सिंधुदुर्ग जिल्हा माहिती Sindhudurg District Information in Marathi

Sindhudurg District Information in Marathi सिंधुदुर्ग जिल्हा माहिती सिंधुदुर्ग माहिती मराठी महाराष्ट्रातील अरबी समुद्राच्या पश्चीमेकडील किनाऱ्यावर वसलेला सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकण प्रदेशाचा दक्षिण भाग आहे. जो महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि प्रशासकीय जिल्हा आहे. सिंधुदुर्ग हा किनारपट्टीचा जिल्हा असल्या कारणाने हवामान सामान्यतः ओलसर आणि दमट असते आणि दिवसा आणि संपूर्ण हंगामात तापमानातील फरक जास्त मोठा नसतो. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत आणि त्यामध्ये देवगड, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी, मालवण,  कुडाळ, वेंगूर्ला आणि सावंतवाडी तालुके येतात.

सिंधुदुर्ग हा जिल्हा पश्चिमेकडे अरबी समुद्राने व्यापलेला आहे तर पूर्वेकडे हा किल्ला सह्याद्री डोंगर रांगा आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५०८७ चौरस किलो मीटर असून या जिल्ह्याची लोकसंख्या ८६८८२५ इतकी आहे आणि या जिल्ह्यामध्ये १०० टक्के साक्षर लोक आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ हा या मार्गावरून जातो आणि या जिल्ह्यामध्ये एकूण ७ रेल्वे स्टेशन आहेत आणि कोकण रेल्वे मार्गाचा १०५ किमीचा पल्ला या जिल्ह्यातून जातो व हे रेल्वे मार्ग मुंबई रेल्वे मार्गशी चांगले जोडलेले आहेत.

सिंधुदुर्ग हा जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक सुंदर भूमी आहे आणि या प्रदेशमध्ये आंबा, काजू या सारख्या उष्ण कटिबंधीय फळांचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि हे बहुतेक त्या ठिकाणावरील महत्वाचे आणि मुख्य पिक आहे.

गोव्यापासून अगदी जवळ असणारा सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे जो खूप शांत, सुंदर समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले आणि मंदिरे असणारा जिल्हा आहे. आज या लेखामध्ये आपण सिधुदुर्ग जिल्ह्याबद्दल माहिती घेणार आहोत.

sindhudurg district information in marathi
sindhudurg district information in marathi

सिंधुदुर्ग जिल्हा माहिती – Sindhudurg District Information in Marathi

नावसिंधुदुर्ग
ओळखजिल्हा
राज्यमहाराष्ट्र
क्षेत्रफळया जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५०८७ चौरस किलो मीटर आहे
लोकसंख्या८६८८२५
तालुकेसिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत ते म्हणजे देवगड, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी, मालवण, उकुडाळ, वेंगुर्ला आणि सावंतवाडी इ.
आकर्षणसुंदर समुद्र किनारे , मंदिरे आणि ऐतिहासिक किल्ले

इतिहास

सिधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील जिल्हा असून हा जिल्हा अरबी समुद्राच्या पश्चीमेकडील किनाऱ्यावर वसलेला आहे. १६०० च्या काळात ब्रिटीश आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र किनाऱ्यावरील भागावर आपले राज्य स्तापित केले होते पण ते राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडून काढून किनाऱ्यांच्या गावावर मराठ्यांचे राज्य कायम ठेवले त्यामध्ये सिंधुदुर्ग देखील होते.

त्यावेळी त्यांनी किनारपट्टी वरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समुद्रातून होणाऱ्या आक्रमणापासून किनाऱ्यावर राहणाऱ्या मराठी लोकांचे संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर एक किल्ला बांधला होता ज्याला सिंधुदुर्ग किल्ला असे नाव दिले होते. या जिल्ह्याचे नाव हे सिंधुदुर्ग या किल्ल्यावरून किल्ल्यावरून पडले आहे, जो अरबी समुद्रामध्ये कुरटे या बेटावर वसलेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचे जीवन 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांची घरे हि बहुतेक लाल दगडांनी बांधलेली असतात आणि त्या घरांचे छप्पर हे स्लाईडचे असते जे पावसाळ्यासाठी बांधलेले असते. सिंधुदुर्ग हा किनारपट्टीचा जिल्हा असल्या कारणाने हवामान सामान्यतः ओलसर आणि दमट असते आणि दिवसा आणि संपूर्ण हंगामात तापमानातील फरक जास्त मोठा नसतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक लोक शेती, मासेमारीवर अवलंबून असतात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा, काजू, जामून या सारख्या उष्ण कटिबंधीय फळांचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि हे बहुतेक त्या ठिकाणावरील महत्वाचे आणि मुख्य पिक आहे.

त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बहुतेक भाग हा जंगलांनी व्यापलेला असल्यामुळे त्या भागामध्ये बिबट्या, जंगली मांजरे,  ससे, रानटी कोंबड्या आणि कधीकधी जंगली म्हशी या सारखे प्राणी पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक गावे हि जंगलामध्ये वसलेली आहेत आणि हि गावे खूप मोठी नसतात.

त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा हा लाकडी खेळण्यांच्यासाठी देखील खूप प्रसिद्ध आहे आणि लाकडी खेळणी ही सावंतवाडी येथील पारंपरिक कलांपैकी एक आहे. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लांब सुंदर समुद्र किनारा, नयनरम्य पर्वत आणि हिरवीगार जंगले यामुळे उत्तम नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे 

सिंधुदुर्ग किल्ला 

इ. स. १६६४ मध्ये हिरोजी इंदुलकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्यासाठी आज्ञा दिली. सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या (हा किल्ला मालवण बंदरापासून १.६० किलो मीटर अंतरावर आहे) अरबी समुद्रामध्ये हा किल्ला कुरटे या बेटावर वसलेला आहे. हा किल्ला किनारपट्टी वरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समुद्रातून होणाऱ्या आक्रमणापासून किनाऱ्यावर राहणाऱ्या मराठी लोकांचे संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर एक किल्ला बांधला होता.

सुनामी बेट 

हे ठिकाण किल्ल्यापासून अर्धा किलो मीटर आहे आणि या भागातील समुद्र शांत असल्यामुळे येथे आपल्याला जेट स्की, कायक रायडर, स्पीड बोट, वाटर स्कूटर आणि बम्पर बोटचा आनंद घेता येतो.

तारकर्ली बीच 

तारकर्ली बीच हा सिंधुदुर्ग किल्ल्यापासून १० किलो मीटर लांब आहे. हा कोकणातील एक सर्वात सुंदर बीच म्हणून ओळखला जातो. याठिकाणी आपल्याला सूर्यास्ताची खूप मोहक आणि आश्चर्यकारक दृष्ये पाहायला मिळतात.

मालवण सागरी वन्यजीव अभयारण्य 

आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण सागरी वन्यजीव अभयारण्य पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती तसेच इतर सागरी वन्यजीव पाहायला मिळतात.

विजयदुर्ग किल्ला 

हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये आहे. विजयदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याचे तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे जेथून किल्ल्यामध्ये प्रवेश केला जातो. ३० मीटर उंच खडकावर आहे. या किल्ल्याची तटबंदीची भिंत ३०० फुट उंच आहे आणि किल्ल्याची भिंत हि १० मीटर उंच आहे.

इतर बीच 

तलाशील टोंडावली बीच, निवती बीच, शिरोडा बीच, माजाली बीच आणि देवबाग बीच यासारखी ठिकाणे देखील पहायला मिळतात.

कराली बॅकवॉटर्स 

कराली बॅकवॉटर्स हे ठिकाण किल्ल्यापासून २.२ किलो मीटर आहे. कराली बॅकवॉटर्स या ठिकाणी आपण बोट चालवण्याचा आनंद घेवू शकतो. या ठिकाणी कराली नदी अरबी समुद्राला येवून मिळते.

इतर ठिकाणे 

देवगड किल्ला, रेडी गणपती मंदिर, आंबोली धबधबा आणि कुणकेश्वर मंदिर आणि बीच.

सिंधुदुर्गला कसे जावे 

जर तुम्ही पुण्याहून किवा मुंबईहून सिंधदुर्गला जाणार असाल तर खाली दिलेले पर्याय उपलब्द आहेत. तुम्ही सिंधुदुर्गला रस्ता मार्गे, हवाई मार्गे किंवा रेल्वेमार्गे या पैकी कोणत्याही मार्गाने जावू शकता.

विमान 

जर तुम्हाला विमानाने सिंधुदुर्गला जायचे असेल तर सिंधुदुर्ग जवळील सर्वात जवळचे विमानतळ रत्नागिरी येथे आहे तेथून तुम्ही तुम्ही विमानाने रत्नागिरीला जावू शकता आणि तेथून टॅक्सी किंवा बस पकडून सिंधुदुर्गला जावू शकता.

रेल्वेमार्गे 

जर तुम्हाला पुण्यातून रेल्वेमार्गे जायचे असेल तर पुण्यातून मांडवी एक्स्प्रेस सिंधुदुर्गला जाते.

रस्त्याने 

पुण्याहून बसने येण्यासाठी या मार्गावत थेट बस नाहीत त्यामुळे तुम्हाला पुण्यातून कणकवलीला यावे लागते आणि तेथून सिंधुदुर्गला जाण्यासाठी टॅक्सी पकडावी लागेल.

आम्ही दिलेल्या sindhudurg district information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सिंधुदुर्ग जिल्हा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sindhudurg district information in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of sindhudurg district in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sindhudurg information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!