शरद पवार यांची माहिती Sharad Pawar Information in Marathi

Sharad Pawar Information in Marathi – Sharad Pawar Essay in Marathi शरद पवार यांची माहिती “काटेवाडी ते मंत्रालय” हा सर्वात मोठा प्रवास शरद पवार यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर पार केला. शरद पवार हे एका छोट्याशा गावातून जन्माला आलेले भारतीय राजकारणी आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. भारतामध्ये राजकरणात केंद्रीय स्तरावर शरद पवार यांनी आपलं महत्त्वाचे स्थान प्राप्त केलं आहे. आजच्या लेखामध्ये आपण चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सांभाळणारे व “पद्मविभूषण” पुरस्काराचे मानकरी असणारे, शरद पवार यांचा जीवनपट पाहणार आहोत.

sharad pawar information in marathi
sharad pawar information in marathi

शरद पवार यांची माहिती – Sharad Pawar Information in Marathi

पूर्ण नाव शरद पवार
जन्म१२ डिसेंबर १९४०
राष्ट्रीयत्व भारतीय
वडीलगोविंदराव पवार
आईशारदाबाई पवार
जन्मगावपुणे जिल्ह्यातील बारामती

जन्म

शरद पवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती येथील आहे. शरद पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० मध्ये झाला. शरद यांच संपूर्ण नाव शरदचंद्र गोविंदराव पवार असं आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या घरात शरद पवार यांचा जन्म झाला. शरद पवार हे लहानपणापासूनच राजकारणाकडे वळले गेले. त्यांची आई शारदाबाई या पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणामध्ये कार्य करत होत्या. त्यामुळे शरद पवार यांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवायला त्यांच्या आईने शिकवलं.

शिक्षण

शरद पवार यांना त्यांच्या आईकडून राजकारणा विषयी ची शिकवण मिळायची. त्यासोबतच राजकीय व सामाजिक विचार करण्याची क्षमता शरद पवार यांच्याकडे होती. शरद पवार यांनी आपल्या राहत्या ठिकाणावरून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हे बारामती येथील विद्यालय येथे शरद पवार यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं.

त्यानंतर पुण्यामध्ये पवारांचं बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय शिक्षण चालू होतं, त्यावेळेला पवार यांनी जनरल सेक्रेटरी म्हणून महाविद्यालय व विद्यापीठ लेवलवर नेतृत्व केलं होतं. शिक्षण चालू असतानाच शरद पवार यांचा परिचय युवक काँग्रेसशी झाला. आणि तिथूनच त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं.

जसे राजकारणामध्ये शरद पवार यांचे अनेक चाहते आहेत तसेच, शरद पवार क्रिकेटचे चाहते आहेत. शरद पवार यांना क्रिकेट खेळायला फार आवडतं. १९ नोव्हेंबर २००५ मध्ये शरद पवार यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्ष पदी निवड झाली. आणि १ जुलै २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदाचा कारभार शरद पवार यांच्या हाती आला. हे पण सांभाळणारे ते “दुसरे” भारतीय आहेत.

वैयक्तिक आयुष्य

शरद पवार यांनी कसोटी क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांची मुलगी प्रतिभा हिच्याशी लग्न केले आहे. या दाम्पत्यांना सुप्रिया नावाची एक मुलगी देखील आहे. सुप्रिया देखील आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे. सुप्रिया सध्या सतराव्या लोकसभेत बारामती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

राजकीय आयुष्य

शरद पवार यांच राजकीय आयुष्य खरतर शाळेमध्ये असताना सुरू झालं होतं. शाळेमध्ये असताना गोवा मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार यांनी काही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांचा मेळा आयोजित केला होता. त्यानंतर शरद पवार कॉलेजमध्ये असताना देखील विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून कार्यरत होते.

कॉलेजमध्ये असतानाच विद्यार्थी संघटनेच्या एका उत्सवासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना मेन गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं. त्या वेळी या समारंभामध्ये पवार यांनी कडकडीत भाषण दिलं. हे भाषण यशवंतराव चव्हाण यांना खूपच आवडलं. आणि तेव्हापासून यशवंतराव चव्हाण पवारांचे गुरु बनले.

यशवंतराव चव्हाण आणि पवार यांच्या गाठीभेटी वाढत गेल्या. यशवंतराव पवार यांना राजकारणाबद्दल रोज काही ना काही चांगलं शिकवायचे. यशवंतराव चव्हाण यांच्याकडून पवारांना खूप काही शिकायला मिळालं. अगदी चोवीस वर्षाचे असताना पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद आलं.

इसवी सन १९६६ मध्ये पवार यांना युनिस्को द्वारे स्कॉलरशिप मिळाली. पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड या सर्व देशांमध्ये जाऊन, त्या देशातील वेगवेगळ्या राजकारण पद्धतीचा अभ्यास शरद पवार यांना या स्कॉलरशिप द्वारे करता आला. राजकारणात उतरल्यावर शरद पवार यांना लोकांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करायला जास्त वेळ लागला नाही.

त्यांची बुद्धिमत्ता, कणखरपणा, सामाजिक आणि राजकीय विचारांचा समतोल राखण्याची शमता त्यांच्यामध्ये आहे. सन १९६७ मध्ये शरद पवार हे राजकीय विधान सभा निवडणुकीमध्ये निवडून आले. बारामती मतदार संघामध्ये त्यांनी विजय मिळवला. सन १९७२ आणि सन १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये देखील शरद पवार यांनी पहिला नंबर काढला म्हणजे निवडून आले.

१९७८ मध्ये शरद पवार हे काँग्रेस पक्ष सोडून जनता पक्षामध्ये सामील झाले. आणि या पक्षासोबत मिळून महाराष्ट्र मध्ये युती सरकार स्थापन केलं. १८ जुलै १९७८ रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शरद पवार हे राज्यातील आतापर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. इंदिरा गांधी सत्तेवर परत आल्यानंतर सन १९८० मध्ये त्यांनी सर्वांचे सरकार उध्वस्त करून टाकलं.

त्यामध्ये शरद पवार यांचा सरकारदेखील बरखास्त झालं. सन १९८४ मध्ये शरद पवार लोकसभा निवडणूक मधून निवडून आले. इसवी सन १९७५ मध्ये शरद पवार विधानसभा निवडणुकी मधून पुन्हा बारामती मधून जिंकून आले. आणि त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इसवी सन १९८७ मध्ये शरद पवार काँग्रेस पक्षामध्ये गेले.

सन १९८८ मध्ये राजीव गांधी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांना योग्य समजलं. इसवी सन १९८८, २६ जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांचा दुसरा शपथविधी पार पडला. नंतर काँग्रेस पक्षाला आव्हान करण्यासाठी शिवसेना व भारतीय जनता पक्ष पुढे आले. या पक्षांनी आपली युती करून काँग्रेस पक्षाला भरपूर आवाहने दिली.

काँग्रेस पक्षाची जबाबदारी आता शरद पवार यांच्यावर होती. सन १९९० मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दणक्यात संपूर्ण राज्यभरात प्रसार सुरू केला. या राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे २८८ पैकी १४१ जागा जिंकल्या.

शरद पवार यांना बारा अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला आणि इसवी सन १९९० चार मार्च रोजी शरद पवार यांचा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसरा शपथविधी पार पडला. पुढे नरसिंह राव जे भारताचे माजी पंतप्रधान होते. त्यांनी शरद पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संरक्षणमंत्री म्हणून निवड केली. ६ मार्च १९९३ रोजी पून्हा महाराष्ट्र राज्याचा कारभार शरद पवार यांच्या हाती गेला.

शरद पवार यांना मुख्यमंत्री बनण्याचा प्रक्रियेमध्ये अनेक संकटांवर मात करावी लागली. राज्यामध्ये कुठलीही घटना घडायची की सगळे अपक्षनेते शरद पवार यांच्यावरच बोट ठेवायचे. शरद पवार जेव्हा चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले. तेव्हा राज्यांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या आणि भयंकर घटना घडत होत्या.

त्यातीलच काही महत्वाच्या घटना म्हणजे मुंबई मध्ये झालेला बॉम्बस्फोट, लातूर मधील भूकंप, राज्यांमध्ये वाढणारा भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींसाठी काँग्रेस पक्षावर आणि मुख्य म्हणजे शरद पवार यांच्यावर आरोप करण्यात आले. हे सगळे आरोप प्रत्यारोप यांना उत्तर देत शरद पवार राजकारण करत राहिले.

शरद पवार यांनी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ५० हून अधिक वर्षांसाठी काम केलं आहे. याशिवाय महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री पद त्यांच्या हाती होते. सन १९९९ मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत. शरद पवार यांनी राजकारणा सोबतच सामाजिक क्षेत्रांमध्ये देखील प्रगती घडवून आणली.

त्यांनी अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या. विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास प्रतिष्ठान,  वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, या सर्व शिक्षण संस्था शरद पवार यांनी स्थापन केल्या आहेत. शरद पवार यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकार तर्फे २०१७ साली “पद्मविभूषण” हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

शरद पवार यांच्या जीवनावर माहिती देणारे आणि शरद पवार यांच्या कामातून मिळणारी प्रेरणा काही लेखकांनी चरित्रे आत्मचरित्रे यांच्या माध्यमातून लोकांसमोर आणली आहे. शरद पवार यांच्यावर काही चरित्र-आत्मचरित्र प्रदर्शित झाली आहेत. त्यातीलच काही लोकांच्या पसंतीस पडलेली चरित्र-आत्मचरित्र खालील प्रमाणे.

साहेब (शरद पवार चरित्रग्रंथ) लेखक व संपादक – सोपान गाडे. लोकनेते शरद पवार (लेखक राम कांडगे). शरद पवार – ए मास लीडर (लेखक दीपक बोरगावे). शरद पवार यांनी जेव्हापासून राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आहे तेव्हापासून राजकारणात शरद पवार नावाचा धुरळा उडाला आहे. शरद पवार यांचे राजकारणातील स्थान आणि कार्य हे नेहमीच अजरामर राहील.

आम्ही दिलेल्या sharad pawar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शरद पवार यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sharad pawar in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sharad pawar information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sharad pawar latest news in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!