किरण बेदी माहिती मराठी Kiran Bedi Information in Marathi

Kiran Bedi Information in Marathi – Kiran Bedi Details in Marathi किरण बेदी यांची ओळख भारताची पहिली महिला ऑफिसर म्हणून केली जाते. किरण बेदी एक धाडसी, नीडर, कर्तृत्ववान, हुशार स्त्री आहेत. त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या बळावर खूप मोठं नाव कमावलं. एका गरीब घरात जन्मलेली स्त्री पुढे जाऊन भारताची पहिली महिला ऑफिसर 1st IPS Officer in India बनली. त्यावेळी महिलांचे शिक्षण घेणं समाजात मान्य नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये देखील किरण बेदी यांनी खूप मोठी कामगिरी करून दाखवली. आजच्या लेखामध्ये आपण किरण बेदी यांची आयपीएस होण्यामागची कथा तसेच त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांचा आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास आजच्या ब्लॉगद्वारे सविस्तर पाहणार आहोत.

किरण बेदी या फक्त एक आयपीएस ऑफिसर नव्हत्या तर त्यांनी केलेल सामाजिक आणि राजकीय कार्य देखील उत्तम आहे. त्या विषय देखील माहिती घेणार आहोत.

kiran bedi information in marathi
kiran bedi information in marathi

किरण बेदी माहिती मराठी – Kiran Bedi Information in Marathi

नाव(Name)किरण बेदी
जन्म (Birthday)९ जून १९४९
जन्मस्थान (Birthplace)पंजाब मधील अमृतसर
वडील (Father Name)प्रकाश लाल पेशावरिया
पती (Husband Name)ब्रुज बेदी
आईचे नाव (Father Name)प्रेम पेशावरिया
मुले (Mother Name)सानिया बेदी

जन्म

पंजाब मधील अमृतसर येथे किरण बेदी यांचा जन्म एका कापड व्यवसायिक च्या घरात झाला. ९ जून १९४९ ही किरण बेदी यांची जन्मतारीख आहे. छोट्याशा गरीब घरात जन्माला येणारा किरण बेदी पुढे जाऊन संपूर्ण देशभरात त्यांच्या नावाचा जल्लोष साजरा होईल याची त्यांना जराही कल्पना नव्हती. प्रकाश लाल म्हणजे किरण यांचे वडील यांचा कापड व्यवसाय होता.

त्यासोबतच ते एक टेनिस खेळाडू देखील होते किरण बेदी यांचे बालपण शीख आणि हिंदू धर्म शिकण्यात गेलं. किरण बेदी यांना तीन बहिणी देखील होत्या. किरण यांचे मूळ नाव किरण पेशवारिया असं होतं. लग्नानंतर त्यांच्या नावापुढे बेदी लागलं.

शिक्षण

किरण यांच प्राथमिक शिक्षण अमृतसर मधील सेक्रेड हार्ट कॉन्वेंट या शाळे द्वारे सुरू झालं. शाळेत असतानाच त्यांनी नॅशनल कैडेट कॉप्सच (NCC) प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्या फक्त प्राथमिक शिक्षणावर थांबल्या नाही तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढील शिक्षण देखील घेतलं.

१९६८ मध्ये त्यांनी इंग्रजी या भाषेची पदवी अमृतसर येथील महिला महाविद्यालयातून मिळवली. दोन वर्षानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठात द्वारे १९७० मध्ये त्यांनी राज्यशास्त्र मध्ये एम.ए ही पदवी मिळवली. खरं तर एकोणिसाव्या शतकामध्ये शिक्षण आणि बाकीचे क्षेत्रांमध्ये पुरुषांचे वर्चस्व होतं.

अशा परिस्थितीमध्ये किरण बेदी यांचा शिक्षण घेणं समाजाच्या डोळ्यात खूपंन सहाजिकच होतं त्या सगळ्या प्रसंगावर मात करून किरण बेदी यांनी १९८८ मध्ये दिल्ली मधील विश्व विद्यालयातून ची पदवी मिळवली. १९९३ मध्ये त्यांनी आय आय टी मधून समाजशास्त्र या विषयावर पीएचडी मिळवली.

वैयक्तिक आयुष्य

किरण बेदी यांचं बालपण तसं चांगलं गेलं जन्म जरी गरीब घराण्यात झाला असला तरी त्यांच्या वडिलांनी त्यांना चांगलं शिक्षण दिलं ज्यामुळे त्या आपलं स्वप्न साकार करू शकल्या. किरण यांना बहिणी देखील आहेत त्यातल्या दोघीजणी टेनिस खेळाडू आहेत. किरण यांचे वडील यांनादेखील टेनिस ची फार आवड आहे ते देखील टेनिस खेळतात त्यांच्यातील काही गुण किरण यांच्यामध्ये आले आहेत.

किरण या भारतासाठी श्रीलंका मध्ये जाऊन दोन वेळा टेनिस स्पर्धा खेळून आल्या आहेत. १९७३ मध्ये भारताचा श्रीलंकेविरुद्ध प्रतिनिधित्व करून लियोनेल फॉन्सेका मेमोरियल ही ट्रॉफी भारतात आणली. ११६६ मध्ये जूनियर लॉन टेनिस चॅम्पियनशीप ही स्पर्धा जिंकली.

१९७५ मध्ये त्यांनी अखिल भारतीय अंतरराष्ट्रीय लॉन टेनिस चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि ती जिंकून देखील दाखवली. १९७६ साली राष्ट्रीय महिला लाॅन टेनिस चॅम्पियनशिप जिंकली. १९६८ मध्ये किरण यांनी ऑल इंडिया इंटरवेर्सिटी टेनिस टायटल हा किताब हस्तगत केला.

त्यांनी ऑल इंडिया हार्ड कोर्ट टेनिस चॅम्पियन व १९७४ या वर्षात चंदिगड मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला चॅम्पियन हि किरण यांची ओळख आहे. टेनिस खेळांमध्ये त्यांनी उत्तम कारकीर्द गाजवली. त्यांची आई एक उत्तम गृहिणी आहेत त्यांचेच गुण किरण त्यांच्या मध्ये उतरले आहेत.

आई-वडिलांचे चांगले संस्कार किरण यांच्यावर असल्यामुळे त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखी आहे. काय योगायोग म्हणावा किरण यांचे पती देखील एक टेनिस खेळाडू आहेत. ब्रुज बेदी असं त्यांचं नाव आहे. किरण आणि ब्रुज बेदी यांचा विवाह ९ मार्च १९७२ मध्ये संपूर्ण झाला. टेनिस खेळताना या दोघांची भेट झाली होती. किरण बेदी यांना एक मुलगी देखील आहे सानिया बेदी. २०१६ मध्ये त्यांच्या पतींची कर्करोगामुळे निधन झाले.

किरण बेदी यांचे कार्य

म्हणतात ना मुलगी शिकली प्रगती झाली. एक मुलगी शिक्षण घेऊन स्वतःमध्ये घरामध्ये आणि समाजामध्ये अनेक बदल निर्माण करू शकते हे किरण बेदी यांनी समाजाला पटवून दिलं. किरण बेदी या पहिल्या महिला आयपीएस ऑफिसर आहेत. किरण बेदी यांची आयपीएस मध्ये निवड झाली आणि त्यांचं प्रशिक्षण राजस्थान मधील माउंट अबू येथे सुरू होतं.

एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे अरुणाचल प्रदेश गोवा मिझोरम संघ शासित प्रदेश कैडर मध्ये जवळपास ८० पुरुषांमध्ये त्या एकट्या महिला होत्या. १९७५ मध्ये त्यांच्या कामाची सुरुवात झाली. आधी त्या दिल्ली येथील चाणक्यपुरी पोलीस स्टेशन उप मंडळ अधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांचं काम बघून त्यांची १९७९ मध्ये पश्चिम दिल्लीत डीसीपी या पदावर नेमणूक झाली.

तिथे राहून त्यांनी काही चांगले बदल घडवून आणले. तिथे क्राईम कंट्रोलिंग साठी पुरेसे ऑफिसर नव्हते त्यामुळे किरण बेदी यांनी किती लोकांना स्वयंसेवक बनवलं. त्यांच्या मदतीसाठी मोठी पोलीस फोर्स उपलब्ध करून दिली. १९८१ मध्ये दिल्लीतील ट्राफिक डीसीपी हे पद किरण बेदी यांच्याकडे आले.

त्यावेळी किरण बेदी यांनी खूप वेगवेगळे प्रश्न सोडवले शहरात होणारी वाहतूक कोंडी याच्यावर उपाय काढला तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणली. अवैध पार्किंग वर काही निर्बंध व नियम लादण्यात आले. १९८३ मध्ये त्यांची बदली गोवा येथे एसीपी ट्राफिक पोलीस म्हणून झाली.

१९८४ मध्ये त्या पुन्हा दिल्लीमध्ये आल्या दिल्ली येथील रेल्वे सुरक्षा बल येथे उप कमांडट म्हणून त्यांना पदवी मिळाली. १९८५ मध्ये त्यांनी दिल्लीतील पोलिस मुख्यालय खूप छान प्रकारे सांभाळून दाखवलं हे सर्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. १९८८ मध्ये उपनिदेशक आणि एनसीबी ही दोन पदे किरण बेदी यांच्या हाताखाली होती.

मिझोरममध्ये १९९० मध्ये त्यांची दीप्टी इंस्पेक्टर जनरल या पदासाठी नियुक्ती करण्यात आली. तीन वर्षांनी म्हणजेच १९९३ मध्ये त्यांची दिल्लीच्या आईजी या पदावर नेमणूक झाली. २००५ मध्ये डायरेक्टर जनरल ऑफ इंडिया ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये त्या कार्यरत होत्या.

२००७ त्यांची निवृत्ती झाली. भारताची पहिली महिला एसीपी म्हणून त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे कारकीर्द गाजवली. परंतु त्यांच समाजात बदल घडवून आणण्याची इच्छा अजून वाढत गेली त्यांचं कार्य इथे थांबल्या नाहीत तर त्यांनी समाज सेवेमध्ये देखील भर घातला. अण्णा हजारे यांच्यासोबत २००१ मध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन हे आंदोलन घांडत या आंदोलनामध्ये किरण बेदी या सहभागी होत्या.

त्यांनी नवज्योति इंडिया फाउंडेशन या एनजीओची स्थापना केली. हा एनजीओ त्यांनी महिलांना पाठिंबा देण्यासाठी काढला महिलांनी शिक्षण घेणं किती गरजेचा आहे तसेच असाक्षरता, महिलांचे होणारं शोषण हे सगळे मुद्दे समाजासमोर मांडले.

२०१५ मध्ये त्या भाजप पक्षात सामील होऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात द्वारे मुख्यमंत्री पदा साठी निवडणुकीत उभ्या राहिल्या परंतु तिथे त्यांना अपयश आलं.

किरण बेदी पिक्चर

किरण बेदी यांच्या कार्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित अनेक पिक्चर, साहित्य, कथा, पुस्तकं निघाली आहेत. कर्तव्यम्‌ हा किरण बेदी यांच्या आयुष्याची कथा सांगणारा पहिला तेलुगू चित्रपट आहे. त्यानंतर विजयाशांती आयपीएस हा दुसरा चित्रपट निघाला. पुढे तेजस्विनी हा हिंदी चित्रपट किरण बेदी यांच्यावर काढण्यात आला.

एस मॅडम सर! हा इंग्रजी चित्रपट मेगन डॉनेमन या ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माता ने काढला. तसेच किरण बेदी यांच्या वर आधारित पुस्तके देखील काढण्यात आली त्यातील एक प्रसिद्ध पुस्तक म्हणजे आधुनिक भारतीय स्त्रीरत्न: किरण बेदी.

आम्ही दिलेल्या kiran bedi information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “किरण बेदी” यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about kiran bedi in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of kiran bedi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kiran bedi details in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!