये आशियाई चॅम्पियनशिप बास्केटबॉल संघाच्या कर्णधार होत्य आणि खेळाची चांगली पार्श्वभूमी असल्यमुळे त्यांना देखील लहान वयामधेचे खेळाची आवड निर्माण झाली होती.

आणि म्हणून त्यांनी १९८५ मध्ये म्हणजेच वयाच्या १२ व्या वर्षी टेनिस खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी मद्रास या ठिकाणी असणाऱ्या ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्यांच्या प्रशिक्षक डेव्ह ओ मीरा ह्या होत्या.

लिएंडर पेस यांची खेळामधील कामगिरी – career

  • लिएंडर पेस यांनी १९९६ च्या खेळामध्ये अटलांटा ऑलम्पिकमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यावेळी त्यांनी वैयक्तिकरित्या कांस्यपदक जिंकले आणि ते वैयक्तिक पदक जिंकणारे भारताचे केंदी जाधव यांच्या खालोखाल बनला.
  • लिएंडर पेस यांनी १९९६ – १९९७ या काळामध्ये महेश भूपती यांच्या सोबत भागीदारी बनवली आणि त्यांनी त्यांच्या विजयाच्या किंवा खिताबाच्या संख्या वाढवल्या आणि तसेच लिएंडर पेस यांनी महेश भूपती यांच्या दुहेरी संघाने अनेक टेनिस स्पर्धकांच्यामध्ये वर्चस्व कायम राखले.
  • तसेच या जोडीने १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, युएस ओपन आणि फ्रेंच ओपन अश्या तीन ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला तसेच १९९९ मध्ये हि जोडी ग्रँडस्लॅमच्या स्पर्धेमध्ये दुहेरी स्पर्धा जिंकणारी भारतातील पहिली जोडी होती.
  • तसेच त्यांनी २००१ मध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धेतील फ्रेंच ओपन जिंकली.
  • पेस यांनी २००३ मध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी केली आणि त्यांनी मार्टिना नवरातीलोवा सोबत विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीच्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित केले आणि ओपन मिश्र दुहेरीचे मुकुट जिंकले आणि त्यांनी २००६ मध्ये युएस ओपन स्पर्धा देखील जिंकली.
  • २००५ या साली त्यांना दुहेरी क्रमवारीमध्ये अव्वल २० खेळाडूंच्यामधील स्थान मिळाले.
  • त्याचबरोबर २००८ मध्ये पेस आणि भूपती या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र बीजिंग ऑलम्पिकमध्ये काम केले आणि २००८ मध्ये त्यांनी युएस मिश्र दुहेरी विजेतेपद जिंकले.

लिएंडर पेस विषयी विशेष तथ्ये – facts

  • लिएंडर पेस हे सध्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरामध्ये वास्तव्य करतात.
  • त्यांनी त्यांच्या संपूर्ण खेळाच्या इतिहासामध्ये ग्रँडस्लॅम या स्पर्धेमध्ये अनेक जेतेपद मिळवली आहेत म्हणजेच त्यांनी ८ दुहेरी तर १० मिश्र दुहेरी जेतेपद मिळवून टेनिस या खेळामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे.
  • २००५ मध्ये त्यांनी रिया पिल्लई हिच्यासोबत लग्न केले होते आणि त्यांच्या मुलीचे नाव अयाना असे आहे. परंतु काही कौटुंबिक समस्यांच्यामुळे २०१४ मध्ये त्यांचा घटस्पोट झाला आहे.
  • लिएंडर पेस यांना जगातील महान दुहेरी आणि मिश्र दुहेरी खेळाडूंच्यापैकी एक मानले जाते.
  • लिएंडर पेस हे ख्रिश्चन धर्माचे आहेत.
  • त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये टेनिस खेळाडू म्हणून तर मुख्य भूमिका बाजवली आहेच परंतु त्यांनी राजकारणामध्ये आणि अभिनेता म्हणून देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
  • स्वयंपाक करणे आणि स्कुबा डायव्हिंग हे त्यांचे छंद आहेत.

लिएंडर पेस यांना मिळालेले पुरस्कार – leander paes awards

  • लिएंडर पेस यांना त्यांच्या टेनिस खेळामधील चांगल्या कामगिरीसाठी १९९६ मध्ये प्रतिष्ठीत असा राजीव गांधी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • १९९६ च्या खेळामध्ये अटलांटा ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि त्यांनी खेळामध्ये काही सुवर्ण पदके देखील जिंकली.
  • लिएंडर पेस यांना १९९० मध्ये त्यांच्या टेनिसमधील चांगल्या यशासाठी अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
  • २००१ मध्ये लिएंडर पेस यांना भारत सरकार कडून टेनिस या खेळामधील चांगल्या कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणारा पद्मभूषण हा पुरस्कार लिएंडर पेस यांना देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आणि हा पुरस्कार २०१४ मध्जे भारत सरकारने दिला.
  • त्याची पत्नी रिया पिल्लई हिने २०१४ मध्ये त्याच्याविरुध्द हिंसाचाराचा खटला दाखल केला होता.
  • २०१२ मध्ये लिएंडर पेस यांना हरियाणा राज्याचे क्रीडा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

आम्ही दिलेल्या leander paes information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लिअँडर पेस माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या leander paes wikipedia in marathi या leander paes awards article मध्ये update करू, मित्रांनो हि information about leander paes in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!