महादेव गोविंद रानडे माहिती Mahadev Govind Ranade Information in Marathi

mahadev ranade information in marathi महादेव गोविंद रानडे माहिती, आपल्या देशामध्ये अनेक असे समाज सेवक आणि सुधारक होवून गेले आहेत ज्यांनी देशामध्ये होणाऱ्या अन्याया विरुध्द आवाज उठवला तसेच त्यांनी अनेक वाईट रूढी आणि परंपरा मोडण्यासाठी अनेक कष्ट घेतले तसेच अनेक लोकांची मदत केली आणि अश्याच एका समाज सुधारकाविषयी म्हणजेच महादेव रानडे यांच्याविषयी आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. महादेव रानडे यांचे पूर्ण नाव महादेव गोविंद रानडे असे आहे आणि हे एक समाजसुधारक होते.

आणि त्यांनी समाजातील अंधश्रध्देविषयी महत्वाची भूमिका बजावली आणि या विरुध्द लाधेले होते. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म हा १८ जानेवारी १८४२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील नाशिकमधील निफाड या ठिकाणी या मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये झाला.

त्यांनी त्यांचे शिक्षण हे कोल्हापूरच्या मराठी शाळेमध्ये केले आणि मग नंतर त्यांनी १४ व्या वर्षी मुंबई मधील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले मग नंतर त्यांनी १८६२ मध्ये त्यांनी बीएची (BA) पदवी पूर्ण केली आणि नंतर चार वर्षांनी त्यांनी एलएलबी (LLB) देखील पूर्ण केली.

मग त्यांनी १८७१ मध्ये बॉम्बे स्मॉल कॉज कोर्टामध्ये प्रेसिडन्सी मॅजीस्ट्रेट म्हणून आपली कारकीर्द सुरु केली.

mahadev govind ranade information in marathi
mahadev govind ranade information in marathi

महादेव गोविंद रानडे माहिती – Mahadev Govind Ranade Information in Marathi

नावमहादेव गोविंद रानडे
ओळखसमाजसुधारक
जन्म१८ जानेवारी १८४२
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील नाशिकमधील निफाड गावामध्ये
शिक्षणबीएची (BA) आणि एलएलबी (LLB)

समाजसुधारक कोण असतात ?

समाज सेवक जे आजारपण, घटस्फोट किंवा बेरोजगारी यासारख्या बदलांना आणि त्यांच्या आयुष्यातील आव्हानांशी जुळवून घेण्यास लोकांना मदत करतात तसेच ते लोकांच्या समस्या आणि गरजा लक्षात घेवून त्यावर योग्य ते पाऊल उचलतात.

दुष्काळ ग्रस्त काळामध्ये आणि पूरग्रस्त काळामध्ये लोकांना मदत करणे त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्द करून देणे किंवा अन्न पुरवणे यासारखे काम समाज सेवक करतात.

महादेव रानडे यांची कारकीर्द

 • त्यांनी १८७१ मध्ये बॉम्बे स्मॉल कॉज कोर्टामध्ये प्रेसिडन्सी मॅजीस्ट्रेट म्हणून आपली कारकीर्द सुरु केली.
 • महादेव रानडे हे प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य होते आणि प्रचलित सामाजिक दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी समर्थन केले.
 • त्यांनी त्यांची पत्नी रमाबाई हिला शिक्षण दिले आणि नंतर त्या डॉक्टर बनल्या आणि सेवा सदन या महिला हक्क संघटनेच्या संस्थापकांच्यापैकी एक होत्या ज्यांनी महिलांच्या हक्काच्या चळवळींना मदत केली.
 • रानडे यांनी १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेला पाठींबा दिला होता आणि तसेच राजकीय आणि सामाजिक संमेलनाचे आयोजन करण्याचे श्रेय देखील त्यांनाच जाते.
 • सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या त्यांच्या विचारसरणीवर आधारित इंदूप्रकाश या बॉम्बे अँग्लो – मराठी दैनिकाचेहि संपादन केले.
 • त्यांनी बालविवाह, विधवा पुनर्विवाह, विवाह आणि इतर सामाजिक कार्याचा उच्च खर्च आणि परदेशात जाण्यावरील जातीय निर्बंध विरुध्द सामाजिक सुधारणा प्रयत्नांना निर्देशित केले.
 • त्याचबरोबर त्यांनी भारतीय अर्थशास्त्र आणि मराठा इतिहास या विषयी पुस्तके लिहिली. त्यांनी आर्थिक प्रगतीमध्ये अवघड उद्योगांचे महत्व ओळखून भारतीय राष्ट्राच्या निर्मितीमध्ये पाश्चात्य शिक्षणाला महत्वाचा घटक म्हणून पहिले.
 • १८६१ मध्ये ते विधवा विवाह संघटनेच्या संस्थापकांपैकी एक होते आणि त्यांनी पुना सार्वजनिक सभा या सामाजिक राजकीय संघटनेची स्थापना केली आणि नंतर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक होते.
 • महादेव गोविंद रानडे हे एक सामाजिक कार्यकर्ते होते ज्यांच्या कार्यावर पाश्चात्य संस्कृती आणि वसाहतवादी राज्याचा खुप प्रभाव होता. त्यांचे कार्य धार्मिक सुधारणांपासून ते सार्वजनिक शिक्षणापर्यंत होते.
 • त्यांनी भारतीय सामाज्याचे समानीकरण करण्याचे प्रयत्न केले आणि त्यांनी परद परदा विरोधी मोहीम चालवली.

महादेव रानडे यांनी लिहिलेली पुस्तके – books

रानडे हे एक हुशार व्यक्ती होते आणि त्यांनी त्यांच्या जीवनकाळामध्ये समाजसुधारक म्हणून काम केले आणि हे काम करत असताना त्यांनी काही पुस्तके देखील लिहिली आणि ती कोणकोणती आहेत ते आपण ता खाली पाहूया.

 • बॉम्बे अँग्लो – मराठी दैनिकाचे संपादन.
 • राजाराम मोहन रॉय यांचे चरित्र.
 • मराठ्यांचा जयजयकार.
 • भारतीय अर्थशास्त्र आणि मराठा इतिहास.
 • विधवांचा पुनर्विवाह.
 • धार्मिक आणि सामाजिक सुधारणा.

महादेव रानडे यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये

 • महादेव गोविंद रानडे यांचा जन्म हा १८ जानेवारी १८४२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील नाशिकमधील निफाड या ठिकाणी या मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये झाला.
 • एक सुप्रसिध्द समाजसेवक म्हणून महादेव गोविंद रानडे यांची ओळख आहे आणि त्यांच्यावर ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पावलांच्यावर पाऊल ठेवून त्यांनी देखील समाजसुधारणा केली.
 • महादेब रानडे यांच्या पत्नीचे नाव रमाबाई रानडे असे होते आणि त्या एक डॉक्टर होत्या आणि महिला हक्क संघटनेच्या संस्थापकांच्यापैकी एक होत्या.
 • महादेव रानडे यांचा विवाह १८५१ मध्ये वयाच्या ११ – १२ व्या वर्षी झाला होता.
 • त्यांनी वकिलीचे शिक्षण केलेले असल्यमुळे त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात हि कोर्टातूनच केली होती म्हणजेच ते प्रथम बॉम्बे स्मॉल कॉज कोर्टामध्ये प्रेसिडन्सी मॅजीस्ट्रेट म्हणून काम करत होते आणि तसेच त्यांनी न्यायधीश म्हणून देखील आपली कामगिरी बजावली कारण ते १८९३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून देखील त्यांनी कामगिरी बजावली.
 • महादेव रानडे यांचा मृत्य १६ जानेवारी १९०१ मध्ये झाला.

आम्ही दिलेल्या mahadev govind ranade information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महादेव गोविंद रानडे माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mahadev ranade information in marathi या mahadev govind ranade biography in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mahadev govind ranade in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maharashtra history in marathi nyayamaurti mahadev govind ranade Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!