तोरणा किल्ला माहिती Torna Fort Information in Marathi

Torna Fort Information in Marathi छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात जे किल्ले घेतले त्यामधील एक म्हणजे तोरणा किल्ला. तोरणा, रायगड आणि राजगड हे किल्ले एकाच पर्वत रांगेमध्ये आहेत त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावरून यामधील २ किल्ल्यांचे दर्शन आपल्यला होतेच. तोरणा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये वसलेला आहे. या सह्याद्री डोंगर रांगा ह्या दोन बाजूस पसरल्या आहेत एका बाजूस तोरणा किल्ला वसलेला आहे आणि दुसऱ्या बाजूस भुलेश्वर रांगा पसरल्या आहेत. तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरावर असल्यामुळे या किल्ल्याला पूर्वीच्या काळी प्रचंडगड म्हणून देखील ओळखले जात होते.

या किल्ल्याला स्वराज्याचा शिलेदार म्हणून देखील ओळखले जाते कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत्यांसोबत आणि मावळ्यान सोबत रायेश्वर मंदिरामध्ये स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा तोरणा हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले.

torna fort information in marathi
torna fort information in marathi

तोरणा किल्ला माहिती – Torna Fort Information in Marathi

किल्ल्याच नावतोरणा
जिल्हापुणे
तालुकावेल्हे
उंची१४०० मीटर
प्रकारगिरिदुर्ग
डोंगर रांगासह्याद्री
किल्ल्याची वेगवेगळी नावेप्रचंडगड, दैवीय विजय आणि  नाबीशाहगड
किल्ल्यावरील ठिकाणेबुधाळा माची, झुंजार माची, मेंगाई देवी मंदिर, तोरंजई देवी मंदिर, बालेकिल्ला, तोरनेश्वर मंदिर, पायरे दरवाजा, हनुमान बुरुज, सफेली बुरुज, भेळ बुरुज, फुटा बुरुज, कोकण दरवाजा, पायरे दरवाजा , दिंडी दरवाजा आणि भगत दरवाजा.

तोरणा किल्ल्याविषयी माहिती 

तोरणा हा किल्ला महाराष्ट्रमधील पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यामध्ये आहे. तोरणा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला सह्याद्री डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे. हा किल्ला समुद्रसपाटी पासून १४०० मीटर उंच आहे आणि या किल्ल्याला प्रचंडगड, दैवीय विजय किवा नाबीशाहगड या नावांनी देखील ओळखले जाते. हा किल्ला कोणी बांधला याची नोंद कोठेहि नाही पण या किल्ल्यावरील वास्तूंचे, मंदिरांचे अवशेष आणि किल्ल्यांच्या बांधकाम शैलीवरून असे समजते कि या किल्ल्यावर प्राचीन काळी शैवपंथीयांचा आश्रम असावा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला इ. स. १६४७ मध्ये तोरणा हा किल्ला जिंकला आणि तोरणा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील होणारा बहुतेक पहिलाच किल्ला होता आणि त्यामुळे हा किल्ला मराठा साम्राज्याचा केंद्र बिंदू बनला. तोरणा या किल्ल्याला तोरणा हे नाव पडण्याचे कारण तोरणा गडावर तोरणा या जातीची झाडे खूप असल्यामुळे या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले आहे. छत्रपती शिवाजी महराजांनी हा किल्ला जिंकल्यावर ह्या किल्ल्याची डाकडूजी करण्यात आली त्यावेळी तेथील काम करणाऱ्या कामगारांना २२ हंडे मिळाले त्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या.

तोरणा किल्ल्याचा इतिहास – torna fort history in marathi

हा किल्ला कोणी बांधला याची नोंद कोठेहि नाही पण या किल्ल्यावरील वास्तूंचे, मंदिरांचे अवशेष आणि किल्ल्यांच्या बांधकाम शैलीवरून असे समजते कि या किल्ल्यावर प्राचीन काळी शैवपंथीयांचा आश्रम असावा आणि हा किल्ला इ. स. १४७० ते १४८६ मध्ये बहामानिंच्या राजवटीत देखील होता असे म्हंटले जाते आणि त्यानंतर त्या किल्ल्यावर निजामांचे राज्य होते.  

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला निजामांच्या कडून काढून घेवून इ. स १६४७ मध्ये हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला आणि स्वराज्याचे तोरण बांधले कारण हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील होणारा पहिलाच किल्ला होता आणि या किल्ल्याचे बांधकाम केले. बांधकामाच्या वेळी कामगार काम करत असताना सोन्याच्या मोहरांचे २२ हंडे सापडले असे म्हंटले जाते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्यासाठी ५ हजार होन खर्च केले होते.

महाराजांनी या किल्ल्याच्या प्रचंड विस्तारामुळे या किल्ल्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या काळात हा मराठा साम्राज्यामध्येच होता पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला पण सचिव शंकराजी नारायण यांनी हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील केला पण तो परत औरंगजेबाच्या ताब्यात गेला पण मराठा साम्राज्यातील पूर्वीच्या काळातील शूर व्यक्ती शांत बसली नाहीत.

