मंगेश पाडगावकर माहिती Mangesh Padgaonkar Information in Marathi

‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’

Mangesh Padgaonkar Information in Marathi मंगेश पाडगावकर माहिती असे म्हणणाऱ्या मंगेश पाडगावकर यांच्या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. मंगेश पाडगावकर यांच्या जन्म १० मार्च १९२९ रोजी कोकण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या ठिकाणी झाला आणि त्यांचे संपूर्ण नाव मंगेश केशव पाडगावकर असे होते. मंगेश पाडगावकर हे एक सुप्रसिध्द गीतकार आणि कवी होते आणि त्यांनी अनेक काव्य रचना केल्या होत्या जसे कि भातुकल्या खेळामधील आणि जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे या सारख्या आयुष्याविषयी काही तरी अर्थ सांगणाऱ्या तसेच अनेक कविता त्यांनी रचल्या आणि त्या लोकप्रिय देखील झाल्या.

त्यांना इ.स १९५६ मध्ये साहित्य संमेलन पुरस्कार आणि इ.स १९५३ आणि इ.स १९५५ मध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे लग्न यशोदा पाडगावकर यांच्याशी झाले असून त्यांना डॉ. अजित पाडगावकर, अभय पाडगावकर आणि अंजली कुलकर्णी ही तीन मुले आहेत.

mangesh padgaonkar information in marathi
mangesh padgaonkar information in marathi

मंगेश पाडगावकर माहिती मराठी – Mangesh Padgaonkar Information in Marathi

पूर्ण नावमंगेश केशव पाडगावकर
जन्म१० मार्च १९२९
जन्म ठिकाणमहाराष्ट्र, वेंगुर्ले (कोकण)
प्रसिध्द कविताभातुकल्या खेळामधील आणि जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा

शिक्षण आणि करिअर 

मंगेश पाडगावकर या लोकप्रिय कवीचा जन्म महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले (कोकण) या ठिकाणी झाला आणि त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण बहुतेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केले असावे. त्यानंतर त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून मराठी आणि संस्कृतमध्ये मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली.

आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही वर्ष रुईया या कॉलेजमध्ये मराठी शिकवले आणि इ. स. १९७० ते १९९० च्या काळामध्ये त्यांनी यूएस इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये संपादक म्हणून काम केले.

मंगेश पाडगावकर यांच्याविषयी महत्वाची माहिती 

  • मंगेश पाडगावकर यांनी आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी कविता लिहायला सुरुवात केली होती.
  • मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले (कोकण) या ठिकाणी झाला आणि त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण तेथेच घेतले आणि बॉम्बे विद्यापीठातून मराठी आणि संस्कृतमध्ये मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली.
  • मंगेश पाडगावकर हे एक लोकप्रिय कवी आहेत.
  • त्यांनी रोमँटिक, राजकारण, सामाजिक, तसेच मुलांच्यासाठी आणि आयुष्यावर कविता लिहिल्या तसेच त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि इंग्रजी आणि इतर भाषांचे ग्रंथ मराठीमध्ये भाषांतर केले.
  • मंगेश पाडगावकर हे मुर्गी क्लब या मराठी साहित्यिक गटाचे ते सदस्य होते.

कामगिरी

मंगेश पाडगावकर हे एक सुप्रसिध्द गीतकार आणि कवी होते आणि त्यांनी अनेक काव्य रचना केल्या होत्या जसे कि भातुकल्या खेळामधील आणि जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा या सारख्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या. इ. स १९६० आणि इ. स १९७० च्या दरम्यान झालेल्या काव्यवाचन कार्यक्रमांमध्ये त्यांनी विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्यासोबत घेतले होते.

मंगेश पाडगावकर यांनी मराठी चित्रपटांच्यासाठी गीते लिहिली जी अरुण दाते यांनी गायिली. अरुण दाते यांनी गायलेली त्यांची या जन्मावर, या जगन्यावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली आणि शुक्रतारा मंद वारा ही गाणी प्रसिद्ध आहेत.

पुणे विद्यापीठासाठी इ.स १९८३ – इ.स १९८४ मध्ये त्यांनी ‘पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान’ हे थीम सॉंग देखील लिहिले जे त्यांनी एका दिवसामध्ये लिहिले होते आणि पु. ल. देशपांडे यांनी हे गाणे एका दिवसामध्ये लिहिण्यास सांगितले होते. त्यानंतर संगीत दिग्दर्शक भास्कर चंदावरकर यांनी ते संगीतबद्ध केले होते.

२०१० मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आयोजित केलेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि हे साहित्य संमेलन दुबई येथे झाले होते. मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ४० प्रकाशणे प्रकाशित केली होती त्यामधील ३१ प्रकाशने हि यूएस लायब्ररी ऑफ काँग्रेसने मिळवलेली आहेत.

काकासाहेब कालेलकर यांच्या सल्ल्यानुसार मंगेश पाडगावकर यांनी मीराबाईच्या ग्रंथांचा अनुवाद केला आणि इ.स १९६५ मध्ये ‘मीरा’ हे पुस्तक प्रकाशित केले. रोमिओ आणि ज्युलिएट, शेक्सफियरच्या द टेम्पेस्ट आणि ज्युलियस सीझर या नाटकांसह त्यांनी कबीर आणि सूरदास यांच्या कामांचा मराठी अनुवाद केला आहे.

ही भाषांतरे स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हॉन येथील ब्रिटीश शहरातील शेक्सफियर मेमोरियलमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच त्यांनी बायबल द न्यू टेस्टामेंटचे नवीन भाषांतर हे २००८ मध्ये पाकाशित केले तसेच त्यांनी पुस्तकांचे अग्रलेखही लिहिले ज्यामध्ये त्यांनी मूळ लेखक, त्यांच्या लेखनशैली आणि संबंधित युगातील साहित्य यावर भाष्य केले आहे.

तसेच ते इतर प्रसिध्द ग्रंथांचे देखील भाषांतर करत होते. त्यांनी शोध कवितेचा आणि स्नेह्गाथा या सारखी पुस्तके लिहिली. शोध कवितेचा या पुस्तकामध्ये मंगेश पाडगावकर यांनी कविता लेखनाचा अनुभव, त्यांचा आत्ता पर्यंतचा प्रवास, तसेच त्यांच्या कविता हे विषय आपल्या या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात.

 

  • भातुकल्या खेळामधील आणि जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा या काही त्यांच्या प्रसिध्द कविता.
  • ‘पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान’ हे थीम सॉंग लिहिले.
  • इ.स १९६५ मध्ये ‘मीरा’ हे पुस्तक प्रकाशित केले जे मीराबाईंच्या आयुष्यावर आहे.
  • बायबल द न्यू टेस्टामेंटचे नवीन भाषांतर हे २००८ मध्ये पाकाशित केले तसेच त्यांनी पुस्तकांचे अग्रलेखही लिहिले.
  • त्यांनी शोध कवितेचा आणि स्नेह्गाथा या सारखी पुस्तके लिहिली.

पुरस्कार आणि सन्मान 

  • इ. स. १९८० मध्ये त्यांच्या त्यांच्या सलाम या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
  • २००८ मध्ये मंगेश पाडगावकर यांना कै. नाना धर्माधिकारी यांच्यासोबत महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • मंगेश पाडगावकर यांना २०१२ मध्ये त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे विद्यापीठाने ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.
  • इ. स. १९५६ मध्ये त्यांना मराठी साहित्यातील चांगल्या कामगिरीसाठी साहित्य संमेलन पुरस्कार देऊन गौरवित करण्यात आले होते.
  • तसेच त्यांना इ. स. १९५३ आणि इ. स. १९५५ मध्ये महाराष्ट्र पुरस्कार मिळाला होता.

मंगेश पाडगावकर यांच्या कविता – Mangesh Padgaonkar Poems in Marathi

अ.क्रकविता
१.       जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
२.       शुक्र तारा मंद वारा
३.       भातुकलीच्या खेळामधील
४.       सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
५.       सांगा कस जगायचं
६.       सलाम
७.       तुझा माझा पाऊस
८.       फुल ठेवूनी गेले
९.       वेद कोकरू
१०.   आता काही नाही
११.   तू असतीस तर

मंगेश पाडगावकर यांचा मूत्यू 

मंगेश पाडगावकर यांचा मूत्यू ३० डिसेंबर २०१५ रोजी मुंबई या शहरामध्ये झाला आणि त्यांच्या मृत्यू त्यांच्या वयाच्या ८६ व्या वर्षी झाला.

आम्ही दिलेल्या mangesh padgaonkar information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मंगेश पाडगावकर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mangesh padgaonkar full information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about mangesh padgaonkar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mangesh padgaonkar marathi kavita Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!