फोंडा घाट माहिती Phondaghat Information in Marathi

phondaghat information in marathi फोंडा घाट माहिती, भारत देश हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे आणि भारतामध्ये अशी प्रत्येक राज्यामध्ये अनेक नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे आहेत आणि तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये तर सह्याद्री डोंगर रांगा हे एक मुख्य आकर्षण आहे आणि या ठिकाणी अनेक लोक किल्ले, घाट, घाटातील धबधबे, जंगले असे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी येतात. आणि आज आपण असाच एक सुंदर आणि सगळीकडे हिरवळ असणारा फोंडाघाट या विषयी आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत.

नैसर्गिक सुंदरता असणारे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा फोंडा घाट हा सिंधूदुर्ग जिल्ह्यातील एक घाट आहे आणि तो पर्यटन स्थळासाठी खूप प्रसिध्द आहे आणि या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी लोकांची खूप गर्दी असते. फोंडा घाटामधून जाताना आपल्याला अनेक छोटे मोठे असे धबधबे दिसतात.

तसेच निसर्ग सौंदर्य पाहण्यास मिळते जे आपल्या डोळ्याचे पारणे फेडते. घाटामधून उंचीवरून पडणारे धबधबे, रस्त्यावर छत असल्यासारखी असणारी झाडे किंवा जंगले, हिरव्यागार आणि खोल दऱ्या, घाटातील उंच उंच कडा तसेच घाटामधून  दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या सर्व गोष्टी पर्यटकांना भुरळ पडतात.

phondaghat information in marathi
phondaghat information in marathi

फोंडा घाट माहिती – Phondaghat Information in Marathi

घाटाचे नावफोंडा घाट
ठिकाणीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये
क्षेत्रफळ४२०४ हेक्टर
जवळची शहरराधानगरी, सावंतवाडी आणि देवगड

फोंडाघाट विषयी महत्वाची माहिती -phondaghat wikipedia in marathi

१८२० च्या काळामध्ये इंग्रज सैनिकांची एक तुकडी या घाटामधूनच सावंतवाडी या ठिकाणी गेले होते असे काही इतिहास कार म्हणतात आणि म्हणून हा एक प्राचीन किंवा खूप जुना घात म्हणून ओळखले जाते. या घाटाजवळ एक गाव आहे त्या गावाचे नाव फोंडा असे आहे आणि या गावाच्या नावावरूनच या घाटाचे नाव देखील फोंडा असे ठेवले आहे आणि हा घाट राधानगरी या मुख्य शहरापासून ४६ ते ४७ किलोमीटर अनंतरावर आहे.

पश्चिम महाराष्ट्राला कोकण भागाशी जोडणारा घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोंडाघाट हा अनेक प्राणी आणि पक्ष्यांनी समृध्द आहे त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक वनस्पती देखील आहे आणि त्यामधील काही औषधी वनस्पती देखील या घाटामध्ये सापडतात आणि अश्या नैसर्गिक संपत्तीने समृध्द असा आहे फोंडाघाट.

फोंडाघाट हा पूर्वेकडे राधानगरी तालुका, दक्षिणेकडे कणकवली तालुका, उत्तरेकडे गगन बावडा आणि पश्चिमेकडे ओरस तालुक्याने वेढलेला आहे तसेच या घाटाजवळ आणि गावाजवळ वैभववाडी, घोणसरी, करंजे आणि करूळ हि जवळची गावे आहेत.

फोंडाघाट कोठे आहे ?

फोंडाघाट हा महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये फोंडा या गावाजवळ आहे आणि या घाटाजवळून कणकवली तहसीलदार कार्यालय हे २० किलो मीटर अंतरावर आहे.

फोंडाघाट जवळ असणारी प्रेक्षणीय स्थळे – tourist places near ghat

फोंडाघाट हा निसर्ग सौंदर्याने नटलेला एक घाट असून या घाटाजवळ अनेक पर्यटक ठिकाणे आहेत ती कोणती आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

  • दाजीपुर अभयारण्य : दाजीपुर अभयारण्य हे राधानगरी तालुक्यातील एक अभयारण्य असून हे सर्वात घनदाट जंगलांच्यापैकी एक मानले जाते आणि हे फोंडाघाटापासून ३२ किलो मीटर अंतरावर आहे.
  • हसणे धबधबा : हसणे धबधबा हा फोंडाघाटाजवळ असणारा एक धबधबा आहे आणि याला आपण लपलेले निसर्ग सौंदर्य म्हणून ओळखू शकतो कारण हे कमी ज्ञान असलेले एक सुंदर ठिकाण आहे आणि कमी ज्ञात असल्यामुळे ह्या ठिकाणी गर्दी देखील नसते त्यामुळे या ठिकाणी शांत वातावरण मिळण्यासाठी चांगले आहे.
  • शिवगड किल्ला : किल्ले हे  महाराष्ट्राची शान आहेत आणि कोकण भागामध्ये देखील आपल्याला अनेक किल्ले पाहायला मिळतात आणि शिवगड किल्ला देखील आहे आणि हा किल्ला दाजीपुर अभयारण्यामध्ये आहे त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी तुन्हाला वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक असते आणि हे फोंडाघाटापासून ३० ते ३२ किलो मीटर अंतरावर आहे.
  • फोंडाघाट व्ह्यू पॉइंट : घाटामधून उंचीवरून पडणारे धबधबे, रस्त्यावर छत असल्यासारखी असणारी झाडे किंवा जंगले, हिरव्यागार आणि खोल दऱ्या, घाटातील उंच उंच कडा तसेच घाटामधून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त हि घाटातील व्ह्यू पॉइंट आहेत.

फोंडाघाट विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • फोंडाघाट हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या सीमेवर आहे.
  • राजापूर हे फोंडाघाटापासून जवळचे शहर आहे आणि हे ४० ते ४४ किलो मीटर अंतरावर आहे.
  • फोंडाघाट या शहराजवळील सर्वात जवळची शहरे म्हटली तर या शहराजवळ देवगड (५० किलो मीटर), सावंतवाडी (५७ किलो मीटर), कोल्हापूर (६४ किलो मीटर) आणि निपाणी (६९ किलो मीटर) हि शहरे आहेत.
  • फोंडाघाटाचे एकूण क्षेत्रफळ हे ४२०४ हेक्टर इतके आहे.

फोंडाघाटला कसे जायचे – how to reach

रस्त्याने

राजापूर हे फोंडा घाटापासून जवळचे शहर आहे आणि आणि ह्या शहरातून फोंडाघाटाला चांगल्या रस्त्याने जोडलेले आहे त्यामुळे पर्यटक आपली स्वताची कार किंवा दुचाकी घेवून फोंडाघाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी जाऊ शकता.

रेल्वेने

नानेगाव रोड रेल्वे स्टेशन हे फोंडाघाट जवळचे रेल्वे स्टेशन आहे तसेच रत्नागिरी रेल्वे स्टेशन देखील फोंडा घाटापासून १४ किलो मीटर अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही या पैकी कोणत्याही रेल्वे स्टेशनवर उतरून तेथून तुम्ही फोंडाघाट पाहण्यासाठी टक्सी किंवा कॅब घेऊन जाऊ शकता.

आम्ही दिलेल्या phondaghat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर फोंडा घाट माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Phondaghat information in marathi wikipedia या phondaghat wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about phondaghat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!