सरनोबत नागोजी कोकाटे यांनी काही सैन्याच्या मदतीने तोरणा गडावर पुन्हा हल्ला केला आणि स्वराज्याचा शिलेदार असणारा तोरणा किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये आणला आणि त्यानंतर या किल्ल्यावर कोणीही आक्रमण केले नाही हा किल्ला कायमस्वरूपी स्वराज्यामध्येचं राहिला.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

 • तोरंजई देवी मंदिर :

कोठी दरवाज्य समोर आपल्याला जे छोटेशे मंदिर पाहायला मिळेल ते मंदिर म्हणजे तोरंजई देवी मंदिर. ज्यावेळी तोरणा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डाकडूजी करण्यासाठी कामगार नेमले. ते कामगार काम करत असताना त्यांना सोन्याच्या मोहरानी भरलेले २२ हंडे सापडले त्याच ठिकाणी हे तोरंजई देवीचे मंदिर बांधण्यात आले.

 • झुंजार माची :

झुंजार माची हि हनुमान बुर्जाच्या जवळून मेंगाई देवीच्या मंदिराच्या बाजूने दिंडी दरवाज्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला झुंजार माची पाहायला मिळते. झुंजार माची कडे जाणारा मार्ग हा सोपा नाही आणि पावसाळ्याध्ये या ठिकाणी जाने खूप धोकादायक असते आणि पावसाळ्यामध्ये या माचीवर दाट धुकं देखील पहला मिळते पण येथे जाने पावसाळ्यामध्ये धोकादायक आहे पण आपण उन्हाळ्यामध्ये गडावरील हा भाग पाहू शकतो.

 • मेंगाई देवी मंदिर :

तोरणा किल्ल्यावर आपल्याला मेंगाई देवीचे मंदिर देखील पाहायला मिळते. रात्रभर मुक्काम करणारे किल्ला प्रेमी या ठिकाणी मुक्काम करू शकतात त्याचबरोबर वेल्हे गावामधील लोक नवरात्रोत्सव या मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये साजरा करतात.

 • बुरुज :

आपण पहिलेच असेल कि प्रत्येक किल्ल्यावर बुरुज हा असतोच कारण हे बुरुज शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले असतात आणि या गडावर देखील आपल्याला बुरुज पाहायला मिळतात आणि ते म्हणजे हनुमान बुरुज, सफेली बुरुज, भेळ बुरुज आणि फुटा बुरुज.

 • तोरनेश्वर मंदिर :

तोरनेश्वर मंदिर हे एक महादेवाचे मंदिर होते पण आपल्याला आज मेंगाई देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला मोडलेले अवशेष दिसताच ते तोरनेश्वर मंदिराचेच आहेत.

 • बुधाळा माची :

तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेला बुधाळा माची पाहायला मिळते आणि या माचीच्या शेवटी पायरे दरवाजा आहे तेथून आपल्यला किल्ल्याकडे जाता येते तसेच बुधाळा माचीवरून भगत दरवाज्याचा रस्ता लागतो आणि या भागात दरवाज्यातून राजगडावर जाण्यासाठी मार्ग आहे.

 • गडावरील दरवाजे :

गडावर आपल्याला वेगवेगळे दरवाजे पाहायला मिळतात ते म्हणजे कोकण दरवाजा, पायरे दरवाजा , दिंडी दरवाजा आणि भगत दरवाजा.

 • बालेकिल्ला :

बाले किल्ला म्हणजे गडावर जेथे झेंडा फडकवला जातो ते ठिकाण म्हणजे बालेकिल्ला.

तोरणा किल्ला फोटो:

torna fort information in marathi
torna fort information in marathi

तोरणा गडावर कसे जावे ?

रेल्वे मार्गे : या किल्ल्याला तुम्हाला भेट द्यायची असेल आणि जर तुम्हाला रेल्वे मार्गे यायचे असेल तर या किल्ल्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक पुणे आणि तेथून टॅक्सी पकडून गडापर्यंत जावे लागेल. पुणे ते तोरणा यामधील अंतर ५२ किलो मीटर आहे.

हवाई मार्ग : ह्या किल्ला पाहण्यासाठी जर विमानाने यायचे असेल तर सर्वात जवळचे विमातळ पुणे शहरामध्येच आहे त्यामुळे विमानने पुण्यामध्ये उतरून तेथून टॅक्सी पकडून गडापर्यंत जावे लागेल. पुण्यातील हे विमान तळ गडापासून ६० किलो मीटर आहे.

रस्तामार्गे : तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे मुख्य शहर पुणे आहे त्यामुळे आपण पुण्यावरून बस, टॅक्सी किवा खाजगी कारणे देखील हा गड पाहण्यासाठी जावू शकतो.

टीप:

 • तोरणा हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही.
 • हा किल्ला २४ तास उघडा असतो.
 • तोरणा हा किल्ला पाहण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, तोरणा किल्ला torna fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. torna fort information in marathi pdf हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about torna fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही तोरणा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या torna killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

3 thoughts on “तोरणा किल्ला माहिती Torna Fort Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!