निलेश लंके यांची माहिती MLA Nilesh Lanke Biography in Marathi

MLA Nilesh Lanke Biography in Marathi – Nilesh Lanke Information in Marathi Language निलेश लंके यांची माहिती शिवसेनेतून सुरू झालेला राजकारणाचा प्रवास आणि आता राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या कार्याचं सर्वत्र सोशल मीडियावर कौतुक होत आहे. परंतु हे निलेश लंके नक्की आहेत तरी कोण ? आणि त्यांनी असं काय कार्य केले आहे? निलेश लंके हे पारनेरच्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. Covid-१९ रुग्णांसाठी कोविड सेंटरची उभारणी केली आणि त्यांच्या या कामाची चर्चा सर्वत्र झाली. आजच्या लेखामध्ये आपण लोकनेता आणि देवमाणूस म्हणजेच निलेश लंके यांच्यावर माहिती जाणून घेणार आहोत.

mla nilesh lanke biography in marathi
mla nilesh lanke biography in marathi

निलेश लंके यांची माहिती – MLA Nilesh Lanke Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)निलेश लंके
जन्म (Birthday)१० मार्च १९८०
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या हंगा या गावात
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)आमदार

जन्म व वैयक्तिक आयुष्य

१० मार्च १९८० रोजी निलेश लंके यांचा जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या हंगा या गावात झाला. निलेश लंके यांचे वडील एक प्राथमिक शिक्षक होते तर घराची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. निलेश लंके यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे त्यांनी आयटीआय केलं. कालांतराने त्यांना काही कंपन्यांमध्ये जॉब देखील मिळाला. परंतु पुन्हा लंके शिक्षणाकडे वळले आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून पॉलिटिकल सायन्स मध्ये पदवी संपादन केली.

लंके यांचे वडील एक साधे प्राथमिक शिक्षक होते घराची परिस्थिती नाजूक होती म्हणून लंके यांनी पाचवी सहावी मध्ये असतानाच स्वतःचा व्यवसाय सुरू केला. काही काळ हंगा‌ स्टेशन वर हॉटेल सुरू केलं परंतु त्या हॉटेलमधून त्यांना काहीच नफा मिळत नव्हता म्हणून हे हॉटेल देखील बंद करावं लागलं. याच हॉटेल पासून त्यांच्या जीवनाचा खरा प्रवास सुरू झाला.

शिवसेनेचे कार्यकर्ते निलेश लंके

निलेश लंके सध्या राष्ट्रवादीमध्ये आमदार असले तरी एके काळी ते शिवसेनेचे कार्यकर्ते होते. एक काळ असा होता जेव्हा बाळासाहेबांनी स्वतः लंके यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला होता. आणि त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतलं होतं. लंके यांच्या घराची परिस्थिती नाजूक होती म्हणून ते हंगा स्टेशन वर हॉटेल चालवायचे.

त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हंगा स्टेशन वर आले होते आणि लंके यांनादेखील बाळासाहेबांची आवड होती बाळासाहेब त्यांचे आदर्श होते म्हणून गर्दीतून वाट काढत ते बाळासाहेबां समोर जाऊन उभे राहीले आणि त्यावेळी बाळासाहेबांनी अत्यंत प्रेमाने चिमुकल्या निलेश च्या डोक्यावर प्रेमाचा हात ठेवला. आणि तिथूनच निलेश लंके यांच्या संघर्षाला सुरुवात झाली.

यानंतर निलेश लंके यांनी समाज सेवेला सुरुवात केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी निलेश लंके यांनी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदावर काम करण्यास सुरुवात केली. आणि तिथूनच निलेश लंके यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. निलेश लंके यांना आधीपासूनच समाजसेवेची आवड होती शिवाय आता शिवसेनेचे शाखाप्रमुख झाल्यापासून त्यांना जनतेचा देखील आधार मिळू लागला त्यांनी स्वतःच्या गावातील म्हणजेच हंगा गावातील ग्रामपंचायत देखील मिळवली.

त्यानंतर पंचायत समिती आणि अखेर शिवसेनेचे तालुका प्रमुख. परंतु शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता असणारे निलेश लंके यांच्या आयुष्यात असं काय घडलं जे त्यांनी पुढे पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. २७ फेब्रुवारी २०१८ च्या सभेमध्ये झालेल्या वादावरून निलेश लंके यांना शिवसेनेतून काढण्यात आलं.

असं नेमकं काय घडलं असेल? २७ फेब्रुवारी २०१८ रोजी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे पारनेर दौर्‍यावर होते त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये काही गडबड झाली आणि काही कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या गाडीसमोर येऊन दगडफेक करू लागले आणि या दौऱ्याला गालबोट लावण्याचे काम निलेश लंके यांनी केलं होतं असा आरोप विजय औटी यांनी केला होता. तर लंके यांना बरबाद करण्यासाठी विजय औटी यांनी हे सगळं कृत्य घडवून आणल्याचं लंके सांगतात. सभेत झालेल्या या गोंधळावरून निलेश लंके यांना शिवसेनेतून काढण्यात आलं.

निलेश लंके राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार

निलेश लंके यांचा प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय ठरला आहे. वडील साधे प्राथमिक शिक्षक त्यामुळे लहानपणापासून आर्थिक दृष्ट्या त्यांनी संघर्ष केला. पुढे कुठलीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना देखील शिवसेनेतून राजकारणात पाऊल ठेवलं आणि काही गैरसमजामुळे त्यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यात आलं. परंतु पुढे जाऊन त्यांनी राष्ट्रवादीत‌ प्रवेश केला.

२०१९ ची विधानसभा निलेश लंके यांनी राष्ट्रवादी मधून लढवली आणि ते निवडून देखील आले. लंके यांची नाळ आधीपासूनच जनतेशी जोडली गेली आहे. ते स्वतः आधी आपल्या जनतेचा विचार करतात म्हणूनच त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करण्यास सुरुवात केली.

ते इथवरच थांबले नाहीत तर ज्या शिवसेनेतून त्यांना काढण्यात आलं त्याच शिवसेनेला निवडणुकीमध्ये मुख्यमंत्रिपद मिळावं म्हणून स्वतःहून योगदान दिलं. निलेश लंके हे पारनेरच्या मतदारसंघाचे आमदार आहेत आमदार झाल्यावर ते म्हणाले, “मी फक्त एकटाच आमदार झालो नाही आहे तर, माझ्या गावातील प्रत्येक व्यक्ती आमदार झाला आहे.”

निलेश लंके यांची जनतेमध्ये मिसळण्याची ही कला लोकांना फारच आवडते. ते इतर राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे आहेत आणि हीच गोष्ट त्यांना महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदार बनवते. आपल्या जनतेशी जाऊन ते थेट संवाद साधतात.‌ निलेश लंके यांचा स्वभाव लोकांमध्ये पटकन मिसळण्याचा आहे ते लोकांमध्ये लगेच गुंतत जातात. ते कोणातही मतभेद करत नाहीत आणि ते कोणालाही लगेच भेटतात. गाडीतून उतरल्यावर देखील कोणीही त्यांच्याशी संवाद साधू शकतो लोकांमध्ये जे मिसळतात असे पुढारी लोकांना आवडतात

कोविड रुग्णांसाठी कोविड सेंटरची स्थापना

निलेश लंके हे जनतेची सेवा अगदी मनापासून करतात. त्यांनी याआधीही निलेश लंके प्रतिष्ठानातून बऱ्याच सामाजिक समस्या सोडवल्या आहेत. सध्या सर्वत्र कोरोनाच सावट आहे. या महामारीची दुसरी लाट पहिल्या लाटे पेक्षा सर्वात मोठी होती. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्ण संख्येमध्ये झपाट्याने वाढ दिसून येत होती आणि त्यामुळेच बऱ्याच कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड्स अवेलेबल नव्हते.

जर बेड्सच अवेलेबल नसतील तर कोरोना रुग्णांवर उपचार कसे करावेत हा प्रश्‍न सर्वांसमोर होता अशा वेळी निलेश लंके हे आपल्या लोकांसाठी पुढे आले आणि म्हणाले, “आपलं काय व्हायचं ते होईल परंतु या लोकांची सेवा कोण करणार? मी नाही करणार तर कोण करणार” माझं जे व्हायचं ते होऊ द्या परंतु माझी लोक जगली पाहिजेत. हे निलेश लंके यांचे शब्द होते.

निलेश लंके यांनी कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून पारनेरच्या भाळवणी येथे शरद पवार यांच्या नावाने १००० बेड्स कोविड सेंटर उभ केलं. या सेंटरमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांच्या जेवणाची सोयदेखील करण्यात आली आहे.

इतकंच नव्हे तर रुग्णांच मनोरंजन व्हाव म्हणून वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित करण्याची व्यवस्था केली आहे. निलेश लंके आता लोकप्रिय आमदार झाले आहेत आणि त्याच मुख्य कारण म्हणजे ते नेहमी लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात जनतेला आधार देतात. निलेश लंके यांना जनतेने लोकनेता आणि देव माणूस अशी नावे दिली आहेत. आणि ती नावे त्यांच्या कार्याला शोभेशी आहेत.

ते स्वतः कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांसोबत राहायचे. त्यांच्या आरोग्याची विचारपूस करायचे इतकच नव्हे तर कोविड सेंटरमध्ये जमिनीवर झोपण्याचा निलेश लंके यांचा फोटो देखील वायरल झाला होता. कोरोना रुग्णांशी स्वतःहून संवाद साधण्यापासून ते त्यांच्या ऑक्सिजनची पातळी तपासण्या पर्यंत अशी सगळी कामे ते स्वतःहून करायचे. त्यांनी बांधलेल्या या कोविड सेंटरची सर्वत्र चर्चा झाली.

त्यांनी रुग्णांची कोणत्याही प्रकारची हेळसांड होऊ नये याची काळजीपूर्वक दक्षता घेतली आहे. त्यांचं कौतुकही करण्यात आला. सोशल मीडियावर देखील त्यांच्या कामाची चर्चा व कौतुक होत आहे. यापूर्वीही निलेश लंके यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ऑगस्ट २०२० मध्ये टाकळी ढाकेश्वरम येथे एक हजार बेड्सच कोविड सेंटर उभारलेलं.

निलेश लंके यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक तर होत आहे. परंतु काही जण त्यांच्या या कामावर ‘प्रसिद्धीसाठी निलेश लंके हे काम करत आहेत’ अशी टीका देखील करत आहेत. यावर उत्तर देताना निलेश लंके म्हणाले, ‘घरात बसून टीका करणं सोपं असतं. टीका करण्याआधी इथे येऊन पहा काय काम चालू आहे ते. टीका करणाऱ्यांनी एकातरी रुग्णांची भेट घेतली असेल का?

कोरोणा रुग्णांच्या सोबत राहून रुग्णांमध्ये मिसळून काम करणं सोपं नाही आहे’. असाच आमदार हवा हे आता महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला वाटू लागलं आहे. निलेश लंके यांनी त्यांच्या अवल्लनीय कार्यातून महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये घर केल आहे.

आम्ही दिलेल्या MLA Nilesh Lanke Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर निलेश लंके यांची माहिती मराठी aamdar nilesh lanke बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Nilesh Lanke information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Nilesh Lanke in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Nilesh Lanke information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!