Narnala Fort Information in Marathi नरनाळा किल्ल्याची माहिती गिरिदुर्ग प्रकारातील ३१६१ फुट उंच उभा असलेला नरनाळा किल्ला narnala killa महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यापासून २४ किलो मीटर अंतरावर वसलेला आहे. नरनाळा गडाच्या पायथ्याशी नरनाळा गाव आहे आणि तेथून गडावर गाडीने जाण्यासाठी वाट आहे. नरनाळा ऐतिहासिक किल्ला अकोला शहरापासून ५५ ते ६० किलो मीटर अंतरावर आहे. नरनाळा हा किल्ला मेळघाट परिसरामध्ये आहे आणि किल्ल्याच्या सभोवताली सुंदर हिरवागार परिसर आहे. हा किल्ला सातपुड्याच्या डोंगरावर बांधला आहे. नरनाळा या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ३८० एकराच्या भागामध्ये विस्तारलेला आहे.

नरनाळा किल्ला माहिती – Narnala Fort Information in Marathi
किल्ल्याची नावे | नरनाळा |
ठिकाण | महाराष्ट्र राज्यातील अकोला ( विदर्भ ) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नरनाळ गावाजवळ आहे |
प्रकार | गिरिदुर्ग |
उंची | ३१६१ फुट |
क्षेत्रफळ | ३८० एकर |
जवळचा परिसर | मेळघाट |
डोंगर | सातपुडा |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणी | तोफ, महाकाली दरवाजा, जुना वाडा, तलाव, नरनाळा धबधबा, नरनाळा अभयारण्य, तेलीयागड किल्ला, जाफराबाद किल्ला, राणी महाल आणि मशीद |
काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला इ. स १२८२ मध्ये चांदगडाचा गोंड राजा बल्लाड अत्राम याने बांधला असावा. हा किल्ला मेळघाट परिसरामध्ये शत्रूच्या हल्ल्यापासून राजाचे आणि सैनिकांचे रक्षण करण्यासाठी बांधला होता. या किल्ल्यानाजिक पश्चिमेकडे तेलीयागड आणि पूर्वेकडे जाफराबाद हे किल्ले देखील पाहायला मिळतात.
नरनाळा किल्ल्याविषयी माहिती
नरनाळा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील अकोला ( विदर्भ ) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नरनाळ गावाजवळ आहे. हा किल्ला अकोट पासून २४ किलो मीटर अंतरावर आणि अकोल्यामधून हा किल्ला ६० किलो मीटर अंतरावर आहे या किल्ल्याची उंची ३१६१ फुट असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. हा किल्ला ३८० एकर क्षेत्रफळा मध्ये विस्तारलेला आहे. त्याचबरोबर हा किल्ला मेळघाट परिसरामध्ये सातपुड्या डोंगरवर बांधला आहे. या किल्ल्यच्या पायथ्याशी नरनाळा गाव आहे आणि या गडाकडे येताना नरनाळ अभयारण्याची एक चौकी लागते त्या चौकीवर नोंद करावी लागते. ह्या किल्ल्याला एकूण ५ दरवाजे आहेत आणि या दरवाज्यांवर कोरीव नक्षीकाम पाहायला मिळते.
- नक्की वाचा: तोरणा किल्ल्याची माहिती
पूर्वीच्या काळी या किल्ल्यावर राजा नारणाल सिंह स्वामी याच्या वर्चस्वाखाली होता त्यामुळे या किल्ल्याचे नाव या राज्याच्या नावावरून नरनाळ असे ठेवण्यात आले.
नरनाळा किल्ल्यावरील ५ दरवाजे
नरनाळ या किल्ल्यावर आपल्यला पाच दरवाजे पाहायला मिळतात.
- शहानुर दरवाजा
- मोंढा दरवाजा
- महाकाली दरवाजा
- दिल्ली दरवाजा
- शिवपूर दरवाजा
- नक्की वाचा: अजिंक्यतारा किल्ल्याची माहिती
नरनाळा किल्ल्याचा इतिहास – Narnala Fort History in Marathi
नरनाळा हा किल्ला नरनाळा भागामध्ये शहानुर किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. काही इतिहासकारांच्या मते हा किल्ला इ. स १२८२ मध्ये चांदगडाचा गोंड राजा बल्लाड अत्राम याने बांधला असावा आणि या किल्ल्याचे नाव राजा नारणाल सिंह स्वामी याच्या वर्चस्वाखाली असताना या किल्ल्याचे नाव या राजाच्या नावावरून नरनाळा असे पडले. इ. स. १४२५ मध्ये नरनाळा हा किल्ला अहमद शा नावाच्या बहामनी शासकाने आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्याचे नुतनीकरण इस्लामी पध्दतीने केले.
त्यानंतर ह्या किल्ल्यावर मुगलांनी आपल्या ताब्यात घेतला पण १७०१ ते १८०३ या काळामध्ये हा किल्ला मराठा साम्राज्याच्या वर्चस्वा खाली राहिला आणि १८०३ मध्ये हा किल्ला इंग्रजांना मिळवण्यात यश आले.
- नक्की वाचा: सिंहगड किल्ल्याची माहिती
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे
तोफ :
असे म्हणतात कि या किल्ल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा तयार होत होत्या आणि त्यामधील एक आपल्याला नरनाळा किल्ल्यावर नऊगजी तोफ पाहायला मिळते या तोफेला तेथील स्थानिक लोक बांगडी तोफ या नावाने देखील ओळखतात.
महाकाली दरवाजा :
महाकाली दरवाजा हा मेंढा दरवाजा सोडून पुढे आल्यानंतर एक मोठा बुरुज आणि त्याला लागून एक दरवाजा आहे तो म्हणजे महाकाली दरवाजा. हा दरवाजा भव्य आहे आणि या दरवाज्याचे काम खूप सुरेख आहे.
नक्षीकाम :
नरनाळा किल्ल्यावर आपल्याला महाकाली दरवाजावरील प्राचीन नक्षीकाम पाहायला मिळेल हे नक्षीकाम उच्च प्रतीचे आहे.
तलाव :
नरनाळा या किल्ल्याच्या आसपास एकूण ५२ तलाव पाहायला मिळतात त्यामधील एक प्रसिध्द तलाव म्हणजे सक्कर तलाव.
मुख्य वाडा :
काही अंतर पुढे गेल्यानंतर आपल्यला एक पडझड झालेली इमारत पाहायला मिळते ती म्हणजे मुख्य वाडा.
नरनाळा धबधबा :
नरनाळा किल्ल्याच्या थोड्याश्या अंतरावर आपल्यला एक नरनाळा धबधबा देखील पाहायला मिळतो.
गडावरील इतर ठिकाणे :
पश्चिमेकडे तेलीयागड किल्ला, पूर्वेकडे जाफराबाद किल्ला, राणी महल, नरनाळा अभयारण्य आणि मशीद इ.
किल्ल्यावरील दरवाजे :
या किल्ल्यावर आपल्यला पाच दरवाजे पाहायला मिळतात ते म्हणजे शहानुर दरवाजा, मोंढा दरवाजा, महाकाली दरवाजा , दिल्ली दरवाजा आणि शिवपूर दरवाजा.
नरनाळा किल्ला फोटो:

नरनाळा किल्ल्यावर कसे जायचे ?
रस्तामार्गे : ह्या किल्ल्य्वर जाण्यासाठी कोणतीही थेट बस मिळत नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा अकोला शहराला जोडलेला आहे आणि हा मर्ह मुंबई, नाशिक, पुणे, हैद्राबाद, अमरावती, नागपूर या शहरांना जोडतो त्यामुळे या मार्गावरून आपल्याला अकोल्याला जाण्यासाठी बस मिळू शकते. अकोल्यापासून हा किल्ला ६० किलो मीटर आहे त्यामुळे तेथील अकोटला जाणारी स्थानिक बस पकडून आपण अकोताला जावू शकतो आणि तेथून टॅक्सी पकडून नरनाळा गावाकडे जावू शकतो नरनाळा अभयारण्याच्या दरवाज्यातून (शहानुर दरवाजा) जाताना तेथे आपल्यला नोंद करून किल्ला पाहायला वरती जावे लागते.
- नक्की वाचा: शिवनेरी किल्ल्याची माहिती
शहानुर दरवाज्याजवळ आपल्यला त्यांची जिप्सी हवी असेल तर घेता येते तसेच आपल्या सोबत गाईड देखील घेवू शकतो आणि तेथे आपण जर मुक्काम करणार असाल तर तेथे राहण्याची आणि खाण्याची सोय शहानुर दरवाज्यापाशी होते.
टीप
- नरनाळा किल्ल्यावर वरती गेल्यानंतर राहण्याची किवा पिण्याच्या पाण्याची आणि खाण्याची कोणतीही सोय नाही.
- हा किल्ला पाहण्याची वेळ सूर्योदय झाल्यानंतर सुरु होते आणि सूर्यास्त झाल्यानंतर बंद होते.
- हा किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी ३ ते ४ तास लागतात.
- हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क आकाराला जात नाही.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, नरनाळा किल्ला narnala fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. narnala fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about narnala fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही नरनाळा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या narnala killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही narnala fort akola information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट