नेव्ही भरती माहिती Navy Bharti Information in Marathi

navy bharti information in marathi नेव्ही भरती माहिती, आपल्या सर्वांना माहित आहे कि आपल्या भारतीय सैन्य दलामध्ये तीन मुख्य दल आहेत आणि ते म्हणजे भूदल, नौदल आणि हवाई दल आणि आज आपण या लेखामध्ये नौदल आणि त्याच्या भरती विषयी माहिती पाहणार आहोत. नौदल हा भारतीय सैन्य दलातील एक महत्वाचा दल आहे जो भारतीय किनारपट्ट्यांचे परकीय आक्रमणांच्यापासून संरक्षण करण्यासाठी संघटीत केला आहे. भारतीय नौदलाकडे दोन ऑपरेशनल कमांड आणि एक तेनिंग कमांड आहे आणि या दलाचे मुख्यालय हे ‘नवी दिल्ली’ या ठिकाणी आहे.

भारतीय नौदलाचे प्रमुख ताल आहे गोवा, मुंबई, चेन्नई, कोची, विशाखापट्टणम, कारवार आणि कोलकत्ता या ठिकाणी आहे. नौदल या भरती विषयी बोलायचे म्हटल्यास अनेक लोक या दलामध्ये भारती होण्यासाठी प्रयत्न करत असतात .

आणि या दलामध्ये भरती होण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये उतीर्ण होणे आवश्यक असते म्हणजे या दलामध्ये काम करण्यासाठी एक विशिष्ट प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि सर्व गोष्टींच्या विषयी खाली आपण सविस्तर पाहणार आहोत.

navy bharti information in marathi
navy bharti information in marathi

नेव्ही भरती माहिती – Navy Bharti Information in Marathi

भारतीय नौदलाची सुरुवात केंव्हा व कशी झाली ?

भारतीय नौदल हि संकल्पना १७ व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये सुरुवात झाली आणि म्हणून भारतीय नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. पुढे ब्रिटीशांच्या काळामध्ये इ. स. १९३४ मध्ये (रॉयल इंडियन नेव्ही) royal indian navy ची स्थापना झाली.

भारतीय नौदल माहिती – indian navy information in marathi

२०२३ या वर्षामध्ये भारतीय नौदलामध्ये १२० ते १२५ जागा भारती केल्या आहेत आणि जे व्यक्ती या जागांच्यासाठी इच्छुक असतात त्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतो परंतु त्या संबधित व्यक्तीला नौदलाच्या कोणत्याही जागेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असावे लागते आणि सर्व नियम व अटी देखील मान्य कराव्या लागतात.

भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज – application

भारतीय नौदल भरतीसाठी किंवा कोणत्याही जागेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येतो करता येतो आणि खाली आपण ऑनलाईन पध्दतीने कसा करायचा हे खाली आपण पाहणार आहोत.

 • कोणत्याही व्यक्तीला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रथम भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट वर जा आणि मग पुढे वेबसाईटवर गेल्यानंतर आधार कार्ड किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र क्रमांक वापरून नोंदणी करा.
 • नोंदणी झाल्यानंतर संबधित व्यक्तीने किंवा उमेदवाराने आपली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरली पाहिजे.
 • जर तो संबधित उमेदवार एका विशिष्ट प्रवेशासाठी पात्र असल्यास ते लॉगिन डॅशबोर्डद्वारे विशिष्ट नोंदीसाठी करण्यासाठी सूचित करू शकता त्यावेळी मोबाईलवर एसएमएस किंवा इमेलवर सूचना प्राप्त होतात.
 • आता संगणक स्क्रीनवर असणाऱ्या माहितीनुसार सर्व माहिती आणि तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा.

भारतीय नौदल प्रवेश परीक्षा – entry

 • नौदल हवाई ऑपरेशन (महिला आणि पुरुषांच्यासाठी).
 • सामान्य सेवा (महिला आणि पुरुषांच्यासाठी).
 • माहिती तंत्रज्ञान (पुरुष आणि महिलांच्यासाठी).
 • हवाई वाहतूक नियंत्रण (पुरुष आणि महिला).
 • हायड्रो (पुरुषांच्यासाठी).
 • शिक्षण (महिला आणि पुरुषांच्यासाठी).
 • नौदल अर्कीटेक्ट (महिला आणि पुरुष).
 • लॉजीस्टिक (पुरुष आणि महिलांच्यासाठी).
 • नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (महिला आणि पुरुषांच्यासाठी).

१२ वी नंतर भारतीय नौदलामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा उमेदवाराला १२ वी नंतर भारतीय नौदलामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया

 • जर एखाद्या उमेदवाराला भारतीय नौदलामध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा नोकरी करायची असेल तर त्याने त्याचे १२ पर्यंतचे शिक्षण हे विज्ञान शाखेतून पूर्ण केले पाहिजे
 • त्या संबधित उमेदवाराने १२ वीचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केले पाहिजेच तसेच त्याने भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेणे देखील आवश्यक आहेत.
 • त्या उमेदवाराला १२ वी मध्ये विज्ञान शाखेमध्ये कमीत कमी ५० टक्के किंवा त्या पेक्षा अधिक गुण मिळालेले असावे.
 • भारतीय नौदलाच्या भरतीसाठी १६ ते १९ अशी वयोमर्यादा आहे.
 • या भरतीसाठी लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणी उतीर्ण होणे आवश्यक आहेत.

भारतीय नौदलामध्ये भरती झाल्यानंतर मिळणारे फायदे – benefits

 • ज्या ठिकाणी काम आहे त्या स्थानकाजवळ कौटुंबिक निवास्थान, वैद्याकिय सुविधा, रेशनिंग आणि इतर काही अनेक सुविधा मिळतात.
 • तसेच भारतीय नौदलामध्ये काम करणाऱ्यांना आकर्षक बोनस देखील मिळतात.
 • भारतीय नौदलातील जहाजे प्रथम श्रेणीतील जिम आणि क्रीडा सुविधांनी सुसज्ज आहेत.
 • तसेच भारतीय नौदलामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचा आरोग्य विमा केला जातो जो नेव्ही ग्रुप इन्शुरन्स कार्यक्रमाच्या अंतर्गत केला जातो.

नौदलामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या परीक्षा – exam

भारतीय नौदलामध्ये वेगवेगळ्या परीक्षांच्या मार्फत प्रवेश केला जाऊ शकतो आणि त्या परीक्षा कोणकोणत्या आहेत ते खाली आपण पाहूया.

 • थेट परीक्षा (direct entry) ( पदवीपूर्व स्तरावरील प्रवेशासाठी कायमस्वरूपी आयोग).
 • थेट परीक्षा (direct entry) (पदवीधर स्तरावरील प्रवेशासाठी कायमस्वरूपी आयोग).
 • भारतीय नौदल परीक्षा (indian navy entrance test) (पदवीधर स्तरावरील प्रवेशासाठी कायमस्वरूपी आयोग)
 • संघ लोकसेवा आयोग (upsc).

आम्ही दिलेल्या navy bharti information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नेव्ही भरती माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या indian navy bharti information in marathi या indian navy information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about navy bharti in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये navy bharti information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!