param vir chakra information in marathi – www paramvirchakra com in marathi परमवीर चक्र माहिती मराठी, आज आपण या लेखामध्ये परम वीर चक्र या विषय माहिती घेणार आहोत जे भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार म्हणून दिले जाते आणि हे अश्या सैनिकांना दिले जाते ज्यांनी युध्द काळामध्ये शौर्याचे काम केले असेल किंवा युध्दामध्ये अतुलनीय कामगिरी केली असेल तर हे परमवीर चक्र त्या संबधित सैनिकाला देऊन गौरविण्यात येते. परमवीर चक्र हा पुरस्कार देण्याची सुरुवात हि ऑगस्ट १९४७ पासून करण्यात आली होती आणि या पुरस्काराची स्थापना हि २६ जानेवारी १९५० मध्ये झाली होती.
परमवीर चक्र देण्याच्या सुरुवात हि भारत सरकारने केली आणि हा पुरस्कार सर्वप्रथम मेजर सोमनाथ शर्मा यांना मिळाला होता तसेच परम वीर चक्र हा अंतिम पुरस्कार कैप्टन विक्रम बत्रा यांना मिळाला होता. परम वीर चक्र हा पुरस्कार भारतीय सैन्यातील अश्या सैनिकांना दिला जातो ज्यांनी युध्दामध्ये शौर्य आणि धाडस दाखवले आहे आणि आजपर्यंत भारताने एकूण २१ परम वीर चक्र पुरस्कार दिले आहेत.
आणि त्यामधील एक हा भारतीय हवाई दलातील सैनिकाला मिळाला आहे आणि २० परम वीर चक्र पुरस्कार हे भारतीय लष्करी दलातील सैनिकांना मिळाले आहेत. परम वीर चक्र हे तिन्ही दलातील सैनिकांना मिळते म्हणजे हे भारतीय लष्कर सैन्यदल, भारतीय हवाई दल किंवा भारतीय नव दल यापैकी कोणत्याही सैनिकाने त्याच्या क्षेत्रामध्ये शौर्याचे काम केल्यास किंवा त्याने शत्रूविरुध्द धाडस दाखवले तर त्याला हा परम वीर चक्र पुरस्कार मिळू शकतो.
21 परमवीर चक्र माहिती मराठी – Param Vir Chakra Information in Marathi
पुरस्काराचे नाव | परम वीर चक्र |
कोणाला दिले जाते | सैन्य, हवाई किंवा नव दलातील सैनिकाने युध्दामध्ये शौर्याचे काम केल्यास त्याला हा पुरस्कार मिळतो. |
पुरस्काराची स्थापना | २६ जानेवारी १९५० |
प्रथम पुरस्कार विजेता | मेजर सोमनाथ शर्मा |
अंतिम पुरस्कार विजेता | कैप्टन विक्रम बत्रा |
परम वीर चक्राची रचना – structure
परम वीर चक्र पदके हे कास्य धातूपासून बनले आहे आणि हे पदक वर्तुळाकार आकाराचे असून ह्या परम वीर चक्राची रचना हि सावित्रीबाई खानोलकर यांनी बनवली आहे. परम वीर चक्राच्या समोरच्या बाजूला मध्यभागी राष्ट्रीय प्रतिक कोरलेले आहे आणि आणि या मध्य भागी कोरलेल्या चिन्हाच्या भोवती चार वज्राच्या प्रतिकृती आहेत तसेच या पदकाच्या पाठीमागे परम वीर चक्र हे नाव देवनागरी आणि इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे आणि दोन्हीच्या मधी कमळाच्या प्रतिकृती आहेत. अश्या प्रकारे परम वीर चक्राची रचना आहे.
परम वीर चक्र पुरस्कार घेण्यासाठी कोण पात्र आहे ?
- परम वीर चक्र पुरस्कार हा सैन्य, नौदल आणि हवाई दल, कोणत्याही राखीव दलाचे, प्रादेशिक सैन्याचे आणि इतर कोणत्याही कायदेशीर रित्या स्थापन केलेल्या सशस्त्र दलांचे अधिकारी, पुरुष आणि महिला हा पुरस्कार घेण्यासाठी पात्र आहेत.
- मॅट्रन्स, सिस्टर्स, नर्सेस आणि नर्सिंग सेवांचे कर्मचारी आणि रुग्णालये आणि नर्सिंग आणि नागरिक यांच्याशी संबधित इतर सेवा वरील पैकी कोणत्याही दलाचा आदेश, निर्देश किंवा देखरेखीखाली नियमितपणे किंवा तात्पुरत्या स्वरुपात सेवा देत आहेत अशी व्यक्ती.
परम वीर चक्र पुरस्कार पात्रता निकष – eligibility criteria
- भारतीय हवाई दल किंवा भारतीय वायू दल यापैकी कोणत्याही सैनिकाने त्याच्या क्षेत्रामध्ये शौर्याचे काम केल्यास किंवा त्याने शत्रूविरुध्द धाडस दाखवले तर त्याला हा परम वीर चक्र पुरस्कार मिळू शकतो.
- शत्रूच्या उपस्थितीमध्ये जमिनीवर, समुद्रामध्ये किंवा हवेमध्ये असो सर्वात स्पष्ट शौर्य किंवा काही साहसी किंवा पूर्व प्रसिध्द शौर्य किंवा आत्मबलिदानासाठी परम चक्र प्रदान केले जाते.
21 परमवीर चक्र विजेता – param vir chakra winners information in marathi
अ.क्र | प्राप्तकर्त्याचे नाव | आर्मी रँक | युनिटचे नाव | युध्द |
१. | सोमनाथ शर्मा | मेजर | कुमाऊँ रेजिमेंट | बडगमची लढाई |
२. | जदूनाथ सिंह | नाईक | राजपूत रेजिमेंट | १९४७ चे भारत पाकिस्थान युध्द |
३. | रामा राघोबा राणे | सेकंड लेफ्टनंट | बॉम्बे सॅपर्स | १९४७ चे भारत पाकिस्थान युध्द |
४. | पिरू सिंग | कंपनी हवालदार मेजर | राजपुताना रायफल्स | १९४७ चे भारत पाकिस्थान युध्द |
५. | करम सिंग | लान्स नाईक | शीख रेजिमेंट | १९४७ चे भारत पाकिस्थान युध्द |
६. | गुरबचन सिंग सलारिया | कॅप्टन | १ गोरखा रायफल्स | काँगोचे संकट |
७. | धनसिंग थापा | मेजर | ८ गोरखा रायफल्स | भारत चीन युध्द |
८. | जोगिंदर सिंग | सुभेदार | शीख रेजिमेंट | भारत चीन युध्द |
९. | शैतान सिंग | मेजर | कुमाऊँ रेजिमेंट | भारत चीन युध्द |
१०. | अब्दुल हमीद | कंपनी क्वार्टर मास्टर हवलदार | ग्रेनेडीअर्स | अस्सल उत्तराची लढाई |
११. | अर्देशीर तारापोर | लेफ्टनंट कर्नल | पुना घोडा | चाविन्दाची लढाई |
१२. | अल्बर्ट एक्का | लान्स नाईक | रक्षकांची ब्रिगेड | हिलीची लढाई |
१३. | निर्मल जितसिंग सेखो | फ्लाईंग ऑफिसर | क्रमांक १८ स्क्वॉडन आयएएफ | १९७१ चे भारत पाकिस्थान युध्द |
१४. | अरुण खेतरपाल | सेकंड लेफ्टनंट | पुना घोडा | बसंतरची लढाई |
१५. | होशियार सिंग दहिया | मेजर | ग्रेनेडीअर्स | बसंतरची लढाई |
१६. | बाणा सिंग | नायब सुभेदार | जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री | ऑपरेशन राजीव |
१७. | रामास्वामी परमेश्वरन | मेजर | महार रेजिमेंट | ऑपरेशन पवन |
१८. | मनोजकुमार पांडे | लेफ्टनंट | ११ गोरख रायफल्स | ऑपरेशन विजय |
१९. | योगेंद्र सिंह यादव | ग्रेनेडीअर | ग्रेनेडीअर्स | टायगर हिलची लढाई |
२०. | संजय कुमार | रायफलमॅन | जम्मू आणि काश्मीर रायफल्स | कारगिल युध्द |
२१. | विक्रम बत्रा | कॅप्टन | जम्मू आणि काश्मीर रायफल्स | ऑपरेशन रायफल्स |
परम वीर चक्र विषयी महत्वाची माहिती – information about param vir chakra in marathi
- परमवीर चक्र हा पुरस्कार देण्याची सुरुवात हि ऑगस्ट १९४७ पासून करण्यात आली होती आणि या पुरस्काराची स्थापना हि २६ जानेवारी १९५० मध्ये झाली होती.
- भारतीय हवाई दल किंवा भारतीय वायू दल यापैकी कोणत्याही सैनिकाने त्याच्या क्षेत्रामध्ये शौर्याचे काम केल्यास किंवा त्याने शत्रूविरुध्द धाडस दाखवले तर त्याला हा परम वीर चक्र पुरस्कार मिळू शकतो.
- हा पुरस्कार सर्वप्रथम मेजर सोमनाथ शर्मा यांना मिळाला होता तसेच परम वीर चक्र हा अंतिम पुरस्कार कैप्टन विक्रम बत्रा यांना मिळाला होता.
- परमवीर चक्र विजेत्यांना रोक भत्ता असतो.
- परमवीर चक्राची रचना हि सावित्रीबाई खानोलकर यांनी केली.
- परम वीर चक्र हे पदक कास्य धातूपासून बनले आहे आणि या पदकाच्या मध्यभागी राष्ट्रीय प्रतिक आणि त्याच्या बाजूने चार वज्राच्या प्रतिकृती कोरल्या आहेत आणि पाठीमागे परम वीर चक्र असे देवनागरी आणि इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे आणि या दोन्हीच्या मधी कमळ कोरले आहे.
- दुसऱ्यावेळी परमवीर चक्र प्रदान केले जाण्याची आणि पुरस्कार प्राप्त करणाऱ्याला रीबँडवर बार घालण्याची तरतूद आहे.
- ज्यावेळी मेजर सोमनाथ शर्मा यांनी ३ नोव्हेंबर १९४७ रोजी काश्मीरमध्ये प्राण दिले तेंव्हा हे पदक प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हते. भारत प्रजासत्ताक झाल्याच्या दिवशी २६ जानेवारी १९५० रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी हे पदक सादर केले होते, परंतु १५ ऑगस्ट १९४७ पासून लागू झाले.
आम्ही दिलेल्या param vir chakra information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर परमवीर चक्र माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या www paramvirchakra com in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि 21 param vir chakra winners information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट