पालक पराठा मराठी रेसिपी Palak Paratha Recipe in Marathi

Palak Paratha Recipe in Marathi पालक पराठा रेसिपी पालक हि एक पौष्टिक भाजी असून या भाजीपासून अनेक चविष्ट पदार्थ बनवून खाल्ले जातात जसे कि पालक पनीर, पालक भजी, पालक पकोडे, पालक पुरी, पालक सूप, पालक भाजी, पालक आमटी यासारखे अनेक पदार्थ पालक पासून बनवले जातात आणि खाल्ले जातात. असाच एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ जो मुख्यता नाश्त्याला बनवला जातो तो म्हणजे पालक पराठा. पालक हा मिक्सरला बारीक केलेला पालक गव्हाच्या पिठामध्ये घालून मळला जातो आणि ह्याचे गरमागरम पराठे बनवून ते सर्व्ह केले जातात.

पालक या भाजीमध्ये जीवनसत्वे, कॅल्शियम, प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात त्यामुळे पालक हा पराठ्यामध्ये वापरून त्याचे स्वादिष्ट आणि खमंग पराठे बनवले जातात आणि ते काही ठिकाणी लोक नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये देखील खातात. पालक पराठा हा भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी बनवला जाता असावा आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या वेगळ्या फरकाने बनवला जातो.

पालक पराठा हा असा स्वादिष्ट पदार्थ आहे जो लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडू शकणारा पदार्थ आहे कारण हा पदार्थ खूप पौष्टिक देखील आहे आणि चविष्ट देखील लागतो त्यामुळे भारतातील काही स्वयंपाक घरामध्ये हा नाश्त्याचा प्रकार आठवड्यातून एकदा तरी बनवला जातोच.

पालक पराठा बनवताना आपण पालक बारीक चिरून देखील गव्हाच्या पिठामध्ये टाकू शकतो किंवा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून देखील पालक आपण गव्हाच्या पिठामध्ये पेस्ट करू शकतो. पालकचा पराठा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी सहज बनतो. आज या लेखामध्ये आपण पालक पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत.

palak paratha recipe in marathi
palak paratha recipe in marathi

पालक पराठा मराठी रेसिपी – Palak Paratha Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारे वेळ२५ मिनिटे
पाककलाभारतीय
प्रकारनाश्ता
बनवण्याची पद्धतसोपी

पालक पराठा बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • पालक : पालक हा या रेसिपी मधील एक मुख्य घटक आहे आणि पालक हा पौष्टिक असतो आणि जर आपण पालक पेस्ट पराठ्यामध्ये वापरली तर तो एक पौष्टिक पदार्थ म्हणून खावू शकतो आणि हा पदार्थ लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांच्यासाठी योग्य ठरू शकतो.
  • गव्हाचे पीठ : गव्हाचे पीठ देखील पालक पराठा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापैकी एक महत्वाचा घटक आहे. गव्हाच्या पिठामध्ये पालक पेस्ट, मिरची, आले लसून पेस्ट आणि मीठ घालून ते मळले जाते आणि त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून त्याचे पराठे लाटले जातात.

पालक पराठा रेसिपी 

पालक पराठा हा आपण दोन प्रकारे बनवू शकतो एक म्हणजे पालक भाजी बारीक चिरून गव्हाच्या पिठामध्ये घालू शकतो किंवा मग पालकची पेस्ट करून त्यामध्ये घालू शकतो. पालक पराठा हा भारतामध्ये अनेक लोक नाश्त्यासाठी बनवतात आणि तो गरमागरम पदार्थ आवडीने बटर किंवा सॉस सोबत खातात. चला तर आता आपण पालक पराठा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
भाजण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारे वेळ२५ मिनिटे
पाककलाभारतीय
प्रकारनाश्ता
बनवण्याची पद्धतसोपी

पालक पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make palak paratha recipe 

पालक पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये आधीपासून सहजपणे उपलब्ध असू शकते किंवा आपल्या घरामध्ये पालक पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य जर उपलब्ध नसेल तर ते बाजारामधून उपलब्ध करून घ्या. आता आपण पालक पराठे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ वाटी गव्हाचे पीठ.
  • दीड वाटी चिरलेली पालक भाजी.
  • १ चमचा ओवा.
  • १ चमचे आले लसून पेस्ट.
  • ३ ते ४ हिरव्या मिरच्या.
  • १/२ चमचा हळद.
  • १/२ चमचा गरम मसाला.
  • १ चमचा साखर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).
  • तूप किंवा तेल ( आवश्यकतेनुसार ).

पालक पराठा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make palak paratha recipe 

  • पालक पराठे बनवताना सर्वप्रथम पालकची भाजी चांगली निवडून स्वच्छ धुवून घ्या आणि मग ती बारीक चिरून घ्या. आणि मग ती भाजी आणि हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या आणि त्या भाजीची चांगली बारीक पेस्ट मिक्सरवर करून घ्या.
  • आता एक मोठ्या आकाराचा मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये गव्हाचे पीठ घाला आणि मग त्यामध्ये ओवा, चवीनुसार मीठ, थोडीसी साखर, आले लसून पेस्ट, गरम मसाला आणि शेवटी आपण बनवलेली पेस्ट घाला आणि त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते चांगले घट्ट मळून घ्या.
  • आणि ते मळलेले पीठ झाकण लावून १० ते १५ मिनिटासाठी बाजूला ठेवा जेणेकरून पीठ चांगले भिजेल.
  • १० ते १५ मिनिटांनी ते पीठ घेवून पोळपाटाला तेल लावून ते पीठ पोळपाटावर चांगले मळून घ्या आणि त्याचे आणि त्या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या.
  • आता गॅसवर मध्य आचेवर तवा ठेवा आणि तो गरम होऊ द्या.
  • मग आपण बनवलेल्या गोळ्याला कोरडे गव्हाचे पीठ लावा आणि तो लाटून घ्या आणि तवा तापल्यानंतर त्यावर थोडे तेल सोडून तो पराठा तव्यामध्ये टाका आणि त्याला दोन्ही बाजूंनी तेल लावून पराठ्याच्या दोन्ही बाजू चांगल्या खरपूस भाजून घ्या आणि पराठा भाजला कि तो बाजूला काढा.
  • अश्या प्रकारे सर्व गोळ्यांचे पराठे लाटून भाजून घ्या आणि शक्यतो पराठे गरमागरम सर्व्ह करा.
  • गरमागरम पालक पराठा दह्यासोबत सर्व्ह करू शकता.

पालक पराठा कश्यासोबत खाल्ला जावू शकतो – serving suggestion 

स्वादिष्ट, खमंग आणि पौष्टिक पालक पराठा आपण दही, लोणी, बटर किंवा सोस सोबत खावू शकतो किंवा तसाच देखील छान लागतो.

टिप्स ( Tips ) 

  • ज्यावेळी आपण पालक पराठ्यामध्ये पालक चिरून घालतो त्यावेळी त्यामध्ये हिरव्या मिरची ऐवजी लाल मिरची वापरली तर आपला पराठा एकदम उत्तम बनतो.
  • तुम्ही पराठ्याचे पीठ फ्रीज मध्ये ठेवून तुम्हाला हवा आहे तेंव्हा गरमागरम पराठा लाटून खावू शकता.

आम्ही दिलेल्या palak paratha recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पालक पराठा मराठी रेसिपी palak paratha बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या palak paratha recipe in marathi madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि palak paneer paratha recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये aloo palak paratha recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!