अण्णा हजारे यांची माहिती Anna Hazare Information in Marathi

Anna Hazare Information in Marathi अण्णा हजारे यांची माहिती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक थोरवीर जन्माला आले ज्यांनी उठता-बसता फक्त आणि फक्त समाजाच्या भल्याचाच विचार केला आपला समाज प्रबोधनकारक व्हावा अशी त्यांची सदोदीत इच्छा असते. प्रत्येक वेळी समाजाला फक्त चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतात तेच समाजसुधारक होय. अण्णा हजारे देखील याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले एक थोर व ज्येष्ठ समाजसुधारक आहेत. आजच्या लेखामध्ये आपण अण्णा हजारे यांचा जीवन परिचय घेणार आहोत.

anna hazare information in marathi
anna hazare information in marathi

अण्णा हजारे यांची माहिती – Anna Hazare Information in Marathi

पूर्ण नाव अण्णा हजारे
जन्म१५ जून १९३८
जन्म गावमुंबईमधील भिंगार
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख समाजसुधारक

जन्म

अण्णा हजारे यांचा जन्म एकोणिसाव्या शतकातला आहे. १५ जून १९३८ रोजी मुंबईमधील भिंगार येथील खोमणे वाड्यामध्ये अण्णा हजारे यांचा जन्म झाला. अण्णा हजारे यांचे मूळ नाव किसन बाबुराव हजारे आहे. अण्णा हजारेंचे वडील बाबूराव हजारे एका आयुर्वेद औषध शाळेमध्ये मजुरीचं काम करायचे.

१९४५ मध्ये अण्णा हजारे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि हजारे भिंगार हे गाव सोडून आपल्या मूळ गावी म्हणजेच राळेगणसिद्धी येथे आले. अण्णा हजारे यांच्या पाठीवर सहा लहान भावंडे होती अण्णा हजारे सगळ्यात मोठे होते त्यामुळे आता घरची जबाबदारी अण्णा हजारे यांच्यावर आली होती.

अण्णा हजारेंनी जेमतेम सातवी ते आठवी पर्यंत शिक्षण घेतलं पुढे घर सांभाळण्यासाठी घराला हातभार लागावा म्हणून पैशाची गरज होती आणि अण्णा हजारे यांनी आपल्या शिक्षण थांबवलं आणि नोकरीच्या शोधात निघाले. नोकरीसाठी अण्णा हजारे दादरला पोहोचले आणि तिकडे फुल विकण्याचं काम सुरू केलं. कालांतराने स्वतःचे स्वतंत्र दुकान सुरू केलं.

लष्करी दल ते समाजसुधारक

अण्णा हजारे यांनी लष्करी दलामध्ये देखील सेवा दिली आहे. इसवी सन १९६२ मध्ये चीनचं भारतावर आक्रमण सुरू होतं आणि जवानांची कमतरता भासत होती त्यामुळे भारत सरकारने धडाक्या मध्ये भरती सुरू केली होती. पंचवीस वर्षाचे अण्णा हजारे त्याच्या शारीरिक क्षमतेचा पात्र नव्हते परंतु गरज होती म्हणून अण्णा हजारे यांना भरती करून घेतलं.

औरंगाबाद मध्ये दोन वर्षाच अण्णा हजारे यांना प्रशिक्षण दिलं गेलं त्यानंतर. १९६३ मध्ये वाहन चालकाचा पद अण्णा हजारे यांच्या हाती दिलं. पुढील दोन वर्षांमध्ये पाकिस्तान ने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अण्णा हजारे यांची बदली पंजाबमधील खेमकरण क्षेत्रांमध्ये होती.

पाकिस्तानी युवा सेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले आणि एकच धुमाकूळ माजला या हल्ल्यांमध्ये इतर वाहनचालकांना सोबत अण्णा हजारे देखील आपल वाहन चालवण्यास सुरुवात केली परंतु या हल्ल्यांमध्ये एकूण एक जवान शहीद झाले. हे सर्व दृश्य अण्णा हजारे यांच्यासाठी चित्तथरारक होतं.

अण्णा हजारे यांना देखील दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा जागृत होऊ लागली. त्याच काळात नेमकं अण्णा हजारे यांच्या हाती स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेलं राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढीला आवाहन हे पुस्तक हाती पडलं. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन अण्णा हजारे यांनी आपण देखील समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असा निर्णय घेतला पुढे अण्णा हजारे यांनी अनेक साहित्य लेखन वाचण्यास सुरुवात केली.

अण्णा हजारे यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे या सगळ्यांची साहित्य लेखन वाचण्यास सुरुवात केली. ही पुस्तकं अण्णा हजारे यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली अण्णा हजारे यांनी या पुस्तकातून बरीच प्रेरणा मिळवून ते समाज सुधारण्यासाठी प्रोत्साहित झाले.

अण्णा हजारे एक महान समाजसुधारक

लष्करी दल सोडल्यावर अण्णा हजारे यांची समाज सुधारक म्हणून वाटचाल सुरु झाली.‌ ते आपल्या मूळ गावी राळेगण सिद्धी येथे परतले. ते म्हणतात ना नवीन गोष्टीची सुरुवात आधी स्वतःपासून करावी तसेच अण्णा हजारे यांनी आपल्या स्वतःच्याच गावाला सुधारण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या पारनेर तालुक्यांमध्ये हे गाव स्थित आहे.

दुष्काळाच आणि गरिबीचं सावट असलेलं हे गाव अण्णा हजारे यांनी त्यांच्या ग्रामस्थांसह बरेच वर्ष अथक प्रयत्न करून गावाचा कायापालट केला. अण्णा हजारे यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नानंतर गावाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये फार फरक जाणवून आला. स्वतःच्या गावांमध्ये सुधारली परिस्थिती पाहून अण्णा हजारे स्वतःच्या कार्यामधून फारच प्रेरित आणि प्रोत्साहित झाले.

त्यांनी पुढे असच समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा निर्णय कायम ठेवला. भ्रष्टाचार आणि अण्णा हजारे यांचा छत्तीसचा आकडा आहे जिथे जिथे भ्रष्टाचार घडला तिथे अण्णा हजारे यांनी आपला आवाज उठवला. भ्रष्टाचाराला मुळापासून उखडून काढण्यासाठी अण्णा हजारे यांनी आतापर्यंत सोळा उपोषण केली आहेत.

तेरा उपोषण महाराष्ट्र सरकारच्या विरोधात. व उरलेली उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली होती. अण्णा हजारे यांची ही सगळी उपोषणे यशस्वी ठरली कारण ज्या ज्या वेळी त्यांनी आंदोलन करून आपल्या मागण्या सरकारपुढे ठेवल्या त्या त्या वेळेस सरकारने स्वीकारल्या वेळप्रसंगी अण्णा हजारे यांना जनकल्याणासाठी तुरुंगवास देखील भोगावा लागला.

स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण समाज सुधारणा घडवून आणणे अत्यंत महत्त्वाचं आहे असं अण्णा हजारे यांना नेहमीच वाटत आलं आहे. अण्णा हजारे यांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली आहे त्यातील त्यांच पहिल आंदोलन इसवी सन १९७९ मध्ये घडलं. हे आंदोलन शासकीय यंत्रणेकडून हेळसांड होऊन गावास वेठीस धरणार्‍या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळांना मान्यता मिळवण्यासाठीच होतं.

या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला अण्णा हजारे यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या आणि त्यांच पहिल उपाशी आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं. अण्णा हजारे यांचं दुसरा यशस्वी उपोषण आंदोलन ७ जून १९८३ रोजी पार पडलं. हे आंदोलन अण्णा हजारे यांनी स्थापन केलेल्या संत यादवबाबा मंदिरा मध्ये घडलं.

या आंदोलनाचा विषय होता महाराष्ट्र सरकार तर्फे राबवल्या जाणाऱ्या वीस कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी. हजारे यांचा तिसरा उपोषण १९८९ साली फेब्रुवारी महिन्यातील २० ते २४ या तारखे मध्ये घडलं. हे उपोषण शेतकऱ्यांच्या विकासासाठी होतं सरकारने मान्य केलेल्या गावाला पाणी पुरवठा धोरण व ठिबक सिंचन अनुदान धोरण या मध्ये फार दोष होते हे दोष दूर व्हावेत म्हणून अण्णा हजारे यांनी हे आंदोलन केलं होतं.

यामध्ये सरकारने अण्णा हजारे यांच्या मागण्या पूर्ण केल्या आणि चार कोटी रुपये मान्य करून सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली. याच वर्षी अण्णांना चौथ आंदोलन कराव लागल. हे आंदोलन सलग नऊ दिवस टिकलं नऊ दिवसांनी सरकारने अण्णांच्या मागण्या पूर्ण केल्या हे आंदोलन शेतकऱ्यांच्या सिंचन वीज पुरवठ्यासाठी केलं होतं.

त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अण्णांना आश्वासन दिलं आणि २५० केव्ही लाईन वीजपुरवठा साठी देण्यात आल्या व इतर गोष्टींसाठी पाच कोटी रुपये दिले. अण्णा हजारे यांनी ५ वे उपोषण भ्रष्टाचारावर केल. अण्णा हजारे यांच भ्रष्टाचारावरील हे पहिले उपोषण १९९४ साली घडलं.

वनविभागातील योजनांमध्ये भ्रष्टाचार घडून आल्यामुळे अण्णा हजारे यांना आवाज उठवावा लागला होता. हे आंदोलन सलग सहा दिवस टिकलं. १९९६ साली अण्णा हजारे यांचं ६ वे उपोषण आंदोलन यशस्वी ठरल. हे आंदोलन होत. राज्यातील शिवसेना भाजप युती सरकारमधील भ्रष्टाचार मंत्र्यांविरुद्ध.

अण्णा हजारे यांनी या आंदोलनामध्ये सलग बारा दिवस उपोषण केलं. आणि तेराव्या दिवशी दोन भ्रष्टाचारी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. सातवा आंदोलन देखील भ्रष्टाचाराविरोधात होतं. १९९७ मध्ये हे आंदोलन घडलं. या आंदोलनामध्ये कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप अण्णांनी लावला होता परंतु अण्णा ते सिद्ध करू शकले नाहीत ज्यामुळे त्यांना तीन महिन्यांची कैद झाली.

हे आंदोलन दहा दिवसाचं होतं. कैदी मधून बाहेर आल्यावर अण्णा हजारे यांनी आठवं आंदोलन केलं. ९ वे उपोषण २००३ साली घडलं. माहितीच्या अधिकारासाठी उपोषण करण्यात आलं होतं. सरकारने माहितीचा अधिकार दिला आणि अण्णांचं हे उपोषण देखील यशस्वी झालं. ९ व्या उपोषणामध्ये माहितीचा अधिकार दिला गेला परंतु त्याची नीट अंमलबजावणी करण्यात आली नाही म्हणून नीट अंमलबजावणी व्हावी म्हणून अण्णा हजारे यांनी १० वे उपोषण केलं.

नऊ दिवसांचा हे उपोषण होतं जे ९ फेब्रुवारी २००४ रोजी सुरू झालं होतं. अण्णांच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि सरकारने बदल्यांचा आणि दप्तर दिरंगाईचा कायदा काढला. अकरावे उपोषण दहाव्या उपोषणाशीच मिळतेजुळते होते दहाव्या उपोषणामध्ये सरकारने माहिती अधिकार यांच्या कायद्यामध्ये बदल आणण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु ते बदल अण्णा हजारे यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी नऊ दिवसाचा अकरा वे उपोषण केलं ते यशस्वी देखील झाले. बारावं उपोषण अण्णांचा मूळ गाव राळेगणसिद्धी येथे २००६ साली घडलं. या उपोषणाचा विषय होता माजी न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगाने दिलेल्या अहवालाच्या अंमलबजावणीचा. पंधरावा आणि सोळावा उपोषण अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी केलं होतं.

आतापर्यंतच्या आंदोलनांमध्ये अण्णा हजारे ११६ दिवसांपेक्षा जास्त काळ उपोषण करत होते. अण्णा हजारे यांनी गोरगरिबांसाठी उठवलेला आवाज समाजामध्ये सुधारणा घडवून आणू लागला होता.

आम्ही दिलेल्या anna hazare information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अण्णा हजारे यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या anna hazare information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about anna hazare in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये anna hazare all information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!