Malvani Masala Recipe in Marathi मालवणी मसाला रेसिपी मराठी आपण रोजच्या जेवणामध्ये किंवा मसालेदार भाजी किंवा आमटीमध्ये या पदार्थाची चव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरतो जसे कि गरम मसाला, गोडा मसाला, काळा मसाला आणि कांदा लसून मसाला यासारखे अनेक मसाले वापरले जातात. तसेच मालवण हा एक कोकणी भाग आहे आणि त्याठिकाणी वेगवेगळे भाज्यांचे प्रकारे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे माशे बनवले जातात आणि त्यामध्ये एक विशेष मसाला वापरला जातो आणि तो म्हणजे मालवणी मसाला. मालवणी मसाला हा मालवण भागामध्ये मालवणी रेसिपीमध्ये वापरला जातो आणि हा मसाला भारताच्या इतर भागामध्ये जर कोणी मालवणी रेसिपीज बनवत असतील तर वापरतात.
मालवणी मसाल्यामध्ये लाल सुक्या मिरच्या आणि काही वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले वापरले जातात आणि हे सर्व भाजून घेतले जाते आणि त्याची बारीक पावडर बनवून ते सर्व मिश्रण एकत्र केले जाते. मालवणी मसाला हा स्वयंपाकामध्ये गरम मसाल्यासारखा वापरला जातो आणि हा तिखट किंवा झणझणीत भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये वापरला जातो.
मालवणी मसाला हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २० ते २५ मिनिटामध्ये बनतो परंतु हा बनवण्यासाठी जास्त साहित्य लागते. चला तर मग आता आपण मालवणी मसाला रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
मालवणी मसाला रेसिपी मराठी – Malvani Masala Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे. |
पाककला | मालवणी |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
मालवणी मसाल्यामध्ये लाल सुक्या मिरच्या आणि काही वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले वापरले जातात आणि हे सर्व भाजून घेतले जाते आणि त्याची बारीक पावडर बनवून ते सर्व मिश्रण एकत्र केले जाते.
- लाल सुक्या मिरच्या : लाल सुक्या मिरच्या हा घटक मालवणी मसाला बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे. लाल मिरच्या चांगल्या भाजून त्याची पावडर बनवली जाते आणि ती इतर मसाल्यांमध्ये मिक्स केली जाते.
- धणे : जर या मालवणी मसाल्यामध्ये धणे वापरले तर मसाल्याला टेस्ट चांगली येते.
- दालचिन, बदाम फुल आणि वेलदोडे : मालवणी मसाल्यामध्ये दालचिन, बदाम फुल आणि वेलदोडे वापरल्यामुळे मसाल्याला खमंग वास येतो आणि मसाल्याचा स्वाद देखील चांगला येतो.
मालवणी मसाला रेसिपी – malvani garam masala recipe in marathi
मालवणी मसाला रेसिपी हि मालवणची एक पारंपारिक डिश आहे जी मालवणी भाजीमध्ये, आमटी मध्ये, फिश करी, मटन करी यासारख्या पदार्थामध्ये घातली जाते. कोणताही मसाला घातला कि त्या रेसिपीची चव छान होते आणि तसेच हा मसाला देखील मालवणी पदार्थांमध्ये वापरला तर त्या पदार्थाची चव वाढते.
मालवणी मसाला हा गरम मासाल्यासारखा वापरला जातो आणि हा मसाला लाल सुक्या मिरच्या आणि काही इतर मसाल्यांच्या पासून बनवला जातो. मालवणी मसाला हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २० ते २५ मिनिटामध्ये बनतो परंतु हा बनवण्यासाठी जास्त साहित्य लागते.चाल तर मग आता आपण मालवणी मसाला कसा बनवायचा आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | ५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे. |
पाककला | मालवणी |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
मालवणी मसाला बनवण्यासाठी लाल सुक्या मिरच्या, धणे, दालचिन, बदाम फुल आणि वेलदोडे हे मुख्य साहित्य लागते तसेच हा मसाला बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा खडा मसाला लागतो आणि यामधील सर्व प्रकारचा खडा मसाला आपल्या घरी उपलब्ध असेल असे नाही त्यामधील काही साहित्य आपल्याला बाजारातून उपलब्ध करून घ्यावे लागते आणि मालवणी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण अगदी सहजपणे बाजारातून उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग आता आपण मालवणी मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या यादी पाहूयात.
- १ मध्यम आकारच बाऊल लाल सुक्या मिरच्या.
- १ चमचा लवंग.
- २ ते ३ मोठा चमचा धणे.
- दीड ते २ चमचे काळी मिरी.
- ३ बदाम फुल.
- २ ते ३ तुकडे दालचिन.
- १ चमचा जिरे.
- ३ ते ४ चमचे खसखस.
- ६ जायपत्री.
- ५ ते ६ वेलदोडे.
- २ ते ३ मसाला वेलदोडे.
- ३ ते ४ चमचे हळद.
- दीड चमचे हिंग.
- १ मोठा चमचा बडीशेफ.
मालवणी मसाला हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनतो. चला तर मग वर दिलेले साहित्य वापरून मालवणी मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.
- आपण ज्या सुक्या मिरच्या वापरणार आहोत त्या आधल्यादिवशी कडक उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्या ( टीप : मिरचीचे देठ काढलेले असावेत ).
- मालवणी मसाला बनवताना मसाला बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते सर्व साहित्य एकत्र घेवून ठेवा म्हणजे आपल्याला ते पटापट भाजता येईल.
- आता गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि ती गरम होऊ द्या. कढई गरम झाली कि त्यामध्ये धणे टाका आणि त्याचा खमंग वास येईपर्यंत ते भाजून घ्या आणि मग ते बाजूला काढा.
- आता कढईमध्ये जिरे, बडीशेफ, खसखस वेगवेगळे भाजून घ्या आणि आणि मग ते वेगवेगळे काढा.
- आता कढई मध्ये दालचिन, बदाम फुल, जायपत्री, लवंग, काळी मिरी, वेलदोडे आणि मसाला वेलदोडे हे सर्व एकत्र घाला आणि ते खमंग वास येईपर्यंत भाजा आणि ते बाजूला काढा.
- आता लाल सुक्या मिरच्या कढईमध्ये घाला आणि त्या देखील चांगल्या भाजून घ्या आणि बाजूला काढा.
- आता ह्या मिरच्या थोड्या थोड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि त्याची पावडर बनवून घ्या. तसेच भाजलेल्या सर्व मसाल्यांची देखील पावडर बनवून ती चालून घ्या आणि मग त्यामध्ये लाल मिरची पावडर घालून ते मिश्रण एकत्र करा आणि ते मिश्रन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्स करा.
- मालवणी मसाला तयार झाला. हा मसाला बरणीमध्ये घालून आपल्याला हवा तेंव्हा वापरू शकतो.
मालवणी मसाला कश्यामध्ये वापरला जातो – use of malvani masala
- मालवणी मसाला आपण मालवणी भाजीमध्ये, आमटी मध्ये, फिश करी, मटन करी, फिश फ्राय, फिश मसाला यासारख्या अनेक पदार्थामध्ये वापरला जातो.
टिप्स (Tips)
- मालवणी मसाला बनवण्यासाठी चांगल्या आणि लाल मिरच्या वापराव्या त्यामुळे मसाला चांगला बनेल आणि रंग देखील चांगला येईल.
- मिरच्या उन्हामध्ये कडक वाळवून घ्याव्या.
- तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्ती करू शकता.
आम्ही दिलेल्या malvani masala recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मालवणी मसाला रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या malvani garam masala recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 1 kg malvani masala recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये malvani chicken masala recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट