नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी Nadichi Atmakatha in Marathi

Nadichi Atmakatha in Marathi – Mi Nadi Boltey Marathi Nibandh नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये नदीची आत्मकथा या विषयावर निबंध लिहिणार आहोत आणि यामध्ये नदीची आत्मकथा म्हणजे नदीच आपल्या प्रवाहाबद्दल, तिच्या उगम कोठे झाला आणि ती कशी वाहते याबद्दल सांगितल्यासारखी शब्द रचना म्हणजे नदीची आत्मकथा सांगणे. या आत्मकथेमध्ये नदी कशी वाहते, कोठून वाहते, तिचे वर्णन या सर्व गोष्टींचा समावेश असतो. चला तर मग आता आपण नदीची आत्मकथा या विषयावर निबंध लिहुयात.

आपण नदीची आत्मकथा हा निबंध पाहण्याअगोदर नदी म्हणजे काय हे जाणून घेवूया. नदी हे पाण्याचे एक नैसर्गिक स्त्रोत्र आहे आणि नदी हि अनेक ओढे, नाले एकत्र येवून बनलेली असते आणि नदीचा उगम हा जंगलातून, डोंगराळ भागावरून आणि खोल दऱ्यातून होतो. जर एकादि मोठी नदी असेल तर त्या नदीला अनेक छोट्या मोठ्या उपनद्या येवून मिळालेल्या असतात. नद्या ह्या आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे म्हणजेच ह्या मानवी संस्कृतीची जीवनवाहिनी आहे तसेच नदीचे पाणी हे ग्रामीण भागामध्ये, शेतांच्यासाठी, शहरामध्ये पुरवले जाते.

nadichi atmakatha in marathi
nadichi atmakatha in marathi

नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी – Nadichi Atmakatha in Marathi

Nadiche atmavrutta in marathi

नदी हा शब्द जरी तुम्हाला ओळखीचा वाटत असला तरी आज मी तुम्हाला नदी हिची आत्मकथा सांगणारा आहे. नदी म्हणते मी खूप शांत प्रवाहाने वाहते म्हणजेच माझा स्वभाव हा खूप चंचल आहे आणि मी कुठेही न थांबता कित्येक दिवस वाहत असते आणि मी जाऊन शेवटी समुद्राला मिळते. मी एक नदी आहे आणि माझा जन्म हा डोंगर आणि दऱ्यांच्या मधूल झाला आहे आणि माझा जन्म हा खूप पूर्वीचा आहे. मी डोंगर दरी मधून वाहत असताना माझी पाण्याची पातळी तशी कमीच असते आणि ज्यावेळी वाहत वाहत मैदानाकडे जाते त्यावेळी माझ्या पाण्याची पातळी वाहत जाते.

ज्यावेळी मी पहिल्यांदा दरी किंवा डोंगरातून उगम पावले त्यावेळी मी अनेक अडथळे पार करत आले आणि मग माझा प्रवाह देखील शांत झाला आणि मला आता शांतपणे वाहणारी म्हणून ओळखले जाते. नदी म्हणते भारतभूमीवर मी अनेक ठिकाणी वाहते आणि मला भारतभूमीवर अनेक नावे देखील देण्यात आली आहेत जसे कि कृष्णा, गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, सरस्वती, कावेरी. माझा प्रवाह हा न थांबता वाहत असतो आणि हा कधी कधी वेगाने वाहतो किंवा मग कधी कधी शांतपणे वाहतो आणि बहुतेकदा माझा प्रवाह वेगाने वाहण्याचे कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणाहून पाणी म्हणजेच ओढे, नाले आणि इतर भागातून पाणी मला येवून मिळते आणि त्यामुळे माझ्या पात्रामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठते त्यामुळे माझ्या प्रवाहाला वेग येतो.

तसेच त्या जास्त पाण्यामुळे मी पात्राच्या बाहेर देखील जाते. तसेच ज्यावेळी माझ्या पात्रामध्ये जेमतेम पाणी असते किंवा ज्यावेळी पावसाचा सीजन नसतो त्यावेळी मी खूप शांतपणे वाहते. माझ्या पत्राचा आकार हा काही ठिकाणी मोठा असतो तर काही ठिकाणी हा खूप लागण असतो म्हणजेच हे तेथील स्थानावर अवलंबून असते. माझ्या प्रवाहामध्ये अनेक मोठ मोठे डोंगर, मोठ मोठे दगड येतात त्यामुळे मला देखील वाहताना खूप अडथळ्यांना सामोरे जावे लागते तरी देखील मी अडथळ्यांवर मात करत करत पुढे वाहते.

Mi Nadi Boltey Marathi Nibandh

माझा प्रवाह हा सतत सरळ किंवा मग नागमोड्या वळणावर वाहत असतो आणि माझ्या पात्राच्या बाजूने अनेक झाडे असतात आणि त्यांना सतत पाणी मिळत असल्यामुळे ती चांगली वाढतात आणि माझ्या अवतीभवतीचा परिसर हा खूप हिरवळ असतो आणि ते दृश्य पाहण्यासाठी खूप छान वाटते तसेच ज्या लोकांना निसर्गाची ओढ असते ते लोक माझ्या काठावर बसून खूप वेळ घालवतात. मला जगामध्ये नैसर्गिक संसाधन म्हणून ओळखले जाते कारण माणसांच्या अनेक गरजा मी भागवतो.

मी जंगल, डोंगर आणि इतर अडचणीच्या भागातून वाहत असते आणि वाहत असताना अनेक प्राणी आणि पक्षी आपली तहान भागवण्यासाठी माझ्या पात्रातील पाणी पितात आणि आपली तहान भागवतात त्यामुळे मी जंगलातील प्राण्यांच्यासाठी आणि पक्ष्यांच्यासाठी देखील खूप मदतगार आहे. तसेच माझे पाणी लोक अनेक कारणासाठी वापरतात, माझे पाणी माझ्या जवळच्या गावामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी करतात तसेच लोक माझ्या पात्रामध्ये कपडे धुण्यासाठी, जनावरे धुण्यासाठी येतात तसेच माझे पाणी हे शुद्ध करून पिण्यासाठी देखील वापरले जाते कारण मी एक गोड्या पाण्याचे स्तोत्र आहे.

शेतीतील पिकांच्यासाठी गोड्या पाण्याची गरज असते आणि माझे पाणी गोडे असल्यामुळे माझ्या गावाजवळ असणारी सर्व गावे त्यांच्या त्यांच्या शेतीसाठी देखील माझेचा पाणी वापरतात. अश्या प्रकारे अनेक वेगवेगळ्या कारणांच्यासाठी माझ्या पाण्याचा वापर करतात. मी वाहत असताना माझ्यापासून अनेक छोटे छोटे कालवे तयार होतात आणि त्या कालाव्यांचा वापर शेतीच्या सिंचनासाठी केला जातो.

त्याचबरोबर पाण्याचा उपयोग हा वीज निर्मिती करण्यासाठी देखील केला जातो आणि माझ्या पात्रातील पाण्याचा उपयोग देखील वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो. भारतामध्ये नदीला आणि एक धार्मिक महत्व आहे तसेच भारतातील गंगा नदी हि एक पवित्र नदी मानली जाते तसेच असे म्हटले जाते कि आपण गंगा नदीमध्ये अंघोळ केली तर आपले सर्व पाप नष्ट होतात. तसेच नदीचे पाणी काही ठिकाणी धार्मिक पूजेसाठी वापरले जाते तसेच माझे पाणी काही उत्सवांच्यासाठी देखील देखील वापरले जाते.

पण सध्या मानवाने माझे कसेही वापरून माझ्या पात्रातील पाण्याचे प्रदूषण केले आहे त्यामध्ये कचरा टाकला आहे, प्लॅस्टिक वस्तू टाकून पाणी पूर्णपणे प्रदूषित केले आहेत तसेच सध्या औद्योगीकरण देखील खूप वाढले आहे आणि औद्योगीकरणातील पाणी देखील मळीचे किंवा घाण पाणी देखील नदी मध्ये सोडले जाते त्यामुळे माझे पाणी दुषित होते.

जसे माणसाला माझ्या पाण्यापासून अनेक फायदे होतात तसेच माझ्या पाण्यापासून अनेक तोटे देखील होतात. ज्यावेळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो तेंव्हा ओढ्याचे पाणी, नाले, शेतातील बाहेर पडणारे पाणी, गावातून बाहेर पडणारे पाणी हे सर्व एकत्र येवून नदीला मिळते आणि त्यामुळे नदी पूर्णपाने भरून ते पाणी नदीच्या पात्राच्या बाहेर पडून जवळ असणाऱ्या गावामध्ये शिरते आणि अनेक लोकांच्या घरामध्ये शिरते आणि त्यामुळे लोकांचे अनेक नुकसान होते. अश्या प्रकारे कोणत्याही नदीची आत्मकथा सारखीच असते.

आम्ही दिलेल्या nadichi atmakatha in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nadi ki atmakatha essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि marathi essay on river माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये nadichi atmakatha in marathi nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!