pavan khind information in marathi – pavan khind history in marathi पावनखिंड माहिती मराठी, पावनखिंड या ठिकाणा विषयी कोणाला माहित नाही तर या ठिकाणा विषयी सर्वांना माहित आहे ज्या ठिकाणी बाजी प्रभू यांनी स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती ते ठिकाण म्हणजे पावनखिंड आणि आज आपण या लेखामध्ये पावनखिंड या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. हे ठिकाण कोल्हापूर शहराजवळ विशाळगड या परिसरामध्ये डोंगरामध्ये हि खिंड आहे आणि या खिंडीशी मराठ्यांचा इतिहास जोडलेला आहे.
पावन खिंडीची लढाई हि मराठा रक्षकांची लढाई होती जी १३ जुलै १६६० मध्ये मराठा सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि सिध्दी जोहर यांच्यामध्ये विशाळगड परिसरामध्ये डोंगराच्या खिंडीमध्ये झाली होती. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळा किल्ल्यावर होती त्यावेळी सिध्दी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला होता आणि त्यावेळी शिवाजी महाराज सिध्दी जोहराला चुकवून विशाळगड कडे निघाले होते.
त्यावेळी तो त्यांच्या पाठलाग करत विशाळगड परिसरातील डोंगरामधील खिंडी जवळ आला आणि त्यावेळी त्या ठिकाणी सिध्दी जोहरला त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांनी रोखले आणि छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित पणे विशाळगड वर पोहचले परंतु बाजी प्रभू यांचे सिध्दी जोहरशी लढताना प्राण गेले आणि हे प्राण त्या खिंडीमधेच गेले म्हणून त्या खिंडीला पावन खिंड असे नाव पडले आहे आणि पूर्वी पावन खिंडीचे मुल नाव हे घोर खिंड असे होते.
पावनखिंड माहिती मराठी – Pavan Khind Information in Marathi
पावन खिंड आणि बाजी प्रभू यांचा इतिहास – pavan khind history in marathi
१६५६ ते १६७२ या कालावधी मध्ये पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी विजापूरचा दुसऱ्या आदिल शहाने सिध्दी जोहर सोबत आपले सैन्य पाठवले. सिध्दी जोहरने १ मार्च १६६० मध्ये पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला हा वेढा त्याने सलग ४ महिने घातला होता. सिध्दी जोहर काही केल्या मागे हटण्यास तयार न्हवता म्हणून शिवाजी महाराजांनी असे ठरवले कि या गडावरून विशाळगडावर जाने सुरक्षेचे ठरेल आणि त्यांनी काही सैनिक जमवले त्यांमध्ये बाजी प्रभू देशपांडे आणि शिवा काशीद देखील होते.
छत्रपती शिवाजी महाराज एका रात्री मुसळधार पाऊस पडत असताना ते पन्हाळगडावरून सुटले. त्यावेळी शिवा काशीद हे थोडेफार शिवाजी महाराजांसारखे दिसत असल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांचे सोंग घेतले आणि सिध्दी जोहराला त्यामध्ये गुंतवून ठेवले आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना पळून जाण्यासाठी वेळ मिळाला.
पण सिध्दी जोहराला हे शिवाजी महाराज नाहीत तर त्याचे सोंग घेतलेला शिवा काशीद आहे हे समजताच त्यांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्याचे ठरवले पण तिकडे शिवा काशीदला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती.
सिध्दी जोहर शिवाजी महाराजांचा पाठलाग करत असताना त्याला पावनखिंडी जवळ “लाख मेले तरी चालतील पण लोकांचा पोशिंदा जगला पाहिजे” असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे यांनी त्याला तेथे रोखले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहचले तो दिवस होता १३ जुलै १६६० हा होता. इकडे पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे सिध्दी जोहरशी दोन हातामध्ये दोन तलवारी घेऊन लढत असताना तेथेच धारातीर्थ झाले.
पावन खिंडीची लढाई – pavankhind story in marathi
ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळा किल्ल्यावर होती त्यावेळी सिध्दी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला होता आणि त्यावेळी शिवाजी महाराज सिध्दी जोहराला चुकवून विशाळगड कडे निघाले होते त्यावेळी तो त्यांच्या पाठलाग करत विशाळगड परिसरातील डोंगरामधील खिंडी जवळ आला आणि त्यावेळी त्या ठिकाणी सिध्दी जोहरला त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे यांनी रोखले आणि छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित पणे विशाळगड वर पोहचले परंतु बाजी प्रभू यांचे सिध्दी जोहरशी लढत होते.
आणि सिध्दी जोहर कडे जास्त सैनिक होते म्हणजेच त्यांच्याकडे १०००० पेक्षा अधिक सैन्य फौज होती आणि बाजी प्रभू यांची सैन्य फौजेमध्ये ६०० सैनिक होते आणि पावन खिंडी पर्यंत आल्यानंतर असा निर्णय घेतला कि ३०० सैनिक हे बाजी पप्रभू यांच्या सोबत खिंडीमध्ये लढतील आणि ३०० सैनिक आपल्या सोबत विशाळगडावर येतील.
बाजी प्रभू यांना सिध्दी जोहराला खिंडी मध्ये रोखण्यास यश मिळाले आणि या सैन्यामध्ये बाजी प्रभू यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे आणि शाम्भूसिंग जाधव हे देखील होते पण ते प्रखर प्रतिकारानंतर खाली पडले आणि बाजी प्रभू देखील गंभीर जखमी झाले होते परंतु ते तसेच दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन सिध्दी जोहरशी लढत होती आणि सिध्दी जोहरशी लढता लढता त्यांचे प्राण गेले.
पावन खिंड चित्रपट – movie
बाजी प्रभू देशपांडे यांची शौर्याची गाथा तसेच त्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या प्राणाची आहुती जगासमोर आणण्यासाठी आणि लोकांना पावनखिंडीचा इतिहास समजण्यासाठी पावन खिंडी हा मराठी चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रदर्शित झाला आणि तो लोकांच्या पसंतीस देखील उतरला आणि या चित्रपटामुळे पावन खिंडीचा इतिहास सर्वांना समजला.
पावन खिंड कोठे आहे ?
पावन खिंड हा परिसर कोल्हापूर आणि कोकण या सीमेवर येतो. हे ठिकाण कोल्हापूर शहराजवळ विशाळगड या परिसरामध्ये डोंगरामध्ये हि खिंड आहे आणि या खिंडीचे मूळ नाव घोर खिंड असे होते.
पावन खिंड या ठिकाणी कसे जायचे – how to reach
पुणे या शहरातून पावन खिंड या ठिकाणी जाण्यासाठी पुणे राष्ट्रीय महामार्ग ४ – सातारा – कराड – पाचवड फाटा – कोकरूड – मलकापूर – आंबा घाट – आंबा घाटातून डावीकडे – पावन खिंड मलकापूरहून पांढरेपाणी मार्गे पावन खिंड असा थेट मार्ग आहे.
आम्ही दिलेल्या pavan khind information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पावनखिंड माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pavankhind story in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि pavan khind history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट