pandav leni information in marathi पांडव लेणी माहिती, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्राचीन लेणी आहेत आणि त्यामधील एक म्हणजे पांडव लेणी आणि आज आपण या लेखामध्ये पांडव लेणी विषयी माहिती घेणार आहोत. पांडव लेणी हि एक प्राचीन लेणी आहे जी नाशिक या शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. ज्याला नाशिक लेणी किंवा पांडू लेणी या नावाने देखील ओळखले जाते. पांडव लेणी हि एक प्राचीन लेणी आहे म्हणजेच ती २५०० वर्षापूर्वीची असावी जी एका उंच टेकडीवर आहे.
आणि या टेकडीला त्रीरश्मी टेकडी म्हणून ओळखले जाते आणि हि लेणी पाली भाषेमध्ये लिहिलेली आपल्याला पहायला मिळते आहे. या ठिकाणी एकूण २४ गुफा आहेत आणि त्यामधील काही गुफा ह्या छोट्या आहेत तर काही गुफा ह्या आकाराने खूप मोठ्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला असंख्य अश्या दगडी खोल्या देखील पाहायला मिळतात.
आणि या दगडी खोल्यांचा वापर पूर्वीच्या काळामध्ये शिष्यांनी आपल्या वस्तगृहासाठी केला होता. हि लेणी महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाची आणि सर्वात जुन्या लेणींच्यापैकी एक आहे आणि या मध्ये अनेक छोट्या मोठ्या गुहा आहेत ज्या ठिकाणी गुरु शिष्यांची बेत होत होती तसेच शिष्यांना प्रवचन दिले जात होते, शिष्यांचे वसतिगृह आणि मठ म्हणून ह्या गुहा काम करत होत्या.
पांडव लेणी माहिती – Pandav Leni Information in Marathi
पांडव लेणी इतिहास – pandav leni history in marathi
आपल्यापैकी अनेकांना असे वाटते कि या लेणीचे नाव पांडव लेणी आहे त्यामुळे हि लेणी महाभारताशी संबधित असेल परंतु तसे नाही कारण ह्या लेणीचा कोणताही संबध महाभारताशी येत नाही. पांडव लेणी हि इसवी सन पूर्व पहिले शतक ते दुसरे शतक या काळामध्ये तयार केलेले आहे आणि या काळामध्ये या ठिकाणी एकूण ४० लेणी तयार केल्या होत्या आणि या सर्व लेणी बौध्द लेणी आहेत.
पांडव लेणी विषयी विशेष
या लेणी विषयी विशेष म्हणजे या लेणी दगडामध्ये कोरल्या आहेत आणि त्यावर नक्षीकाम केले आहे. त्याचबरोबर त्यामध्ये २४ गुहा आहेत आणि या मोठ्या आकाराच्या असणाऱ्या गुहांच्यामध्ये दगडी खोल्या आहेत. तसेच या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या प्रकारचे जलव्यवस्थापन पहायला मिळते.
त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या दगडामध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या या ठिकाणावरील मुख्य आकर्षणापैकी एक आहे. या गुहेमध्ये बुध्द आणि बोधिसत्वाच्या मूर्ती, राजा, शेतकरी, व्यापारी याचे प्रतिनिधित्व करणारी अनेक शिल्पे आणि इंडो ग्रीक स्थापत्यकलेतील सुंदर मिश्रण दर्शवणाऱ्या प्रतिमा या ठिकाणी पहायला मिळतात.
पांडव लेणी ह्या भात्य्क्या साधूंनी त्यांच्या निवासासाठी वापरलेल्या लेण्या आहेत आणि या ठिकाणी एकूण २४ लेणी आहेत आणि प्रत्येक लेणीमध्ये काही न काही महत्व आहे.
सर्वात सुंदर आणि आकर्षक लेणी म्हणजे क्रमांक ३, १०, १८ आणि २० आणि यामध्ये १८ वी लेणी चैत्य आहे जे मुळता एक मंदिर किंवा प्रार्थना गृह आहे आणि १० व्या क्रमांकाची लेणी देखील अतिशय सुंदर आणि भव्य आहे.
पांडव लेणीमधील गुहा
- पहिली गुहा : पहिल्या गुहेमध्ये अरुंद असा व्हरांडा आहे आणि समोरील खाम्बंच्यामध्ये चार स्थंभ असलेले आपल्याला पहायला मिळतात. या गुहेमध्ये कोणत्याही प्रकारचे शिलालेख नाहीत आणि हि गुहा एक अपूर्ण राहिलेली गुहा आहे.
- दुसरी गुहा : दुसरी गुहा हि एक लहान उत्खनन आहे म्हणजेच हि एक छोटीशी गुहा आहे.
- तिसरी गुहा : तिसरी गुहा हि पांडव लेणींच्यामधील एक महत्वाची गुहा आहे कारण हि यामधील सर्वात मोठी गुहा आहे आणि यामध्ये असंख्य महत्वापुरणे शिलालेख पहायला मिळतात.
- चौथी गुहा : लेणीच्यामधील चौथ्या क्रमांकाच्या गुहेमध्ये कोणतेही शिलालेख नाहीत आणि यामध्ये एक हत्तीवर स्वार असलेली महिला कोरली आहे.
- सहावी गुहा : या गुहेमध्ये व्यापारी लोकांच्या संबधित शिलालेख पहायला मिळतो.
- आठवी गुहा : या लेणींच्या संकुलामध्ये आठव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये मुगुडासा नावाच्या मच्छीमाराने दिलेल्या भेटीचे वर्णन करणारे शिल्प आहे.
- दहावी गुहा : दहावी गुहा हि अतिशय सुंदर आणि आकर्षक गुहा आहे आणि हि गुहा सिथियन वेस्टर्न क्षत्रप शासक नहपान याने बांधली आहे.
- चौदावी गुहा : हि देखील एक मोठी गुहा आहे आणि यामध्ये तीन कक्षांचा समावेश आहे आणि त्यामधीलएकामध्ये हमनकाचा शिलालेख पाहायला मिळतो.
- अठरावी गुहा : १८ वी लेणी चैत्य आहे जे मुळता एक मंदिर किंवा प्रार्थना गृह आहे आणि गुहेमध्ये असणाऱ्या चैत्याची उंची ६ फुट इतकी आहे.
पांडव लेणी विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- पांडवलेणी याला पांडू लेणी, जैन गुहा, तीर्थकर लेणी आणि पंच लेणी या नावांनी देखील ओळखले जाते आणि या लेणी विषयी असे म्हटले जाते कि हि लेणी २५०० वर्षापूर्वी जैन संतांनी खोदली होती.
- पांडव लेणींच्यामध्ये प्राचीन काळामध्ये नाशिक वर राज्य करणाऱ्या तीन घराण्यांची कथा आहे, ते म्हणजे सातवाहन, क्षत्रप आणि अभिर.
- पांडव लेणी हि त्रीरश्मी टेकडीवर आहे आणि या टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांची संख्या २०० इतकी आहे आणि या पायऱ्या चढून लेणी पर्यंत पोहचण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात.
- या लेणींमध्ये एकूण २४ ते २५ लेणींचा समूह आहे आणि या सर्व लेणी इसवी सन पूर्व दुसरे शतक ते पाचवे शतक मध्ये तयार केल्या आहेत.
- १८२३ मध्ये या लेणींचे दस्ताऐवजीकरण कॅप्टन जेम्स डेलामेण यांनी केले होते.
- पांडव लेण्यांच्यामध्ये महायान आणि बौध्द धर्मातील हीनयान पंथांची वस्ती असल्याने या ठिकाणी अनेक सुंदर अश्या कोरीव कामांचा चांगला संयोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
- पांडव लेणीला त्रीरश्मी बौध्द लेणी म्हणून देखील ओळखले जाते कारण हि त्रीरश्मी टेकडीवर आहे.
पांडव लेणी विषयी पर्यटकांच्यासाठी काही टिप्स – tips
- पांडवलेणी हि नाशिक शहरपासून खूप जवळ आहेत त्यामुळे तुम्ही हि लेणी पाहण्यासाठी नाशिकमधून टॅक्सी किंवा रिक्षा मधून जाऊ शकता.
- पांडव लेणी टेकडीवर आहे आणि टेकडीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
- पांडव लेणी हि पर्यटकांना पाहण्यासाठी सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० पर्यंत खुले असते.
- जरी या ठिकाणाला पर्यटक बारा महिने भेट देत असले तरी सप्टेंबर ते मार्च या कालावधी मध्ये या ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.
- त्रीरश्मी टेकडीवर चढण्यासाठी २० मिनिटे लागतात त्यामुळे ट्रेकिंगवेळ हा २० मिनिटे इतका आहे.
- पांडव लेणी पाहण्यासाठी कमीत कमी २ ते ३ तास लागतात.
- पांडव लेणी पाहण्यासाठी पर्यटकांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रवेश शुल्क आकारला जात नाही.
पांडव लेणी पर्यंत कसे पोहचायचे – how to reach
पांडव लेणी हे एक ऐतिहासिक आणि प्राचीन ठिकाण आहे आणि या ऐतिहासिक ठिकाणी अनेक लोक किंवा पर्यटक या ठिकाणाची सुंदरता पाहण्यासाठी येतात आणि जर पर्यटकांना हि लेणी पाहण्यासाठी यायचे असल्यास तुम्ही नाशिक या शहरामध्ये कोणत्याही शहरातून बसने, रेल्वेने किंवा विमानाने येऊ शकता.
कारण या तिन्हीही मार्गाने नाशिकला महाराष्ट्रातील प्रमुख शहरांनी चांगले जोडलेले आहे आणि तेथून टॅक्सी किंवा रिक्षा पकडून त्रीरश्मी टेकडीच्या पायथ्याशी पोहचू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमची स्वताची कार घेऊन जाणार असला तर नाशिकला इतर शहरांशी रस्ता मार्गाने देखील चांगले जोडलेले आहे.
त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वताच्या कारणे देखील जावू शकता आणि हे तुम्हाला सोयीस्कर ठरेल कारण तुम्ही आजूबाजूची इतर प्रेक्षणीय स्थळे देखील पाहू शकता.
आम्ही दिलेल्या pandav leni information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पांडव लेणी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pandav leni history in marathi या pandav leni information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information about pandav leni in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट