My Dream City Essay in Marathi – My Dream City Mumbai essay in English माझ्या स्वप्नातील शहर निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये माझ्या स्वप्नातील शहर या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आजच्या काळामध्ये पाहीलेतर आपल्या जगामध्ये तसेच देशामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे म्हणजेच देशामध्ये मोठ मोठी शहरे उभारली गेली आहेत. आपल्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये एक आवडीचे शहर असते आणि आपण त्याला स्वप्ननगरी असे समजत असतो आणि आपल्याला वाटत असते कि आपले शहर हे खूप छान असावे आणि देशातील एक स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून आपल्या शहराला ओळखले जावे.
आणि मला देखील तसेच वाटते कारण मी देखील एका शहरामध्येच राहतो आणि मला देखील असे वाटते कि मी ज्या शहरामध्ये राहतो ते शहर देखील सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असावे तसेच शहरामध्ये अनेक मोठे मोठे टॉवर्स आणि अपार्टमेंट जरी असल्या तरी त्या ठिकाणी झाडांची हिरवळ देखील असावी जेणेकरून शहराला एक नैसर्गिक देणगी देखील लाभेल आणि त्यामुळे तेथील वातावरण देखील खूप चांगले राहील.
त्याचबरोबर शहर म्हटले कि प्रत्येकाला प्रश्न पडतो कि आपल्या घरातील कचरा कुठे टाकावा परंतु लोकांनी आपल्या घरातील कचरा हा त्यांच्या भागामध्ये असणाऱ्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकावा किंवा मग हा कचरा ज्यावेळी कचरा गोळा करण्यासाठी कचरे वाले येतात त्यांच्याकडे द्यावा तो इतरत्र कोठेही टाकू नये म्हणजेच आपले घर जसे आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतो तसेच आपले शहर देखील स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.
माझ्या स्वप्नातील शहर निबंध मराठी – My Dream City Essay in Marathi
My Dream City Mumbai essay in English
आपल्या प्रत्येकाचे एक स्वप्नातले शहर असते आणि त्या ठिकाणी सर्व सुविधा, स्वच्छता, नैसर्गिक वातावरण असणे खूप गरजेचे असते आणि मला देखील तसेच वाटते.
प्रत्येकाच्या आवडीचे एक शहर असते जेथे त्यांना राहायला आवडते आणि माझे देखील असे एक आवडते शहर आहे ते म्हणजे मुंबई. मला मुंबई या शहरामध्ये राहायला खूप आवडते आणि हे शहर भारतामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना माहित आहे. मुंबई हि एक महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचे आणि मोठे शहर आहे आणि या ठिकाणी दाट म्हणजेच सर्वाधिक लोकसंख्या देखील आहे. मुंबई या शहराला पूर्वी ब्रिटीशांच्या काळामध्ये बॉम्बे या नावाने ओळखले जात होते मग त्यानंतर या शहराला इ.स १९९५ मधून मुंबई म्हणून ओळखले जाते.
मुंबई हे शहर महारष्ट्र राज्याची राजधानी आहे आणि ह देशाच्या आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या खूप महत्वाचे आहे आणि त्यामुळे या शहराला खूप महत्व आहे. माझ्या या स्वप्ननगरी मध्ये रात्रीच्या वेळी चमकणारे दिवे, सतत गजबजलेले रस्ते आणि भुरळ पडणारी काही ठिकाणे आहेत त्यामुळे शहर आणखीनच सुंदर दिसते आणि या शहराला आपण एक प्रगत मेट्रो शहर म्हणून ओळखू शकतो. मुंबई ह्या शहर जर व्यावसायिक दृष्ट्या खूप महत्वाचे असले तरी हे शहर अनेक सोयी सुविधांनी देखील नटलेले आहे.
जसे कि या शहरामध्ये अनेक मॉल्स, मोठ मोठी पार्क, फॅशन अपडेट, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजक गोष्टी, चांगले रस्ते, स्वच्छ पाणी या सारख्या अनेक गोष्टीने मुंबई हे शहर आहे. मुंबई हे शहर अनेक गोष्टींनी परिपूर्ण आहे तसेच या शहराला अनेक जुनी आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे लाभली आहेत जसे कि मरीन ड्राईव्ह, कुलाबा कॉजवे, जुहू बीच, गेट वे ऑफ इंडिया, एलिफंटा लेणी, सिद्धिविनायक मंदिर, चौपाटी बीच, वरळी सी फेस, शिवाजी पार्क या सारखी अनेक ठिकाणे आपल्याला मुंबई या शहरामध्ये पाहायला मिळतात.
मुंबई हे शहर मला आवडण्याचे कारण म्हणजे या शहराला एक नैसर्गिक वारसा लाभला आहे म्हणजे या शहराला एक सुंदर अशी नैसर्गिक समुद्र किनारपट्टी लाभली आहे त्यामुळे हे शहर आणखीनच खुलून दिसते. हे शहर म्हणजे अनेकांची जीवन चालवण्याचे ठिकाण आहे कारण मुंबई या शहरामध्ये अनेक लोक हे रोजगारासाठी येतात आणि आपले आयुष्य सुखकर करतात कारण या शहरामध्ये औद्योगीकरण तसेच अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी आहेत त्यामुळे तरुण वर्ग या शहराकडे मोठ्या प्रमाणात वळतो.
मुंबई हे शहर जरी देशासाठी सर्व बाजूंनी महत्वाचे असले तरी या शहरामध्ये वाढत्या औद्योगिकरणामुळे, वाहनांच्या रहदारीमुळे शहरामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक संख्या असल्यामुळे तेथे राहण्यासाठी जागा अपुरा होत आहे तसेच, कचरा देखील मोठ्या प्रमाणामध्ये गोळा होत असल्यामुळे कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येत नाही त्यामुळे शहरामध्ये काही ठिकाणी अस्वच्छता आणि दुर्गंधी पसलेली आहे.
तसेच आपण वर सांगितल्या प्रमाणे वाहनांची रहदारी खूप वाढली आहे तसेच औद्योगीकरण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे त्याचा परिणाम हवेवर आणि तेथील वातावरणामध्ये होत आहे कारण मोठ मोठ्या कारखान्यातून बाहेर पडणारा धूर तसेच गाड्यांच्या मधून बाहेर पडणारा धूर या मुले हवेचे प्रदूषण होते आणि या शहरामध्ये देखील तसेच होते आहे परंतु हे प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे काळजी गरज आहे.
कारण आपल्या आजूबाजूची हवा जितकी स्वच्छ असते तितकेच आपले आरोग्य देखील चांगले राहते आणि तसेच शहरामध्ये कचरा आणि अस्वच्छता असेल तर शहर सुंदर दिसत नाही आणि माझ्या स्वप्नातील शहर हे मला सुंदर आणि स्वच्छ असावे असे वाटते त्यामुळे आपल्या शहराची सुंदरता दिसून येते. त्याचबरोबर वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगीकरणामुळे तर इतर कारणांच्यामुळे शहरातील झाडे नष्ट केली जात आहेत.
पण झाडे हि एक नैसर्गिक देणगी आहे आणि शहरामध्ये झाडे असल्यास शहर हिरवेगार तसेच शहरातील हवा देखील शुद्ध राहील त्यामुळे शहरामध्ये जितकी झाडे तितके शहर खूलुन दिसेल. पण शहरामध्ये सर्व ठिकाणी मोठमोठ्या इमारतीच पाहायला मिळतात पण जर चांगले वातवर ठेवायचे असल्यास शहरामध्ये काही प्रमाणात झाडे असणे आवश्यक आहे.
अश्या प्रकारे माझ्या स्वप्नातील शहर हे सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण, तसेच शहरामध्ये नैसर्गिक वातावरण असलेले, तसेच शहरामध्ये पुरेसे पाणी असणे, शहरामध्ये देखील शुध्द वातावरण असणे आणि शहर हे स्वच्छ आणि सुंदर असणे ह्या सर्व गोष्टी माझ्या स्वप्नातील शहरामध्ये असाव्यात असे मला वाटते.
आम्ही दिलेल्या my dream city essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझ्या स्वप्नातील शहर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my dream city essay in marathi 1000 words या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि my dream city essay pdf in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये my dream city essay in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट