माझी ओळख निबंध मराठी Myself Essay in Marathi

Myself Essay in Marathi – Myself in Marathi Essay माझी ओळख निबंध मराठी माझा परिचय मराठी निबंध मित्रांनो, आपण जेंव्हा पहिल्यांदा शाळेत जायचो, तेंव्हा आपल्याला आपले शिक्षक अथवा शिक्षिका स्वतःबद्दल परिचय द्यायला उभे करायचे. खरंतर, त्या बालवयात स्वतःबद्दल नेमकं काय सांगायचं; हे कळायचं नाही. त्यामुळे, अगदी दोन ते तीन ओळींमध्ये आपण सर्वजण आपले स्वतःचे नाव, आपल्या शाळेचे नाव आणि जास्तीत जास्त गावचे नाव सांगून स्वतःची ओळख पटवून द्यायचो आणि बेंचवर बसायचो. याखेरीज, अनेकदा आपल्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये देखील आपल्याला स्वतःवर निबंध लिहायला सांगितले जायचे.

शिवाय, स्वतःचा परिचय किंवा स्वतःची ओळख देण्यासाठी सुद्धा सांगितले जायचे. परंतू, बरेच विद्यार्थी बारावीत असून किंवा ग्रॅज्युएटेड असून, त्यांना स्वत:बद्दल माहिती कशी सांगावी हे अजूनही कळतं नाही. कारण, याबद्दल विद्यार्थ्यांना पुरेसे ज्ञान नसल्याने, अनेक विद्यार्थी स्वतःचा परिचय देण्यामध्ये दचकतात किंवा घाबरतात.

myself essay in marathi
myself essay in marathi

माझी ओळख निबंध मराठी – Myself Essay in Marathi

माझा परिचय मराठी निबंध – Essay on Myself in Marathi

पण मित्रांनो, केवळ विद्यार्थी वर्गच एवढा स्वतःच्या परीचयाबद्दल अज्ञानी नसून, आपल्या समाजातील बऱ्याच उच्च व्यक्तींना सुद्धा स्वतःचा परिचय कसा द्यावा हे कळत नाही. कित्येक वेळा इंटरव्यूमध्ये किंवा एखाद्या व्यक्ती समोर स्वतःचा परिचय देण्यामध्ये मोठमोठ्या व्यक्ती चाचपतात.

अशा प्रकारे, या विस्तृत जगामध्ये प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असल्याने, प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा परिचय देखील त्यानुसार वेगवेगळा असतो. ज्यामुळे, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण होते.

म्हणूनच मित्रांनो, आज याठिकाणी मी स्वतःबद्दल माहिती सांगणार आहे, जेणेकरून स्वतःबद्दल आपण नेमकं काय सांगायचं हे तुमच्या लक्षात येईल. नमस्कार मित्रहो! मी तेजल तानाजी पाटील. “संजय गांधी विद्यालय, नागणवाडी” या आदर्श शाळेची, मी एक आदर्श विद्यार्थीनी!

खरंतर, माझी शाळा ही माझ्या घरापासून साधारणतः दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे, मी रोज माझ्या शाळेला बसने प्रवास करून जाते आणि शाळेत गेल्यावर खूप मन लावून अभ्यास करते. त्यामुळे, शाळेतील सगळ्या शिक्षकांना मी खूप प्रिय आहे. शिवाय, प्रत्येक परीक्षेमध्ये संपूर्ण वर्गात माझाचं पहिला नंबर येतो.

खरंतर मित्रहो, माझ्या या यशामध्ये माझ्या शाळेतील शिक्षकांसोबत, माझ्या घरातील व्यक्तींचा देखील तितकाचं मोलाचा वाटा आहे. कारण, अगदी लहानपणापासूनच माझ्या घरातील सदस्यांनी आणि शाळेतील शिक्षकांनी मला एक आदर्श विद्यार्थीनी व त्यासोबतच एक चांगली संस्कारी मुलगी बनवण्यामध्ये कधीचं कुठल्याही प्रकारची कमी सोडलेली नाही.

मला माहिती नाही की, मी कितपत आदर्श व्यक्ती आहे. परंतू, आपल्या समाजामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून वावरण्यासाठी अत्यावश्यक असलेले सर्व गुण माझ्या अंगी आहेत, हे मात्र नक्की!

कारण, वडीलधाऱ्या अथवा ज्येष्ठ व्यक्तींचे म्हणणे ऐकणे, वृद्ध किंवा गरीब व्यक्तींना गरजेच्या वेळी मदत करणे, प्रत्येक व्यक्तीशी मनापासून सुसंवाद साधणे, घर कामांमध्ये आई-बाबांना सहकार्य करणे अशी कामे मी खूप आवडीने माझ्या लहानपणापासूनच करत आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या चांगुलपणामागे किंवा त्या व्यक्तीच्या चांगल्या व्यक्तीमत्वामागे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाचा महत्त्वाचा आणि बहुमोलाचा वाटा असतो, असे म्हटले जाते.

खरंच, हे म्हणणे अगदी बरोबर आहे. कारण, लहानपणापासून आपल्याला मिळणारे चांगले संस्कार आणि चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव आपणा सर्वांना पहिल्यांदा आपल्या कुटुंबातूनच मिळते. त्यामुळे, मलादेखील माझ्या कुटुंबातून चांगल्या-वाईट गोष्टींचे संस्कार खूप चांगल्या पद्धतीने मिळाले आहेत. शिवाय, माझे बाबा शिक्षक असल्याने, घरामध्ये सर्वांनी शिस्तबद्ध आणि टापटीप राहण्याची सवय ही सुरूवातीपासूनच चालत आलेली आहे.

तसं पहायला गेलं तर, माझे बाबा आणि काका हे दोघंही प्रेमळ स्वभावाचे देखील आहेत. तसेच, माझी आई आणि काकू या दोघी उत्तम गृहिणी असल्याने, घरातील प्रत्येक सदस्याची काळजी घेण्यासाठी त्या कधीचं कोणत्याही गोष्टीचा कंटाळा करत नाही. रोज नवीन-नवीन पक्वान्न आई आणि काकू एकत्रितपणे मिळून, तसेच गप्पागोष्टी करत, अगदी त्या जेवणामध्ये स्वतःच प्रेम ओतून बनवतात.

त्याचबरोबर, घरात आलेल्या पाहुण्यांची त्या दोघीही मनापासून सेवा करतात आणि त्यांचा व्यवस्थितरीत्या पाहुणचार सुद्धा करतात. मित्रांनो, माझी आई आम्हां सगळ्या भावंडांना  नेहमी सांगत असते की “अतिथी देवो भव:” अर्थातच  आपल्या सर्वांच्या घरी येणारा प्रत्येक पाहुणा हा परमेश्वराचा अंश असतो.

त्यामुळे, अशी श्रध्दा मनात आणून माझी आई नित्यपणे घरी आलेल्या पाहुण्यांची  सेवा करते. खरंतर, मी खूप लहान असताना माझी आजी देवाघरी गेली होती. त्यामुळे, आजीचं प्रेम मला कधी मिळालं नाही.

पण, असं असलं तरी माझ्या आजोबांनी मात्र ही उणीव नक्कीच भरून काढली. त्यामुळे, माझ्या आजोबांमध्ये आणि माझ्यामध्ये जिव्हाळ्याचा, आपुलकीचा व प्रेमाचा एक अनोखा बंध आहे. शिवाय, माझा अभ्यास करून झाल्यावर, मला आजोबांसोबत मोकळा वेळ घालवण्यासाठी खूप आवडते.

कारण, आजोबा त्यांच्या आयुष्यातील अनेक जिवंत अनुभव, पौराणिक कथा, आध्यात्मिक कथा आणि भविष्याला किंवा अडचणीला साहसाने कसे तोंड द्यावे यांसारख्या गोष्टींचे मार्गदर्शन अगदी उत्तमरीत्या करतात. एकंदरीत मित्रांनो, माझे आजोबा आणि घरातील इतर सर्व सदस्य माझ्या आयुष्यात मला पुढे जाण्यासाठी खूप मनापासून प्रोत्साहित करतात.

ज्यामुळे, माझे मनोबल वाढते, कोणत्याही नवीन गोष्टीबद्दल मनामध्ये तयार होणारी भीती निघून जाते आणि माझ्या शरीरात पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. खरंतर, या सर्व गोष्टींमुळे मी माझ्या अभ्यासावर पूर्ण लक्ष देऊ शकते आणि वाचलेलं दीर्घकाळ लक्षात देखील ठेवू शकते.

अशा प्रकारे मित्रांनो, एकंदरीत मी एक शांत स्वभावाची, अभ्यासू, कर्तव्यदक्ष, दयाळू आणि कुणालाही पटकन जीव लावणारी अशी गोड मुलगी आहे. माझे घरातील सर्वजण आणि शाळेतील शिक्षक देखील मला कायम म्हणत असतात की, मी सगळ्यांसाठी एक आदर्श आणि सुसंस्कृत अशी मुलगी आहे.

यांखेरीज, मला नेहमी गरीब आणि गरजू लोकांना मदत करायला खूप आवडते. त्याचबरोबर, कोणतंही काम करताना किंवा कुणाशीही बोलताना अथवा गप्पागोष्टी करताना माझ्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची मी पूर्णपणे काळजी घेते. यांसोबत, मी सर्वांना आनंदीत ठेवण्यासाठी माझ्याकडून होतील तेवढे सर्व प्रयास करते.

काहीवेळा मला वाटते की, या पृथ्वीवरील गरीब व्यक्ती असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो, उच्च जातीचा व्यक्ती असो किंवा कनिष्ठ जातीचा व्यक्ती असो, शेवटी ती व्यक्ती देखील आपल्याप्रमाणे माणूसच असते ना!

त्यामुळे, मला सर्वांची निस्वार्थपणे मदत करायला खूप आवडते. मित्रांनो, एक आदर्श व्यक्ती बनवण्यासाठी लागणारे सर्व गुण माझ्या अंगी यावेत, यासाठी मी सदैव प्रयत्न करत असते. कारण, सुरुवातीला कोणताच व्यक्ती हा पूर्णता परिपूर्ण नसतो. त्यामुळे, मलादेखील परिपूर्ण व्यक्ती बनण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील आणि त्यासोबत कित्येक वेळा त्यागही करावे लागतील.

मित्रहो, माझ्या अंगी बऱ्याच चांगल्या सवयी आहेत. त्यामुळे, या सगळ्या चांगल्या गोष्टींच्या आधारे मी भविष्यामध्ये एक चांगला व्यक्ती नक्की बनू शकते, यात काही शंका नाही! परंतू, दुसरीकडे या चांगल्या गोष्टींसोबतच माझ्यामध्ये काही दुर्गुण सुद्धा आहेत. त्यामुळे, या दुर्गुणांना लक्षात घेऊन, त्यांना पूर्णपणे बदलण्यासाठी मी आवश्यक ते सर्व प्रयत्न नेहमी करतं असते.

माझ्यामध्ये असलेली सर्वांत चांगली सवयी म्हणजे, मी माझी सर्व कामे अगदी ठरलेल्या वेळेत पूर्ण करते. कारण, लहानपणापासूनचं वेळेला सगळ्यांत आधी महत्त्व दिले पाहिजेत, असं मला माझ्या प्रिय  बाबांकडून कायम शिकायला मिळालं आहे. त्यामुळे, मी माझा अभ्यास वेळेवर पूर्ण करते.

                     तेजल तानाजी पाटील

                        बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या myself essay in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा परिचय मराठी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या myself in marathi essay या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sample essay about myself in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये short essay on myself in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!