मदर तेरेसा माहिती मराठी Mother Teresa Information in Marathi

Mother Teresa Information in Marathi मदर तेरेसा यांची माहिती दया, प्रेम, आधार, परोपकार या सगळ्यांचा एक उत्तम उदाहरण म्हणजे मदर तेरेसा. मदर तेरेसा यांची सामाजिक कार्यातील कारकीर्द सर्वात उत्कृष्ट आणि श्रेष्ठ आहे. अगदी निस्वार्थ पणाने त्यांनी गरजू, गरीब, लाचार, पीडित, रुग्ण, शोषित, अनाथ मुलं, वृद्ध पीडित महिला या सगळ्यांना सढळ हाताने मदत केली. मदर तेरेसा यांनी स्वतःला सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतलं त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य फक्त आणि फक्त लोकांची सेवा करण्यामध्ये अर्पण केलं. येशूच्या शिकवणीप्रमाणे जेव्हा आपण निस्वार्थपणे एखाद्याची मदत करतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपात तीच मदत आपल्याकडे देखील येते.

मदर तेरेसा यांनी देखील तेच केलं त्यांनी प्रसिद्धीसाठी किंवा स्वतःच्या भल्यासाठी लोकांना मदत केली नाही तर त्यांना गरीब आणि गरजवंतांनसाठी खरंच मनातून प्रेम, काळजी निर्माण झाली आणि त्यांनी समाजसेवा करायचं ठरवलं. आणि संपूर्ण जगभर त्या मदर तेरेसा या नावाने ओळखू जाऊ लागल्या.

खऱ्या अर्थाने त्या लोकांच्या मदर होऊन त्यांना प्रत्येक गोष्ट देत होत्या.जस एक आई आपल्या मुलाला देते. त्यांनी गरीब गरजू लोकांना आपलं स्वतःच्या मुलासारखं मानून त्यांची काळजी घेतली. दयाळू, प्रेमळ मेरी सिस्टर खऱ्या अर्थाने मदर तेरेसा कशी बनली हे आपण आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.

mother teresa information in marathi
mother teresa information in marathi

मदर तेरेसा माहिती मराठी – Mother Teresa Information in Marathi

मदर तेरेसामाहिती
संपूर्ण नावअँजेझो गोंक्शे बोजाक्सीयू
जन्म26 ऑगस्ट 1910
जन्मगावस्कोप्जे, उत्तर मॅसेडोनिया
मृत्यू5 सप्टेंबर 1997, कोलकाता
पुरस्कारशांततेचे नोबेल पारितोषिक, भारतरत्न, ऑर्डर ऑफ द स्माइल, अधिक

नोबेल पुरस्कार

मदर टेरेसा एक महान समाज सेविका ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य फक्त गरीब आणि गरजू लोकांची मदत करण्यासाठी अर्पण केलं. आयुष्य हे दुसऱ्यांसाठी जगावं अशी त्यांची शिकवण होती. येशू यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. येशूने दिलेली शिकवणी चा खरा अर्थ मदर टेरेसा यांनी लोकांना समजावून सांगितला त्या स्वतः जरी ख्रिश्चन धर्माच्या असल्या तरी लोकांना मदत करताना त्यांनी जात धर्म काहीच बघितलं नाही.

अशा थोर आणि महान व्यक्तीला पुरस्कार देणं आणि त्यांचं कौतुक करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे मदर तेरेसा यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांची समाजसेवा पाहून भारत सरकारने मदर तेरेसा यांना भारतात द्वितीय सर्वोच्च मानला जाणारा पद्मश्री पुरस्कार देऊन मदर तेरेसा यांना सन्मानित केलं.

हा पुरस्कार मदर तेरेसा यांना १९६२ मध्ये देण्यात आला. आणि काही दिवसांनी त्यांना आपल्या देशातील सर्वोच्च सर्वात श्रेष्ठ आणि उच्च मानला जाणारा भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार खूपच कमी मोजक्या आणि कर्तृत्ववान लोकांना मिळतो ज्यामध्ये मदर तेरेसा या निश्चित येतात.

१९७९ मध्ये त्यांची समाज सेवेमधील कामगिरी पाहून त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. किती थोर होत्या मदर तेरेसा ज्यांनी खरंच स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार केला जशी एक आई स्वतः आपल्या मुलाचा विचार करते मदर तेरेसा यांना मिळालेली नोबेल पुरस्कार सोबतची रक्कम १९२,००० डॉलर्स त्यांनी गरीब लोकांच्या मदतीसाठी पुढे केले. १९८५ मध्ये त्यांना मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार देखील जाहीर झाला.

शिक्षण

मदर तेरेसा यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण स्कोपजे येथील शाळेमधून पूर्ण केलं. सरकारी शाळेमधून तिचे शिक्षण पूर्ण करता करता तिला सामाजिक कार्यामध्ये आवड निर्माण झाली. मदर टेरेसा यांना नन होऊन स्वतःला प्रभू येशू यांची सेवा करण्यात झोकून द्यायचं होतं त्यामुळे त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी नन समुदायाच्या सिस्टर्स ऑफ लोरटो मध्ये भाग घेतला.

त्यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांचं घर सोडलं. पुढे आयलंड मधे त्यांनी इंग्रजी भाषेचे शिक्षण घेतलं. एका इन्स्टिट्यूटमधून त्या नन होण्याचा प्रशिक्षण घेत होत्या.

वैयक्तिक आयुष्य

मदर टेरेसा या मूळच्या भारतीय नव्हत्या त्यांचा जन्म युगोस्लाव्हियातील स्कोपजे या गावी २७ ऑगस्ट १९१० रोजी झाला. त्यांचा जन्म एका गरीब घराण्यात झाला. त्यांचे वडील एक साधे व्यापारी होते आणि आई गृहिणी. अग्नेस गोंझा बियाजिजू हे मदर टेरेसा यांचं मूळ नाव आहे. मदर तेरेसा यांचे बालपण संघर्षमय होतं.

वयाच्या अगदी सातव्या वर्षात मदर तेरेसा यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यामुळे घराची परिस्थिती बेताची होती. मदर तेरेसा यांच्या आईने मदर तेरेसा व त्यांच्या भावंडांच संगोपन केलं मदर तेरेसा यांच्या विचारांमध्ये त्यांच्या आईच्या शिकवणीचा जास्त प्रभाव पडला. मदर तेरेसा यांची ईसा मसीहा यांच्यावर फार श्रद्धा होती.

लहानपणी मदर तेरेसा यांच्या आई आणि बहिणी सोबत चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना करायच्या. मदर तेरेसा यांनी स्वतः हालाखीत जीवन काढलं असल्यामुळे त्यांना मोठं होऊन गोरगरिबांसाठी काहीतरी करायचं होतं त्यांना येशूची श्रद्धा, प्रसार संपूर्ण जगभर पसरवायची होती. म्हणूनच त्यांनी पुढे जाऊन स्वतःला येशुच्या श्रद्धे मध्ये झोकून देण्याचं ठरवलं त्यासोबतच गोरगरिबांना मदत करायचं देखील ठरवलं.

राजकीय आयुष्य

मदर तेरेसा या समाजसेविका होत्या. समाज सेवेमध्ये त्यांची कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. विदेशातील पोरगी इकडे भारतात येऊन मदर तेरेसा या नावाने ओळखली जाऊ लागली आणि हीच ओळख ती पुन्हा सातासमुद्रापार देखील घेऊन गेली. गरिबाला मदत करणं हा मदर तेरेसा यांचा छंद होता.

गरीब, लाचार, शोषित, पिडीत, दलित, अपंग अशा प्रत्येक माणसाला जो अडचणीत असेल त्याला मदत करणं हे मदर तेरेसा यांनी त्यांचं कर्तव्यच मांनलं होतं. नन प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी धार्मिक प्रतिज्ञा घेतली आणि त्यांचं नन‌ मध्ये रूपांतर झालं. त्यांना सिस्टर मेरी असं नाव देण्यात आलं.

त्या भारतामध्ये आल्या आणि दार्जिलिंग येथे नन ची शपथ घेतली. पुढे त्या कलकत्ता येथे गेल्या मदर तेरेसा यांचे हिंदी आणि बंगाली भाषेत चांगला दांडगा अनुभव आहे त्यामुळे त्यांनी तेथील संत मेरी स्कूल मध्ये गरीब मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. मदर तेरेसा या गरीब मुलांना शिक्षण द्यायच्या त्यामुळे ही मुलं झोपडपट्टी येथून यायची स्कूलच्या आजूबाजूला असलेली झोपडपट्टी मध्ये अतिशय गरिबी, आजारपण, असह्य अशी लोकं होती.

एक दिवस मदर तेरेसा यांचा लक्ष बाजूच्या झोपडपट्टीमध्ये गेलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की तिथली लोक अतिशय गरिबीत जीवन जगत आहेत. त्यांना आरोग्याच्या सेवा देखील उपलब्ध नाही आहेत. त्यावेळी मदर टेरेसा यांनी गरीब, असह्य, लाचार, पीडित, शोषित, दलित, अपंग अशा गरजवंतांची मदत करण्याचं ठरवलं.

मदर तेरेसा यांनी स्वतःला समाजसेवे मध्ये वाहून दिलं आणि त्यांनी समाजसेवा सुरू केली. सामाजिक कार्यामध्ये त्या इतक्या पुढे गेल्या की त्या खऱ्या अर्थाने सर्वांच्या मदर बनल्या आणि त्यांना मदर तेरेसा असं नाव पडलं. मदर टेरेसा यांनी लहान मुलं ज्यांना घर नाही, जे अनाथ आहेत तसेच म्हातारी माणसे, आजारी पीडीत लोक ज्यांचे खाण्यापिण्याचे हाल होतात अशा लोकांना मदर टेरेसा यांनी आपलंसं केलं.

त्यांना प्रेम, माया दिली त्या सोबतच त्यांच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा देखील पुरवल्या. गरजू आणि होतकरू स्त्रियांना देखील त्यांनी आधार दिला. अनाथ मुलांसाठी मदर तेरेसा यांनी एक वेगळा आश्रम सुरू केलं वृद्धांसाठी देखील वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या तसेच गरीब आणि आजाराने त्रस्त अशा लोकांसाठी देखील वेगवेगळ्या योजना राबवल्या.

मदर तेरेसा यांनी स्वतः पटणा येथील मेरी हॉस्पिटल मधून नर्स च प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःला समाज सेवेमध्ये समर्पित केलं. ७ ऑक्टोंबर १९५० मध्ये मदर तेरेसा यांनी मिशनरी ऑफ चारिटी या संस्थेची स्थापना केली.

त्यावेळी समाजामध्ये स्त्रिया फार हाल अपेष्टा सहन करायच्या त्या वेळी एक स्त्री स्वतः दुसऱ्या स्त्रीला मदत आणि सहाय्य करते हे लोकांना बघवायचं नाही त्यामुळे खूप लोकांनी मदर तेरेसा यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावून टीका करून त्यांचं हसं केलं.

परंतु मदर तेरेसा यांनी लोकांकडे लक्ष न देता आपलं समाज सेवेचे कार्य सुरूच ठेवलं. मदर तेरेसा यांनी खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जगण्यासाठी एक नवीन प्रेरणा जागी केली असहाय्य आणि आशा नसलेल्या लोकांमध्ये एक आशेचा नवीन किरण जागा केला. खऱ्या अर्थाने मदर तेरेसा यांनी लोकांना आपलंसं करून त्यांना प्रेम दिलं.

निर्मल रुदय आणि निर्मल शिशु भवन आश्रम ही दोन आश्रम स्थापन केली. या आश्रमात मध्ये अनाथांची तसेच वृद्धांची व रुग्ण पीडितांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली जायची. पश्चिम बंगालमध्ये मदर तेरेसा यांनी कुष्ठरुग्णांसाठी कुष्ठ गृहाची स्थापना केली त्यावेळी समाजामध्ये कुष्ठ रुग्णांना हडतूड केलं जायचं. परंतु मदर तेरेसा यांनी त्यांच्यावरती उपचार करून त्यांना आपुलकी दाखवली प्रेम दिलं.

मदर तेरेसा यांच्या मते आपण जीवन दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे तेच खरं जीवन असतं. मदर टेरेसा यांनी फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्ये देखील मिशनरीज ऑफ चारिटी ही संस्था पसरवली. या संस्थेच्या शाखा जवळपास ५२ देशांमध्ये आहेत. इतकच नव्हे तर २२७ ठिकाणी या संस्थेची सेवा केंद्रे आहेत.

या संस्थेकडून इतर देशात आणि भारतामध्ये चालवल्या जाणाऱ्या ९८ शाळा, १०२ कुष्ट रोग उपचार रुग्णालय, ४८ अनाथालय, ६२ आश्रम गृह ४२५ फिरती रुग्णालय. खरंच किती महान समाजसेविका होत्या मदर तेरेसा. मदर तेरेसा यांनी त्यांच्या हस्ते सुरू केलेल्या सर्व आश्रम संस्था या सगळ्यांचा खर्च मदर तेरेसा यांना मिळालेल्या पुरस्कारांची मधून केला जायचा.

किती निस्वार्थीपणाने त्या लोकांची सेवा करत होत्या. मदर तेरेसा यांनी त्यांच्या इतक्या छोट्याशा चारिटी संस्थेचे खूप मोठ्या उपशाखा आणि शाखांमध्ये रूपांतर केलं. खरंच खूप मोठी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. कोण कोणाचं नसतं असं बोलणाऱ्या या जगामध्ये मदर तेरेसा यांनी गरीब आणि बेघर तसेच गरजवंतांना आपलं करून त्यांना आधार दिला.

मदर तेरेसा यांचा हा प्रवास बघून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आज-काल सगळेजण आपला स्वार्थ पाहतात परंतु जो खऱ्या अर्थाने निस्वार्थीपणे दुसऱ्याला मदत करतो तोच खरा माणूस आणि तीच खरी माणुसकी हा संदेश मदर तेरेसा आपल्यापर्यंत त्यांच्या या कहानी मधून पोहचवत आहेत.

मदर तेरेसा या खूप सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. मदर तेरेसा यांचे सामाजिक कार्यामध्ये असणार स्थान व मदर तेरेसा यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांच्या वागणुकीतून प्रभावित होणार्‍या अनेक महिला आणि समाजसेवक आहेत.

समाज कार्य हादेखील एक धर्म आहे आणि या धर्माचा स्वीकार प्रत्येक माणसाने करावा. समाजसेवा हा धर्म जर प्रत्येकाने स्वीकारला तर नक्कीच हे जग आनंदी आणि प्रेमाने भरून जाईल माणुसकीचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचेल.

मृत्यू

माणुसकी काय असते हे मदर तेरेसा यांच्या कडून शिकावं. माणुसकीचे उत्तम उदाहरण म्हणजे मदर तेरेसा त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेमध्ये अर्पण केलं. जिथे लोक फक्त स्वतःच्या फायद्या पूर्ती काम करतात अशा वेळेमध्ये मदर टेरेसा यांनी निस्वार्थीपणे गरजू लोकांना मदत केली.

काही काळाने मदर तेरेसा यांची तब्येत थोडी फार बिघडू लागली तरी पण त्यांनी स्वतःकडे लक्ष न देता त्यांची समाज सेवा सुरूच ठेवली. १९८३ मध्ये त्या रोमला गेल्या होत्या. तिथे त्या पोप जॉन पॉल द्वितीय याच्या भेटीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. १९८९ मध्ये त्यांना पुन्हा हृदयविकाराचा दुसरा झटका आला अशा परिस्थितीमध्ये देखील त्या काम करत होत्या.

हळूहळू मदर तेरेसा यांची तब्येत खराब होत गेली. १९९१ त्यांना किडनी आणि हृदयाचा त्रास सुरू झाला. ५ सप्टेंबर १९९७ मध्ये त्यांचं निधन झालं. मदर टेरेसा यांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये देखील समाजसेवा सुरू ठेवली. कोलकत्ता येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकांना मायेचा आधार देणाऱ्या मदर तेरेसा खूप लोकांना पोरक्या करून गेल्या.

मदर तेरेसा यांच्या जाण्याने देशभरात व देशा बाहेर देखील शोककळा पसरल्या. समाज सेवकांसाठी तर खूप मोठा आधारच गायब झाल्यासारखं परिस्थिती उद्भवली असेल.

आम्ही दिलेल्या mother teresa information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मदर तेरेसा बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या madar teresa information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about mother teresa in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर mother teresa mahiti असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!