Palak Soup Recipe in Marathi पालक सूप मराठी रेसिपी पालक हा तसाच भाजी बनवून आपण आपल्या घरातल्या लोकांना जेवणामध्ये वाढली तर ते कोणीही खात नाहीत आणि जर आपल त्यापासून टेस्टी आणि चमचमीत पदार्थ जसे कि कुरकुरीत पालक भजी, पालक पकोडे, पालक पनीर, पालक पुरी किंवा पालक सूप बनवून दिली तर ते पदार्थ आवडीने खातात. आज आपण या लेखामध्ये पौष्टिक पालक सूप कसा बनवायचा ते पाहणार आहोत. जसा आपण टोमॅटो सूप किंवा सार थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम पोटाला शांतता मिळावी म्हणून पितो तसेच आपण पालक सूप देखील बनवून पिऊ शकतो कारण हा भाजीपाला आरोग्यासाठी चांगला असतो.
कारण त्यामध्ये पौष्टिक घटक असतात आणि यामुळे पालक सूप हे लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांच्या साठी चांगले. पालक सूप हे घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहे आणि हे खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. चला तर मग आता आपण पालक सूप कसे बनवायचे ते पाहूयात.
पालक सूप मराठी रेसिपी – Palak Soup Recipe in Marathi
तयारीसाठी लागलेला वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
पालक सूप म्हणजे काय ?
पालक सूप हा पदार्थ आपण एक पौष्टिक पदार्थ म्हणून थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम पिऊ शकतो. पालक सूप बनवताना पालक मिक्सरवर फिरवून त्याचा घट्ट असा रस काढला जातो आणि मग त्याला तुपाची किंवा बटरची फोडणी दिली जाते आणि या फोडणीमध्ये आले लसून पेस्ट, मिरची कांदा हे साहित्य त्या सुपची चव वाढवण्यासाठी वापरले जातात.
- नक्की वाचा: टोमाटो सूप रेसिपी
पालक सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य – key ingredients
- पालकचा रस : पालक सूप बनवताना पालकचा रस हा एक महत्वाचा घटक आहे कारण हा पालकचा रस काढून त्याला आले – लसून, हिरवी मिरची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा याची फोडणी दिली जाते आणि फोडणीसाठी बटर किंवा तूप वापरले जाते.
- मिरची : या सूप मध्ये जर आपण हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली तर सूपला थोडी तिखट चव येते.
- आले – लसून : आले – लसून देखील पालक सूप बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे कारण सूप मध्ये जर आपण आले लसून घातले तर सूपला चांगला फ्लेवर आणि खमंग वास येतो.
पालक सूप रेसिपी हि आपण विशेषता थंडीच्या दिवसामध्ये बनवून खावू शकतो आणि हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनणारी रेसिपी आहे. चला तर मग पाहूयात पौष्टिक पालक सूप कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागलेला वेळ | १० ते १५ मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
जर तुम्ही पालक सूप बनवत असाल तर त्यासाठी बाजारातून आणलेला ताजा पालक वापरा तसेच हि रेसिपी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या, आले, लसून आणि इतर काही साहित्य लागते आणि थोडे साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग आता आपण पालक सूप बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- एक मोठा बाऊल निवडलेली पालक पाने.
- २ चमचे तांदळाचे किंवा हरभरा डाळीचे पीठ.
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- १ कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ चमचा हिरवी मिरची पेस्ट.
- २ ते ३ चमचे तूप.
- १/४ हिंग पावडर.
- २ चमचे फ्रेश क्रीम ( गार्निशिंगसाठी ).
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- काळी मिरी पावडर.
- नक्की वाचा: पालक पराठा रेसिपी
आता आपण वर दिलेले साहित्य वापरून पालक सूप कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
- पालक सूप बनवताना सर्वप्रथम पालक निवडून घ्या आणि मग तो गरम पाण्यामध्ये चांगला धुवून घ्या आणि परत स्वच्छ गार पाण्यामध्ये धुवून घ्या.
- त्यामधील पाणी काढून पालकची पाने मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि ते मिक्सरला एकदम बारीक फिरवा आणि मग त्यामध्ये २ वाटी पाणी घाला आणि ते परत फिरवा आणि मग ते मिश्रण गाळण्याच्या सहाय्याने गाळून त्याचा रस एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि रस खूप जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये आणखीन थोडे पाणी घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या आणि तो रस थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर एक खोलगट भांडे ठेवा आणि त्यामध्ये २ ते तीन चमचे तूप घाला आणि मग तूप गरम झाले कि त्यामध्ये सर्वप्रथम आले लसून पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घाला आणि ते काही सेकंद भाजा आता त्यामध्ये कांदा घाला आणि तो लालसर होईपर्यंत भाजा.
- कांद्या भाजताना आपल्याला थोडा वेळ मिळतो त्यावेळी पालकच्या २ चमचे तांदळाचे पीठ किंवा डाळीचे पीठ घाला आणि ते एकजीव करा.
- आता कांदा भाजल्यानंतर यामध्ये हिंग पावडर घाला आणि ती तेलामध्ये चांगली मिक्स करा. मग यामध्ये पालकचा रस घाला आणि सर्व मिश्रण चांगले मिक्स करा.
- आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालून घ्या आणि ते मिक्स करून त्याला एक उकळी आणा.
- तुमचा पालक सूप तयार झाला.
- गरमागर पालक सूप सर्विंग बाऊल मध्ये काढा आणि त्यावर थोडी फ्रेश क्रीम आणि मिरी पावडर टाकून सर्व्ह करा.
टिप्स ( Tips )
- तांदळाचे पीठ किंवा हरभरा डाळीचे पीठ आपण सूपला घट्टपणा येण्यासाठी वापरतो.
- तुम्हाला जर तिखट प्रमाण कमी हवे असेल तर या रेसिपी मध्ये दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी हिरवी मिरची वापरू शकता.
आम्ही दिलेल्या palak soup recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पालक सूप मराठी रेसिपी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या palak soup recipe for baby in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि diet palak soup recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये cream of palak soup Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट