mavim information in marathi महिला आर्थिक विकास महामंडळ माहिती, महिलांच्या विकासासाठी आपले भारत सरकार अनेक योजना राबवत असते तसेच अनेक वेगवेगळ्या मंडळांची स्थापना करत असते आणि माविम (mavim) देखील एक तसेच मंडळ आहे जे महिलांच्या विकासासाठी आणि सशक्तीकरण करण्यासाठी कार्यरत आहे आणि खाली आपण या लेखामध्ये माविम विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. माविम चे पूर्ण स्वरूप महिला आर्थिक विकास महामंडळ असे आहे.
हे एक प्रकारचे महिलांचा आर्थिक विकास कसा होईल यासाठी कार्यरत असलेले एक मंडळ आहे ज्या मंडळाची स्थापना २४ फेब्रुवारी १९७५ मध्ये झाली आहे आणि या मंडळाची स्थापना प्रथम महाराष्ट्र सरकारकडून झाली आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत महिलांचे बचत गट बनवले जातात आणि या बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्यासाठी वेगेवगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात तसेच त्यांच्या हितपर काही योजना राबवल्या जातात.
जेणेकरून त्यांना आर्थिक मदत होईल आणि त्यामुळे त्या आर्थिक दृष्ट्या सशक्त आणि स्वतंत्र बनतील. चला तर खाली आपण माविम विषयी आणखीन माहिती पाहूया.
महिला आर्थिक विकास महामंडळ माहिती – Mavim Information in Marathi
माविमचे पूर्ण स्वरूप – mavim full form in marathi
माविम हे एक महामंडळ आहे जे महिलांच्या विकासासाठी चालवले जाते आणि याचे संक्षिप रूप महिला आर्थिक विकास महामंडळ (mahila arthik vikas mahamandal) असे आहे.
माविम विषयी माहिती – information about mavim in marathi
महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना हि अंतराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने करण्यात आली आणि या मंडळाची स्थापना झाल्यानंतर सरकारने २००३ पासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सशक्तीकरणासाठी अनेक कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली.
आणि अश्या प्रकारे माविमने महिलांचा सर्वांगीण विकास करण्याचे काम आपल्या हाती घेतले. तसेच या मंडळाने महिलांच्यासाठी महाराष्ट्रमध्ये स्वयं सहायता गट चळवळ सुरु केली आणि वेळोवेळी सहाय्यक धोरणात्मक यंत्रणा तयार केली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायमच पाठींबा दिला
माविमचा मुख्य उदिष्ट – objective
या मंडळामध्ये महिलांचे बचत गट बनवले जातात आणि त्यांना गुंतवणुकीची आणि बचतीची सवय लागावी या साठी या गटामार्फत योजना राबवल्या जातात आणि तसेच महिलांचे क्षमता संवर्धन देखील केले जाते आणि महिला सामाजिक आणि अर्थीक दृष्ट्या सशक्त आणि स्वतंत्र्य बनवले जाते म्हणजेच तिला आर्थिक अडचणीमध्ये कोणावर अवलंबून राहावे लागत नाही.
इतर उदिष्ट्ये
- माविम हे मंडळ महिलांचे संघटन करण्याचा प्रयत्न करत असते आणि हे संघटन ते बचत गटाच्या माध्यमातून केले जाते.
- सध्या आपण पाहतो कि महिला अनेक क्षेत्रामध्ये पुढाकार घेतात आणि तसेच त्यांच्या शासनातील सहभागासाठी चालना दिली जाते.
- महिलांना समान संधी मिळवून देणे हे देखील माविम समोरील एक उदिष्ट आहे.
- महिलांचा उद्योग क्षेत्रामध्ये विकास करणे तसेच त्यांचे आत्मविश्वास वाढवणे.
- महिलांना बाजारपेठांची ओळख करून देणे आणि बाजारपेठेमध्ये त्यांचे चांगले संबध निर्माण करण्यासाठी मदत करणे.
- महिलांच्यासाठी राजकीय, सामाजिक आणि अर्थी न्याय मिळवून देणे किंवा प्रस्थापित करणे.
- त्यांची उद्योजक म्हणून प्रवृत्ती बनवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे.
माविम महामंडळाचे ध्येय – goal
कोणतीही संस्था समोर ध्येय ठेवून सुरु केलेली असते आणि तसेच माविमने देखील समोर ध्येय ठेवून सुरुवात केली आहे. या महामंडळाचे ध्येय असे आहे कि महिलांसाठी लैंगिक न्याय आणि समानता आणण्याचा प्रयत्न करणे आणि महिलांची क्षमता वाढवून त्यांना सामजिक आणि आर्थिक दृष्ट्या सबल बनवणे.
महिला आर्थिक विकास महामंडळ विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष मा. श्रीमती ज्योती ठाकरे ह्या आहेत आणि मा. श्रीमती श्रध्दा जोशी ह्या या मंडळाच्या एमडी आहेत.
- माविम हे महामंडळ ९ ते १० हजारहून अधिक गावांच्यामध्ये आणि २५० हून अधिक शहरांच्यामध्ये महिलांच्यासाठी कार्यरत आहे.
- माविम हे देशातील अग्रेसर महामंडळ आहे जे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते.
- राज्यामध्ये ९ लाखाहून अधिक गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल आणि सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार माविम मार्फत अनेक योजना आणि कार्यक्रम राबवते.
- माविम या मंडळाने २०२१ या वर्षापर्यंत १.५० लाख स्वयं सहायता महिला बचत गटांची निर्मिती करण्यास त्यांना यश मिळाले आहे आणि यामध्ये १७ लाखाहून अधिक महिलांना संघटीत केले आहे.
- महिला आर्थिक विकास महामंडळ ( महाराष्ट्र ) चे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे.
- महिला आर्थिक विकास महामंडळाचे मुख्यालय किंवा मुख्य कार्यालयीन ऑफिस मुंबई शहरामध्ये जरी असले तरी या महामंडळाच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी उपशाखा आहेत. ज्या त्या भागामध्ये कार्यरत आहेत आणि त्या तेथील महिलांच्यासाठी काम करतात.
माविम महामंडळामध्ये नोकरी करायची असल्यास महत्वाचे मुद्दे
माविम महामंडळामध्ये अनेक स्त्रिया आणि पुरुष स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक योजनांची रचना करत असतात. तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतात आणि अश्या प्रकारची कामे करण्यासाठी माविम हे अनेक पदांच्यासाठी भरती करून घेत असते आणि ज्यावेळी तुम्ही यामध्ये कोणत्याही पदासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला काही मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत.
- माविम महामंडळामध्ये कोणत्याही पदासाठी किंवा नोकरीसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला त्यांनी ठरवलेले काही पात्रता निकषांची पूर्तता करावी लागते.
- त्याचबरोबर या भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्ही ई मेलद्वारे तुमचा अर्ज त्या पत्त्यावर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे पाठवू शकता.
- तसेच माविम साठी अर्ज करण्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मंडळामध्ये कोणत्याही पदासाठी अर्ज करत असताना आवश्यक असणारी कागदपत्रे त्याला जोडणे आवश्यक असते.
- या मंडळामध्ये कोणत्याही पदासाठी आरजे करत असताना कोणताही शुल्क आकाराला जात नाही तसेच वेतान हे सरकारी नियमांच्यानुसार ठरवले जाते.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जसे कि दहावी, बारावी किंवा पदवीचे प्रमाणपत्र, रेझ्युमे, ओळखपत्र (आधारकार्ड, व्होटिंग कार्ड किंवा लायसन्स), पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला.
- जर एखाद्या व्यक्तीच्या अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या व्यक्तीचा आरजे फेटाळला जाऊ शकतो किंवा बाद केला जाऊ शकतो.
आम्ही दिलेल्या mavim information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर महिला आर्थिक विकास महामंडळ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mavim full form in marathi या mavim cmrc in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about mavim in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mavim information in Marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट